সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 31, 2019

राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद गडचिरोलीत

राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद गडचिरोलीत

चार्मोशी येथे दौरा असल्याची प्रशासकीय माहिती 

चामोर्शी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. या बॅरेजचे काँक्रिट बांधकाम व दरवाज्यांच्या उभारणीचे काम झाले आहे. सदर प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होत आहे. त्यासाठी ते 6 फेब्रुवारी 2019 रोजी गडचिरोली जिल्हयातील चार्मोशी दौरावर येत आहेत.

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन 2 फेब्रुवारीपासून

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन 2 फेब्रुवारीपासून

  • अभय बंग संमेलनाध्यक्ष, पालकमंत्री मुनगंटीवार उद्घाटक
  • चांदा क्लबवर सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज व तुषार सुर्यवंशी यांचे प्रबोधन

चंद्रपूर, दि.31 जानेवारी- सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सातव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला शनिवारपासून येथील चांदा क्लब ग्राऊंडवर सुरुवात होत असून ज्युबिली हायस्कूल येथून सकाळी काढण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती दिंडीने या संमेलनाची सुरुवात होणार असल्याची माहिती सहाय्यक समाज कल्याण आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग संमेलनाध्यक्ष राहणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहतील. याप्रसंगी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीशराजे आत्राम, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नागो गाणार, आमदार अनिल सोले, आमदार रामदास आंबटकर, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार नानाजी श्यामकुळे, आमदार संजय धोटे, आमदार सुरेश धानोरकर, आमदार कीर्तिकुमार भांगडीया, डॉ.राणी बंग, समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज, सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता केळकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

दोन दिवसीय संमेलनात 'तंबाखू मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आणि वास्तव', 'व्यसनमुक्ती उपचार पद्धती, गरज आणि यश', 'दारुबंदीनंतर चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेमुळे झालेले सकारात्मक बदल, प्रशासन आणि समाजाची जबाबदारी', 'अमली पदार्थांचा विळखा आणि उपाय योजना,' 'व्यसनमुक्ती प्रसार माध्यमे आणि साहित्यिकांची जबाबदारी' या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्र होणार आहे.

2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे जाहीर प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनात 2017-18 व 2018-19 च्या राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या 2 तारखेच्या उदघाटन सोहळयाला जेष्ठ सामाजिक कार्याकर्त्या डॉ.राणी बंग, संप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, सुप्रसिध्द अभिनेत्री अनिता दाते-केळकर, उपस्थित राहणार आहेत. तर 3 फेब्रुवारीला पुरस्कार वितरण सोहळयाला सुप्रसिध्द अभिनेत्री निशीगंधा वाड उपस्थित राहणार आहे. या संमेलनास जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी पत्रपरिषदेत केले.
सुपर स्पेशालिटीत लवकरच रोबोटिक्स सर्जरीची सुविधा

सुपर स्पेशालिटीत लवकरच रोबोटिक्स सर्जरीची सुविधा


नागपूर, दि. 31 : नागपूर हे शहर आंतरराष्ट्रीय शहर होत आहे. साधारणत: 70 हजार कोटीचे विकासकामे सुरू आहेत. सर्व सोयीयुक्त आतंरराष्ट्रीय शहर होत असतांना या शहरातील आरोग्य सुविधा देखील गुणात्मक असाव्यात यासाठी सुपरस्पेशालिटी रूग्णालयात देशातील पहिली रोबोटिक्स सर्जरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल,असे आश्वस्त उद् गार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले.

सुपरस्पेशालिटी रूग्णालयातील न्युरोसर्जरी शल्यक्रिया गृहाचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ.अभिमन्यू निसवाडे,सभागृह महानगरपालिका सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, मेंदुरोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रमोद गिरी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, मेंदुची शल्यक्रिया अत्यंत क्लिष्ट शल्यक्रिया आहे. डॉ. प्रमोद गिरी हे अनेक वर्षापासून या मॉड्युलर ओटीच्या निर्मीतीसाठी प्रयत्नरत होते.या ओटीच्या निर्मीतीसाठी शासनाने दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला.

यावेळी बोलतांना डॉ. प्रमोद गिरी म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 13 मॉड्युलर ओटी तयार केल्या आहेत. लवकरच न्युरोलॉजीतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल असे प्रयत्त्न सुरू आहेत.

सुपरस्पेशालिटीत चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.50 नि:शुल्क कीडनी प्रत्यारोपण केले असल्याचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यूनिसवाडे यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या मदतीतूनच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

रूग्णासाठी डॉकटर हे देवदूतच असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की डॉ. प्रमोद गिरी हे निष्णात मेंदुरोग तज्ज्ञ आहेत .मॉड्युलर ओटीच्या निर्मीतीसाठी त्यांनी सातत्याने आग्रह केला. मॉड्युलर ओटीच्या माध्यमातून अस्वस्थ मेंदुरोग रुग्णांना चांगल्या आरोग्यसुविधा मिळतील. खनिज विकास प्रतिष्ठानमधून व्हेंटीलेटरसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या लोकार्पण कार्यक्रमाला सुपरस्पेशालिटीतील विविध विभागप्रमूख व पारीचारिका उपस्थित होते. संचलन व आभार डॉ. सागर शहाणे यांनी केले.
पाच वर्षांत सर्वच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेतून वीज:ऊर्जामंत्री बावनकुळे

पाच वर्षांत सर्वच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेतून वीज:ऊर्जामंत्री बावनकुळे

नाशिक/प्रातिनिधी:

गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने विजेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमुळे महाराष्ट्र आज देशात अव्वल आहे. स्मार्ट मीटर, मोबाईल अँप, प्रीपेड मीटर तसेच तंत्रज्ञानाच्या वापरातून वीज क्षेत्राला आधुनिकीकरणाकडे नेण्याचा प्रयत्न झाला आहे. आता एक ग्रीड एक राष्ट्र ही महत्वपूर्ण संकल्पना येत आहे. 

एक लाख मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेमुळे महाराष्ट्र भारनियमनमुक्त झालाच आहे. पण अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देतांना येत्या ५ वर्षात राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेतून दिवस वीज देण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी व मुख्यमंत्री सौर कृषिपंप या योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील ग्रामीण भागात असलेले ७०० फिडरचे विलगीकरण केल्यानंतर ग्रामीण कृषी वाहिनीवर असलेल्या वीज ग्राहकांना अखंडित वीज देता येणे शक्य आहे. त्यासाठी २ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून केंद्र सरकाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर एका वर्षात वाहिनी विलगीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
मार्चअखेर संपूर्ण देश होणार भारनियमनमुक्त:आर.के.सिंग

मार्चअखेर संपूर्ण देश होणार भारनियमनमुक्त:आर.के.सिंग

क्षेत्रीय परीक्षण प्रयोगशाळेचे भूमिपूजन 
नाशिक/प्रतिनिधी:

गेल्या साडेचार वर्षांत देशाच्या वीजनिर्मिती क्षमतेत तब्बल एक लाख मेगावॅटने वाढली असून सर्व राज्यांमधील शहरांमधील भारनियमन संपुष्ठात आले आहे. आता मार्च 2019 पर्यंत संपूर्ण देश भारनियमन मुक्त होणार, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी केले.

नाशिक जवळच्या शिलापूर परिसरात केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेच्या क्षेत्रीय परीक्षण प्रयोगशाळेच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे ऊर्जामंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्री. हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शीतल सांगळे, आमदार श्रीमती देवयानी फरांदे, आमदार योगेश घोलप, आमदार श्री. राजाभाऊ वाजे, माजी मंत्री श्री. बबनराव घोलप, माजी खासदार श्री. समीर भुजबळ, माजी आमदार जयवंत जाधव, अनुसंधान संस्थेचे महासंचालक व्ही. एस. नंदकुमार, ऊर्जा मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार राज पाल यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. सिंग म्हणाले, ऊर्जा विभाग निरंतर विजेचे स्वप्न साकारत असून देशभरातील सर्वच ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यात खंड पाडणाऱ्या वीज पुरवठादारांना खंडित कालावधीसाठी दंड आकारून त्याचा लाभ वीज ग्राहकांना देण्याचा धोरणात्मक निर्णय मार्चनंतर लागू करण्यात येईल. देशभरातील 1 लाख 80 हजार किलोमीटरची वाहिनी एका ग्रीडला ओडून 'एक राष्ट्र एक ग्रीड' ही संकल्पनाही प्रत्यक्षात आणली आहे. एक हजार दिवसांच्या आत देशातील प्रत्येक गावात वीज पोहचविण्यात आली. तर वीजजोडणीपासून वंचित प्रत्येक घरात वज पोहचविण्याचे उद्दिष्टही जानेवारी अखेर पूर्ण होईल. सौभाग्य योजनेतून जोडणी देण्यासाठी राज्याला दोन टप्प्यात 800 कोटी रुपयांचा निधी दिला. ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांच्या मागणीनुसार वाहिनी विलगीकरणासाठी 2 हजार रुपये महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन श्री. सिंग यांनी दिले. देशात ऊर्जा क्षेत्रात गेल्या साडेचार वर्षात झालेल्या कामांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

खासदार श्री. गोडसे म्हणाले, शिलापूरमध्ये साकारत असलेल्या प्रयोगशाळेमुळे नाशिकची ओळख 'इलेक्टिक हब' म्हणून होणार आहे. तर प्रास्ताविक करताना राज पाल यांनी 115 कोटी रुपये निधीतून येत्या 18 महिन्यात प्रयोगशाळेचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. 


 बुटीबोरीसाठी नवीन वीज आराखडा तयार करा- प्रा. देशमुख

बुटीबोरीसाठी नवीन वीज आराखडा तयार करा- प्रा. देशमुख

नागपूर/प्रतिनिधी:

बुटीबोरी परिसरात येणारे नवीन उद्योग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या परिसरासाठी विजेची वाढत्या मागणीनुसार नवीन विजेचा आराखडा तयार करण्याची सूचना नागपूर जिल्हास्तरीय विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांनी केली आहे.

