সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 31, 2014

संगणक परिचालकाचे लैंगिक शोषण

संगणक परिचालकाचे लैंगिक शोषण

चंद्रपूर - लग्नाचे आमिष दाखवून संगणक परिचालकाचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका ग्रामसेवकाला तब्बल सहा महिन्यांनी अटक करण्यात आली आहे. नागभीड पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या पळसगाव (खुर्द) येथे संगणक परिचालक म्हणून एक महिला कार्यरत होती. याच गावात राहत असलेले ग्रामसेवक राजू ठाकरे याने तिला लग्नाचे आमिष दाखविले.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाला सुरवात

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाला सुरवात

चंद्रपूर,   गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला सुरवात झाली. रात्रभर कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरूच होता. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कत्तलखान्याविरुद्ध पोलिस ठाण्याला घेराव

कत्तलखान्याविरुद्ध पोलिस ठाण्याला घेराव

कामठीतील अवैध कत्तलखाणा हटण्यिात यावा
कामठी : शहरात सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण असून, रोज सायंकाळी पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे कामठीतील नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील अवैध कत्तलखाणा हटण्यिात यावा, या मागणीला घेऊन पोलिस ठाण्याला घेराव घालण्यात आला.
वन-वन्यजिवांच्या सुरक्षावर संकट

वन-वन्यजिवांच्या सुरक्षावर संकट

वनरक्षक-वनपाल बेमुदत संपावर वनमंत्र्यानी तोडगा काढावा-बंडु धोतरे
                        बेमुदत संपामुळे विदर्भातील वन-वन्यजिवांच्या सुरक्षावर संकट

चंद्रपुरः महाराष्ट्र राज्य वनरक्षक व वनपाल संघटना व्दारे वेतनवृध्दी
करीता 25 आॅगष्ट पासुन बेमुदत संपावर गेल्याने राज्यातील वनक्षेत्रातील
वन व वन्यजीव यांच्या सुरक्षेवर संकट निर्माण झाले आहे. या आंदोलनावर
तात्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे, याकरिता मा. वनमंत्री डाॅ. पतंगराव कदम
यांनी स्वतः पुढाकार घेऊन संप मिटवावा अशी मागणी इको-प्रो चे अध्यक्ष
बंडु धोतरे यांनी केली आहे.
वनरक्षक-वनपाल यांच्या बेमुदत संपामुळे संपुर्ण राज्यात विशेष करून
विदर्भातील वन-वन्यजीवांना याचा मोठा फटका बसला आहे. सदर संप असाच पुढे
चालु राहीला तर वनसंपत्ती ची चोरी व वन्यप्राण्यांची शिकारीच्या घटनेत
वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भात ताडोबा, मेळघाट, पेंच
व्याघ्र प्रकल्प तर बोर, नवेगाव-नागझीरा आदी अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने
मोठया प्रमाणात आहे. याव्यतिरीक्त विदर्भातील अन्य वनक्षेत्रात
वन्यजिवांचे प्रमाण सुध्दा मोठया प्रमाणात आहे. संपकाळात वनरक्षक, वनपाल
व वनमजुर सुध्दा बेमुदत संपात सहभागी झाल्याने संरक्षणाची गंभीर समस्या
सुध्दा निर्माण झाली आहे. अलिकडेच विदर्भात वाघांच्या शिकारीचे अनेक
प्रकरणे समोर आलेली आहेत. अशा परिस्थीतीत जंगलक्षेत्र रक्षकाशिवाय असणे
शिकाÚयासाठी फावणार आहे.
विदर्भातील वनक्षेत्रात विशेष करून चंद्रपूर जिल्हयात वन्यप्राणी-मानव
संघर्ष परिस्थीतीत अशा संपामुळे मोठया संकटाना तोंड दयावे लागत आहे.
वाघ-बिबटच्या हल्ल्यात जख्मी-मृत्युु पाळीव प्राण्यांचे पंचनामे वेळेवर न
होत असल्याने त्याची भरपाई गावकÚयांना देणे शक्य होत नाही. तसेच
वनसंपदेचे नुकसान, वन्यप्राण्यांच्या शिकारी आदी अनेक समस्या निर्माण
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनरक्षक-वनपाल अशा परिस्थीतीत
गावकÚयासोबत समन्वय साधुन परिस्थीती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू शकतो.
त्यामुळे सदर संप लवकरात लवकर संपवीणे हे वनमंत्री व राज्यसरकारची
जबाबदारी आहे. यावर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी बंडु धोतरे यांनी केली
आहे.

Sunday, August 03, 2014

विद्यार्थांची भूक वरण-भातावरच

विद्यार्थांची भूक वरण-भातावरच

ग्रामीण भागात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याने घरगुती आहारासह निवासी आश्रमशाळांतून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातून भाजीपाला गायब झाला आहे. त्यामुळे विद्यार्थांची भूक वरण-भातावरच भागात आहे.