काव्यशिल्प Digital Media: सार्ड

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label सार्ड. Show all posts
Showing posts with label सार्ड. Show all posts

Friday, August 03, 2018

सार्ड तर्फे जागतिक व्याघ्र दिन साजरा

सार्ड तर्फे जागतिक व्याघ्र दिन साजरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
29 जुलै हां दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निम्मित्याने वाघ व वन्यजीव या बद्दल जनजागृति केलि जाते. व वन्यजीव सवर्धनात सामान्य लोकांचा सहभाग वाढविला जातो याचेच ओचित्य साधुन “सोशल अक्शन फॉर रूरल डेवलपमेंट “(सार्ड) चंद्रपुर या वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय चंद्रपुर येथे “आंतर राष्ट्रीय व्याघ्र दिवस” साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून सौ. कलाताई गोंदे शाळेच्या मुख्याध्यापिका , तर प्रमुख पाहुने म्हणून महाराष्ट्र इको टूरिझम डेवलपमेंट बोर्ड चे सदस्य श्री.अरुणजी तीखे सर, सार्ड संस्था अध्यक्ष श्री.प्रकाश कामडे , अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषण चंद्रपुर सौ.सुवर्णा कामडे, सार्ड सदस्य भाविक येरगुड़े हे मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निम्मिताने विद्यार्थ्यांना विविध जंगल, वन्यजीव, वाघ , त्यांचे महत्व अन्न साखळीत त्यांची भूमिका इत्यादींचे महत्व पटवून देण्यात आले.श्री अरुणजी तीखे यानी त्यांचे जीवन वनविभागाची सेवा करण्यात कसे गेले, ताडोबाच्या निर्मिति मध्ये कुठली महत्वाची कामे त्यानी हाताळलि या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली, श्री. प्रकाश कामडे यानी मानव वन्यजीव संघर्ष कसा निर्माण होतो आणि या तुन वाघांचि संख्या कशी कमी होत आहे. भविष्यारत वाघ वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग कसा महत्वाचा असू शकतो हे समजावून सांगितले. सौ सुवर्णा कामडे यांनी वन्यजीवांवर प्रेमकरा त्यांचे रक्षण करा तरच पर्यावरण वाचेल असा सन्देश दिला, भाविक येरगुड़े यानी जंगलांचे महत्व व त्यांचे जतन कैसे करावे,व्रुक्षरोपनाचे महत्व या बद्दल मार्गदर्शन केले. हां कार्यक्रम संपताच सर्व पाहुन्यांच्या हस्ते शाळेत व्रुक्षारोपन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन श्री.महेंद्र राळे सर, तर आभार प्रदर्शन श्री वाढई सर यानी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कमलाकर व्यवहारे, मंगेश लहामागे, संजय जावड़े, स्वप्निल राजुरकर,विलास माथानकर, प्रवीण राळे,आनंद कांबळे,सदानंद आगबत्तनवार व शाळेतील शिक्षक वृंद यानी परिश्रम घेतले.

Tuesday, July 31, 2018

ग्रीन प्लॉनेट सोसायटी, सार्डतर्फे जागृती पत्रक वाटप

ग्रीन प्लॉनेट सोसायटी, सार्डतर्फे जागृती पत्रक वाटप

Environmental balance through tiger conservation | व्याघ्र संवर्धनातून पर्यावरणाचे संतुलनचंद्रपूर/प्रतिनिधी:
जागतिक व्याघ्र दिनानिम्त्ति चंद्रपूर-मूल मार्ग, महापालिका व वन नाक्याजवळ सामाजिक संस्थेंकडून ग्रीन प्लानेट सोसायटी व सार्ड संस्थेच्या वतीने ‘वाघ व वन्यजीव वाचवा’ असे संदेश देणारी पत्रके वाटण्यात आली. यावेळी संस्था अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, सार्ड संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कामडे, प्रा. डॉ.योगेश दुधपचारे, प्रा सचिन वझलवार,दिनेश खाटे,भाविक येरगुडे, विलास माथनकर, स्वप्नील राजूरकर,नितीन मत्ते, प्रवीण राळे,महेंद्र राळे, कमलेश व्यवहारे,संदीप वडते, संचिता मत्ते आदी उपस्थित होते. वनातून जाणाºया महामार्गावर उपाय योजना करण्याची कार्यकर्त्यांनी केली.जंगल मार्गावर अंडर पासेस व गतिरोधक नसल्याने वाघ आणि वन्यजीवांचे अपघाती मृत्यू होत आहेत.त्यामुळे जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांनी हे पाउल उचलले  आहे.