সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 30, 2015

आगरझरी च्या जंगलात आढळला दुर्मिळ वन पिंगळा

आगरझरी च्या जंगलात आढळला दुर्मिळ वन पिंगळा

आगरझरी जंगल परिसरात उंच झाडावर खूप लहान घुबड बसून होत त्याचे फोटो घेतल्यानंतर लक्षात आल कि हा,वन पिंगळा असून दुर्मिळ घुबड असल्याचे लक्षात आले,वन्यजीव निरीक्षक दिनेश खाटे ,अभिषेक येरगुडे,वनदीप रोडे, जंगल भ्रम्हंती करत असतांना हा दुर्मिळ वन पिंगळा आढळून आला
वन पिंगळा हि भारतात आढळणारी घुबडाची एक दुर्मिळ जात आहे. याचे शास्त्रीय नाव ग्लौसिडियम रेडियाटम. हि प्रजाती अनेकदा जोड्या किंवा लहान गटांमध्ये, एकटयाने आढळते आणि सहसा पहाट आणि तिन्हीसांजा त्यांचा प्रती-आवाज आपणास जंगलात ऐकू येतो . भारतात वनपिंगळाच्या दोन उप प्रजाती आहेत. वन पिंगळाचे डोके गोल असून छातीवर तपकिरी पट्टे आढळतात आणि पंख काळसर आहेत आणि शेपूट नीट निरखून पांढरा-तपकिरी पट्टे असतात. हि जात सामान्यतः दाट जंगलांमध्ये आढळून येते पुष्कळदा चुकीने हिला अतिदुर्मिळ रानपिंगळा (फोरेस्ट आऊलेट) म्हणून संबोधिले जाते . उंदीर, साप, सरडे, पाली हे वनपिंगळाचे मुख्य खाद्य आहे.
झपाट्याने जंगल तोडी मूळे वन पिंगळा चे अधिवास नष्ट होत आहे,त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे,अश्या दुर्मिळ जातीचे घुबड कालांतरानंतर नष्ट होईल अशी वेळ येऊ नये यासाठी वनविभागाने त्याच्या अधिवासांचे रक्षण कारण गरजेचे आहे.
महीलांनी केला दारूमुक्ती निर्धार -

महीलांनी केला दारूमुक्ती निर्धार -

 महात्मा गांधी पुण्यतिथीदिनी दारूमुक्तीची शपथ

सावली - महात्मा गाधी यांचे पुण्यतिथीदिनी श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यांनी दारूबंदी करणा-या पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार व महाराष्ट शासनाचे आभार मानित दारूबंदीनंतर दारूमुक्तीसाठी शपथ घेत दारूमुक्तीचा निर्धार जल्लोषात केला

Sunday, January 25, 2015

वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या दोघांना अटक

वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या दोघांना अटक

चंद्रपूर, वन्यप्राण्यांची शिकार करून मांस खाणार्‍या दोन शिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. शिकार्‍यांकडून बंदूक, कुर्‍हाड, सुरी व सांगाडे जप्त करण्यात आले असून, ही कारवाई सावली वनविभागाने केली. आरोपींमध्ये शामराव हिरामन मोटघरे (रा. आकापूर) व अन्य एका साथीदाराचा समावेश आहे.

Wednesday, January 21, 2015

Tuesday, January 20, 2015

चंद्रपूर दारुबंदी आंदोलन

चंद्रपूर दारुबंदी आंदोलन


New post on kavyashilp

चंद्रपूर दारुबंदी आंदोलन

by काव्यशिल्प
5 जून 2010 ते 20 जानेवारी 2015 चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीची मागणी गेल्या साडेचार वर्षांपासून खदखदत आहे. 5 जून 2010 पासून सुरू झालेल्या या आंदोलनाला आता 20 जानवोरी 2015 रोजी यशस्वी रूप आले. आता ही दारुबंदी प्रत्यक्षात एक एप्रिलपासून होत आहे. पदयात्रा, रस्ता रोको, जेलभरो इतकेच काय तर महिलांचे मुंडण हे या आंदोलनाचे महत्त्वाचे ठप्पे ठरलेत. […]
काव्यशिल्प | जानेवारी 20, 2015 at 10:55 सकाळी | Categories: खाद्य | URL: http://wp.me/p2W00x-1T
Comment   See all comments   Like
Thanks for flying with  WordPress.com

Wednesday, January 14, 2015

 सुरेश चोपणे

सुरेश चोपणे

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान समितीच्या सदस्यपदी सुरेश चोपणे

चंद्रपूर : येथील खगोप, पर्यावरण क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत प्रा. सुरेश चोपणे यांची केंद्र सरकारने, केंद्रीय केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली.

