काव्यशिल्प Digital Media: गुन्हे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label गुन्हे. Show all posts
Showing posts with label गुन्हे. Show all posts

Thursday, September 20, 2018

सेक्ससाठी कश्मीरी तरुणीही नागपुरात

सेक्ससाठी कश्मीरी तरुणीही नागपुरात


बेलतरोडी, मनीषनगर, अजनी, हुडकेश्‍वर, सीताबर्डी, धंतोली, शंकरनगर व अंबाझरी हे परिसर देहव्यापाराचे "हब' बनले आहेत. काश्‍मीरसह अन्य राज्यांतील जवळपास 800 पेक्षा जास्त तरुणी "मसाज' सेवा देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती देहव्यापाराशी संबंधित सूत्रांनी दिली.
वर्षभरापासून शहरातील देहव्यापार चांगलाच फोफावला आहे. उपराजधानीला "सेक्‍स रॅकेट' हब अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. 



एम्प्रेस मालमध्येही सेक्स रॅकेट 

शहर पोलीसांनी २४ तासात एम्प्रेस मॉलसह दोन ठिकाणी सुरु असलेले देह व्यापाराचे अड्डे उघडकीस आणले.
पहिली कारवाई गांधीसागर तलाव येथील एम्प्रेस मॉलमध्ये करण्यात आली. सामाजिक सुरक्षा शाखेला मॉलमधील पहल्या माळ्यावर असलल्या ‘सलुन अ‍ॅण्ड स्पा’मध्ये देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाली. स्पाची मालक दर्शना उर्फ खुशी अनिल धकान (३५) रा. काचीमेट वाडी आहे. पोलिसांनी धाड टाकण्याची योजना आखली. 
शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता डमी ग्राहक स्पामध्ये पाठवण्यात आला. खुशीने दीड हजार रुपयात एका तरुणीचा सौदा केला. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकून खुशीला पकडले. स्पा मध्ये तीन तरुणी सापडल्या. एक तरुणी दिल्लीची राहणारी आहे. पोलिसांनी स्पा मधून मोबाईल, रुपये आणि रजीस्ट्रर जप्त केले. अड्ड्यावर सापडलेल्या तरुणीचा विचारपूस केल्यावर पोलिसांनी खुशीला ताब्यात घेतले. खुशीला आॅक्टोबर २०१७ मध्ये सुद्धा वाडीमध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवतांना पकडले होते. सुटल्यानंतर तिने अड्डा बंद केला होता. यानंतर एम्प्रेस मॉलमध्ये स्पा च्या नावावर देह व्यापार करू लागली. तिने ५० हजार रुपये महिना भाड्याने स्पा घेतला होता.
सूत्रानुसार एम्प्रेस मॉलमध्ये अनेक दिवसांपासून देह व्यापार सुरु आहे. तीन महिन्यांपूर्वी बेलतरोडी पोलिसांनी केलेल्या कारवाईतही एम्प्रेस मॉलमध्ये देह व्यापार सुरु असल्याची बाब उघडकीस आली होती. सातत्याने चर्चा होवूनही पोलीस एम्प्रेस मॉलवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहत होते.





दोन हजार रुपयात तरुणीचा सौदा 

दुसरी कारवाई झोन पाचच्या विशेष चमूने कळमना येथे सुरु असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर केली. येथे एक महिला आणि आॅटोचालकास पकडले. पोलिसांना डिप्टी सिग्नल येथील कविता बांदे ही महिला देह व्यापार चालवित असल्याची माहिती मिळाली होती. या आधारावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून कविताशी संपर्क साधला. त्याने दोन हजार रुपयात तरुणीचा सौदा केला. कविताने ग्राहकास आरोपी स्वीटी बागडे हिच्या घरी जाण्यास सांगितले. कविताने आॅटो चालक शेख कलीम शेख मुनीर (३२) रा. शेखनगर खरबी याच्यासोबत तरुणीला स्वीटीच्या घरी पाठवले.डमी ग्राहकाने इशारा करताच पोलीसांनी धाड टाकून स्वीटी आणि कलीमला पकडले. त्यांच्याकडे तरुणीही सापडली.

छायाचित्र -  साभार- विजय तायडे 



 हाॅटेल केपी इंनमध्ये सेक्स रॅकेट
नागपूर- धंतोली भागात असलेल्या हाॅटेल केपी इंनमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छापा घालून अनेकांवर कारवाई केली आहे. यात रशियन तरुणींनी सापङल्या असून, त्यांच्याकङून मोबाईल आणि ङायरी जप्त करण्यात आली.

