काव्यशिल्प Digital Media: जुन्नर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label जुन्नर. Show all posts
Showing posts with label जुन्नर. Show all posts

Monday, February 04, 2019

 जुन्नर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोकुळ कुरकुटे

जुन्नर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोकुळ कुरकुटे

जुन्नर /आनंद कांबळे:

जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोकुळ कुरकुटे यांची तर कार्याध्यक्षपदी रवींद्र पाटे यांची निवड करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दत्ता म्हसकर होते.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे -उपाध्यक्ष इस्माईल सय्यद ,संजय शेटे
सचिव-सचिन कांकरिया
सहसचिव - सुरेश भुजबळ
खजिनदार- पराग जगताप
प्रसिद्धी प्रमुख -लक्ष्मण शेरकर
तक्रार निवारण प्रमुख - दादा रोकडे
आळेफाटा विभाग प्रमुख - अर्जुन शिंदे,
जुन्नर विभाग प्रमुख - दामोदर जगदाळे
ओतूर विभाग प्रमुख - रामनाथ मेहेर
नारायणगाव विभाग प्रमुख - अतुल कांकरिया तर सल्लागार ज्ञानेश्वर भागवत ,प्रवीण ताजणे,रमेश तांबे यांची एकमताने निवड करण्यात आली.

Sunday, January 27, 2019

डिसेंन्ट फाऊंडेशनला स्वच्छतेबाबत पुरस्कार

डिसेंन्ट फाऊंडेशनला स्वच्छतेबाबत पुरस्कार

जुन्नर /आनंद कांबळे

जुन्नर -महाराष्ट्र राज्याचे कृषि -पणन व फलोत्पादन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या शुभहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव येथे डिसेंन्ट फाऊंडेशन चे संस्थापक *जितेंद्र बिडवई* याना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व  अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. 


डिसेंन्ट फाऊंडेशन च्या माध्यमातून *'कळी उमलताना'* या उपक्रमा अंतर्गत ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी तज्ञ वैद्यकीय महीला अधिकाऱ्यांमार्फत  वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करून ईको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन चे मोफत वाटप करण्यात आले आहे.


त्याचप्रमाणे *'संस्कार स्वच्छतेचा'* या उपक्रमा अंतर्गत आत्तापर्यंत ८० शाळांना स्वच्छता कीट वाटप केले आहे. 


तसेच  'किटक नाशकांचा सुरक्षित वापर' या उपक्रमा अंतर्गत अनेक शेतकर्यांना कृषी तज्ज्ञांचे मार्फत मार्गदर्शन करून मोफत संरक्षण पोषाख वाटप करण्यात आले आहे. याच कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला.

शिवनेरीसह, जुन्नर मध्ये साकारनार  प्राचीनवस्तू संग्रहालय

शिवनेरीसह, जुन्नर मध्ये साकारनार प्राचीनवस्तू संग्रहालय

डेक्कन कॉलेज, खा.आढळराव,सह्याद्री गिरीभ्रमन संस्थेचे प्रयत्न 

जुन्नर /आनंद कांबळे:

शिवजन्मभूमी महाराज किल्ले शिवनेरीवर  तसेच जुन्नर शहरात  प्राचीन वस्तु आणि शिवकालीन शस्रास्र संग्रहालय साकारणार आहे.  आणि डेक्कन कॉलेजच्या वतीने भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्था  सहकार्याने हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत सुमारे ८६ कोटी रुपयांचा विकास प्रकल्प राज्य शासनाच्या विविध विभागांद्वारे २००२ पासून सुरु आहे.शिवकालीन दुर्गबांधनीचे  मॉडेल फोर्ट म्हणून किल्ले शिवनेरीचे संवर्धन करण्यात येत आहे.

या प्रकल्पामुळे शिवनेरीला भेट देणाऱ्या  दुर्गप्रेमी पर्यटक आणि शिवप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुन्नर तालुक्याला इ.स.पूर्व इतिहास असून, या इतिहासाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. यामुळे शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांना आकर्षण वाटेल असे   प्राचीन वस्तु आणि शिवकालीन शस्रास्र संग्रहालय     उभारावीत अशी मागाणी होती.

शिवनेरीवरील अंबरखाना इमारती मध्ये कायमस्वरुपी माहिती केंद्र आणि शिवकालीन शस्रास्र संग्रहालय उभारण्यात यावे अशी मागणी १९ फेब्रुवारी २००७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे  जुन्नरमधील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने केली होती. अशी माहिती संस्थचे अध्यक्ष संजय खत्री यांनी दिली. 

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्रहालयाला मान्यता दिली होती. भारतीय पुरात्तव विभागाचे जुन्नर विभागाचे संरक्षक सहाय्यक बी.बी.जंगले यांनी  अंबरखाना इमारतीच्या संवर्धनाला सुरुवात केली. मात्र  हा प्रस्ताव पुढे बाजूला पडला.

खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य शासनाबरोबर, विद्यमान केंद्रिय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका उषा शर्मा यांचे बरोबर संग्रहालयाबाबत पाठपुरावा  केला. 

यानंतर डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ.वसंत शिंदे यांनी शिवनेरी सह जुन्नर शहरात देखील पुरातत्व वस्तु संग्रहालय उभारण्याबाबत नियोजन केले.  संग्रहालयासाठी  डॉ. शिंदे यांनी  जुन्नर नगर पालिकेच्या  जिजामाता उद्याना शेजारील जुन्या विश्रामगृहाची  जागा देण्याची मागणी नगर पालिकेकडे केली आहे.

जुन्नरचे  नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच जागा डेक्कन कॉलेजला  सदर जागा हस्तांतरीत  करण्याची तयारी दर्शविली असल्याचे डॉ. वसंत  शिंदे यांनी सांगितले. 

पुढील महिन्यात  शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यात संग्रहालयाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक घोषणा करतील, यासाठी आम्ही पाठपुरावा करत  आहोत.

- संजय खत्री अध्यक्ष, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर 


किल्ले शिवनेरीवरील  अंबरखाना ही वास्तू वापरात येऊन चांगले संग्रहालय झाले तर हे दुर्गप्रेमी  पर्यटकांसाठी मार्गदर्शक  माहिती केंद्र होईल. त्याच्या कार्यवाहीसाठी  केंद्र, राज्य सरकारसह विविध विभागांशी पत्रव्यवहार करीत आहे. 

- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील 

जुन्नर शहर 2000 वर्षांपूर्वी  सातवाहनांची साम्राज्याची  पहिली राजधानी होती. सातवाहन साम्राज्याचे   रोमन आणि ग्रीक लोकांबरोबर व्यापारी संबंध होते.डेक्कन कॉलेजच्या माध्यमातून जुन्नर मध्ये   उत्खनन करण्यात आलेले आहे.सुमारे2000वर्षांपूर्वीच्या प्राचीन तसेच शिवकालीन  लोकसंस्कृतीची माहिती व्हावी, यासाठी संग्रहालयासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत.

- डॉ. वसंत शिंदे 

कुलगुरू, डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ) 

जुन्नर मध्ये प्रस्तावित असलेल्या    प्राचीनवस्तू संग्रहालयासाठी जागा तसेच   आवश्यक ती  प्रशासकीय पूर्तता करण्यासाठी जुन्नर नगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.--

शाम पांडे,नगराध्यक्ष जुन्नर नगर पालिका

असा ही आदर्शपणा

असा ही आदर्शपणा

जुन्नर / आनंद कांबळे

शैक्षणिक क्षेत्रात अधिकारी म्हटले की,चुका काढणे ,गुरुजीना विनाकारण त्रास देणे असे प्रकार अधिकारी करत असतात ,पण आज एक विद्यार्थ्यांनीचा पुढील काळातील सर्व शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी अधिकारी घेतो, हाच गुरुजीना सुखद धक्का .

याबाबतची घटना अशी की ,जुन्नर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पी.एस मेमाणे हे बालिका दिनानिमित्त शाळेना भेट देत होते.त्यांनी अचानकपणे काठेवाठी शाळेस भेट दिली. शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला आहे,असे असताना त्यांनी विद्यार्थीशी वैयक्तिक हितगुज केले.

त्यावेळी इयत्ता पहिलीतील एक चुणचुणीत मुलगी साहेबांशी धीटपणे बोलत होती.तिच्याशी मेमाणे यांनी अधिक चौकशी केली असता तिने सांगितले की मी साक्षी पांडुरंग मुठे ,मला शाळा खूप आवडते.मला खूपृ खूप शिकून मोठे व्हावयाचे आहे म्हणून मी ४ते ५ किलोमीटर प्रवास करत डोंगर दरीतून चालत  शाळेत येते.

है ऐकून  गटशिक्षणाधिकारी मेमाणे यांना धक्काच बसला.तिला जवळ घेत तिला आधुनिक झाशीची राणीची लेक म्हणून तिचा गौरव केला.

यापुढील काळात या मुलीचा संपूर्ण शैक्षणिक खर्च  करण्याचा मनोदय त्यांनी  व्यक्त केला.गटशिक्षणाधिकारी मेमाणे यांची शैक्षणिक तळमळ पाहून शिक्षण  क्षेत्रात  काम करत असलेल्या शिक्षक  वर्गास हा सुखद धक्काच होता.

कारण शैक्षणिक क्षेत्रात  गुरुजीना त्रास देणे म्हणजे अधिकारी अशी रितच झाली आहे.

गटशिक्षणाधिकारी पी.एस मेमाणे यांनी बालिका दिना निमित्त काठेवाडी शाळेस एक न विसणारी भेट दिली.त्याबद्दल  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य ,मुख्याध्यापिका वर्षाराणी शिंदे ,शिक्षक प्रवीण पारवे यांनी शाळेची मुलगी दत्तक घेतल्याबद्दल मेमाणेसाहेबांना धन्यवाद दिले.