प्रा. गिरीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बुटीबोरी येथील महावितरण कार्यालयात हिंगणा तालुका विदुयत नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर मेघे होते. बुटीबोरी परिसराचा विकास वेगाने होत असून याठिकाणी दर्जेदार आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी नवीन आराखडा करणे गरजेचे आहे. असे यावेळी प्रा. देशमुख यांनी सांगितले. यावेळी वीज अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारसास नुकसान भरपाई म्हणून श्रीमती नितु भगत यांना ३ लाख ८० हजार रुपये देण्यात आले. यावेळी बुटीबोरी परिसरात मागील ५ वर्षात महावितरण मार्फत करण्यात आलेल्या कामाची माहिती देण्यात आली. यात बुटीबोरी विभागात पायाभूत आराखडा -२ योजनेत ३ नवीन नवीन उपकेंद्राची उभारणी आणि २ उपकेंद्राची क्षमता वाढ यांचा समावेश आहे. सोबतच दीनदयाल ग्राम ज्योती योजनेत ३ उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून २ उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी जिल्हास्तरीय विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि आमदार मेघे यांना देण्यात आली.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी शाखा कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच जवाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश यावेळी प्रा. देशमुख यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी सौर कृषी पम्पाचे प्रात्यक्षिक करून दाखवावे अशी सूचना आमदार समीर मेघे यांनी यावेळी महावितरण अधिकारी वर्गाला केली. बैठकीला हिंगणा तालुका विदुयत नियंत्रण समितीचे सदस्य चंद्रशेखर पिसे, रवींद्र वानखेडे, सूचित चिमोटे,विकास दाभेकर, संजय दोडरे, प्रकाश वानखेडे, अधीक्षक अभियंता मनीष वाठ , कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ बुटीबोरी विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि शाखा अभियंता उपस्थित होते.
 मार्च पासून जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करा

मार्च पासून जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करा



चंद्रपूर/प्रतिनिधी:
व्यावसायिक अभ्यासक्रम साठी इमेज परिणाम
शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये सामाईक प्रवेश परिक्षा (CET) देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणीचे परिपूर्ण प्रस्ताव 1 मार्च ते 31 मे 2019 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चंद्रपूर येथे सादर करण्याबाबत समितीचे उपायुक्त, विजय एम. वाकुलवार यांनी कळविले आहे.

2019-20 या शैक्षणिक वर्षातील व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून या समितीकडे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी शासनाच्या www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळवर अर्ज भरून त्याची छापील प्रत तसेच – CET प्रवेशपत्रासह, अर्जदाराचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच जातीचा दावा सिध्द करणारे जातीचे व अधिवासाचे प्रमाणपत्रासह सादर करावे. तसेच उमेदवारांनी आपला प्रस्ताव सादर करतांना सोबत सर्व मुळ दस्तावेज स्कॅनिगकरिता आणावेत. सदर अर्ज सादर करतांना उमेदवारांना काही अडचणी असल्यास त्यांनी 18002330444 या मदत केंद्रावर संपर्क साधून समस्येचे निराकरण करावे, असे समितीचे उपायुक्त विजय एम. वाकुलकर यांनी कळविले आहे.
सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना सूचना

सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना सूचना

चंद्रपूर/प्रतीनिधी:

चंद्रपूर जिल्ह्यात सुशिक्षीत बेरोजगार युवकाच्या काही सेवा सहकारी संस्था कार्यान्वित आहेत. अशा संस्थांना  काम मिळवून देण्याच्या उद्देशाने  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर या कार्यालयाने जिल्हास्तरीय काम वितरण  समितीची  स्थापना यापूर्वीच करण्यात आली. त्या समितीच्या वतीने या कार्यालयात नोंदणी असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथील सुरक्षारक्षक व सफाईगाराचे काम वाटप करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या संस्थांनी 7 फेब्रुवारी 2019 पर्यंत  कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधून कामाबाबतची सविस्तर माहिती जाणून घेवून अर्ज सादर करावे.

 सदर सेवा सहकारी संस्थांकडून अर्जासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाण पत्र, बँकेचे पासबुक, सन 2017- 18 चा लेखापरिक्षण अहवाल व संस्थेचे पॅन कार्ड प्रत व सभासदांचे चालू असलेले सेवायोजन कार्ड, सभासद क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र व सुरक्षारक्षक परवाना सोबत जोडावा,असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांनी केले आहे.    
लाव्हा येथे साईबाबा सप्ताह संपन्न

लाव्हा येथे साईबाबा सप्ताह संपन्न

भागवत कथा,पालखीचे आयोजन साईनामाच्या गजरात शोभायात्रा 
वाडी ( नागपूर ) अरूण कराळे:

लाव्हा येथील साई सांस्कृतिक मंडळातर्फे रविवार २० जानेवारीपासून श्री साईबाबा सप्ताह समारोह अंतर्गत मांजरखेड अमरावती येथील हभप रमेश महाराज मानकर यांचे संगीतमय भागवत कथा,संतोष भालेराव महाराज यांचे भारुड,सांप्रदायिक वारकरी मंडळ,जय दुर्गा महिला मंडळ,गुरुमाऊली मंडळ,रमना मारोती मंडळ,विठ्ठल रुख्मिणी मंडळ,संत गाडगेबाबा मंडळ,हनुमान सेवा भजन मंडळाचे भजन,होम हवन,प्राक्षाळ पूजाआदी साप्ताहिक कार्यक्रम संपन्न झाले.सप्ताहाचेअंतिम दिवशी साई सांस्कृतिक मंडळाचेअध्यक्ष भोजराज पुसाम,उपाध्यक्षअशोकआगरकर,सचिव संजय उके,सहसचिव प्रकाश डवरे, कोषाध्यक्ष हर्षल वानखेडे,सहकोषाध्यक्ष सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनात गांवातून साई पालखीचे आयोजन करून गजानन महाराज,शंकरजी,ताजुद्दीन बाबा यांचे चित्ररथ असलेली भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी साईनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता .आयोजनासाठी मंडळाचे सदस्य पांडुरंग बोरकर,रामेश्वर ढवळे,गंगाधर करंडे, बंडू सावरकर,गणेश ताजने,तुकाराम उईके,मुकींदा धुर्वे,सुनील वानखेडे आदींनी अथक प्रयत्न केले तर प्रज्वल डेकोरेशन लाव्हा,प्रमोद घोडेवाले खडगांव,डीजे प्रफुल लाव्हा,मदनकर बलून डेकोरेशन वाडी,द ग्रेट शिवराजे प्रतिष्ठान ढोल ताशे ध्वज पथक वाडी यांचे विशेष सहकार्य मिळाले.याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, वाडीचे बांधकाम सभापती हर्षल काकडे, नागपूर पं .सं. उपसभापती सुजित नितनवरे,सरपंच ज्योत्स्ना नितनवरे,उपसरपंच महेश चोखांद्रे,भीमराव कडू,संतोष केचे,रुपेश झाडे,साधना वानखेडे,सुशीला ढोक,किशोर ढगे, विजय मिश्रा,कपिल भलमे,पप्पू पटले आदीसह हजारो नागरीक शोभायात्रेत सहभागी होते .
वाडीत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ विभागाची धाड

वाडीत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ विभागाची धाड



वाडीत गिरनार गोडाऊनमध्ये मिळाले प्लास्टिक
वाडी ( नागपूर ) अरूण कराळे:

वाडीतील प्रत्येक दुकानांत तसेच गोडावून मध्ये वाडी नगर परिषदच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ विभागानी धाड टाकून प्लॉस्टीकच्या विरोधात कारवाई केली .कोहळे-लेआऊट मधील गिरनार कार्गो गोडाऊन मध्ये धाड टाकून तीन टन प्लास्टिक अंदाजे ३ लक्ष रुपयाचा जप्त केला . तसेच प्रती टन पाच हजार रुपये दंडाच्या रक्कमची पावती गोडावून मालकाला देण्यात आली . प्लास्टिकचा माल गुजरात येथून येत असून वाडीतील गोडावून मध्ये जमा केल्या जाते . याची माहीती मिळताच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी राहूल वानखेडे, उपप्रादेशिक अधिकारी आंनद काटोले, क्षेत्र अधिकारी मनोज वाटाणे ,वाडी नगर परिषदचे उपमुख्याधिकारी आकाश सहारे,रोहित सल्लारे,कपिल डाफे,शुभम गायकवाड,प्रविण नांदूरकर आदी कर्मचाऱ्यांची कारवाई केली .
राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

 विष्णू तळपाडे(अकोले-अहमदनगर):

बदलापुर येथील कोळी महादेव समाज संघटना,आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य,वधुवर परिचय मेळावा,गोतेभाऊ स्नेह संमेलन,आदिवासी संस्कृती मेळावा आणि आदिवासी संस्कृती सन्मान सोहळा पार पडला.यावेळी अकोले तालुक्यातील बीजमाता राहिबाई पोपेरे यांना कृषीरत्न पुरस्कार व निसर्गवासी किसन इष्टे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाऊसाहेब पारधी व सुरेश बांडे यांनी केले.अध्यक्ष स्थानी प्रकाश धिगे हे होते.या वेळी आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त शंकर अस्वले GSTचे सहाय्य आयुक्त मुरलीधर बांडे नगरसेवक संदिप लोटे,धर्मा लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.मंडळाची भूमिका व कार्य शिवाजी सुरकुले यांनी सांगितले.प्रस्तावीक भारती उडे यांनी केले,तसेच सूञसंचालन सुधीर साबळे यांनी केले तर आभार किसन भारमल यांनी मानले.
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण

अकोले(अहमदनगर)विष्णु तळपाडे:

सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.
मागे घरकुलाचा सव्हेॕ केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.
मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात.
हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय.
यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन,शिपाई ,अरोग्य सेविका,सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.
 चंद्रपूर महापौर चषकाचा थरार आजपासून

चंद्रपूर महापौर चषकाचा थरार आजपासून

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने दि. १ फेब्रूवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान महापौर चषक कबड्डी व कुस्ती स्पर्धा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कारागृहामागील कोहिनूर क्रीडांगण येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन १ फेब्रूवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मा. पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व मा. केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रूवारी सायंकाळी ६ वाजता मा. केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराजजी अहीर यांच्या हस्ते व मा. पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व मा. आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे चंद्रपूर शहरातील खेळाडूंसाठी मान्यताप्राप्त संघटनांमार्फत विविध क्रीडा प्रकारांमध्ये महापौर चषक स्पर्धा आयोजित केल्या जातो. शहरातील विविध खेळाडूंना आपल्या क्रीडाकौशल्य गुणांना वाव देता यावा तसेच खेळांविषयी आवड असलेल्या तरुण मुला-मुलींनी शहराचे नाव राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवावे हा त्यामागील उद्देश आहे. या स्पर्धांमध्ये विजेत्या खेळाडूंना व संघांना पैशांच्या स्वरुपात धनादेशाव्दारे बक्षिसे अदा केली जातात. यामुळे खेळाडूंना आर्थिक मदत होते 