मागील आठ दिवसांमध्ये ही तिसरी कारवाई असून, नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणमध्ये सेक्स रॅकेट चे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच रामदासपेठ येथील एका स्पा सलून आणि हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याचा भांडाफोड झाला होता. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी गोंडखैरी येथील एका फार्म हाऊसवर छापा घालून सेक्स डान्स करणाऱ्या तरुण तरुणींना अटक केली होती. शहरात ब्युटी पार्लर, मसाज सेंटर, हॉटेल, फार्म हाऊस आदी ठिकाणी सेक्स रॅकेट चे प्रमाण मोठ्या संख्येने वाढलेले आहे. शहरात नुकतेच नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आणि त्यांच्या नवी टीमने याविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही अशा सेक्स रॅकेट विरुद्ध कारवाईचे धडक मोहीम सुरू केली आहे.


नागपूरच्या रामदासपेठेतील पॉश कुंटनखान्यावर छापा


रामदासपेठेतील एका पॉश इमारतीत परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून स्पा च्या आड चालणारा कुंटणखाना उजेडात आणला. या प्रकरणी स्पा मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे.


धरमपेठमध्ये भाड्याच्या सदनिकेत
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकानेआॅनलाईन हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून एका महिलेसह तिघांना अटक केली. सौरभ राजेंद्र मून (वय २४), श्वेता सौरभ जैन (वय २२, रा. दोघेही, वाराशिवनी, बालाघाट) आणि केविन जॉन चक्कू ( वय २९, रा. पुट्टेपारमपील, केरळ), अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही गेल्या काही महिन्यांपासून खरे टाऊन धरमपेठमध्ये भाड्याच्या सदनिकेत राहतात. अत्यंत टेक्नोसॅव्ही असलेले हे तिघे सोशल साईटवरून सेक्स रॅकेट चालवीत होते. त्यांनी संकेतस्थळावर एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली राहुल आणि अर्जुन नाव टाकून आपला मोबाईल क्रमांक नमूद केला होता. या क्रमांकावर येणाऱ्या नंबरवर श्वेता लाघवी आवाजात ग्राहकांना पाहिजे तशी महिला आणि मुलगी उपलब्ध करून देण्याची बतावणी करायची. ग्राहकाच्या ऐपतीनुसार, त्याला महिला-मुलीचे दर सांगत होती. ग्राहकाने रक्कम जमा करताच धरमपेठसारख्या पॉश एरियातील खरे टाऊनमध्ये हे त्रिकूट त्याला सदाशिव अपार्टमेंटमधील सदनिका उपलब्ध करून देत होते. ही माहिती गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांना कळाली. त्यांनी आपल्या सहकाºयांकडून शहानिशा करवून घेतली. त्यानंतर गुरुवारी दुपारी एका बनावट ग्राहकाने सौरभ, श्वेता तसेच केविनसोबत संपर्क साधला. विशिष्ट रक्कम स्वीकारल्यानंतर या त्रिकुटाने ग्राहकाला एक देहविक्रय करणारी तरुणी उपलब्ध करून दिली. त्याचवेळी उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीना जगताप, सहायक निरीक्षक संजीवनी थोरात, फौजदार अजय जाधव, हवालदार विजय गायकवाड, दामोदर राजूरकर, नायक संजय पांडे, अस्मिता मेश्राम, छाया राऊत, बळीराम रेवतकर, सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर आणि शकुन सनेश्वर यांनी या कुंटणखान्यावर छापा घातला. यावेळी हे त्रिकूट तसेच वेश्याव्यसाय करणारी तरुणी पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी बयान नोंदविल्यानंतर तिला सोडून दिले तर सौरभ, श्वेता आणि केविनला कलम ३७०, ३४ तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.