डॉ.लहू गायकवाड यांना बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार जाहीर

डॉ.लहू गायकवाड यांना बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार जाहीर

 जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील प्रा.डाँ.लहू गायकवाड यांना बेस्ट इनोव्हेटिव्ह टिचर पुरस्कार जाहिर करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दर वर्षी संशोधन अणि चौकटी बाहेरचे कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना 'बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर' हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येत असते.    २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. (दि. २६)जानेवारी २०१९ रोजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नितीन करमळकर यांनी आपल्या भाषणा मध्ये हा पुरस्कार, नारायणगाव येथील  ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विषयाचे शिक्षक, 'प्रा.डॉ. लहू कचरू गायकवाड' यांना  पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

 डॉ.गायकवाड हे इतिहासाचे अभ्यासक, संशोधक व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.जुन्नर तालुक्याच्या इतिहासाला त्यांनी संशोधनातून मोठे स्थान प्राप्त करून दिले आहे.

 डाँ.प्रा.लहू गायकवाड  यांना पुरस्कार  जाहीर झाल्याने ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव च्या शिरपेचात,पुन्हा एकदा मनाचा तुरा रोवला गेला.असल्याचे प्राचार्य शेवाळे  यांनी मत व्यक्त केले. डॉ लहू गायकवाड यांचे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष  कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच  त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Friday, January 18, 2019

गायमुखवाडी ट्रॅव्हल्स- पिकअप भीषण अपघातात ३ ठार २० जखमी

गायमुखवाडी ट्रॅव्हल्स- पिकअप भीषण अपघातात ३ ठार २० जखमी

जुन्नर /आनंद कांबळे:

नगर कल्याण राष्ट्रीय मार्गावरील गायमुखवाडी ( ता. जुन्नर ) येथे विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी गेलेल्या नगर येथील ट्रॅव्हल्स व कांदयाने भरलेल्या पिकअप ४o७ ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले .

टॅव्हल्स मधील पंधरा ते वीस विद्यार्थी जखमी झाले. जखमीमध्ये काही शिक्षकांचा समावेश असल्याचे बोलले जात होते. हा अपघात गुरुवार दि. १७ रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घडला. याबाबत पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर व सहायक पोलिस निरीक्षक रमेश खुणे अधिक माहिती घेताना सांगितले की, अहमदनगर येथील डॉन बॉस्को विद्यालय सावेडी येथील विद्यार्थ्यांच्या सहलीची खाजगी बस क्र. एम.एच. १६ बी.सी. २६५१ वसईकडून नगरकडे जात असताना जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडीत आळेफाटया कडून मुंबईकडे कांद्याने भरलेला पिकअप ४०७ क्रमांक एमएम१६ ए वाय ४१८९ ची समोरासमोर जोरदार धडक होऊन पिकअप चालकासह अन्य दोघे ठार झाले.
पिकअप चालक महादेव बाबाजी खोसे(वय४८), बसचा क्लिनर शैलेश बाबासाहेब निमसे (वय१९) त्यात एका शिक्षकाचा समावेश आहे. शिक्षकाचे नाव समजू शकले नाही.
अपघात घडल्यानंतर ट्रॅव्हल्स व पिकअप गाडीने पेट घेतला . या अपघातात ट्रॅव्हल्स मधील १५ ते २० सहलीतील विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते.जखमी विद्यार्थ्यांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघात स्थळी ओतूर व आळेफाटा पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी जुन्नरच्या पोलिस उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना यांनी भेट दिली.

Tuesday, January 15, 2019

अतुल बेनके यांच्या सह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

अतुल बेनके यांच्या सह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

जुन्नर /आनंद कांबळे:

जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी ते गुंजाळवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केले नाहीत ते लवकरात लवकर बुजवावेत यासाठी वरूळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर बेकायदा जमाव जमवून गर्दी करून सार्वजनिक रस्त्यामध्ये ठाण मांडून लोकांना जाण्या येण्याचा रस्ता अडवून लोकांची गैरसोय केली म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या सह५० ते ६० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे
. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके गुंजाळवाडीचे उपसरपंच श्रीकांत वायकर,तालुका युवक अध्यक्ष सुरज वाजगे ,तानाजी वारुळे,वरूळवाडी चे उपसरपंच सचिन वारुळे, सदस्य भाऊ वारुळे, विपुल फुलसुंदर, वरून भुजबळ, पप्पु नायकोडी,राहुल गावडे,व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे५० ते ६० कार्यकर्ते यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम३४१ ,१४३,१४७,मपोकाक१३५,सह क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ नुसार दि.१३रोजी सायं गुन्हा दाखल केला आहे याबाबत पो. शिपाई रमेश इचके यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे यांनी म्हटले की, रस्ताच्या दुरावस्थेमुळे गुंजाळवाडी येथील दोन जण अपघात होऊन जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत या घटने मुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यावी म्हणून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनापूर्वी नारायणगाव पोलीस ठाण्यात आंदोलनाबाबतचे रितसर पत्र देण्यात आले आहे. आंदोलकांनी कोणतेही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा उद्रेक केलेला नाही. गुन्हे दाखल होण्याच्या बाबत राजकीय दबाव दिसून येत असल्याचे वाजगे यांनी म्हटले.

