काव्यशिल्प Digital Media: चंद्रपूर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label चंद्रपूर. Show all posts
Showing posts with label चंद्रपूर. Show all posts

Saturday, February 09, 2019

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारीला हिरकणी योजनेचे आयोजन

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारीला हिरकणी योजनेचे आयोजन


बचत गटांच्या मार्फत उद्योजकता विकासासाठी
जिल्हा प्रशासनांनी पुढे येण्याचे सुरेश प्रभू यांचे आवाहन


चंद्रपूर, दि 9 फेब्रुवारी : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधत बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये अधिक उद्योजकता निर्माण करावी यासाठी हिरकणी योजनेची घोषणा केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारी पासून तालुकास्तरीय आयोजनाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्यावतीने महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मुंबई येथील मंत्रालयातील वार रूममध्ये यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, अकोला येथून कौशल विकास राज्यमंत्री रणजीत पाटील, संबंधित विभागाचे सचिव असीम गुप्ता, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आदी सहभागी झाले होते.

राज्य शासनामार्फत महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी योजनेची सुरुवात आज करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील अभिनव प्रयोग करणाऱ्या 10 बचत गटांची निवड केली जाणार आहे. या बचत गटांना आर्थिक मदत केली जाणार आहे. याशिवाय उत्तम काम करणाऱ्या बचत गटांना पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील चांगल्या बचत गटांना केंद्र पातळीवर काम करण्याची संधी देखील दिली जाईल, असेही आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुरेश प्रभू यांनी जाहीर केले.

चंद्रपूर येथून संपर्क साधताना महापौर अंजली घोटेकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी महिला बचत गटांसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले. महिला बचत गटांसाठी ही एक नवीन संधी असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे महिला बचत गटांचे कार्य चालू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी हिरकणी योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांचा सहभाग नोंदविण्याबाबत यापूर्वी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्ह्यामध्ये काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बचत गट अतिशय सक्षमतेने काम करत असताना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी देखील केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील यावेळी घोटेकर यांनी केले

आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी भैय्यासाहेब येरमे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Friday, February 08, 2019

उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दंतरोग निदान व वैद्यकीय उपचार

उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दंतरोग निदान व वैद्यकीय उपचार

चिमूर/रोहित रामटेके        

चिमूर : - दिनांक.०८/०२/२०१९ ला उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे  राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा  नागपूर , जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर, वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय चिमूर यांच्या सयुक्त विद्यमानाने उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे ८ फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता वैद्यकिय व दंतरोग निदान व उपचार , शस्त्रकीया शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले हे शिबिर ३ दिवस नियमित सुरु राहणार आहे. या शिबीरातील वैद्यकिय रोगनिदान व उपचार मध्ये तज्ञ डॉक्टराकडुन रोगनिदान, चाचण्या, उपचार, मार्गदर्शण व समुपदेशन करन्यात येनार असून या शिबिराचे लाभ शेकडो रुग्णांनी घेतले. या संपूर्ण शस्त्रक्रियामध्ये आवश्यकतेनुसार निवडण्यात आलेल्या गरजू  रुग्णावर ८ फरवरी ते १० फेब्रुवारी पर्यत उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करन्यात येईल . रूग्ण व एका नातेवाईकास मोफत आहार देन्यात येईल. दंतरोग निदान व उपचार यामध्ये शासकिय दंत महाविद्यालय नागपूर , शरद पवार दंत महाविधालय मेघे सावनगी येथील दंतरोग तंज्ञाची चमू व वरोरा आनंदवन फिरत्या दंत रुग्णवाहीकेसह हजर राहुन ८ ते १० फरवरी पर्यत १० ते ३ वाजेपर्यत दंतरोग निदान व यावरील उपचार करन्यात येणार असून या शिबिराला राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे राष्ट्रिय छात्र सेना यांचा हि यामध्ये सहभाग होता तसेच आठवले समाज कार्यालयाच्या विदयार्थ्यांनीही व विदयार्थिनी यांनीही या शिबिराला सहकार्य केले. या शिबीरामध्ये बालरोग तज्ञ,भिषीक तज्ञ, शस्त्रक्रिया तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, कान - नाक व घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, चर्मरोग तज्ञ, मानसिक रोग तज्ञ, दंत रोग तज्ञ, बधिरी करण तज्ञ, क्ष - किरण तज्ञ, फिजीओ थेरेपी , अक्युप्रेशर थेरेपी आदी विशेष तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध केलेली आहे. चिमूर तालुक्यातील संपूर्ण परिसरातील नागरीकांनी या निशुल्क शिबीराला मोठ्या प्रमाणात उपस्थीत राहुन शिबीरातील तज्ञ डॉक्टराचा लाभ घेतला असे आवाहन केले कि उपजिल्हा रुग्णालय चिमूर चे वैद्यकिय अधिक्षक डॉ.गो.वा.भगत , डॉ.अश्विन अगडे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.रवि गेडाम व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिगांबर मेश्राम यांनी या शिबिराला प्रामुख्याने हजर राहून योग्य त्या प्रकारे कसे मार्गदर्शन करून योग्य त्या प्रकारे उपचार करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले या निशुल्क शिबिराची समुर्ण चिमूर तालुक्यात चर्चा रंगली आहे.