Tuesday, January 13, 2015

चांडक मेडिकलला आग; ५० लाखांचे नुकसान

चांडक मेडिकलला आग; ५० लाखांचे नुकसान

चंद्रपूर, - जटपूरा गेट लगत चांडक मेडीकलमध्ये मंगळवार, १३ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीच ५० लाखांची औषधी व उपकरणे जळून खाक झाली. ही आग शॉर्टसक्रिटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील मुख्य गांधी चौक ते जटपूरा गेट मार्गावर चांडक मेडिकल आहे. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मेडीकल उघडण्याच्या अगोदर अचानक या दुकानाला आग लागली. आगीची माहिती मिळताच संचालक मोहन चांडक यांनी दुकानाकडे धाव घेतली व महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलालासुद्धा माहिती दिली. मात्र, तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अवघ्या एक ते दिड तासात ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आले. मात्र, तोपर्यंत मेडिकलमधील ५० लाखांच्या वर औषध जळून खाक झाले होते. चांडक मेडिकल हे शहरातील सर्वात जुने व मोठे मेडिकल आहे. त्यामुळे या मेडिकलच्या दुकानात औषधांचा साठासुद्धा भरपूर प्रमाणात असतो. तसेच जिल्हाभरातील रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, आरोग्य विभाग, महानगरपालिकेला सुद्धा औषध पुरवठा केला जातो. त्यामुळे दुकानातील दुसरा मजल्यावर सर्वत्र औषधांचा साठा आहे. या आगीत हा सर्व साठा तसेच वैद्यकीय उपकरणे जळून खाक झाली. या आगीत किमान ५० लाखांची औषधी जळून खाक झाल्याची माहिती चांडक यांनी दिली
बंडू धोतरे राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानित

बंडू धोतरे राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानित

चंद्रपूर - येथील इको-प्रोचे अध्यक्ष  बंडू धोतरे यांना केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानित करण्यात आले.
आसामची राजधानी गुवाहाटी येथील नेहरू स्टेडियमवर 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकांनद जयंती निमित्त  युवादिनी 19 राष्टीय युवा महोत्सव या पुरस्काराचे वितरण  झाले. यावेळी गृहमंत्री राजनाथसिंह, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या हस्ते,  केंद्रीय युवा कार्य, खेळ राज्यमंत्री  (स्वतंत्र प्रभार) श्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.  भविष्यात उद्‌भवणाऱ्या
देशातील सर्वाधिक प्रदूषणासाठी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला विपुल वनसंपदा लाभली आहे. येथे वन्यजीव मोठ्या संख्येने मुक्त संचार करतात. मात्र, त्यांच्या संरक्षणाला मानवीकृतीचा धोका पोहोचत आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासह पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होणारी मानवी हानी टाळण्यासाठी धोतरे यांनी इको-प्रो नामक संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून वन्यजीवांचे रक्षण, पर्यावरण, ऐतिहासिक स्थळांचे जतन, नगर संरक्षणासाठी युवकांची फौज तयार केली. सैन्य दलासारखा पॅन्ट आणि हिरव्या रंगाची कॉलर असलेली सफेद टी-शर्ट असा या कार्यकर्त्यांचा गणवेश असतो. साप असो की वाघ, मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या हिंस्र जीवांना स्वत:चे जीव धोक्‍यात घालून जीवनदान देण्याचे काम इको-प्रोचे कार्यकर्ते करीत आहेत.
ताडोबा अभयारण्याजवळील अदानी प्रकल्पविरोधी आंदोलनामुळे धोतरेंचे कार्य देशपातळीवर पोहोचले. त्याला शहरातील अन्य संघटना आणि नागरिकांनी दिलेली साथ महत्त्वाची होती. अदानीविरुद्ध 25 जुलै 2009 ला बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. तेव्हा मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंग यांनी भेट देऊन कौतुक केले होते. धोतरे यांनी वन्यजीवांच्या प्रश्नासह रेल्वे मालधक्का, धूळप्रदूषण, बाबूपेठ उड्डाणपूल, चंद्रपूरला व्याघ्र जिल्ह्याची मागणी यासारख्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचा पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हस्ते "संघर्ष सन्मान पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. 21 एप्रिल 2014 रोजी बल्लारपूर येथे एका गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी राबविलेल्या रेस्कू ऑपरेशनदरम्यान बंडू धोतरे थोडक्‍यात बचावले होते. जीव धोक्‍यात घालून वन्यजीवांच्या रक्षणासाठीचे त्यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
समस्यांची जाणीव ठेवून वन व वन्यजीवांचे संरक्षण, प्रदूषणाचा विरोध, ऐतिहासिक वास्तूंचे जतन यासाठी झटणारा तरुण कार्यकर्ता म्हणजे बंडू धोतरे. चंद्रपूर जिल्ह्यातील अदानी प्रकल्पाचा कडाडून विरोध केल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या बंडू धोतरेंच्या गत 12-13 वर्षांतील प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने त्यांची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड केली.

