काव्यशिल्प Digital Media: महाऔष्णिक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label महाऔष्णिक. Show all posts
Showing posts with label महाऔष्णिक. Show all posts

Sunday, April 15, 2018

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात गुणवत्ता मंडळाचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात गुणवत्ता मंडळाचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातुन  समस्यांचे निराकरण होत असल्याने ह्या  विद्युत केंद्राची प्रगती झाली असुन कर्मचा-यांचा कामाचा दर्जा देखील उंचावला  असल्याचे जयंत बोबडे मुख्य अभियंता  यांनी प्रतिपादन केले. ते गुणवत्ता मंडळाच्या  २४वा वर्धापन दिन समारोपीय व बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होते. 
            याप्रसंगी  मार्गदर्शक  म्हणुन आशुतोष पातुरकर व मुख्य अतिथी  सुनील आसमवाऱ मुख्य अभियंता, कोराडी प्रशिक्षण केंद्र, कोराडी, उपमुख्य अभियंता अनिल आष्टिकऱ,  राजु घुगे,  मधुकर परचाके व श्रीमती विजया बोरकर मंचावर उपस्थित होते. सुनील आसमवार यांनी आपल्या भाषणातुन गुणवत्ता मंडळामुळे कंपनीला होणारा फायदा यावर विषेश भर दिला.
तर व्यवस्थापन कौशल्य कशाप्रकारे  गुणवत्तेवर आधारीत असु शकते यावर आशुतोष पातुरकर यांनी प्रकाश टाकला. प्रारंभी, मोरेश्वर मडावी व चमुनी स्वागतगित सादर केले. गुणवत्ता मंडळ स्पर्धेचे परिक्षक म्हणुन अधिक्षक अभियंता अनिल काथोये, कार्यकारी अभियंता शशीकांत वेले़, जयप्रकाश बोवाडे, सविता फुलझेले व सहाय्यक अभियंता  मोहन गोडबोले यांनी कार्यभार हाताळला. 
यानिमीत्य केस स्डडी सादरीकरऩ, कविता,  घोषवाक्य़, निबंध व प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.  सुरेद्र निशानराव कार्यकारी अभियंता व गुणवत्ता मंडळ मुख्य समन्वयक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन केले. सूत्र संचलन सविता फुलझेले व शशीकांत वेले यांनी तर पाहुण्यांचा परिचय श्वेता दासरवार यांनी करून दिला तर आभार प्रर्दशन हेमंत ढोले यांनी केले. कार्यक्रमाला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंदातील सर्व अधिक्षक अभियंते़, कार्यकारी अभियंते, कर्मचारी व गुणवत्ता मंडळाचे सदस्य मोठया संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते. 
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अनिल काथोये बाळु इंगळे, मोहन गोडबोले, सुनिल इंगळे, अरविंद पेशकऱ,  विष्णु पगारे,  दिगांबर इंगऴे, सतिश पाटील, राजु माहुलीकऱ, दिलीप कातकऱ,   शितल मेश्राम, रोशनी ठाकरे व गुणवत्ता मंडळाचे सद्स्यांनी अथक परीश्रम घेतले.

Thursday, April 05, 2018

CTPS मध्ये विद्युत तारेच्या स्पर्शाने कामगार गंभीर जखमी

CTPS मध्ये विद्युत तारेच्या स्पर्शाने कामगार गंभीर जखमी

चंद्रपूर/रोशन दुर्योधन:  
रेल्वे इंजीनचे काम करत असतांना विद्युत तारेचा स्पर्श होऊन चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत  केंद्रातील कंत्राटी  कामगार प्रविन नामदेवराव बोदे,वय ३० रा.घुग्गुस हा गंभीर जखमी झाल्याची घटना  गुरुवारी सकाळी ७.३०  वाजताच्या सुमारास घडल.  हा जखमी कामगार साई उर्जा इंडो व्हेन्चर प्रा लीमीटेड.सी.टी.पी.एस मधे (मित्तल )ह्या कंत्राटदाराचा असल्याची माहिती आहे .सध्या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याला ऊपचारासाठी चंद्रपूर येथील पालीवाल यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटना स्थळावर काम सुरु असतांना  कंपनीचे व्यवस्थापक तिवारी हे तेथे उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.सध्या या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याला नागपूर येथे हलविण्यात येऊ शकते असे भारतीय मजदूर संघाच्या चंद्रपूर येथील पधाधिकाऱ्यांकडून बोलल्या जात आहे.