रमाई आवास योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाचे उद्दीष्ट आता 7000

रमाई आवास योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाचे उद्दीष्ट आता 7000

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित
 चंद्रपूर, दि.8 फेब्रुवारी – राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री  तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणा-या रमाई आवास घरकुल योजनेसाठी (ग्रामीण) चंद्रपूर जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट आता 7 हजार इतके झाले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत सदर योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाच्या एकूण उद्दीष्टात या सरकारच्या काळात तिप्पट वाढ झाली आहे.
            शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागातर्फे 8फेब्रुवारी 2019 रोजी याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सन 2018-19 या वर्षाकरीता चंद्रपूर जिल्हयासाठी सदर योजनेकरीता 4500 इतके मंजूर उद्दीष्ट होते. त्यात आता 2500 इतके अतिरीक्त उद्दीष्ट मंजूर करण्यात आले आहे. आता चंद्रपूर जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट 7 हजार इतके झाले आहे.
            जानेवारी 2019 मध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रमाई आवास घरकुल योजना (ग्रामीण) साठी लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेता मंजूर उद्दीष्ट अपूरे पडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित विभागाला अतिरिक्त उद्दीष्ट मंजूर करण्यासाठी निर्देश दिले होते. त्यानुसार आता चंद्रपूर जिल्हयाच्या एकूण उद्दीष्टात 2500 ने वाढ झाली आहे.
            याआधी 2010-11 मध्ये 512, सन 2011-12 मध्ये 950, सन 2012-13 मध्ये 370, सन 2013-14 मध्ये 220, सन 2014-15मध्ये 1000 याप्रमाणे या सरकारच्या कार्यकाळात 3052 तर सन 2015-16 मध्ये 390, सन 2016-17 मध्ये1252,  सन 2017-18मध्ये 2000 तर सन 2018-19 मध्ये 7000 याप्रमाणे या सरकारच्या कार्यकाळात 10642 इतके उद्दीष्ट चंद्रपूर जिल्हयासाठी निर्धारित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत यासरकारच्या कार्यकाळात उद्दीष्टातील ही वाढ तिप्पट आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता सदर योजनेचे एकूण उद्दीष्ट 7000 इतके झाले आहे.
            अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागात रमाई आवास योजनेसाठी उद्दीष्टात झालेल्या भरीव वाढीमुळे मोठया संख्येने या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार आहे. 


चंद्रपुरात आजपासून पक्षिमित्रांचा चिवचिवाट

चंद्रपुरात आजपासून पक्षिमित्रांचा चिवचिवाट

19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपुरात*

पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक, मार्गदर्शकांची मांदियाळी

चंद्रपूरः 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन 9 व 10 फेब्रुवारी 2019 ला चंद्रपूरात आयोजित होत असून इको-प्रो संस्थेतर्फे सदर आयोजनाची तयारी पूर्ण झालेली आहे.


या संमेलनाचे उद्घाटक राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री नितिन काकोडकर यांचे हस्ते होत असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोपाल ठोसर, जेष्ठ पक्षी अभ्यासक असनार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षीमित्र, संमेलन अध्यक्ष श्री दिलीप विरखडे, विशेष उपस्थिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चे क्षेत्रसंचालक श्री एन आर प्रवीण, जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार, स्वागताध्यक्ष डॉ अशोक जीवतोड़े, श्री मनोहर पाऊनकर, अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, श्री सुरेश चोपणे, अध्यक्ष ग्रीन प्लैनेट प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.


सदर संमेलन मधे विदर्भातील पक्षीमित्र, अभ्यासक, मार्गदर्शक उपस्थित होणार असून या संमेलन मधे जवळपास 140 पक्षीमित्र यांनी नोंदणी केलेली आहे. सदर संमेलन जिल्ह्यातील माळढोक व सारस पक्षी संरक्षण व अधिवास संरक्षणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. दोन दिवसीय चालणाऱ्या या संमेलना मधे जिल्ह्यातील पक्षी अधिवास संरक्षण, विदर्भातील माळराने, पक्षी संरक्षण व संवर्धन, शहरी पक्षी अधिवास व सध्यस्थिति, पक्षी व पक्ष्याची अधिवास संरक्षण व संवर्धनापुढील आवाहने या विषयावर चर्चा सत्र आयोजित होणार आहे. या दरम्यान विविध अभ्यासकाचे प्रेजेंटेशन सादरिकरण होणार आहे.

 परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबीर

परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबीर

प्रशांत गेडाम/ प्रतिनिधी

 सिंदेवाही -:  तालुक्यातील सर्वोदय विद्यालय  गडबोरी येथे प्रथम  (NGO) आणि सिंदेवाही  पंचायत समिती  मधील शिक्षण विभाग  यांच्या  तर्फ़े   सिंदेवाही तालुक्यातील विद्यार्थ्यांची  परीक्षेबद्दल भीती दूर व्हावी,  परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा याकरिता तालुक्यातील गडबोरी ,वासेरा ,रामाळा देवाडा या गावातील    वर्ग 10 वीच्या   विद्यार्थ्यांना करीता परीक्षा पूर्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमचे पुजन करून उद्घाटक करण्यात आले. यावेळी गणित आणि इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन तालुक्यातील तज्ञ मार्गदर्शन श्री मांडवकर सर , ठवकर सर आणि करंबे सर  विषय तज्ञ मेश्राम सर  प्रथम चे विनोद ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बोर्ड परीक्षेच्या कृतीप्रतिका कश्याप्रकार चे असतात .हे  समजावून सांगण्यात आले. तसेच गडबोरी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले व  परीक्षेकरिता  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .

या कार्यमाला पंचायत समिती सिंदेवाही विषय तज्ञ भारत मेश्राम सर आणि प्रथम चे प्रतिनिधी विनोद ठाकरे ,सपना कुलमेथे ,आरती नागदेवते ,  भूषण निशाणे यांनी सहकार्य केले यावेळी सर्वोदय शाळेचे मुख्याध्यापक  शिक्षक वर्ग आणी शाळेचे तसेच परीसरातील  विद्यार्थी उपस्थित होते.

Thursday, February 07, 2019

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?


▪माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अर्ज केलाच नाही

▪काँग्रेसकडून 12 जणानी केले अर्ज


चंद्रपूर/ प्रातिनिधी :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?, असा प्रश्न चर्चेत आहे. यातच माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अर्ज केलाच नाही. त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून एकूण बारा जणांनी अर्ज केले. यावेळी या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना परत उमेदवारीची शक्यता वर्तविली जात असताना काँग्रेसकडून मात्र इच्छुक दावेदारांची यादी वाढत आहे. पण कॉंग्रेसचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्यातील चंद्रपूर,बल्लारपूर, राजुरा व वरोरा या चार तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. हा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र १९९६मध्ये या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले. त्यानंतरच्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले. २००४ नंतर मात्र भाजपने आजतागायत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या लोकसभेच्या दृष्टीने राजकीय हालचालींनी वेग पकडला असला तरी अद्यापही कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी स्पष्ट झालेली नाही.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात खरी लढत भाजप-काँग्रेसमध्येच होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेला आता सुरुवात झालेली आहे. विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार हे लोकसभा लढण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत, तर दुसरीकडे ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मात्र आपला अर्ज भरलेला नाही. मागील वेळेस पुगलिया यांना डावलून संजय देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यानंतर देवतळे भाजपवासी झाले. ते बघता आता नविन चेहऱ्याला संधी मिळण्याची  शक्यता आहे. यात तेली समाजातील नेते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. माजी खासदार दिवंगत नेते शांताराम पोटदुखे यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली होती. त्यांच्या निमित्ताने तेली समाजाला संधी मिळाली. या लोकसभा मतदारसंघात तेली समाज सर्वाधिक असून, त्यातील अनेक दावेदार निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यात प्रामुख्याने तेली समाजाचे वरिष्ठ नेते आणि सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, देवराव घटे यांचा समावेश आहे. समाजा पाठोपाठ कुणबी समाजाचीही संख्या मोठी असल्याने या समाजातूनही इच्छुकांची यादी पुढे आली आहे. यात मनोहर पाउनकर, दिनेश चोखारे, बाळू गोहोकार यांचा समावेश आहे. याशिवाय प्राध्यापक कोंगरे, आमदार कासावार, सुनीता लोढीया, शिवा राव यांनीही उमेदवारी साठी अर्ज दाखल केला आहे.