या स्पर्धेत राज्यभरातून पुरूष व महिला कबड्डी - कुस्ती संघातील खेळाडू सहभागी होणार आहेत. कबड्डी स्पर्धेत पुरुष विजेता व उपविजेत्या संघाला अनुक्रमे ८१,०००/- व ६१,०००/- रोख पारितोषिक व चषक तसेच महिला गटात विजेता व उपविजेत्या संघाला अनुक्रमे ६१,०००/- व ४१,०००/- रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय मॅन ऑफ द टूर्नामेंट रुपये ११,१११/-, मॅन ऑफ द मॅच, अष्टपैलू खेळाडू रुपये ७,०००/-, उत्कृष्ट खेळाडू रुपये ५,०००/-, आवडता खेळाडू रुपये ५,००० या स्वरूपाची वैयक्तीक रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत. तर कुस्ती स्पर्धेत रुपये ७१,०००/- व ३५,०००/- रोख पारितोषिक व चषक तसेच महिला गटात विजेता व उपविजेत्या संघाला अनुक्रमे रुपये ५१,०००/- व ३१,०००/- रोख पारितोषिक व गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.. कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि. ३ फेब्रुवारी रोजी तर कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि. १० फेब्रुवारी रोजी मा. पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार मा. केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराजजी अहीर यांच्या हस्ते तसेच मा. आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे, श्री. देवरावजी भोंगळे जि. प. अध्यक्ष, मा. चंदनसिंह चंदेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. 

कुस्ती व कबड्डी स्पर्धेकरिता राज्यस्तराहून पंचांना आमंत्रित करण्यात आले असून खेळाडूंची भोजन व्यवस्था सोमेश्वर मंदिर येथे तर निवास व्यवस्था खालसा कॉन्व्हेंट पटेल हायस्कूल, लोकमान्य टिळक काळाराम मंदिर मनपा प्रा. शाळा, जाकीर हुसेन शाळा दादमहाल वॉर्ड, सन्मित्र कॉन्व्हेंट समाधी वॉर्ड, काळाराम मंदिर, येथे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यास सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत असून महानगरपालिकेच्या महापौर सौ. अंजली घोटेकर व आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकारी, कर्मचारी, समिती सदस्य कार्यरत आहेत. १ फेब्रूवारीपासून सुरु होणाऱ्या महापौर चषक कुस्ती व कबड्डी स्पर्धेचा आस्वाद सर्व चंद्रपूरकरांनी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे
 3 सुपरफास्ट रेल्वे गाडयांचा चंद्रपुरात थांबा

3 सुपरफास्ट रेल्वे गाडयांचा चंद्रपुरात थांबा

4 व 5 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर हिरवी झेंडी दाखविणार

    चंद्रपूर /प्रतिनिधी

लोकसभा क्षेत्राचे खासदार, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर मुन्नारगुडी ते भगत की कोठी, गांधीधाम-विशाखापट्टनम तसेच तिरूवेनपल्ली ते बिलासपूर या सुपरफास्ट रेल्वे गाडयांचा थांबा मंजूर झाला असून गांधीधाम-विशाखापट्टनम ट्रेन नं. 18502 ही गाडी सोमवारला रात्रौ 22.45 वा. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबणार असून तिरूनेलवेली-बिलासपूर ट्रेन नं. 22620 ही साप्ताहीक गाडी सोमवारी दुपारी 12.02 वाजता चंद्रपूर स्थानकावर पोहचेल तसेच बिलासपूर-तिरूनेलवेली ट्रेन नं. 22619 मंगळवार दि. 05 फेब्रुवारी 2019 रोजी 17.52 ला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. याबरोबरच मुन्नारगुडी ते भगत की कोठी ट्रेन नं. 16864 ही गाडी मंगळवारला दुपारी 12.02 ला चंद्रपूर स्थानकावर पोहचेल. विशाखापट्टनम-गांधीधाम ट्रेन नं. 18501 ही गाडी शुक्रवारी सकाळी 8.40 ला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचेल तसेच भगत की कोठी  (जोधपूर) ते मुन्नारगुडी ट्रेन नं. 16863 ही गाडी शुक्रवारी सायं. 19.18 ला चंद्रपूर स्थानकावर पोहचेल.

दि. 4 फेब्रुवारी 2019 रोजी ट्रेन नं. 18502 (गांधीधाम-विशाखापट्टनम) व ट्रेन नं. 22620 (तिरूनेलवेली-बिलासपूर) चंद्रपूर स्थानकावर थांबेल तसेच दि. 05 फेब्रुवारी 2019 रोजी, ट्रेन नं. 16864 (मुन्नारगुडी ते भगत की कोठी) व ट्रेन नं. 22619 (बिलासपूर-तिरूनेलवेली) या गाडयांना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर हिरवी झेंडी दाखविणार असून या गाडयांच्या स्वागतासाठी चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी, रेल्वे प्रवाशांनी तसेच रेल्वे प्रवासी सुविधा संघटनांच्या पदाधिका-यांनी उपरोक्त गाडयांच्या निर्धारीत वेळेत उपस्थित राहून या गाडयांचे स्वागत करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी विशेष प्रयत्न केल्याने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर तब्बल तीन सुपरफास्ट साप्ताहीक गाडयांचा थांबा मंजूर झाला. आता या गाडयांपैकी गांधीधाम ते विशाखापट्टनम तसेच तिरूवेनपेल्ली ते बिलासपूर या गाडया दि. 4 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत. तसेच मुन्नरगुडी ते भगत की कोठी (जोधपूर) व बिलासपूर ते तिरूवेनपेल्ली या गाडया दि. 5 फेब्रवारी 2019 रोजी चंद्रपुर स्थानकात पहिल्यांदाच थांबणार आहेत. 

ना. हंसराज अहीर या गाडयांच्या थांब्यांबाबत आग्रही होते त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रयांनी त्यांच्या या मागणीची त्वरित दखल घेत या जिल्हयातील दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय बांधव तसेच व्यापारी, व्यवसायी, नोकरपेशा वर्ग तसेच जिल्हयातील मोठया संख्येतील प्रवाशांकरिता या तिन्ही गाडया अत्यंत सुविधाकारक ठरणार आहेत. विशाखापट्टनम ते गांधीधाम या गाडीमुळे गुजरातेतील गांधीधाम व गीर राष्ट्रीय अभयारण्यासाठी जाणा-या पर्यटकांना मोठी सुविधा होणार आहे. तामिळनाडू (हिल्सस्टेशन) मुन्नारगुडी येथुन सुटणा-या गाडीमुळे दक्षिण भारतीय प्रवाशांचीसुध्दा फार मोठी सोय होणार आहे. ना. हंसराज अहीर यांनी प्रवाशांच्या सुविधेकरिता या गाडया सुरू करून प्रवाशांसाठी  फार मोठी उपलब्धी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !

अकोले (अहमदनगर) खबरबात/प्रतिनिधी

-विष्णु तळपाडे

सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु  विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.

       मागे घरकुलाचा सव्हे केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.

     मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात. हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय. यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा. शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन, शिपाई , अरोग्य सेविका, सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.

Wednesday, January 30, 2019

BIT कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

BIT कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
अपघात नसून घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथील बल्लारपूर इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात लॅब असिस्टंट पदावर कार्यरत असलेले अमर नगराळे यांचा अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. हि घटना मंगळवारी रात्री 10.30वाजताच्या दरम्यानबामणी कोठारी मार्गावर घडली.
गेल्या आठ महिन्यांपासून वेतन नसल्यानं हा कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचला होता, असं सहकाऱ्यांचं म्हणणं आहे.होते.त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करून कर्मचाऱ्यांनी आज मृतदेह महाविद्यालयात ठेऊन न्यायाची मागणी केली. या प्रकारामुळे महाविद्यालयात एकच खळबळ उडाली.

महाविद्यालयातील सुमारे तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन संस्थेमार्फत नियमित मिळत नसल्याने मागील अनेक दिवसांपासून या संस्थेत संस्थेतील कर्मचाऱ्यांचा व संस्था अध्यक्ष व्यवस्थापनाचा वाद सुरू होता.कर्मचाऱ्यांनी संस्था अध्यक्षांना वारंवार वेतनाचे पैसे मागितले मात्र ते देत नसल्यामुळे विविध पद्धतीने कर्मचारी हे आंदोलन करू लागले. या सर्व कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व अमर नगराळे करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार मागील आठ महिन्यांपासून संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन नसल्यानं कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या या विवंचनेत ते होते. त्यातच त्यांचा काल अपघाती मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे असे बोलल्या जात आहे. कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी ते झटत असल्यानं त्यांना मारण्यात आलं, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी केला आहे.या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांनी अमर नगराळेंचा मृतदेह आज संस्थाप्रमुख बाबासाहेब वासाडे यांच्या केबिनमध्ये आणला आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत तिथेच ठेवण्याचा इशारा दिला.आता या मृत्यूमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली
न्याय मागण्यासाठी नागेपलीत उपोषण

न्याय मागण्यासाठी नागेपलीत उपोषण

जिल्हाधिक्कारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

अहेरी/ प्रतिप्रतिनिधी

नागेपल्ली येथील सर्व्ह न.84 मधील रहिवासी यांचे वास्तव्यास असलेले घर उध्वस्त केल्यामुळे न्याय मागण्यांसाठी 40 महिलां मुलाबाळा सह अहेरी येथीलअप्परजिल्हाधिकारी कार्यालया समोर  आज पासून आमरण उपोषनास बसले  आहेत.


निवेदनात त्यांनी म्हटले आहेकी,

अहेरी तालुक्यातील येतअसलेल्या आलापल्ली साजा क्र.5अंतर्गत येत असलेल्या नागेपल्ली येथील सर्व्हे न.84मधील क्षेत्र1.21आर  ह्या शासकीय जमिनीवर आम्ही 70/80 परिवार घरे बांधून राहत असतांना मात्र, सदर जागेवर आलापल्ली येथील एका  धनाढ्य तथा कथित सामाजिक कार्यकर्ता म्हणून समजल्या जाणाऱ्या व्यक्तीची नजर असल्याने त्यांनी अधिकारी व राजकीय लोकांशी संगनमत करून  त्यांना हाताशी धरून आम्हाला त्रास देने सुरू केले आहे.