Sunday, January 11, 2015

बंडू धोतरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

बंडू धोतरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी चंद्रपूर येथील इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांची निवड झाली आहे. आसामची राजधानी गुवाहाटी येथील नेहरू स्टेडियमवर 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकांनद जयंती निमित्त होणाऱ्या युवादिनी 19 राष्टीय युवा महोत्सव या पुरस्काराचे वितरण होत आहे. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या हस्ते, केंद्रीय युवा कार्य, खेळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत सत्कार होईल. बंडू धोतरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीवांच्या रक्षणासह पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कार्य केले आहे. 
बल्लारपूर येथील बिबट रेस्क्यु आॅपरेशन 

एक थरारक अनुभव

बल्लारपूर येथे घडलेला प्रसंग आयुष्यात नेहमीच स्मरत राहील असाच होता. तो दिवस. तिथला प्रसंग. तो थरार सुदैवानं मी बचावाल्यामुळ आपणाशी अनुभव कथन करीत आहे. वाचण्यासाठी क्लिक करा
- बंडू धोतरे

- बंडू धोतरे

Thursday, January 08, 2015

लाच प्रकरणी तिघांना पकडले

लाच प्रकरणी तिघांना पकडले


नागपूर,: प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्‍यक गुण देण्याकरिता रामटेक येथील समर्थ हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजच्या तांत्रिक निदेशक प्रशांत राम येळणे यास विद्यार्थ्याकडून एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आले. विनापरवानगीने माती खोदकाम केल्यामुळे कारवाईची धमकी देऊन शेतमालकाकडून साडेबारा हजारांची लाच घेणाऱ्या मौदा तहसील कार्यालयातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. अरुण महादेव सुटे (वय 47), सुधाकर डी. राठोड (वय 48) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

Wednesday, January 07, 2015

Tuesday, January 06, 2015

भाजपच्या प्रदेशाद्याक्ष पदी रावसाहेब पाटील दानवे

भाजपच्या प्रदेशाद्याक्ष पदी रावसाहेब पाटील दानवे

DSC_1872.JPG प्रदर्शित करत आहे
रावसाहेब पाटील दानवे
मुळगाव जवखेडा ता. भोकरदन जिल्हा जालना.  
मूळ व्यवसाय शेती, जवखेडा मुळगावी संपूर्ण एकत्र कुटुंब.

मुलाने केली आईची हत्या

मुलाने केली आईची हत्या

पोंभुर्णा - तालुक्यातील चकठाणा येथे मुलाने जन्मदात्या आईलाच ठार केल्याची घटना मंगळवार, ६ जानेवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.गंगाधर गजानन गौरकर (३५) आणि त्याची आई शकुंतला गजानन गौरकर (६५) यांच्यामध्ये मंगळवारी सकाळी ९ वाजता किरकोळ स्वरूपाचे भांडण झाले. भांडणातच गंगाधरने आई शकुंतला हिच्या डोक्यावर काठीने वार केले. गंभीर दुखापतीमुळे शकुंतला जागेवरच गतप्राण झाली.
कोळसा कामगारांच्या  संपाने  ३० कोटींचे नुकसान