Sunday, December 23, 2018

ऑल इंडिया उलमा बोर्ड़ ची जुन्नर येथे बैठक

ऑल इंडिया उलमा बोर्ड़ ची जुन्नर येथे बैठक


 जुन्नर - ऑल इंडिया उलमा बोर्ड़ ची जुन्नर येथे बैठक झाली. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाची जमीन, अतिक्रमण ,घोटाले या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यात महारष्ट्र मध्ये वक्फ बोर्डची 3 लाख एकर जमीन आहे. जमिनीवर महाराष्ट्र सरकारचा ६० वर्षापासून कब्जा आहे. महाराष्ट्र सरकार वक्फ बोर्डला वक्फ बोर्ड जामिनीचे भाड़े देत नाही . ऑल इंडिया उलमा बोर्ड ला महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्ड मंडळाच्या जामिनीचे भाड़े म्हणून वक्फ बोर्डला एक हजार कोटि रुपये दयावे. महाराष्ट्र सरकार ने वक्फ बोर्ड़ मंडळाच्या जामिनीचे सर्व साढ़ेसात कोटी रुपये देवून पुणे व परभणी या जिलयमध्ये चालू केला आहे .
वक्फ बोर्ड मालमत्ता सर्वे मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाले झाले आहे. काही वक्फ बोर्डची संपत्ति मध्ये सर्वेमध्ये नोद होवू नये म्हणून पैसे देवून वक्फ बोर्ड मंडलाची जामिनीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.
वक्फ बोर्ड मण्डलचा सर्वे व चौकशी विभागीय आयुक्त मार्फत करण्यात यावी. वक्फ बोर्ड मंडलाची अतिक्रमण, खोटे कागदपत्रे तयार करुण वक्फ बोर्ड जमीन विकन्यात आली आहे .
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाचे सी ई ओ नसल्याने हजारों फाइल्स वक्फ बोर्ड मध्ये प्रलबित पडली आहे.
ऑल इंडिया उलमा बोर्ड ची अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डला नियमित सी ई ओ देण्यात यावा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाचे चेअरमन म.म.शेख यानी राजीनामा दिला.
तसेच वक्फ बोर्डचा कालावधी सांपला आहे. आम्ही या मुख्य मागण्या घेवून महाराष्ट्र सरकार समोर निदर्शन केली आहे. डिसम्बर २०१७ रोजी हिवाळी अधिवेशन नागपुर ५ दिवस आमरण उपोषण केले होते. २६नोव्हेबर २०१८हिवाळी अधिवेशन मुम्बई आजाद मैदानवर निदर्शन केली. १८ डिसम्बर२०१८ रोजी जंतर मंतर दिल्ली येथे एक दिवस निदर्शन केले. लोकशाही मार्गाने औल इंडिया उलमा बोर्ड महारष्ट्र वक्फ बोर्ड च्या मागण्या घेवून केंद्र व राज्य सरकार व राज्य सरकार समोर मागण्या करत आहोत परंतु केंद्र व महाराष्ट्र सरकार वक्फ बोर्ड मागण्या वर निर्णय घेण्यास तयार नाही.


या पत्रकार परिषदेला उपस्थित उलमा बोर्ड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मौलवी उस्मान रहमान शेख महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहम्मद शहाबुद्दीन जावेद सौदागर , मौलाना मोहम्मद नकी हसन महाराष्ट्र प्रदेश जॉइन्ट सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुतबे आलम पीरज़ादे महाराष्ट्र प्रदेश एक्सेकेटिव मेम्बर निसार मकबूल शेख पुणे जिल्हा उपाध्यक्ष यासीन सय्यद जुन्नर शहर अध्यक्ष नाजिम गोलंदाज व रफ़ीक़ तकि यूसुफ शेख अशपक तीरंदाज अल्ताफ बेपारी जावेद चौगुले व अनेक सामाजिक संघटना व त्याचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती निसार मकबूल शेख यानी दिली.