Tuesday, November 28, 2017

 विद्यार्थ्याचे अपहरण करून  मारहाण

विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण

नागपूर : आपल्या साथीदारांसह एका आरोपीने अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.
राहुल धनराज हाथीबेड (२१), आश्विन अशोक देशमुख (१९) सतीश जगदीश मेश्राम (२१) रा. कामगार कॉलनी, सुभाषनगर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पीडित १६ वर्षाचा विद्यार्थी आदित्य इशेंद्र मिश्रा हा बारावीचा विद्यार्थी आहे. आदित्यची हिमांशु हिरणवार नावाच्या मित्राच्या माध्यमातून राहुलशी ओळख झाली होती. काही दिवसांपासून कोणत्यातरी गोष्टीवरून राहुल आणि आदित्यमध्ये वाद सुरु होता. राहुलने त्याला वर्डशॉप मेसेज पाठवून धमकी दिली होती. तो आदित्यला ‘तेरे मे दम है तो सुभाषनगर मे आ’ अशी धमकी देत होता. सोमवारी दुपारी १२.३० वाजता आदित्य भाऊराव सुर्वे उद्यानात आला होता. त्याच्यासोबत हिमांशुही होता. याची माहिती मिळताच राहुल दोन्ही साथीदारांसोबत उद्यानात पोहोचला. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी आणि दंड्याने आदित्यला मारहाण केली. जखमी केल्यानंतर त्याला अ‍ॅक्टीव्हावर बसवून सुभाषनगरकडे घेऊन गेले. पुढे धोका असल्याचे पाहून हिमांशुने पोलिसांना सूचना दिली. प्रतापनगर पोलिसांनी सुभाषनगर चौकाजवळ आरोपींना अटक करून आदित्यला त्यांच्या तावडीतून सोडविले. पोलिसांनी अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
दोन लहान मुलांचे अपहरण

दोन लहान मुलांचे अपहरण

पारशिवणी (कन्हान)::  : आंबेडकर चौकातुन दोन लहान मुलांचे दुपारी ३ वाजता दरम्यान अपहरण करण्यात आले. मुलीच्या प्रसंगावधानाने आरडाओरडा केल्यानंतर कामठी नविन पोलीस स्टेशन परिसरात तिला सोडुन अपहरणकर्ताने पोबारा केला. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक हाके यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेने ही मुले सुखरूप सापडली.


Monday, November 27, 2017

काजलच्या मृत्यूचा तपास वरिष्ठाकडे

काजलच्या मृत्यूचा तपास वरिष्ठाकडे

सिंदेवाही : येथील काजल मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी पुढाकार घेतला आहे. काजल मृत्यू प्रकरणात अनेक बाबी अनुत्तरित आहेत. रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मृत काजलचे मोठे वडील काशीनाथ हनवते व त्यांचे कुटुंब यांच्याशी चर्चा केली. मागील चार दिवसांपासून  हे प्रकरण सुरु असून चर्चा होत आहे.

 या घटनेची बातमी 
https://kavyashilpnews.blogspot.in/2017/11/blog-post_668.html

Wednesday, November 22, 2017

काजलचा मृतदेह विहिरीत

काजलचा मृतदेह विहिरीत

- सिंदेवाही तालुक्यातील घटना 

सिंदेवाही/प्रतिनिधी:

सिंदेवाही येथील सिद्धार्थ चौक जवळील विहिरीत एका युवतीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आल्याची घटना घडली . काजल रावजी हनुमंते वय १७ वर्ष असे या युवतीचे नाव असून ती सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही येथे बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती.

                 प्राप्त माहिती अनुसार काजल  हि य आपल्या मोठ्या वडीलाकडे सिंदेवाही येथे राहून शिक्षण घेते. ती सिंदेवाही तालुक्यातील लोनखैरी या गावची रहिवासी होती. तिन दिवसापासून म्हणजे रविवार पासून ती अचानक घरून निघून गेली होती. घरचांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेच आढळून न आल्याने आज बुधवार ला सकाळी ७.३० वाजता च्या दरम्यान सिंदेवाही येथील सिद्धार्थ चौक येथील विहरीत तरंगत असलेल्या  आढळून आले.

             हि माहिती सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली.पोलीस घटना स्थळ गाठून तिला विहीरीतून बाहेर काढले. पुढील तपास इंगळे साहेब ठाणेदार सिंदेवाही याांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Saturday, November 18, 2017

महाविद्यालयीन युवकाचा धारदार शस्त्राने भोकसून खून

महाविद्यालयीन युवकाचा धारदार शस्त्राने भोकसून खून

क्ऱ्हाड - महाविद्यालयीन युवक  प्रथमेश संजय सपकाळ (वय 18 रा. विहे, ता. पाटण)चा धारदार शस्त्राने भोकसून खून झाला. कालपासून संबधित युवकासह तीघेजण बेपत्ता होते. त्यातील एकाचा खून झाल्याचे आज स्पष्ट झाले. पार्ले येथे ही घटना घडली.