कोळसा कामगारांच्या संपाने ३० कोटींचे नुकसान




चंद्रपूर- जिल्ह्यातील कोळसा कंपन्यांच्या कामगारांनी मंगळवारपासून संप पुकारल्याने वेकोलिची उत्पादन प्रक्रिया ठप्प पडली. या संपामुळे दिवसभर जिल्ह्यातील ३० कोळसा खाणींचे उत्पादन बंद झाले असून, वेकोलिचे जवळपास ३० कोटी, तर कोल इंडियाच्या जवळपास २०० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

शासनाच्या कोळसा खाणीतील कामगार विरोधी धोरण व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी देशभरात कामगार संघटनांच्या वतीने संप पुकारला आहे. देशपातळीवर संघटनांना प्रतिसाद देत जिल्ह्यातील पाचही मान्यताप्रात कामगार संघटना संपात सहभागी झाल्या.
लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : अहिर

लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : अहिर




चंद्रपूर, -देशात लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका मोलाची असते, असे प्रतिपादन केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास, बंडू लडके, बबन बांगडे व विनोदसिंह ठाकूर उपस्थित होते.

Sunday, January 04, 2015

 पारशिवनी

पारशिवनी

पूर्वी पारशिवनीचे नाव शिवनी असे होते. मात्र, येथे येण्याकरिता कन्हान व पेंच या दोन नद्यांचे पात्र पार करून यावे लागायचे. त्यामुळे शिवनी या गावाला पारशिवनी असे नाव पडले. आधी पारशिवनी हे गाव वनशिंगी येथे होते. जेथे सध्या पारशिवनी शहर वसले आहे. ती जागा बाकाबाई भोसले यांच्याकडून मालगुजार बाजीराव पाटील यांनी 100 रुपयांत घेतली होती. कालांतराने येथे या गावाला स्थलांतरित करण्यात आले.
"हातमाग' बंद  सिर्सीला हवाय रोजगार

"हातमाग' बंद सिर्सीला हवाय रोजगार

"हातमाग' बंद
सिर्सीला हवाय रोजगार

श्रीमंत सिर्सीला विकासाची प्रतीक्षा
जिनिंग, प्रेसिंग व हातमाग व्यवसाय सर्व दूर प्रसिद्ध असलेले सिर्सी गाव. मात्र, हे उद्योग आता बंद झाल्याने गावातील नागरिकांचा पारंपरिक व्यवसाय हिरावला. त्यामुळे बेरोजगारीची फौज निर्माण झाली आहे. उमरेड तालुक्‍यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी ओळख आता पुसली गेली आहे. प्रगतिशील शेतकरी संघटनेने 1989 मध्ये गावात जिनिंग-प्रेसिंग मिल व हातमाग व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. परंतु, कालांतराने हे दोन्ही व्यवसाय बंद पडले. यामुळे गावात मोठ्या संख्येत असलेला भूमिहीन कोष्टी समाज बेरोजगार झाला. त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी गावात कला-वाणिज्य महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी हातमाग व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही, हीच शोकांतिका आहे.
मृत्यूचे प्रवेशद्वार कोंढाळी

मृत्यूचे प्रवेशद्वार कोंढाळी

औद्योगिकीकरण झाले; आता हवाय स्थानिक विकास

नागपूरपासून अवघ्या 48 किलोमीटरवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंढाळी गाव आहे. औद्योगिकदृष्ट्या कोंढाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात जडवाहतूक चालते. दिवसेंदिवस महामार्गालगत दोन्ही बाजूंनी वाढते अतिक्रमण तसेच जडवाहतुकीमुळे अपघातांत वाढ झाली आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रवेशद्वार, अशी नवी ओळख गावाला मिळाली आहे. वाढत्या औद्योगिकीकरणासोबत स्थानिकांना सुविधा न मिळाल्याने त्यांच्यात प्रशासनाप्रति नाराजी आहे. कोंढाळीत सर्वधर्मीयांचे वास्तव्य आहे. त्यामुळे गावाला सर्वधर्मसमभावाची ओळख प्राप्त झाली आहे.
पंचक्रोशीत मांढळ

पंचक्रोशीत मांढळ

पूर्वी मांढळचे नाव मातंगपूर असल्याचे इतिहासाचे जाणकार सांगतात. कालांतराने मातंगपूर शब्दाचा अपभ्रंश होऊन मांढळ हे नाव पडले. पूर्वी येथे कुस्त्यांची आमदंगल मोठ्या स्वरूपात होत असे. तान्ह्या पोळ्याचीही येथे परंपरा होती. आमनदीमुळे शिंगाडा व मासेमारीचा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात चालत असे. काळाच्या ओघात हे सारे कमी झाले असले तरी पंचक्रोशीत मांढळ गावाची वेगळी ओळख आहे.