Tuesday, December 11, 2018

जुन्नर तालुकास्तरीय भजन स्पर्धेत फांगुळ गव्हाण शाळा प्रथम क्रमांकाने विजयी

जुन्नर तालुकास्तरीय भजन स्पर्धेत फांगुळ गव्हाण शाळा प्रथम क्रमांकाने विजयी

जुन्नर /आनंद कांबळे:

             यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय कला- क्रीडा स्पर्धा सन-2018-2019 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगुळ गव्हाण येथील मुलांनी प्रथम क्रमांक मिळविला, पश्चिम आदिवासी भागातील शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगुळ गव्हाण येथील भजनाचा संघ विजयी झाला आहे. 
हा संघ जिल्हास्तर याकरिता निवड झाला,या संघाचे पंचायत समिती शिक्षण विभाग जुन्नर, बीट पाडळी आणि केंद्र खडकुंबे फांगुळ गव्हाण येथील शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन केले. 
सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक कचरदास दरेकर,लेंभे सर,काफरे मॅडम आणि मेमाणे सर यांनी केले,तर विशेष सहकार्य वा. दा. शेळके केंद्रप्रमुख यांनी केले. 
या सर्व मुलांचे अभिनंदन बीट पाडळी शिक्षण विस्तार अधिकारी शेळकंदे साहेब आणि सत्कार पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी पी. एस.मेमाणे साहेब व सुभाष मोहरे,विनायक ढोले,अन्वर सय्यद यांनी केले.

Sunday, December 09, 2018

जुन्नरमध्ये तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात.

जुन्नरमध्ये तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात.

जुन्नर /आनंद कांबळे 

          पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कला क्रीडा महोत्सव जुन्नरमध्ये आजपासून सुरू झाल्या आहेत.
आजच्या पहिल्या दिवशी मैदानी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार घेण्यात आले.यात कबड्डी,खो खो ,लंगडी,धावणे, गोळाफेक,चेंडूफेक,उंच उडी,लांब उडी आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
आज पहिल्या दिवशी उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, आशाताई बुचके,शरदराव लेंडे,पंचायत समिती सदस्य नंदाताई बनकर,जीवन शिंदे,दिलीप गांजळे,कृष्णराव मुंढे विद्यालयाचे सचिव देवराम मुंढे ,गटशिक्षण अधिकारी पी.एस .मेमाणे ,विस्तार अधिकारी के.बी.खोडदे,अनिता शिंदे ,सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,माध्यमिक क्रीडा शिक्षक पंच उपस्थित होते.
मैदानी स्पर्धा दिवसभरात उत्साही वातावरणात पार पडल्या,मैदान निर्मितीसाठी मुख्याध्यापक पोटकुले सर,क्रीडा शिक्षक शेजवळ मॅडम,साबळे सर,शिंगोटे सर यांनी विशेष प्रयत्न केले.
स्पर्धेच्या विजेत्या संघांना पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांजकडून ट्रॉफी तर पंचायत समितीच्या वतीने मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
संपूर्ण स्पर्धांचे समालोचन आपटाळे विद्यालयाचे शिक्षक लोखंडे सर यांनी उत्तम प्रकारे केले.
पहिल्या दिवसातील स्पर्धा गटशिक्षण अधिकारी पी.एस.मेमाणे यांच्या उत्तम नियोजनाखाली व मार्गदर्शनाखाली पार पडल्या.स्पर्धांचे संयोजन शिक्षण विस्तार अधिकारी के.बी.खोडदे,अनिता शिंदे यांनी उत्तम प्रकारे केले.
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ,शिक्षक समिती,अखिल शिक्षक संघ या संघटनांच्या वतीने पंचांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. स्पर्धा वेळेत पार पडल्याने सर्व शिक्षकांनी संयोजकांचे आभार मानले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या नियोजनात सर्व केंद्रप्रमुख,विषयतज्ज्ञ,अपंग समावेशीत शिक्षक, अनिल देठे,दीपाली थोरात,प्रवीण घोलप,तोडकरी सर,क्रीडा संघटनेचे राऊत सर,खराडे सर,विनायक खोत सर,विजय घोलप सर,डुंबरे एस.बी, ढमाले सर,व सर्व क्रीडा शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.
संपन्न झालेल्या या स्पर्धांमधील प्रथम क्रमांक पुढीलप्रमाणे : 50 मीटर धावणे स्पर्धेत - जमीर अकबर शेख ,शाळा धनगरवाडी,स्नेहा चंद्रकांत केदार ,शाळा आलमे यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

100 मीटर धावणे स्पर्धेत - आदित्य दिलीप कुमकर, शाळा पिंपळगांव जोगा,सारिका रवींद्र गाडगे,शाळा,साकोरी यांनी प्रथम क्रमांक मिळवले आहेत.

चेंडूफेक स्पर्धेत - बजरंग रामजन गौतमे शाळा,बागलोहरे,आणि खुशबू मटरू रॉय शाळा नं.2 नारायणगाव,यांनी प्रथम क्रमांक मिळवले आहेत.

गोळाफेक स्पर्धेत - आदित्य दिलीप कुमकर ,शाळा पिंपळगावजोगा,सानिका रवींद्र भुजबळ ,शाळा आनंदवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवले आहेत

उभी उंच उडी स्पर्धेमध्ये सुजल भाऊसाहेब खिलारी शाळा शिंदे आणि रविना मनोहर बांडे शाळा राजूर नंबर एक यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

धावती उंच उडी स्पर्धेत रोशन लक्ष्मण मोघे शाळा ठाकरवाडी आणि शुभांगी चंद्रकांत माळी शाळा गोळेगाव यांचे प्रथम क्रमांक आले आहेत.