चंद्रपूरची जागा सेवादलला राखीव 
केंद्रीय स्तरावर पक्ष नेतृत्त्वात मोठ्या प्रमाणात  झालेले बदल आणि आगामी लोकसभा बहुमताने जिंकण्यासाठी कांग्रेस रणनीती आखत आहे. त्यानुसार काँग्रेसच्या विविध विंगमधील लोकांना पुढे आणण्यासाठी योजना आखली जात आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मागील १५ वर्षांचा इतिहास बघता यंदा चंद्रपूरची जागा सेवादल साठी राखीव ठेवण्याचा विचार पक्ष निरीक्षक करीत आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील काही जेष्ठ नेत्यांना २६ जानेवारी ला प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईला बोलाविले होते. त्यानंतर वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या सर्वांना ५ फेब्रुवारीला दिल्लीला बोलावून घेतले. चंद्रपूरच्या या जागेवर चर्चा करण्यासाठी सेवादल चे राष्ट्रीय संघटक लालजी देसाई यांनी हि जागा सेवादलच्याच एखाद्या कार्यकुशल कार्यकर्त्याला देण्याची आग्रही भूमिका मांडली. यावेळी नागपूर, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर येथील वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.

शिवाणीचे ब्रह्मपुरीत दौरे वाढले 
चंद्रपूर लोकसभेची जागा मिळावी, यासाठी विजय वडेट्टीवार प्रयत्नशील असून, तसे झालेच तर वारसदार म्हणून ब्रह्मपुरी विधानसभेतून सुपुत्री शिवाणी वडेट्टीवार निवडणूक लढू शकते. त्यासाठीच ती गेल्या ८ दिवसापासून ब्रह्मपुरीत दौरे करीत आहे. सावलीतील मेहा बुज येथे महिला काँग्रेसचा मेळावा, आरोग्य मार्गदर्शन व हळदीकुंकु कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थिती होत्या. गेल्या काही दिवसापासून त्या सावली तालुक्याचा दौरा करीत आहेत.

नाहीतर हे येणार बाहेरील चेहेरे 
चंद्रपूर काँग्रेस कमेटीतील २ गटातील वाद जर निवडणूक काळापर्यंत शमला नाहीतर बाहेरील चेहेरे उभे करण्याचा प्रस्ताव सुरु आहे. यात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांना तिकीट देण्याचा विचार पक्षातील काही नेते करीत आहेत.

पारोमिता विधानसभा लढणार
श्रमिक एल्गारच्या प्रमुख तथा दारूबंदीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वामी या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील,अशी चर्चा मागील काही दिवसापासून होती. शिवाय त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात होते. मात्र त्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करित असल्याची चर्चा पुढे आली आहे. 

Wednesday, February 06, 2019

चारचाकी वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार

चारचाकी वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:

 ब्रम्हपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खेड रोडवरील डीएफओ यांच्या बंगल्याजवळ् अज्ञात चारचाकी वाहनाने सायकलस्वारास धडक दिली असता सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना रात्री ७.३० वाजता घडली. अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला.

प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड येथील रहिवासी रामचंद्र मेश्राम वय ५० हे आपल्या सायकलने आपल्या स्वगावी परतत असतांना डीएफओ यांच्या बंगल्याजवळ् अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या सायकलला धडक दिली. यात रामचंद्र मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालक घटनास्थळून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहे.
 सावित्रीच्या लेकींनी पकडली दारू अन श्रेय लाटले गडचांदूर पोलिसांनी

सावित्रीच्या लेकींनी पकडली दारू अन श्रेय लाटले गडचांदूर पोलिसांनी

नागपूर/खबरबात:

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतरही अवैध दारू येणे थांबत नसल्याने आणि याचमुळे गावातील युवक वाईट मार्गाने लागू नये म्हणून गावासाठी संघर्ष करणाऱ्या गडचांदूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या महिलांनी मोठ्या धाडसाने गावात येणाऱ्या दारूच्या वाहनासह दारूच्या ७४ पेट्या पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत शाब्बासकीचे काम केले आहे.मात्र महिलांनी केलेल्या या कारवाईचे श्रेय लाटण्याचे काम गडचांदूर पोलिस करीत असल्याचे लक्षात येत आहे.

 मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शिरपूर ते गाडेगाव मार्गाने पोलीस पाटील यांच्या घरासमोर टाटा सफारी क्रमांक एच.आर 26 ए.के.0612 वाहनातून अवैध दारू येत असल्याची माहिती गडचांदूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या महिलांना मिळाली,या समितीतील काही महिलांनी पुढाकार घेत अवैध दारू वाहतूक होणाऱ्या गाडीला पकडण्याचे ठरविले व महिलांनी मोठ्या शिताफीने गाडी पकडली या सोबतच या गाडीत २ ड्रायव्हर होते. त्यातील एक ड्रायवर पडून जाण्यास यशस्वी ठरला मात्र नरेश विठ्ठल बावणे वय 21 रा. खिर्डी  ता.कोरपना जि. चंद्रपुर यास  ड्रायव्हरला पकडण्यास महिलांना यश आले.व याला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाला गावाच्या लोकांची मोठी मदत मिळाली व याचमुळे महिलांना अवैध दारू पकडता आली.

