रामटेक ( तालूका प्रतिनिधी ):
रामटेक शहरात व परीसरात मागिल चार पाच दिवसापासुन मोठाप्रमाणात चोरीच्यां घटना होत अाहे. गडमंदिर परीसरातील जवळपास पन्नास दुकानाची चोरी या चार दिवसात झाली असुन. शनिवारच्या मध्यराञी पुन्हा अंबाळा तिर्थक्षेञ येथे
दहा दुकानात चोरी एकूण १८,४५० रुपये रोख रक्कमेची चोरी केली.घटनेची माहीती मिळताच माजी आमदार अाशिष जयस्वाल व नगरसेवक सुमित कोठारी यांनी घटना स्थळी भेट दिली.
१) रमाबाई सुखदेव गलबले - ४,०००
२ ) शालु रामभाउ आगाशे ५,०००
३ ) राजेश सुखदेव गलबले - ६५०
४ ) अकुंश रामराव कठौते -२५०
५ ) बबन छोटु भारती - १८००
६ ) बबीता विरसिंग पवार - ६००
७ ) प्रमोद प्रभाकर वाघ - ४५००
८ ) विजय राजाराम कोहळे - १५०
९ ) चंदन लक्ष्मण चौव्हान - १०००
१०) गिता जगतसिंग कछवा यांच्या दुकानातील लाॅक तोडले या प्रकरणी ३७९ अन्वेय गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरिक्षक दिपक वंजारी पी.एस.आय.मुत्येपोड,पी.एस.आय . सरकटे पुढिल तपास करीत अाहे.