दि.26 डिसेंबर रोजी तहसीलदार यांनी पोलीस फोउजफाटा सोबत घेऊन अतिक्रमण धारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता लोकांना धाक दडप करून घरे पाडू लागले त्याचा आम्ही प्रतिकार केला त्यामुळे त्याच दिवशी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्यापैकी काही लोकांना अटक सुद्धा करण्यात आली . 

त्याचप्रमाणे 23 जानेवारी रोजी रात्रौ11:45 च्या दरम्यान काही तहसिलदार यांनी काही लोकांना सोबत घेत झोपेत असललेल्यानं उठवत काही घरांना आग लावली याबाबत ची तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही.

आम्ही सदर ठिकाणी शांततापूर्वक निवास करीत असताना 28 जानेवारी रोजी उपविभागीय अधिक्कारी अहेरी यांनी कलम144 लावून आमचे घरे जबरदस्तीने तोडले आणि या ठिकाणी कोणी पाऊल ठेवले तर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.

त्यामुळे अश्या परिस्थितीत आमचे जीवन जगणे कठीण झाले आहे.आमच्यावर झालेल्या अन्याया संदर्भात अप्परजिल्हाधिकारी कार्यालयासमोर 30 जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसत आहोत या प्रकरणाची योग्य चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही न्याय मार्गाने उपोषण साठी बसत आहोत.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची वनमजुरांना जबर मारहाण

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची वनमजुरांना जबर मारहाण

ललित लांजेवार/

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी वनविकास महामंडळाच्या वनात काम करणाऱ्या पाच वनमजुरांना जबर मारहाण केली आहे,  मार्कंडा प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 89,90,91 मध्ये ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती आहे. यातील काही वन मजुरांवर अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात असून दोन वनमजुरांवर चंद्रपूर येथे पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.नक्षल्यांनी या क्षेत्रातील  बाम्बूचे काम करणाऱ्या इतर 60 ,70 रोजगारना काम न करण्याची दिली धमकी दिली,  नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमकीमुळे वनमजुरांना व त्यांच्या परीवाराला धोका निर्माण झाला असून या परिसरातील नागरिक तसेच इतर वनमजुर भयभीत झाले आहेत.

अवैध सावकारांविरुद्व फास

अवैध सावकारांविरुद्व फास


चंद्रपूर, बल्लारपूर व चिमूर तालुक्यात एकाचवेळी सहकार विभागामार्फत कारवाई

चंद्रपूर, दि.30 जानेवारी- चंदपूर जिल्हयातील चंद्रपूर, बल्लारपूर व चिमूर तालुक्यात सहकारी विभागामार्फत 30 जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांचेकडे अवैध सावकारी संदर्भाने प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सकाळी 8 ते 9.00 या दरम्यान अवैध सावकाराचे घरावर व इतर मालमत्तेवर टाकलेल्या धाडीत मोठया प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. या आक्षेपार्ह दस्ताऐवजावरुन तीनही संशयीत अवैध सावकारांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिंबधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर शहरातील जटपूरा गेट जवळील शुभम अनिल लोणकर रा.जटपूर गेट वार्ड क्रं.1 रामनगर रोड चंद्रपूर यांचे राहते घरी स्वाक्षरी असलेला 1 कोरा स्टॅम्प पेपर, स्वाक्षरी नसलेले 3 कोरे स्टॅम्प पेपर, स्वाक्षरी असलेले परंतू रक्कम नमूद नसलेले 7 कोरे चेक व रक्कम असलेला 1 चेक तसेच संशयास्पद नोंदी असलेल्या 23 पॉकीट डायरी आढळल्या.

बल्लारपूर तालुक्यातील बामणी कु. पुष्पा श्रावण जाधव, रा. बेघर रोड बामणी ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर येथील आज रोजी टाकलेल्याधाडीत पुष्पा श्रावण जाधव यांचे नावाने दुसऱ्याचे सही व रक्कम नमूद असलेले 7 चेक, प्रभाकर कुंभारे यांनी लिहून दिलेला उतारा आढळलेलाआहे.

चिमूर तालुक्‍यातील नेरी येथील गुलाब नारायण कामडी यांच्याकडे टाकलेल्या धाडीत मालमत्ता स्थावर 4 विक्रीपत्र आढळून आले. दत्तु भगवानजी पिसे, मु.पो.नेरी यांचे राहते घरी स्वाक्षरी असलेले 3 कोरे चेक व स्वाक्षरी नसलेले 6 कोरे चेक, तीन 7/12, 2100 रुपयाचे कोरे स्टॅम्प पेपर, 1 इसारपत्र व आक्षपार्ह नोंदी असलेले वही व डायरी आढळल्या.

अवैध सावकारी संबंधाने प्राप्त तक्रारीवर जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांचे मार्गदर्शनात असलेल्या सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर , बल्लारपूर व चिमूर तालुक्यातील अनुक्रमे पी. एस. धोटे, एम. डी. मेश्राम, आर. एन. पोथारे व पी. एन. गौरकार यांचे नेतृत्वात 4पथकामार्फत चंद्रपूर ,बल्लारपूर व चिमूर तालुक्यामध्ये अवैध सावकार अनुक्रमे शुभम अनिल लोणकर, कु . पुष्पा श्रावण जाधव व गुलाब नारायण कामडी, दत्तु भगवानजी पिसे यांचे घर व प्रतिष्ठाणावर धाडी टाकण्यात आल्या. त्यावेळी त्यांचेकडून अवैध सावकारीचे अनुषंगाने वरिलप्रमाणे दस्ताऐवज जप्त करण्यात आलेले आहे. जिल्हयातील एकूण 3 तालुक्यात विविध पथकाव्दारे 35 कर्मचाऱ्यांनी सकाळी 8.25वाजेपासून दुपारी 12.30 वाजपेर्यंत केलेल्या धाडसत्रात वरिलप्रमाणे दस्तऐवज व इतर कागदपत्रे हस्तगत करण्यात आले आहेत.

सदर धाडीत पोलीस विभागातील 8 कर्मचारी विजय जाधव , सिमा आत्राम, प्रिती महाजन, पो. सी. बंडू मातने तसेच चिमूर येथील पोलीसकर्मचारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,चंद्रपूर तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर /बल्लारपूर व चिमूर येथील अधिकारी पी. एस. धोटे, एम.डी. मेश्राम, स.नि.बल्लारपूर व आर. एन. पोथारे सनि, चिमूर व कर्मचारी आर. डी. कुमरे, आर, आर.कोमावार, एस.डी. शेळकी, पी. डब्ल्यु, भोयर, एम. पी.पिंगे, एस. एस.बोधे, एस.बी. एवले., पी. एन. गौरकार, ए. एस. देरकर, व्ही .आर. निवाने तसेच गटसचिव व पतसंस्थेतील मॅनेजर व कर्मचारी यांनी पंच म्हणून सहभाग घेतला.

महाराष्ट्र सहकारी (नियमन) अधिनियम 2014चे कलम 16नुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर ,बल्लारपूर व चिमूर यांचे मार्फत उपरोक्त प्रकरणाबाबत पुढील तपास सुरु असून तपासाअंती अवैध सावकारांचे विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. अवैध सावकारीबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अथवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांचे कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन,जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,चंद्रपूरचे ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.
 मागास आयोगाचा अहवाल हा ‘ब्रह्मघोटाळा’

मागास आयोगाचा अहवाल हा ‘ब्रह्मघोटाळा’

मूळातून चौकशी झाली पाहिजे
ओबीसी व्ही.जे.एन.टी. संघर्ष समिती 


माननीय उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर महाराष्ट्र शासनानाला न्या. गायकवाड राज्य मागास आयोगाचा अहवाल कोर्टात व याचिकाकर्त्यांना द्यावा लागला आहे. मात्र त्यातही शासनाने फसगत केलेली आहे. राज्य मागास आयोगाचा पूर्ण रिपोर्ट न देता त्याचा सारांश फक्त दिलेला आहे. मूळ रिपोर्ट हा एक ‘ब्रह्मघोटाळा’ असून त्याची मुळातूनच चौकशी होणे गरजेचे आहे.

मराठा समाज हा पुढारलेला समाजघटक आहे, असा अहवाल राज्य मागास आयोगाच्या अनेक अध्यक्षांनी अनेकवेळा दिलेला आहे. त्याचप्रमाणे मान्यवर हायकोर्ट व मान्यवर सुप्रिम कोर्ट यांनीसुद्धा अनेकवेळा मराठा समाज पुढारलेला असल्याचे निकाल दिलेले आहेत. त्यामुळे मराठा जात ही ओबीसी अथवा SEBC च्या यादीत कधीच येऊ शकत नाही.

असे असतांना विद्यमान भाजपा-शिवसेनेच्या फडणवीस सरकारने पुढीलप्रमाणे षडयंत्र करून चुकीच्या पद्धतीने मराठा समाजास ओबीसी (SEBS) दर्जा देऊन त्यांना आरक्षण दिले आहे.

1) सुप्रिम कोर्टाच्या सर्व गाईड लाईन्स डावलून राज्य मागास आयोगाचे गठण करण्यात आले.

2) हा आयोग ओबीसींचा असतांना त्यात जाणीवपूर्वक मराठा समाजाचे पक्षपाती सभासद मोठ्या संख्येने नियुक्त करण्यात आलेत.

3) आयोगामार्फत मराठा समाजाचे जे सर्वेक्षण करण्यात आले ते खाजगी संस्थांकडून करण्यात आले. या खाजगी संस्था मराठा-पक्षपाती होत्या, त्यामुळे त्यांनी बोगस अहवाल तयार केला व आयोगाला सादर केला.

4) या खाजगी संस्थांची नियुक्ती मागास आयोगातर्फे केली गेलेली नाही. शासनानेच या खाजगी संस्थांना काम दिले व त्यांचे अहवाल राज्य मागास आयोगाला स्वीकारायला भाग पाडले. यावरून महाराष्ट्र शासनच हे सर्व षडयंत्र घडवून आणत होते, हे सिद्ध होते.