Friday, November 17, 2017

नऊ मित्रांची 11 लाख 62 हजाराने फसवणूक

नऊ मित्रांची 11 लाख 62 हजाराने फसवणूक

  • चंद्रपूरच्या एसीसी कंपनीत नियुक्तीचे बनावट पत्र
    नऊ मित्रांची 11 लाख 62 हजाराने फसवणूक 
    सीताबर्डी पोलिसांनी वणी येथील आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल

Thursday, November 16, 2017

विस्तार अधिकारी पाटील यांचेवर विनयभंग, अॅट्रासीटी गुन्हा

विस्तार अधिकारी पाटील यांचेवर विनयभंग, अॅट्रासीटी गुन्हा


आदिवासींच्या विविध संघटनांचा पोलीसांवर मोर्चा

रामटेक/ प्रतिनिधी- रामटेक पंचायत समीतीचे विस्तार अधिकारी (पंचायत) सी.एम.पाटील यांचेवर विनयभंग व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दिनांक 16/11/2017 रोजी रामटेकच्या पोलीस ठाण्यावर आदिवासी संघटनांनी मोर्चा नेला.
रामटेक पंचायत समीतीचे लंपटबाज विस्तार अधिकारी (पंचायत) सी.एम.पाटील यांचेवर विनयभंग व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत ग्रामसेविकेच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा भादंवीच्या कलम 354,354 (अ), 354(ड), सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-2015 कायद्याचे 3(2)व्ही(ए),3(आय)डब्लू(ए),3(1)(डब्लू)(2) कलमांखाली दाखल करण्यात आला आहे .या आरोपी अधिका-याला जि.प. प्रशासन तात्काळ निलंबित करणार का असा प्रश्न यानिमीत्ताने विचारला जात आहे.
राहत्या घरात स्वत:ची चिता रचून महिलेनं संपवली जीवनयात्रा

राहत्या घरात स्वत:ची चिता रचून महिलेनं संपवली जीवनयात्रा

कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील बामणी गावातही घटना

कोल्हापूर- एका वृद्ध महिलेनं राहत्या घरात  स्वत:ची चिता रचून जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडलीये.कलव्वा कांबळे असं मृत महिलेचं आहे.

कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील बामणी गावातही घटना घडलीये. कलव्वा कांबळे ह्या अनेक वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. आपले काम आपणच करून स्वतःला लागेल तेवढे अन्न तयार करून खात होत्या. मात्र, सोमवारी रात्री त्यांनी स्वतः चिता रचली आणि अंगाभोवती साड्या गुंडाळून पेटवून घेतले. हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. वृद्ध महिला नेहमीप्रमाणे घराबाहेर आली नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या नागरिकांना चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

Tuesday, November 14, 2017

मालेवाडा येथील मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मालेवाडा येथील मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

चिमूर/प्रतिनिधी:
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मालेवाडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सीताराम बालाजी निब्रड यांचावर शिक्षिकेला व्हाट्सप्प वर अश्लील संदेश पाठविल्या बद्दल चिमूर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      प्राप्त माहिती अनुसार मुख्याध्यापक सीताराम बालाजी निब्रड यांनी एका शिक्षिकेला २४ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या दरम्यान व्हाट्सप्प व टेक्स मॅसेजेस च्या स्वरूपात अश्लील मॅसेजेस पाठविले. यापूर्वी या मुख्याध्यापकाला गावकरी व पोलिसांनी समाज दिली होती.परंतु त्याचा वागण्यात काही हि बदल न झाल्याने अखेर शिक्षिकेसह कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले आणि मुख्याध्यापक सीताराम बालाजी निब्रड याच्या विरोधात तक्रार नोंदविली.  या संदर्भात भादंवि ३५४ अ.५, ६७ कलमान्वये चिमूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारा असून या मुख्याध्यापकाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे सीईओ यांना देण्यात आले आहे.

Sunday, November 12, 2017

चंद्रपुरात घरफोडी पोलीस सुस्त, चोरटे मस्त

चंद्रपुरात घरफोडी पोलीस सुस्त, चोरटे मस्त

चंद्रपूर:(ललित लांजेवार)
 शहरात घरफोडी होते ह्या घरफोडीची तक्रार पोलिसात केली जाते. मात्र पोलिस दादा हे घटनास्थळी लवकर पोहोचत नाही असा अनुभव नागरिकांना बराच वेळा वेगवेगड्या माध्यमातून येतो. असाच अनुभव चंद्रपुरात रामनगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणात फिर्यादीला व चंद्रपूरच्या जनतेला आला आहे.

