काव्यशिल्प Digital Media: फाशी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label फाशी. Show all posts
Showing posts with label फाशी. Show all posts

Wednesday, June 13, 2018

वर्ध्यात चिमुकलीसह नवरा-बायकोने घेतला गळफास

वर्ध्यात चिमुकलीसह नवरा-बायकोने घेतला गळफास

फाशी साठी इमेज परिणामवर्धा/प्रतिनिधी:
 जिल्ह्यातील लहान आष्टी येथील अनिल नारायण वानखडे (३७), स्वाती अनिल वानखडे व दीड वर्षांची आस्था या तिघांचे मृतदेह बुधवारी सकाळी अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आले.
घरात वडिलांसोबत झालेल्या वादापायी हे तिघे मंगळवारी संध्याकाळी घराबाहेर पडले. तिघांनी विषारी औषध प्राशन करून झाडाला गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.या बाबद्चा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Friday, November 10, 2017

लोणी मावळा प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा

लोणी मावळा प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा


अहमदनगर - लोणीमावळा (ता. पारनेर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केले यांनी आज आरोपी संतोष विष्णू लोणकर, दत्तात्रय लोणकर आणि दत्तात्रेय शंकर शिंदे या तीनही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय सामूहिक बलात्कार, कट करण्यासह अन्य एका गुन्ह्यात जन्मठेप व व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडातील मंदिर मुलीच्या कुटुंबाला देण्यात येणार असून पन्नास हजार हे सरकारी जमा होणार आहेत. पीडित मुलीच्या आई-वडिलांसह गावकरी तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील उपस्थित होते.


लोणीमावळा तालूका पारनेर येथे 22 आॅगस्ट 2014 रोजी शाळकरी मुलीचा तिघांनी बलात्कार करून खून केला होता. निघृण पद्धतीने शाळकरी मुलीचा खून झालेला असतानाही हा खटला सुरुवातीच्या काळात आरसा गाजला नाही. शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून झालेला असतानाही सरकार पक्षाकडून फारशी गंभीर दखल घेतली नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या खटल्यात अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने खटल्यात निकम यांची डिसेंबर 2014 ला नियुक्ती केली. 18 नोव्हेंबर  2014 रोजी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले तर 1 जुलै 2015 पासून सुनावणी सुरू झाली. 7 जुलै 2017 रोजी सुनावणी संपली. 

या खटल्यात एकूण 32 साक्षीदार तपासण्यात आले. घटनेचा प्रत्यक्षदर्शी जे कही साक्षीदार नव्हता मात्र निकम यांनी 24 परिस्थितीजन्य, पुराव्याची साखळी न्यायालयात सादर केली. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे आणि अन्य बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपी संतोष लोणकर,  मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे यांना बलात्कार, खून व त्यासाठी कट करणे या आरोपाखाली दोषी ठरवले. दोन दिवसांपूर्वी आरोपी व सरकार पक्षातर्फे शिक्षेवर युक्तिवाद झाल्यानंतर आज निकाल देणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले होते. आज सकाळी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी शिक्षा पत्राचे वाचन करण्यात आले. हत्येचा कट करणे,  सामूहिक बलात्कार या प्रकारामध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड तसेच खून आणि अत्याचार या प्रकरणांमध्ये तिघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी करून वसूल करण्यात येणाऱ्या दंडा पैकी एक लाख रुपयांची रक्कम संबंधित पीडित मुलीच्या कुटुंबाला दिली जाणार असून पन्नास हजार रुपये सरकारी जमा होणार आहे याशिवाय माध्यमातून होणारी रक्कम ही सरकारी जमा होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह आरोपीचे वकील अॅड. राहुल देशमुख, अॅड. अनिल आरोटे, आणि अॅड. परिमल फळे, यावेळी उपस्थित होते.