5) या बोगस संस्थांच्या बोगस सर्व्हेक्षणाच्या आधारावर बोगस अहवाल तयार करण्यात आला. अशा बोगस अहवालाच्या आधारावर मंजूर झालेला ‘मराठा आरक्षणाचा कायदा’ न्यायालयात टिकणार नाही, या बद्दल आमची खात्री आहे

6) महाराष्ट्र शासनाने हा अहवाल स्वीकारला नाही, मात्र अहवालाच्या फक्त शिफारशी स्वीकारल्या व मराठा जातीला ओबीसी म्हणजेच SEBC दर्जा देऊन त्यांना मूळ ओबीसींचे आरक्षण फस्त करण्याचा परवाना दिला.

7) महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आमदारांनी राज्य मागास आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्याचा आग्रह धरला व त्यासाठी दोन दिवस सभागृह बंद पाडले. मात्र तरीही अहवाल विधानसभेत मांडला गेला नाही. हायकोर्टाने, वकीलांनी, पत्रकारांनी व असंख्य कार्यकर्त्या-नेत्यांनी राज्यमागास आयोगाचा अहवाल मागीतला, मात्र त्यांना अजूनही अहवालाची मूळप्रत देण्यात आलेली नाही.

8) फडणवीस सरकारने केले तसे षडयंत्र इतरही राज्ये सरकारे करू शकतात व जाट, पटेल, राजपूत, ठाकूर सारख्या क्षत्रिय जाती संपूर्ण देशातील ओबीसींचे आरक्षण नष्ट करू शकतात.

9) देशातील सर्व क्षत्रिय जाती केंद्र सरकारमधील ओबीसींच्या यादीत आलेत तर, संपूर्ण देशातील हजारो ओबीसी जाती रस्त्यावर भीक मांगतांना दिसतील, यात शंका नाही.

या बोगस अहवालाचा सारांश असलेली प्रत पी.डी.एफ. फाईल स्वरूपात देण्यात आलेली आहे. त्यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे.....

1) मराठा व कुणबी एकच जात आहे, हे या अहवालाने मान्य केले आहे. त्यासाठी ते पहिला आधार देतात की, मराठी भाषा बोलणारा तो मराठा, असा पुरावा देऊन अहवालकर्ते स्वतःच अडचणीत आलेले आहे. कारण महाराष्ट्रात राहणारे सर्वच जातीचे लोक मराठी भाषेतच बोलतात. धोबी, लोहार, सुतार, कुंभार आदि जातीसुद्धा मराठीच बोलतात मग त्यांनीही स्वतःला मराठाच म्हणावे काय?

2) मराठा व कुणबी मराठी भाषाच बोलतात म्हणून ते एकच जात आहेत, असा हास्यास्पद पुरावा जोडलेला आहे.

3) मराठा व कुणबी एकच आहेत तर, मग त्यांना एकत्र 16 टक्के आरक्षणाच्या SEBC प्रवर्गातच का टाकले नाही. कुणबी जातीला ओबीसी यादीतच का ठेवले आहे?

4) आजवरच्या सर्व राज्य मागास आयोगाच्या अहवालात मराठा व कुणबी एक नाहीत व मराठा ही पुढारलेली जात असल्याचे सिद्ध केले आहे. संदर्भः- मराठा ओबीसीकरण, लेखक- अशोक बुद्धीवंत, प्रथमावृत्ती-2009)

5) जगन्नाथ होले विरूद्ध महाराष्ट्र सरकार (रीट पिटिशन क्र. 4476/2002) या केसच्या दिनांक 17 ऑक्टोंबर 2003 च्या निकालपत्रात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठा व कुणबी हे एकच आहेत, असे मानायला नकार दिलेला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 15 एप्रिल 2005 रोजी शिक्कामोर्तब केले आहे. हायकोर्टाने अशा प्रकाराला मुर्खपणा(Absurdity) म्हटलेले आहे. (AIR Bombay R 365 (DB) Aurangabad bench, 2006, Vol.1, P 370)

6) मराठा हे कुणबीच आहेत व ते शूद्रच आहेत, असे सिद्ध करण्याचा आटापिटा करतांना चूकीची उदाहरणे दिलेली आहेत. छत्रपती शिवराय, संत तुकाराम आदि महापुरूष मुळातच शुद्र होते व कुणबीही होते. मात्र आजच्या मराठा जातीच्या तत्कालीन मराठा पूर्वजांनी स्वतःला 96 कुळी उच्चवर्णीय समजून शिवरायांना शूद्र म्हणून हिन वागणूक दिलेली आहे. छत्रपती शिवरायांनी लिहिलेल्या 136 पत्रांपैकी एका पत्रात ते खंत व्यक्त करतात की, ‘ते देशमूख नाहीत, पाटील आहेत.’ (संदर्भः- शिवाजी महाराजांची पत्रे, लेखक- डॉ. प्र.न. देशपांडे)

7) जातीव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या काळात अनेक उलथापालथी झालेल्या असून काही जातींची उन्नती होऊन त्या क्षत्रिय झालेल्या आहेत. त्यापैकी मराठा ही मुळात मिरासदार कुणबी जात असली तरी मध्ययुगीन काळात सामंतशाहीमुळे व आधुनिक काळात ब्राह्मणेतर चळवळीमुळे काही कुणबी घराणी उन्नयन होऊन त्या क्षत्रिय झाल्यात. महाराष्ट्रात जसे मराठा, तसे उत्तरेकडे जाट, ठाकूर वगैरे जाती क्षत्रिय म्हणून आजही मिरवितांना दिसतात.

8) खाऊजा धोरण वा शेतीविषयक सरकारी धोरणामुळे या क्षत्रिय जातीत गरीब वर्ग निर्मान झाला आहे. तो आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्याचे कोणतेही सामाजिक व शैक्षणिक शोषण झालेले नाही, त्यामुळे तो सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असू शकत नाही. हे सत्य कालेलकर आयोग, मंडल आयोग व त्यानंतरच्या अनेक आयोगांनी, तसेच न्यायालयांनीही वारंवार मांडले असतांना, महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना जाणीवपूर्वक षडयंत्र रचून त्यांना SEBC दर्जा दिला व मूळ ओबीसींच्या यादीत टाकले आहे.
पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राद्वारे साडे सात हजारांवर तक्रारींचा निपटारा

पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राद्वारे साडे सात हजारांवर तक्रारींचा निपटारा


'हॅलो चांदा'ला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

आपल्या कोणत्याही तक्रारीसाठी डायल करा 155-398


चंद्रपूर, दि.30 जानेवारी- जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'हॅलो चांदा' या ऑनलाइन तक्रार निवारण केंद्राद्वारे आतापर्यंत तब्बल 7 हजार 936 तक्रारींचा निपटारा करण्यात यश आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून, त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हॅलो चांदा ऑनलाइन तक्रार निवारण केंद्र 155-398 या टोल फ्री क्रमांकावर समस्या सोडविणारा देशातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.

या अभिनव उपक्रमाची सुरुवात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते 15 जुलै 2017रोजी करण्यात आली. नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्यासाठी 155-398 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सेवेद्वारे जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्यातील दिरंगाई, 7/12, 8अ, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई, पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास केलेली टाळाटाळ, शाळा अंगणवाडीतील मध्यान्ह भोजन, शेतीविषयक समस्या, अवैध दारूची विक्री, आरोग्यासंबंधित समस्या, वीज, रस्ते आदीविषयी समस्यांची तक्रार करण्याची सुविधा आहे.

लोकांच्या तक्रारी आल्यास त्या हॅलो चांदा कक्षातील कर्मचाऱ्यांकडून नोंद केल्या जातात आणि तीस दिवसांच्या आत त्या समस्या सोडविल्या जातात. समस्या सुटली अथवा नाही याचा फिडबॅकसुद्धा या सेवेद्वारे घेतल्या जात असल्याने या सेवेला चंद्रपूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जुलैपासून तर आतापर्यंत 8 हजार 474 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी तब्बल 7 हजार 936 तक्रारीचे निराकरण करण्यात आले. तर केवळ 437तक्रारी प्रलंबित आहेत. ऑनलाइन तक्रार निवारण केंद्राद्वारे नागरिकांना समस्या मांडता येत असून त्या त्वरित सोडविण्यात येत असल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली असून सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली अभिनव योजना राज्यात लोकप्रिय ठरली आहे.

26 जानेवारीला भाषणातून कौतुक
जिल्हयात हॅलो चांदा ही योजना उत्तम काम करीत असून या यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हयातील नागरिकांच्या समस्या दूर होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणातून या योजनेचे कौतुक केले असून नागरिकांना या योजनेचा लाभ सुध्दा घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.
मेंडकी येथे जबरानजोतधारक शेतकरी मेळावा

मेंडकी येथे जबरानजोतधारक शेतकरी मेळावा

रोहित रामटेके/ ब्रह्मपुरी

श्रमिक एल्गार वनहक्क शेतकरी अभियान (विदर्भ) च्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा तथा वनहक्क शेतकरी अभियानाच्या संयोजिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे अध्यक्षतेखाली जबरानजोत धारक शेतकरी मेळावा घेण्यात आला. 


 या मेळाव्याला रणरागीनी प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सुनबाई सौ. अश्विनी खोब्रागडे या प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होत्या. 


अॅड. गोस्वामी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ब्रम्हपुरी तालुक्यातील १२०० जबरानजोत धारकांचे अपिल जिल्हाधिकारी यांनी एकाच दिवशी खारीज केले असुन हा फार मोठा अन्याय जबरान जोत धारकांवर आहे. श्रमिक एल्गारने खारीज केलेले दावे पुन्हा अपिल केले ही देशातील पहीली घटना आहे असेही यावेळी त्या बोलल्या. ब्रम्हपुरी तालुक्यात वाघाचे हल्ले होत आहेत तसेच वन्यप्राण्यापासुन पिकाची नुकसान होत आहे यावर सरकार चुप्पी साधुन असुन या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्वांनी संघटनेला साथ द्यावी असे आव्हानही त्यांनी अध्यक्षीय भाषनातुन केले. जनतेचे प्रश्न निकाली लावेपर्यंत स्वस्थ बसनार नाही यासाठी संघटना मजबुत करु असेही सांगितले. प्रश्नावर बोलण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसुन माणुसकी पाहीजे मात्र आपले लोकप्रतीनीधी संवेदनशुन्य झालेले दिसत आहेत असे मत व्यक्त केले. 


अश्विनी खोब्रागडे यांनी भाषनातुन सांगतांना शेतकरी संघटीत होऊन या अभियात सहभागी होण्याचे आव्हान केले.