शनिवारच्या रात्री रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या रामनगर परिसरातील  श्री. अरुण चिंतलवार यांच्या राहत्या घरी रात्रीच्या सुमारास घरफोडी झाली. या घरफोडीत अरुण चिंतलवार
यांच्या घरून दहा हजार रुपये रोख व दोन हजार रुपये चिल्लर त्याच सोबत महत्वपूर्ण सामानही चोरीला गेल.

चोरट्यांनी जेव्हा घर फोडलं तेव्हा चिंतलवार दाम्पत्य हे एका वैवाहिक कार्यक्रमासाठी अकोला येथे गेले होते. सकाळ होताच शेजारी राहणारे सुनील तिवारी यांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांनी या घटनेची माहिती चिंतलवार दांपत्यास फोनवरून दिली मात्र अकोला- चंद्रपूर अंतर लांब असल्याने त्यांनी संध्याकाळपर्यंत पोहोचातोय असे फोनवरून तिवारी यांना कडविले. व घटनेची माहिती पोलिसांना देण्यास सांगितले. तिवारी यांनी या घटनेची माहिती रामनगर पोलीस स्टेशनला फोन करून दिली, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात त्यांना घटनास्थळावर जाणे  बंधनकारक असते. पोलिस स्टेशन ते घटनास्थळ हे अंतर जवळपास अडीच किमी. मात्र घटनेच्या 50 मिनिटानंतरही पोलिस घटनास्थळी दाखल झाली नव्हती. त्यामुळे शेजारी तक्रारदार पोलिसांची वाट पाहत घटनास्थळी बराच वेळ होते. घटनेचा 50 मिनिटांनीही पोलीस घटनास्थळावर दाखल झाली नाही हे बघून तिवारी यांनी रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार जी.बी.गोटमारे यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्याचाही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परत फोन रामनगर पोलिसांना करण्यात आला. मात्र त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे जे उत्तर होते ते सामान्य जनतेसाठी चीड़ निर्माण करणारे होते.

संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पोलीस दादांनी फोनवर घेऊन घेतली मात्र या घटनेला प्राधान्य न देता, या घटनेबद्दल गांभीर्य न जाणता त्यांनी सर्वात पहिले मुद्देमाल गेला आहे का? किंवा चोरीचा प्रकार  मोठा आहे की छोटा असा प्रश्न केला. इतका सर्व खटाटोप झाला असतानाही पोलिस स्टेशन पासून निव्वळ दोन ते अडीच किलोमीटर अंतर यासाठी पोलिसांना इतका खटाटोप का करावा लागला? असाही प्रश्न यावेळी निर्माण होत आहे. यातही तक्रारकर्त्याने इतका वेळ घटनास्थळावर पोहोचण्यासाठी का होतोय अशी विचारणा केली असता पोलिसांनी फोनवरून उत्तर दिले 'सकाळची वेळ असल्याने पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ कमी व कामात आहे त्यामुळे घटनास्थळावर कर्मचारी पोहोचून जाईल थोडा वेळ लागेल'.

चंद्रपुरातील रामनगर परिसर हा उच्चभ्रू वस्तीत मोडतो या वस्तीत शहरातील धनाढ्य व सुशिक्षित नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तक्रारदाराच्या सांगण्यावरून या परिसरात पोलीस कधीच गस्त घालत नाही असे निदर्शनास आले आहे. तक्रारदार हे कामानिमित्य  रात्रीचे दोन वाजेच्या दरम्यान घरी परततात तरीही पोलिसांची पेट्रोललिंग या प्रभागात कधीच दिसली नाही असे सांगण्यात येते. हा मार्ग म्हणजे शहराच्या बाहेर चहूबाजूंनी निघण्यासाठी सोईस्कर आहे. घुग्घुस- चंद्रपूर, घुग्घुस- नागपूर, घुग्गुस- राजुरा, आणि परत शहरात हा मार्ग येतो. त्यात हा मार्ग भामटे -भुरट्याना शहराबाहेर जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. मात्र या परिसरात पोलिसांची गस्त नसल्याने चोरटे आपल्या संधीचा पुर्ण फायदा घेत असतात.त्यामुळे आता रामनगर पोलिसांना आपल्या हदीत गस्त घालन्याची गरज या निमित्याने निर्माण होत आहे

या संपूर्ण प्रकारात प्रश्न हा तक्रार करण्याचा किंवा घेण्याचा नसून पोलिसांवरील आक्षेपाचा देखील नाही.प्रश्न आहे तो पोलिसांनी दिलेल्या "असमाधानकारक उत्तरांचा" आहे.