लांब उडी स्पर्धेत आदित्य दिलीप कुमकर शाळा पिंपळगाव जोगा आणि आकांक्षा संतोष हांडे शाळा पिंपळगाव जोगा यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

लांब उडी स्पर्धेत प्रेम गुलाब म्हस्के शाळा नगदवाडी आणि साक्षी कैलास सोलाट शाळा गुंजाळवाडी यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

मुलांच्या कबड्डी स्पर्धेत पिंपळगाव जोगा शाळेतील मुले तर उच्छिल शाळेतील मुलींचा प्रथम क्रमांक आला
खो खो स्पर्धेत धनगरवाडी शाळेतील मुले आणि मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

लंगडी स्पर्धेत गुंजाळवाडी शाळेतील मुलांनी आणि मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला आहे
तालुकास्तरिय उच्छिल शाळेच्या मुली कब्बड्डीत विजयी

तालुकास्तरिय उच्छिल शाळेच्या मुली कब्बड्डीत विजयी

जुन्नर /आनंद कांबळे:

                 यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय कला- क्रीडा स्पर्धा  सन-2018-2019 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथील कब्बड्डी मुली प्रथम क्रमांक मिळविला.

आजपर्यंत पश्चि म आदिवासी भागातील शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथील मुलींचा संघ विजयी झाला आहे आणि त्यास जिल्हास्तर यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग जुन्नर, बीट पाडळी आणि केंद्र उच्छिल शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन केले. 
या सर्व खेळाडूना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद सुभाष मोहरे,स्मिता ढोबळे,आरती मोहरे आणि लीलावती भवारी यांनी केले,तर विशेष सहकार्य पुष्पलता पानसरे यांनी केले.
 या सर्व मुलांचे अभिनंदन बीट आपटाळे शिक्षण विस्तार अधिकारी के बी खोडदे आणि सत्कार पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी पी. एस.मेमाणे यांनी केले.
 

Tuesday, December 04, 2018

जागतिक अपंग दिन विशेष लेख

जागतिक अपंग दिन विशेष लेख

जुन्नर (पुणे)/आनंद कांबळे:
आज आपण २१ व्या शतकात वावरत आहोत तरीही आपले समज-गैरसमज आहे तिथेच आहेत. सद्याची दुष्काळी परिस्तिथी पाहता मानव कृत्रिमरित्या पाऊस पाडू इच्छित आहे. नवनविन झाडांना कलम करून सुंदर अश्या फुलबागा तयार करू पाहत आहे . परंतु जी फुले आपल्या घरात जन्माला आली आहेत त्यांना योग्य ते खतपाणी न देता ती उमळण्याआधीच कोमजतात यांकडे मात्र दुर्लक्ष करित आहे. साने गुरुजी म्हणत 'मुलं म्हणजे देवाघरची फुलं' म्हणजेच ज्या मुलांना देवाघरी स्थान आहे . त्यांना त्यांच्या स्वत:च्या हक्काच्या घरी मात्र कवडीमोलही किंमत नसावी ही एक खरोखरच एक खंत करण्यासारखी गोष्ट आहे.


दिव्यांग ( मतिमंद असलेली) म्हणजेच विशेष मुले आज किती तरी लोकांच्या घरी जन्माला येतात. काही घरामध्ये त्यांना हक्काचे स्थान मिळतही. परंतु अशी उदाहरणे बोटावर मोजण्याईतकीच.जवळ जवळ निम्म्याहून अधिक मुलांना तर वेडा म्हणूनच संबोधण्यात येते . अहो जर कोणी कुठे आणि कसा जन्म घ्यायचा हे जर आपल्या हाती असते तर सगळे विद्वान पंडित, राजे महारथी म्हणूनच जन्माला नसते का आले ? मानसिक अपंग मुलांनाही स्वतःच्या अशा भावना असतात . त्यांनाही प्रेम , जिव्हाळा , आपुलकी, ओढ हे शब्द कळत नकळत का होईना पण स्पर्ष करून जातात . आपल्याला थंडी वाजली तर आपण आहाहाहा करत कुडकुडायला लागतो . ह्या संवेदना त्यांनाही असतात . फरक केवळ एवढाच असतो की आपण थंडीला प्रतिउत्तर म्हणून गरम चादर अंगावर ओढातो . ही मुले मात्र तशीच गारठत उभी राहतात मग आपल्यातीलच एखाद्यने त्याच्या अंगावर चादर नको का ओढायला..........