बंद कंपन्यांचे व्हावे पुनर्ज्जिवन

बंद कंपन्यांचे व्हावे पुनर्ज्जिवन

बारमाही नदी, तरीही दुषित पाणी
कन्हान हे गाव नागपूर शहरापासून सुमारे 22 कि.मी.वर जबलपूर मार्गावर आहे. पचमढीपासून वाहणाऱ्या कन्हान नदीशेजारी हे गाव वसलेले असल्यामुळे "कन्हान' हे नाव पडले. नागपूर-कोलकाता रेल्वेमार्ग येथून जातो. 1970-75 च्या दशकात औद्योगिक नगर म्हणून उदयास आले. येथील औद्योगिकीकरण धोरणामुळे राज्यात सर्वात मोठी महसूल मिळवून देणारी ग्रामपंचायत म्हणून कन्हानने नावलौकिक मिळविला. 1970 च्या दशकात परिसरातील एक-दोन नव्हे तर जवळपास 10 कंपन्या स्थापित झाल्या. कंपनीच्या परिसरात चार ते पाच किलोमीटरपर्यंत रेल्वे मालधक्‍का, रेल्वे जाळे असणारी खंडेलवार ट्यूब मिल ही त्याकाळी राज्यात पहिली कंपनी होती. जवळपास 900 एकर जागेत स्थापित उद्योगांमध्ये हजार मजूर कार्यरत होते. परंतु 1995 नंतर येथील उद्योगांना उतरती कळा आली. बऱ्याच कंपन्यांमधील कामगार युनियनने कामगारांना विविध प्रलोभने दाखवून संप घडवून आणला. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला. त्यामुळे 2000 पासून हळूहळू कंपन्यांना टाळे लागत गेले. आज येथील सर्वच कंपन्या बंद झाल्या असून, केवळ ढाचे उरले आहेत. अचानक कंपन्या बंद झाल्यामुळे कामगारांची देणी थकली आहेत.
.............

पचखेडी

पचखेडी

पचखेडी

ब्रिटिशकाळात पचखेडीची ओळख बेलडोंगरी अशी होती. पूर्णत: गवळी समाजाची वस्ती असलेले हे गाव आमनदीच्या काठावर वसले होते. नदीकाठावरील भाग अचानक भूस्खलन होऊन खचल्याने संपूर्ण गाव दबले, असे इतिहासतज्ज्ञ सांगतात. 20 वर्षांपूर्वी येथे झालेल्या उत्खननात सोन्याची अंगठी, प्राचीन मातीच्या वस्तू आढळल्या. त्यामुळे ऐतिहासिक कथेला दुजोरा मिळतो. कालांतराने पुन्हा गाव वसले. परसोडी, दहेगाव, खैरलांजी, मदनापूर व केसोरी अशी पाच गावे जवळजवळ होती. त्यामुळे या गावाला "पचखेडी' असे नाव पडल्याचे गावकरी सांगतात. परसोडी राजा या गावातील शेतात भोसले राजे यायचे. नदीवर लहान मुलांसोबत खेळायचे. खाचरावर बसून मुलांना ओढायला लावायचे. सखाराम डहारे या तरुणाने एकट्याने महाराजांचा खाचर ओढून शाबासकी मिळविली होती. त्यामुळे त्याला नागपूर येथील राजवाड्यात गौरविण्यात आले, अशा अनेक आठवणी आहेत. सखराम डहारे यांच्या मुलाने सखास्मृती विद्यालय सुरू करून शैक्षणिक सुविधा निर्माण करून दिली. गोसेखुर्द प्रकल्पातील सोनेगाव व जीवनापूर ही गावे वसल्यामुळे पचखेडी गाव कुही तालुक्‍यातील मोठ्या गावांच्या रांगेत आहेत.