 यावेळी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, महासचिव घनशाम मेश्राम, विदर्भ राज्य आघाडीचे मुल तालुका अध्यक्ष गौरव शामकुळे, श्रमिक एल्गारचे मोतिराम विधाते, यांची भाषने झाली. 


कार्यक्रमाचे संचालन श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते घनशाम लेंझे यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना मांदाडे यांनी केले. 


कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बाळकृष्ण दुमाने, बालाराम चहांदे, विनायक थेरकर, मंगला मिसार, अशोक बोरकर, नरेंद्र राऊत, गिरीधर नाकतोडे, डाक्टर नागोसे, साधुजी भोयर, भय्याजी मेश्राम, श्रावन बुजाडे, शिवम बानबले, पार्वता ठाकरे, विभा मेश्राम , बुधाजी मांदाडे,  गणेश कडस्कर  आदिंनी परीश्रम घेतले.

 चाळीस वर्षांनंतर गावात आली  लाईट

चाळीस वर्षांनंतर गावात आली लाईट

अनेक वर्षांनंतर लोकांचा अंधकार संपला
गजेंद्र डोंगरे/बाजारगाव:

बाजारगाव:-नागपूर जिल्ह्यातील पेठ कालडोंगरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चंद्रपुर रिठी हे छोटेसे 40 घराची वस्ती दोनशे लोकसंख्या असलेले गाव चाळीस वर्षापासून बिना लाईन मध्ये अंधारात एवढे वर्ष काढली असून आज चाळीस वर्षानंतर लाईन ट्रान्सफाँरम चे उद्घाटन करण्यात आले प्रधानमंत्री सौभाग्य योजना अंतर्गत वीज कनेक्शन देण्यात आली या बीपीएल कार्ड द धारकांना मोफत कनेक्शन देण्यात आले या चंद्रपूर रिठी गावात गावात पारधी समाज राहत आहे चाळीस वर्षानंतर लाईन आल्याने त्यांचा आनंद मावेनासा झाला चाळीस वर्षापासून गाव वंचित होतेनारायण आमझरे (मुख्य अधीक्षक अभियंता )राजेंद्र (घाटोळे अभियंता )अशोक गाणार (कार्यकारी अभियंता )निखिल श्रीवास्तव (सहाय्यक अभियंता), नाना गावंडे ( कांग्रेस नेता) भिमराव कडू ,विष्णू आदमने, रमाबाई बोरकर (सरपंच पेठ ),मोहन खांदारे, वसंता बावणे ,मोरेश्वर डवरे, अनिल पाटील , पुरुषोत्तम सोनवणे ,प्रवीण पानपत्ते ,माणिक भलावी, अरुण मोरे ,अंकुश शेंडे ,अनिल पाटील उपस्थित होते मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते संचालन हेमचंद ठकराल तर आभार प्रदर्शन रमाताई बोरकर यांनी मानले

 

गणराज्य दिनी मतीमंद विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

गणराज्य दिनी मतीमंद विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

युवा मित्र फाउंडेशनने आयोजित केला स्नेहभोजनाचा कार्यक्रम
चंद्रपूर/प्रतिनिधी:

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून "युवा मित्र फाउंडेशन"च्या माध्यमातून  स्व. दादाजी बेले मतिमंद विद्यालयात मतिमंद विध्यार्थ्यांनसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम विध्यार्थ्यांचा चेहऱ्यावर राष्ट्रध्वजाची प्रतिकृती काळून देण्यात आली.व  मिठाईचे वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
    तसेच संस्थेचा वतीने विध्यार्थांसाठी जेवण्याची व्यवस्था करण्यात आली. "युवा मित्र फाउंडेशन"ने केलेल्या या कार्यक्रमाचा मतीमंद मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघयला मिळाला,त्यामुळे  खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक  दिन साजरा झाल्याचे वाटले.

यावेळेस संस्थेचे महेश काहिलकर, चेतन जनबंधु, सोनल धोपटे, रुपेश नायर, दिनेश जुमडे, दिनेश गोहणे, ओमप्रकाश मिसारजी, बाळूभाऊ नगराळे,  संजीवनी कुबेरजी, भरती कश्यपजी, सुषमा मोके, माधुरी काहिलकर, रेश्मा नायर,पल्लवी जुमडे, कीर्ती नगराळे, इत्यादींची उपस्थिती होती.

Tuesday, January 29, 2019

महाराजबागेतील बिबट्याचा मृत्यू

महाराजबागेतील बिबट्याचा मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी:
महाराजबागेत मागील ११ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ‘बाल्या’ नामक बिबट्याचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. हा चौदावर्षीय बिबट्या मागील आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता.

गावामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या या बिबट्याला चंद्रपूर जिल्ह्यातीलधाबा वनपरिक्षेत्रातून १४ नोव्हेंबर २००८ रोजी जेरबंद करून महाराजबागेत आणण्यात आले होते. तेव्हापासून तो महाराजबागेतच वास्तव्यास होता. मूत्रपिंडाच्या आजाराने अत्यवस्थ असलेल्या या बिबट्यावर आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. मागील काही दिवसांपासनू त्याने अन्नग्रहण करणेही सोडले होते. अखेर शनिवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. 

बिबट्याचे शवविच्छेदन डॉ. प्रशांत सोनकुसरे आणि डॉ अभिजित मोटघरे यांनी केले. महाराजबागेत त्याच्यावर शनिवारी सकाळी ११.१५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ डी. एम. पंचभाई, डॉ. सुनील बावस्कर, डॉ. अभिजित मोटघरे व डॉ. प्रशांत सोनकुसरे तसेच प्राणिसंग्रहालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी ऑगस्ट २०१८ महिन्यात महाराजबागेत अनामिका नामक मादी बिबटाचा मृत्यू झाला होता.

पूर्वजांचे भाव ज्याच्या मनात आहे तो राष्ट्र हि संकल्पना समजू शकतो:अजयजी निलदावार

पूर्वजांचे भाव ज्याच्या मनात आहे तो राष्ट्र हि संकल्पना समजू शकतो:अजयजी निलदावार

चंद्रपूर/प्रतिनिधी:

शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ तर्फे “ भारत माता पुजन ” चा कार्यक्रम शहीद भगतसिंग चौक, पठाणपुरा रोड चंद्रपुर येथे संपन्न झाला. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हनून अजय निलदावार – प्रांत महामंत्री.वि.हि.प. नागपूर, कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन चंद्रपूर महानगरपालिका चे उपमहापौर श्री अनिल फुलझेले व कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी चंद्रपूर चे श्रीपाद जोशी, लेखक, नाटककार हे होते.

सर्व प्रथम चंद्रपूर महानगरपालिका चे उपमहापौर यांना चौकाचे सौन्दर्यीकरण करण्याचे व चौकातून विठ्ठल मंदिर कडे जाणाऱ्या मार्गाला “स्व.अॅड. दादाजी देशकर मार्ग” असे नाव देण्याबाबत निवेदन सदर कार्यक्रमातून देण्यात आले. व अनिल फुलेझेले यांनी सदर कार्यक्रमाबाबत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आपल्या भाषणात म्हणाले कि इतिहास चे स्मरण नेहमी करणे हि काळाची गरज आहे. आपल्या वैचारिक वारसा मध्ये नियमितता असणे आवश्यक आहे. संस्कृती माणसाला तेजस्वी बनवते. त्यागाची परंपरा हि सुरु असणे आवश्यक आहे. भगतसिंग यांचे साहित्य वाचण्याची गरज आहे. या वयात आपण इतक्या चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करणे म्हणजे आपली देशभक्ती हि जागृत असण्याचे प्रतिक आहे. इतिहासातून आपली संस्कृती कळते, संस्कृती मधून भाषा कळते म्हणून भाषा हि सुधृढ असणे आवश्यक असते. आपण या देशाचे देणे लागतो या विचाराने आपण जगले पाहिजे. असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पुढे म्हणाले की भारत माता पुजन हा कोणत्या धर्माचा कार्यक्रम नाही आहे हा समाजाचा उत्सव झाला पाहिजे. भारत मातेची सर्वानी पूजा केली केली पाहिजे.भारताचे रक्षण करणे हे कोणत्या एका संघठनेचे काम नाही आहे. हे सर्व धर्माचे काम आहे.कायद्याचे पालन म्हणजेच देशभक्ती आहे. जगात सहिष्णूता ही भारताकडून शिकली पाहिजे.रक्षण करणारी आपली संस्कृती आहे ति आपण सदैव जपली पाहिजे. व सदैव देशभक्ती जागृत ठेवली पाहिजे.व ति आपल्या आचरणातून दाखवली पाहिजे आज आचरनातून देशभक्ती दाखवण्याची अत्यंत गरज आहे. ज्या प्रकारे देशात वातावरण खराब होत चालले आहे ते पुढील काळासाठी योग्य नाही आहे. आज जे लोक भारतात रहातात तेच लोक भारताच्या विरोधात नारेबाजी करताना आपल्याला दिसून येतात. देशाच्या विरोधात नारे देणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. असे का होते या प्रश्नावर तरुण युवा पिढी ने विचार केला पाहिजे व देशाप्रती योग्य प्रेम व्यक्त केले पाहिजे.

आम्ही आमचा संस्कार टिकवून ठेवला तर आपली भारत माता मजबूत होणार. आपण आपल्या जीवन्मुल्याचे संरक्षण केले तर त्याचे संरक्षण समाजात होणार. पूर्वजांचे भाव ज्यांच्या मनात आहे ते राष्ट्र हि संकल्पना समजू शकेल.घरातील संस्कार जतन करणे आवश्यक आहे. व अशा देशभक्ती पर कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण चंद्रपूर शहरात चौका-चौकात करण्याचे आव्हान यावेळी उपस्थित नागरिकांना केले. व देश सेवा करणे म्हणजे सीमेवर जाऊनच करणे असे नव्हे तर सामाजिक क्षेत्रात राहून सुध्दा योग्य प्रकारे करू शकतो असे ते आपल्या भाषणात म्हणाले.


कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी भारत मातेचे पुजन केले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शेवट वंदे मातरम नी कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमात वयक्तिक गीत चैतन्य खटी यांनी म्हंटले. प्रास्ताविक सुयश खटी यांनी केले व सूत्रसंचालन श्रेयश घरोटे , आभार प्रदर्शन प्रसाद घरोटे, वंदे मातरम तेजस्विनी घरोटे यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंकुश पिंपळशेंडे, रवी म्हरसकोल्हे, आदित्य देशपांडे, शरद खनके, प्रसाद काटपाताळ, सुजित खटी, प्रज्वल काटपाताळ, चैतन्य खटी, ओंकार नेरलवार, मयूर घरोटे, कार्तिक भाकरे, ओंकार अंदनकर, विश्वनाथ तेलंग इत्यादीनी सहकार्य केले.
चंद्रपुरात रेशीम कोष खरेदी केंद्राला मान्यता

चंद्रपुरात रेशीम कोष खरेदी केंद्राला मान्यता

चंद्रपूर/प्रतिनिधी: 

 विदर्भ व लगतच्या विभागातील तुती व टसर कोषाचे उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांना, खरेदीदारांना, रिलर्स तसेच उद्योजकांना टसर कोषाच्या खरेदीविक्रीची सुलभतेने सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी चंद्रपूर येथे रेशीम कोष खरेदी केंद्राची स्थापना करण्यात यावी, असे पत्र केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संचालक रेशीम संचालनालयास पाठविले होते. या संदर्भातील पाठपुराव्याची तसेच या अनुषंगाने उपलब्ध अनुकूल सुविधांची योग्य दखल घेत विभागीय रेशीम कार्यालय, नागपूर यांच्याद्वारा या केंद्राला तत्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथील यार्डवर हे केंद्र भाडेतत्वावर जागा घेवून सुरू करण्याससुध्दा अनुमती देण्यात आली आहे. 

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पत्राची याद्वारे त्यांनी केलेल्या मागणीची गांभीर्याने दखल घेत विभागीय रेशीम कार्यालय, नागपूर यांनी चंद्रपुरात रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी सर्व शक्याशक्यतेबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना पाथरी येथील रेशीम विकास अधिकारी श्रेणी-१ यांना केली होती. त्यानुसार सदर अहवाल प्रस्तुत केल्यानंतर विभागीय रेशीम कार्यालयाने ही मान्यता प्रदान केली आहे.

मुख्यमंत्री व संबंधित अधिकाºयांना पाठविलेल्या पत्राद्वारे गृह राज्यमंत्री अहीर यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधताना बेंगलोर जवळील रामनगरच्या धर्तीवर विदर्भ व लगतच्या रेशीम उत्पादक शेतकºयांसाठी खरेदी विक्रीची, वाहतूक, विपणन व अन्य सुविधांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे खरेदी केंद्र उघडण्यास शेतकºयांना व या प्रक्रियेत सहभागी असणाºया सर्वांना मोठी सोय उपलब्ध होईल, याकडे लक्ष वेधले होते.

रेशीम कोष खरेदी केंद्राच्या अभावामुळे राज्यांतर्गत खरेदीपेक्षा राज्याबाहेर मोठया प्रमाणात म्हणजेच ९९.४० टक्के रेशीम कोषाची खरेदी होत असल्याच्या बाबींकडेही त्यांनी या पत्रातून शासनाचे लक्ष वेधले होते. एवढेच नव्हे तर राज्यातील ११ टक्के टसर उत्पादक शेतकरी आपला माल बंगलोर येथे विकत असल्याने त्यांना आर्थिकदृष्टया नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.

ही बाब मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकºयांनी निदर्शनास आणीत यापूर्वी चार बोगी असल्याने सुविधा व्हायची. आता केवळ एक बोगी उपलब्ध असल्यामुळे बंगलोर येथे मालाची वाहतूक करताना प्रचंड मन:स्ताप होतो. तसेच खासगी वाहनाद्वारे हा माल खरेदी केंद्रावर नेण्यासाठी आर्थिक, मानसिक त्रासाबरोरच मालाच्या दर्जावरही परिणाम होत असल्याच्या संबंधितांच्या तक्रारीकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले होते.

ना. अहीर यांच्या या भूमिकेची योग्य दखल घेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेशीम संचालनालयाने सर्व बाबींची अनुकूलता विचारात घेत विभागीय रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पत्र २५ जानेवारीला निर्गमित करून जिल्हा रेशीम कार्यालयाच्या (पाथरी, जि. चंद्रपूर) सकारात्मक अहवालानुसार कृष उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर येथे कोष खरेदी केंद्राकरिता लागणारी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १०० स्क्वे. फूट जागा भाडे पट्टीवर घेण्यास तत्वत: मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तसेच वैदर्भीय तुती उत्पादक शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे सहकार्य व सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

चंद्रपूर हे विदर्भातील मध्यवर्ती ठिकाण असून भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, नागपूर व मराठवाडा परिसर चंद्रपूरशी रेल्वेद्वारे जोडला गेला आहे. त्यामुळे परिवहनाच्या दृष्टीने सर्वात स्वस्त पर्याय चंद्रपूरमुळे निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना:वीजजोडणीसाठी ८६८५ शेतकऱ्यांचे अर्ज

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना:वीजजोडणीसाठी ८६८५ शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ दहा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी 8 हजार 685 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

शाश्‍वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका तयार केली असून या पुस्तिकेचे वितरण सर्वत्र करण्यात येत आहे. याशिवाय योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी महावितरणतर्फे मोठ्याप्रमाणात व्हॉट्स ॲपचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत दि. 29 जानेवारी 2019 पर्यन्त राज्यातील सुमारे 8 हजार 685 शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून मागील दहा दिवसात 5 हजार 446 शेतकऱ्यांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे
 बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्या दिनांक ३० जानेवारी रोजी खामला, पांडे ले आऊट, स्नेह नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वरील भागासह योगक्षेम ले आऊट, मालवीय नगर,गोकुळपेठ बाजारपेठ, जयताळा,प्रसाद नगर, दुबे ले आऊट, अमर-आशा, दाते ले आऊट, शारदा नगर,घरकुल सोसायटी, प्रगती नगर,अष्टविनायक नगर,संघर्ष नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. 

सकाळी ६ ते ९ या वेळेत भगवाघर,काचीपुरा, लेंड्रापार्क, रामदासपेठ कॅनॉल रोड,सकाळची १० ते ११ या वेळात राणी झाशी चौक परिसर,संगम चाळ, जानकी टॉकीज, तेलीपुरा,हनुमान गल्ली, अभ्यंकर रोड, येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळात वसंत नगर आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालय परिसर, सोमलवाडा, राजीवनगर,सावित्री विहार, वर्धा रोड, मुळक कॉम्प्लेक्स, विदर्भ प्रीमियर सोसायटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, पाटील ले आऊट, पन्नास ले आऊट, सोनेगाव वस्ती, सहकार नगर,गजानन धाम, जयप्रकाश नगर, चिंतामणी नगर,तपोवन कॉम्प्लेक्स ,राहुल नगर,नार केसरी ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत धरमपेठ,खरे टाउन, धरमपेठ टांगा स्टॅन्ड, वेस्ट हाय कोर्ट रॊड, अलंकार सिनेमा, जीवन छाया शंकर नगर, दीनदयाल नगर,स्वावलंबी नगर,पडोळे कॉर्नर, त्रिमूर्ती नगर,लोकसेवा नगर,ब्लॅक डायमंड सोसायटी, कापसे ले आऊट, शहाणे ले आऊट, सुर्वे नगर, भांगे विहार, चंदनशेष नगर,कृष्णन नगरी, बेस, नरसाळा येथील वीज पुरवठा बंद राहील.
3 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर

3 फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर

मूल येथील महाशिबिराची तयारी अंतिम टप्प्यात

जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 मूल येथे रविवारी 3 फेब्रुवारी रोजी शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यशस्वीतेसाठी जनजागृती व प्रसिद्धी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

मूल येथील प्रशासकीय भवनात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय तसेच सर्व शासकीय विभागाच्या समन्वयातून या महाशिबिराचे आयोजन कर्मवीर महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात येणार आहे.

बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, महाशिबिर नियोजन समितीचे स्थानिक अध्यक्ष तथा मूलचे उपविभागीय अधिकारी एम.व्ही. खेडकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, विभागीय वनअधिकारी सोनकुसरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव किरण जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे, पोलीस निरीक्षक कासार आदीसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरस्थळाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शिबिरासाठी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सूचना डॉ.खेमनार आणि पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी केल्यात. रुग्णवाहिका, अग्निशामन, पार्किंग आदी व्यवस्थांची पाहणी त्यांनी केली. मूल शहरासह तालुका आणि सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केला वणी येथील पत्रकार मारहाणीचा निषेध 

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केला वणी येथील पत्रकार मारहाणीचा निषेध 

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन 
 दोषी पोलीस कर्मचा-यांवर कठोर कारवाईची केली मागणी
चंद्रपूर/प्रतीनिधी:

बातमीच्या चित्रीकरणासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस ठाण्यात गेलेल्या झी मीडियाचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत आणि त्यांच्या सहका-याला २ पोलीस कर्मचा-यांनी गुहेगाराप्रमाणे वागणूक देत जबर मारहाण केली. २८ जानेवारी रोजी झालेल्या या घटनेविषयी माध्यम जगतात संताप व्यक्त होत आहे. झी मीडिया प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी स्वतःचा परिचय दिल्यावरही हा प्रकार घडला. मारहाणीतून आपली कशीबशी सुटका करून घेत राऊत यांनी पोलीस निरीक्षक वणी यांचा कक्ष गाठला. मात्र तरीही २ मुजोर-बेलगाम कर्मचा-यांची अरेरावी सुरूच राहिली. 

पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप केल्यावरच अत्याचारी पोलीस कर्मचारी मागे सरले. या घटनेने पत्रकार सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या घटनेचा निषेध आणि २ दोषी पोलीस कर्मचा-यांवर कठोर कारवाईची मागणी करत चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या एका शिष्टमंडळाने माध्यम प्रतिनिधींसमवेत चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांची भेट घेत त्यांना एक निवेदन सादर केले. जिल्हाधिका-यांशी झालेल्या चर्चेत पत्रकार बंधूनी वणी येथील घटनेविषयी चिंता व्यक्त करत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदनामार्फत भावना कळविण्याची विनंती केली. पत्रकारांचे संरक्षण करत चौथ्या स्तंभाला बळकट करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी मारहाण केल्याने शिष्टमंडळाने संताप व्यक्त केला. याप्रसंगी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांच्यासह प्रमोद काकडे, महेंद्र ठेमस्कर, प्रवीण बतकी, जितेंद्र मशारकर, अमित वेल्हेकर, गणेश अडलूर , आशीष अम्बाडे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केला वणी येथील पत्रकार मारहाणीचा निषेध

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केला वणी येथील पत्रकार मारहाणीचा निषेध


जिल्हाधिका-यांना दिले निवेदन - दोषी पोलीस कर्मचा-यांवर कठोर कारवाईची केली मागणी
चंद्रपूर :- बातमीच्या चित्रीकरणासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस ठाण्यात गेलेल्या झी मीडियाचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत आणि त्यांच्या सहका-याला २ पोलीस कर्मचा-यांनी गुहेगाराप्रमाणे वागणूक देत जबर मारहाण केली. २८ जानेवारी रोजी झालेल्या या घटनेविषयी माध्यम जगतात संताप व्यक्त होत आहे. झी मीडिया प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी स्वतःचा परिचय दिल्यावरही हा प्रकार घडला. मारहाणीतून आपली कशीबशी सुटका करून घेत राऊत यांनी पोलीस निरीक्षक वणी यांचा कक्ष गाठला. मात्र तरीही २ मुजोर-बेलगाम कर्मचा-यांची अरेरावी सुरूच राहिली. पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप केल्यावरच अत्याचारी पोलीस कर्मचारी मागे सरले. या घटनेने पत्रकार सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या घटनेचा निषेध आणि २ दोषी पोलीस कर्मचा-यांवर कठोर कारवाईची मागणी करत चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या एका शिष्टमंडळाने माध्यम प्रतिनिधींसमवेत चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांची भेट घेत त्यांना एक निवेदन सादर केले. जिल्हाधिका-यांशी झालेल्या चर्चेत पत्रकार बंधूनी वणी येथील घटनेविषयी चिंता व्यक्त करत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदनामार्फत भावना कळविण्याची विनंती केली. पत्रकारांचे संरक्षण करत चौथ्या स्तंभाला बळकट करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी मारहाण केल्याने शिष्टमंडळाने संताप व्यक्त केला. याप्रसंगी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांच्यासह प्रमोद काकडे, महेंद्र ठेमस्कर, प्रवीण बतकी, जितेंद्र मशारकर, अमित वेल्हेकर, गणेश अडलूर , आशीष अम्बाडे आदींची उपस्थिती होती.
बांबू संशोधन आता अधिक वेगवान होणार

बांबू संशोधन आता अधिक वेगवान होणार


बांबू क्षेत्राची गुणात्मक वाढ आणि दर्जेदार उत्पादन पद्धती यासाठी सामंजस्य करार
- सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 29 : राज्यात विविध बांबू प्रजातींची निर्मिती, बांबू क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लागवड आणि संशोधन आता अधिक वेगवान होणार असून त्यासाठी आजचा सामंजस्य करार निश्चित उपयुक्त सिद्ध होईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले

आज सह्याद्री अतिथीगृहात वनमंत्री श्री मुनगंटीवार आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था आणि बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के.रेड्डी, राष्ट्रीय सुगी पाश्च्चात तंत्रज्ञान संस्थे चे संचालक सतीश पाटील, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, संस्थेचे सल्लागार गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

या करारामुळे राज्यातील बांबू क्षेत्र अधिक गतीने विकसित होईल, बांबूच्या टिशू कल्चर ची निर्मिती, त्याची नर्सरी निर्माण करण्याच्या कामाला गती येईल. शेतकऱ्यांच्या शेतात बांबू लागवडीला यातून प्रोत्साहन मिळेल. सामूहिक उपयोगिता केंद्राची निर्मिती, भाऊ केंद्रांची स्थापना, प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आदान प्रदान, बांबूची काढणी आणि हाताळणी, बांबू क्षेत्राची गुणात्मक वाढ आणि दर्जेदार उत्पादन पद्धती चा विकास या सर्वच कामात हा सामंजस्य करार महत्वाचा ठरणार आहे, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन होणार

मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन होणार

  • राज्‍य मंत्रीमंडळाचा निर्णय
  • अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराचे फलीत
चंद्रपूर, दि.29 जानेवारी- चंद्रपूर जिल्‍हयातील मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या आज झालेल्‍या बैठकीत घेण्‍यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने राज्‍य शासनाने हा निर्णय घेतला आहे. जुलै 2018 च्‍या नागपूर येथे झालेल्‍या पावसाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा व उत्‍तर महाराष्‍ट्राच्‍या विकासासाठी घोषीत करण्‍यात आलेल्‍या विशेष पॅकेजमध्‍ये राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी यासंबंधीची घोषणा केली होती. 



चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिकांच्‍या उपजिवीकेचे साधन प्रामुख्‍याने जंगल व शेतीवर आधारित आहे. सदर जिल्‍हयातील नागरिकांची कृषी शिक्षण घेण्‍याची मानसिकता असून सुध्‍दा सदर जिल्‍हा मागास असल्‍यामुळे या जिल्‍हयांमध्‍ये युवक व युवतींसाठी कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध करणे गरजेचे आहे. ज्‍यामुळे आधुनिक कृषीतंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यासाठी ग्राम पातळीवर विस्‍तार कार्यकर्ते, ग्रामसेवक, कृषीमित्र व तज्ञ मार्गदर्शक निर्माण होवू शकतील. या क्षेत्राची ही विशिष्‍ट गरज लक्षात घेता डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव विद्यापीठामार्फत शासनाला सादर करण्‍यात आलेला आहे. या प्रस्‍तावाला आज मंत्रीमंडळाची मान्‍यता मिळाली आहे.

मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन झाल्‍यास जिल्‍हयातील युवक युवतींसाठी कृषी पदवीधर अभ्‍यासक्रमाची सुविधा निर्माण होणार असुन त्‍या माध्‍यमातुन बदलत्‍या हवामानानुसार कृषी व्‍यवसाय, शेतीपूरक व्‍यवसाय व शेती उद्योग ज्‍या मुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार या भागात होवू शकतो. तसेच शेतक-यांना आधुनिक पध्‍दतीने शेती कशी करावी यासंबंधीचे प्रशिक्षण व सल्‍ला देवून पिकांची उत्‍पादकता वाढून पर्यायाने त्‍यांचा आर्थिकस्‍तर उंचावेल. ही गरज लक्षात घेता हे महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा प्रस्‍ताव शासनाला सादर करण्‍यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्‍या कार्यक्षेत्रांतर्गत विदर्भातील 11 जिल्‍हयांचा समावेश होतो. सद्यःस्थितीत पूर्व विदर्भातील 5 जिल्‍हयांसाठी केवळ दोनच घटक कृषी महाविद्यालये कार्यरत असून पूर्व विदर्भातील विकासाचा अनुशेष भरून काढण्‍यासाठी सदर शासकीय कृषी महाविद्यालय सहाय्यभूत ठरणार आहे.

मुल लगतच्‍या मारोडा, सोमनाथ येथे विद्यापीठाच्‍या माल‍कीची 61.80 हे, जमीन उपलब्‍ध आहे. यापैकी 41.80 हेक्‍टर जमीन या कृषी महाविद्यालयासाठी उपलब्‍ध होवू शकते. या कृषी महाविद्यालयासाठी शेती प्रयोगासाठी आवश्‍यक 30 हेक्टरजमीनीची निकड उपलबध जमिनीतून भागविली जावू शकते. झुडपी जंगल कृषी शाखेच्‍या विद्यार्थ्‍यांना पर्यावरण आणि जैवविविधतेच्‍या दृष्‍टीकोणातुन अभ्‍यासासाठी उपयुक्‍त ठरू शकते. या सर्व बाबी लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मुल येथे 60 विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमतेचे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाने घेतला आहे.

चंद्रपूर जिल्‍हयातील कृषी शिक्षण व प्रशिक्षण या प्रक्रियेच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयाचा कृषी विषयक विकासाला या कृषी महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेने गती मिळणार आहे. या आधीही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील कृषी क्षेत्राच्‍या विकासाच्‍या दृष्‍टीने अनेक महत्‍वपूर्ण निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्‍हयातील 96 हजार शेतक-यांना कर्जमुक्‍तीचा लाभ, चंद्रपूर तालुक्‍यातील अजयपुर येथे पंजाब नॅशनल बँकेच्‍या सहका-र्यांने शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्‍थापना, टाटा ट्रस्‍ट च्‍या सहकार्याने92 गावांमध्‍ये समृध्‍द शेतकरी प्रकल्‍प, जे.के. ट्रस्‍ट्र च्‍या सहकार्याने जिल्‍हयात 15 ठिकाणी भाकड गायींचे दुध उत्‍पादक गायींमध्‍ये रूपांतरण करण्‍याचा प्रकल्‍प, पोंभुर्णा येथे मधुमक्षीका पालनाचा कृषी उद्योग, चांदा ते बांदा या योजनेच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयात मोठया प्रमाणावर बंधा-यांची निर्मीती, चिचडोह बॅरेज च्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर व गडचिरोली जिल्‍हयातील 43 गावांना सिंचनाचा लाभ, जिल्‍हयातील माजी मालगुजारी तलावांच्‍या दुरूस्‍तीसाठी मोठया प्रमाणावर निधीला मंजूरी, विशेष बाब या सदराखाली मुल आणि पोंभुर्णा या तालुक्‍यातील शेतक-यांसाठी सिंचन विहीरींना मंजूरी, पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजना हा महत्‍वाकांक्षी सिंचन प्रकल्‍प, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मुल तालुक्‍यातील चिचाळा व लगतच्‍या गावांमध्‍ये पाईपलाईन द्वारे सिंचन सुविधा उपलब्‍ध करण्‍याचा 23 कोटी रू. किंमतीचा महत्‍वाकांक्षी प्रकल्‍प, पोंभुर्णा येथे टाटा ट्रस्‍ट च्‍या सहकार्याने अगरबत्‍ती उत्‍पादन प्रकल्‍प, टूथपिक उत्‍पादन प्रकल्‍प, विसापूर आणि पोंभुर्णा येथे बांबु हॅन्‍डीक्राफ्ट ॲन्ड आर्ट युनिटची स्‍थापना, दुग्‍धव्‍यवसाय प्रकल्‍प आदी महत्‍वपूर्ण निर्णय घेत शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्‍यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या प्रयत्‍नांना मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याच्‍या निर्णयाने नवा आयाम प्राप्‍त झाला आहे.