काही पालक मानसिक अपंग मुलगा म्हणजे जणू काही शापच समजतात . आणि तो जर शाप असेल तो तुमच्यासाठी , त्यांची शिक्षा त्यांनी का भोगावी. कारण शाप हा तर आपापल्या कर्मामुळे मिळालेला असतो. आणि प्रत्येक शापालाही एक अभिशाप असतोच कि. रामायणातील अहिल्या हि देखील कित्येक वर्ष शापात होती परंतु प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ती देखील शापमुक्त झाली होती. मग या मुलांसाठी का कोणी राम बनत नाही.
समाजात या मुलांना एक वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जाते, त्यांच्याकडे आजही एका वेगळ्या नजरेने पहिले जाते. अरे पण तुमच्याकडे देखील कुणाचीतरी नजर असतेच ना. जेव्हा एखादे मतिमंद मूळ बाजारात, लग्नसमारंभात काय अगदी बागेत जरी खेळायला गेले तरी आजूबाजूची लोक त्याला तिरस्कृत नजरेने बघतात परंतु या नजरेची साधी कल्पनादेखील या मुलांना नसते.

समाजात अशीही काही उदाहरणे आढळतात कि खुळा म्हणून या मुलांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते तर काहींच्या घरी हि मूल अतिशय लाडकी असतात पण ते लाड काय कामाचे जे त्यांचं आतित्वच हिरावून घेतात. मुलगा वागतो तसा वागू दे गप्प बसला म्हणजे झालं, त्यांच्या कामात अडथळा नको म्हणून काही पालक या मुलांना घरातच कोंडून ठेवतात मग ते मूल काय खात, काय पीत, कस राहत यांच्याशी त्यांना काहीही सोयर-सुतक नसत. त्यापेक्षा सर्वात प्रथम या मुलाना समजून घ्या, त्यांच्या कामाची सवय लावा, स्वतःच काम स्वतः करणे हि त्यांची स्वतःची जबाबदारी आहे याची जाणीव मुलाना करून द्या.

मानसिक अपंग, विशेष मुलांसाठी आज विविध सामाजिक संस्था व शाळा काम करत आहेत. येथे या मुलांचे अपंगत्वाचे प्रमाण, बुध्यांकानुसार त्यांचे वर्गीकरण करून विविध गट तयार केले जातात. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना कामे दिली जातात. या संस्था त्याच्यातील सुप्त गुण शोधून त्यांच्या विविध त्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी प्रयत्न करतात. हि मुले मेणबत्या, खडू,कापूर, अगरबत्ती बनविणे, चित्रकला, हस्तकला, शिवणकाम करून शोभेच्या वस्तू बनवून त्यांची प्रदर्शनामार्फत विक्री करणे अशी कामे करतात, याशिवाय गायन, नृत्य, अभिनय, नाटक सादरीकरण करतात, मैदानी खेळ, स्पर्धात्मक खेळ, मनोरंजनात्मक खेळ खेळणे अशा इविध उपक्रमात सहभाग घेतात, ज्या मुलांना शारीरिक अपंगत्व आहे त्यांच्या गरजेनुसार फिसिओ थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्यूपेशनल थेरपी अशा विशेष तज्ज्ञच्या मार्गदरशनखाली दिली जाते. अपंग मुलांमध्ये काम करणे अवघड जरी आले तरी अशक्य मात्र मुळीच नाही हे त्या मुलांमध्ये गेल्याशिवाय आणि त्यांच्या सोबत काम केल्याशिवाय कसे कळणार? म्हणूनच म्हणतोय

अपंगांना हवी आहे तुमची साथ, द्या त्यांना मदतीचा हात,
मग ते हि करतील हसत खेळत अपंगत्वावर मात
जगतीक अपंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
संस्थेविषयी थोडेसे....
घे पाखरा मार भरारी, नको पाहू फिरुनी माघारी......
जरी अधुरी तुझी कहाणी, परी गात जा मंजुळ गाणी.....

माय ऍक्टीव्हिटी सेन्टर संचलित नंदनवन हि नोंदणीकृत सामाजिक संस्था शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरापासून 3 कि.मी. अंतरावर मतिमंद या दिव्यंग घटकासाठी शिक्षण, पुनर्वसनाचे सेवाकाम गेल्या 5 वर्षांपासून करत आहे. सद्या संस्थेत 22 मतिमंद बांधव संस्थेचा लाभ घेत आहे. सेवाकार्य आपल्यासारख्या दानशूर, सामाजिक भान असलेल्या दात्यांच्या, लोकसहयोगाच्या मदतीतून चालत आहे. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे, आपणहि आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडासा वेळ काढून आवश्य भेट द्यावी, संपर्कासाठी पत्ता : 
नंदनवन, मु. पो. खानापूर, धामनखेल रोड, ता. जुन्नर, जि. पुणे
लेखक : विकास बाजीराव घोगरे (विशेष शिक्षक)
संस्थापक : माय ऍक्टीव्हिटी सेंटर संचलित नंदनवन, जुन्नर, पुणे
मो. ९९६७२३०१८५, ७९७२४४४०८९
आनंद कांबळे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार

आनंद कांबळे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार

जुन्नर /आनंद कांबळे:
जुन्नर येथील प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आनंद कांबळे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या वतीने शिर्डी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
कराड अर्बन बँकेचे सुभाषराव जोशी व चेअरमन डाँ.सुभाष एरम यांच्या हस्ते आनंद कांबळे यांना सहपत्नीक शिक्षकरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.यावेळी आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार ,विकास गवते ,अतुल औटी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आनंद कांबळे यांच्या मुख्याध्यापक कालावधीत शाळेस आय.एस ओ मानांकन,स्वच्छ शाळा पुरस्कार ,उपक्रमशिल शाळा पुरस्कार ,तसेच बाबेल ट्रस्टचा पुरस्कार मिळाला आहे. शाळेचा दर्जा अ असून शाळा सिद्धीत Aग्रेड मिळाली आहे.यापूर्वी आनंद कांबळे यांना विविध सामाजिक ,शैक्षणिक संस्थेकडून सुमारे १४ पुरस्कार मिळाले आहेत.विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Saturday, November 24, 2018

तेजूरच्या ठाकरवाडीतील विद्यार्थ्यांना स्पोर्टस ड्रेस

तेजूरच्या ठाकरवाडीतील विद्यार्थ्यांना स्पोर्टस ड्रेस


जुन्नर (पुणे) / आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील आदिवाशी भागातील तेजूर ठाकरवाडीतील जि.प शाळेतील आदिवासी ११२ विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांने स्पोर्टस ड्रेस दिवाळी भेट दिले अशी माहिती मुख्याध्यापक आ.का.मांडवे यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेतील अभियंता व तेजूरचे रहिवाशी रामदास आढारी यांनी तेजूर ठाकरवाडी शाळेस भेट दिली.
शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता पाहून या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला .त्यांनी या विद्यार्थ्यांना स्पोर्टस ड्रेस भेट दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,याच मातीत मी शिक्षण घेतले.त्यावेळी एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या.मात्र त्यावेळच्या गुरुजीनी मला व माझ्या बरोबर शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले म्हणूनच मी अधिकारी झालो. आदिवासी ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर तेही माझ्यापेक्षाही मोठे होतील.मला माझे बालपण व त्यावेळची परिस्थिती लक्षात आली. या मुलांच्या करिता काहीतरी करावे म्हणून ही भेट दिली. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पोर्टस ड्रेस मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूप काही सांगून गेला. यापुढेही शाळेकरिता मदत देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी सरपंच संजय गावडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर दुधवडे , तंटामुक्ती अध्यक्ष सनाशेठ केदार, मुख्याध्यापक आ.का.मांडवे ,सहकारी शिक्षक ता.म.तळपे,स.चि.नांगरे,कृ.ना.तुरे ,ल.दु. कुडेकर उपस्थित होते.

Thursday, November 22, 2018

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुसरी आश्वासित प्रगती योजना लागू

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुसरी आश्वासित प्रगती योजना लागू

महासंघाच्या प्रदीर्घ लढ्याला यश



जुन्नर / आनंद कांबळे
शिक्षकेतर कर्मचारी यांना दुसरी आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू होण्यासाठी गेले ७/८ वर्ष महासंघाच्या वतीने विविध आंदोलन व निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला होता परंतु महासंघाच्या वतीने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाजूने 4 ऑक्टोबर 2018 अंतिम निकाल लागू झाला.

या याचिकेतील आदेशानुसार शिक्षकेतर कर्मचारी ( लिपिक व सेवक ) त्यांना 24 वर्ष पूर्ण केल्यानंतरची निवड श्रेणी अर्थात दुसरी आश्वासित प्रगती योजना लागू करावी यासाठी आज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक मा.सौ.मिनाक्षी राऊत तसेच शिक्षण संचालक कार्यालयात

अधीक्षकांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी पुणे,नगर व प्रशासन अधिकारी पुणे,नगर मनपा यांना यासंदर्भात आदेश लागू करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार तात्काळ यासंदर्भातले आदेश न्यायालयाच्या अधीन राहून लागू करण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक सौ. मिनाक्षी राऊत यांनी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले अशी माहिती संघटनेचे राज्य सहसचिव. विकास थिटे यांनी दिली.

महासंघाच्या शिष्टमंडळात पुणे जिल्हा अध्यक्ष नारायण शिंदे, राज्य सहसचिव विकास थिटे , पुणे जिल्हा सचिव जितेंद्र पायगुडे , शिक्षकेतर प्रमुख मारुती माळवदकर , मावळ तालुकाध्यक्ष आनंद गावडे तसेच श्रीकृष्ण सावरगावकर, वंदना गोडबोले, व्यंकटेश जोशी, श्रीकांत काकतकर,शोभा आगटे, लक्ष्मण लोखंडे, अनिल जगताप , मनोहर भोसले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.