ब्रिटिशकालीन खापा  स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित

ब्रिटिशकालीन खापा स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित


  • ब्रिटिशकालीन खापा 
  • स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित 

खापा शहर कन्हान नदीच्या काठावर वसलेले आहे. नदीकाठावर एकीकडे माउली माता, तर दुसरीकडे प्रसिद्ध लष्करशहा बाबांचा दर्गा आहे. या स्थळी संत पतीराम महाराज, राघवानंद महाराज, लष्करशहा बाबा, कृष्णाजी महाराज आदी संत-महात्मे जन्मले आहेत. त्यामुळे ही संतांची भूमी आहे. कृष्णाजी महाराज व त्यांच्या पत्नीने जिवंत समाधी घेतली होती. एकेकाळी जरीच्या साड्या आणि चोळीसाठी हे गाव प्रसिद्ध होते. हातमागावर चालणारा विणकर व्यवसाय आता इतिहासजमा झाला. त्यावर उपजीविका साधणारा हलबा समाज अन्य व्यवसायांत गुंतला आहे. ब्रिटिश काळात येथील शेकडो तरुणांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली होती. अनेकजण शहीदही झाले. येथील नगर परिषद ब्रिटिशकालीन असून, तिची स्थापना 1867 मध्ये झाली. अनेक लोकप्रतिनिधींनी नगरविकासासाठी केवळ थापाच मारल्याने हे शहर स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत.

Friday, January 02, 2015

‘नायलाॅन’ मांजाचा वापर टाळा

‘नायलाॅन’ मांजाचा वापर टाळा

पक्षी आणि मनुष्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी नायलाॅन मांजावर बंदी आणण्याची गरज - बंडु धोतरे

नायलाॅन धागा अत्यंत मजबुत असल्याने हे सर्व प्रकार होतात. पतंगत्सोवमुळे असंख्य पक्षी दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात. जिकडे-तिकडे या धाग्यांचे जाळे झाडावर व तारांवर लटकलेले असतात. याबाबत सर्वच नागरीकांनी जागृतपणे या नायलाॅन मांजाचा वापर टाळणे तसेच आपल्या मुलांना या मांजा वापरापासुन परावृत्त करणे तसेच सर्वच शाळकरी विदयाथ्र्यामध्ये सुध्दा शिक्षकांनी याबाबत जागृती करणे गरजेचे आहे. सर्व बाल-गोपाल व चंद्रपूरकरांनी पतंगोत्सवाकरिता चायनिज-नायलाॅन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी केले आहे.

Thursday, January 01, 2015

मुधोली येथे वाघिणीचा मृत्यू

मुधोली येथे वाघिणीचा मृत्यू


चंद्रपूर, - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातील मुधोली गावानजीक पूर्णवाढ झालेल्या एका वाघिणीचा संशयास्पदस्थितीत मृत्यू उघडकीस आला. गावाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यालगत वाघिणीचा मृतदेह मिळाल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. दोन वाघांची झुंज, चार चाकी वाहनाची धडक की विषप्रयोग यापैकी कशाने तरी हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी विसेरा व तिच्या शरीराचे अवयव हैद्राबाद व बंगलोर येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.
युवा शेतकर्‍याची आत्महत्या

युवा शेतकर्‍याची आत्महत्या

वरोरा - तालुक्यातील युवा शेतकर्‍याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ जानेवारीला घडली.  शेगाव पोलिस ठाणे हद्दीत येणार्‍या आबमक्ता (वडगाव) येथील युवा शेतकरी मोरेश्‍वर निमदेव ठावरी (२८) याच्याकडे पाच एकर शेती होती. वडील म्हातारे असल्याने शेतीचे कामकाज मोरेश्‍वर सांभाळत होता. मागील तीन वर्षांपासून सतत शेतात नापिकी असल्याने मोरेश्‍वर विवंचनेत होता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. शेतातील झाडाला मोरेश्‍वरने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी १० वाजता त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळल्याने शेगाव पोलिसात कळविण्यात आले. मृतकाचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोर्डा घोन्सा येथे नुकताच जुळला होता. मृतकावर बँक व सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. शेगाव पोलिसांनी शवविच्छेदनाकरिता मृतदेह वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.