त्यामुळे रामनगर पोलिसांच्या अशा बेजबाबदार प्रश्नांमुळे व लेटलतीफ पणामुळे नागरिक पोलिसांवर विश्वास ठेवणार का ?असाच प्रश्न निर्माण होत आहे.या संपूर्ण प्रकरनावरुण वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा कर्मचार्‍यांना काय सबब देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.



Friday, November 10, 2017

आमदार बाळू धानोरकरसह 30 आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल.

आमदार बाळू धानोरकरसह 30 आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल.

चंद्रपूर - शेतात वीज टॉवर उभारणीचा शेतक-यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी चंद्रपूर - नागपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी वरोरा आमदार बाळू धानोरकरसह 30 आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल. द
लोणी मावळा प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा

लोणी मावळा प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा


अहमदनगर - लोणीमावळा (ता. पारनेर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केले यांनी आज आरोपी संतोष विष्णू लोणकर, दत्तात्रय लोणकर आणि दत्तात्रेय शंकर शिंदे या तीनही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय सामूहिक बलात्कार, कट करण्यासह अन्य एका गुन्ह्यात जन्मठेप व व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडातील मंदिर मुलीच्या कुटुंबाला देण्यात येणार असून पन्नास हजार हे सरकारी जमा होणार आहेत. पीडित मुलीच्या आई-वडिलांसह गावकरी तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील उपस्थित होते.


लोणीमावळा तालूका पारनेर येथे 22 आॅगस्ट 2014 रोजी शाळकरी मुलीचा तिघांनी बलात्कार करून खून केला होता. निघृण पद्धतीने शाळकरी मुलीचा खून झालेला असतानाही हा खटला सुरुवातीच्या काळात आरसा गाजला नाही. शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून झालेला असतानाही सरकार पक्षाकडून फारशी गंभीर दखल घेतली नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या खटल्यात अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने खटल्यात निकम यांची डिसेंबर 2014 ला नियुक्ती केली. 18 नोव्हेंबर  2014 रोजी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले तर 1 जुलै 2015 पासून सुनावणी सुरू झाली. 7 जुलै 2017 रोजी सुनावणी संपली. 

या खटल्यात एकूण 32 साक्षीदार तपासण्यात आले. घटनेचा प्रत्यक्षदर्शी जे कही साक्षीदार नव्हता मात्र निकम यांनी 24 परिस्थितीजन्य, पुराव्याची साखळी न्यायालयात सादर केली. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे आणि अन्य बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपी संतोष लोणकर,  मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे यांना बलात्कार, खून व त्यासाठी कट करणे या आरोपाखाली दोषी ठरवले. दोन दिवसांपूर्वी आरोपी व सरकार पक्षातर्फे शिक्षेवर युक्तिवाद झाल्यानंतर आज निकाल देणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले होते. आज सकाळी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी शिक्षा पत्राचे वाचन करण्यात आले. हत्येचा कट करणे,  सामूहिक बलात्कार या प्रकारामध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड तसेच खून आणि अत्याचार या प्रकरणांमध्ये तिघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी करून वसूल करण्यात येणाऱ्या दंडा पैकी एक लाख रुपयांची रक्कम संबंधित पीडित मुलीच्या कुटुंबाला दिली जाणार असून पन्नास हजार रुपये सरकारी जमा होणार आहे याशिवाय माध्यमातून होणारी रक्कम ही सरकारी जमा होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह आरोपीचे वकील अॅड. राहुल देशमुख, अॅड. अनिल आरोटे, आणि अॅड. परिमल फळे, यावेळी उपस्थित होते. 

Thursday, November 09, 2017

मौदा येथील सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक अरूण शंकर ढोके यांना 5 हजाराची लाच घेतांना CBI चे अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

मौदा येथील सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक अरूण शंकर ढोके यांना 5 हजाराची लाच घेतांना CBI चे अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

मौदा येथील सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक अरूण शंकर ढोके यांना 5 हजाराची लाच घेतांना CBI चे अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.