दारूचे वाहन पकडल्या नंतर याची माहिती पोलिसांना दिली.व नंतर पुढील कारवाई झाली,मात्र पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीमध्ये हि कारवाई गडचांदूर पोलिसांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र हि कारवाई गडचांदूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या महिलांनी केली.असून त्याला नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण प्रकरणात पोलीस आपली पाठ थोपटवून घेण्यासाठी असे करत असल्याचे लक्षात येत आहे, या कारवाईत बराच संभ्रम निर्माण होत असून पोलिसांना त्यांच्या हदीतील अवैध दारू पास होण्याची माहिती मिळाली नाही का?असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे ,तर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली नसून हि कारवाई महिलांनी करून पोलिसांच्या स्वाधीन आले आहे. सावित्रीच्या लेकीने दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर गावच्या संघर्ष समित्यांनी देखील बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अन संडासच्या गडरमध्ये सापडल्या ७० पेटी देशी, १० पेटी विदेशी दारू

अन संडासच्या गडरमध्ये सापडल्या ७० पेटी देशी, १० पेटी विदेशी दारू



चंद्रपूर/प्रतिनिधी:

चोर कुठे काय लपवेल याचा काही नेम नाही,आणि पोलीस केव्हा कुठे यांचा गेम करेल याचा काही नेम नाही , चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी नंतर अवैध दारू विक्रेते व पोलिसात चोर पोलीस गेम सुरु झाला आहे,चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली या दारूबंदी नंतर अवैध दारू विक्रेते आपापली शक्कल लढवून अवैध दारूची तस्करी करू लागले, अशातच पोलिसांच्या नजरा दारू विक्रेत्यांकडे लागल्या हजारो कारवाया झाल्या तरी मात्र दररोज एक नवीन अवैध दारू विक्रेता उदयास येऊ लागला.

हि अवैध दारू लपवून आणण्यासाठी दारूविक्रेते तुफानी शक्कल लढवू लागले, कुणी चार चाकी गाडीच्या डिक्कीत,तर कुणी दरवाजाच्या फटीतून,तरी कुठे भाजीपाला टोपली,पेट्रोलच्या टंकित,गाडीत विशेष कप्प्याची सोय करून गाडीच्या आत,इंजनमध्ये अशा विविध प्रकारे दारू लपवून या मार्गाने विक्री करू लागले,मात्र शौचालयाला जाण्याचा गडरमध्ये देखील दारू लपविली जाऊ शकते याचा अंदाज फक्त चोरच घेऊ शकतो,अवैधरित्या आणलेली दारू संडासाच्या गडरमध्ये लपवून ठेवले मात्र पोलीस त्यांच्यापेक्षाही शहाणे निघाले आणि त्यातलाही सर्च ऑपरेशन मध्ये गडरमध्ये लपविलेली दारू पोलिसांनी बाहेर काढली.

हि घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चिनोर गावातील. बुधवारी पहाटे २ वाजता अवैधरित्या दारू तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली व त्यांनी तत्काळ पाठलाग सुरू केला अशातच शोधकार्य सुरू असताना गावातील Z.P शाळेच्या मागच्या बाजूला बांधकाम सुरु असलेल्या गडरमध्ये दारू सापडली, यात शौचालयाच्या खड्ड्यामधून ७० पेटी देशी व १० पेटी विदेशी दारू यासह २ दुचाकी असे एकून ९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शंकर मुटेकर, PC विनोद जाधव PC प्रफुल मेश्राम यांच्या पथकाने केली आहे.




२१ दिव्यांग जोडपी विवाहबद्ध होणार!

२१ दिव्यांग जोडपी विवाहबद्ध होणार!


आस्था बहु. चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

चंद्रपूर -प्रतिनिधी 
आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट तथा गौरवबाबू पुगलिया संगनिकृत उपवर वधू सुचक केंद्र वरोरा द्वारा १६ वर्षांपासून अविरत सुरू असणारा दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा स्व. गौरवबाबू पुगलिया स्मृति प्रित्यर्थ यावर्षी दिनांक १० फेब्रुवारी २०१९ रोजी गौरव सेलिब्रेशन सभागृह, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला नरेशबाबु पुगलिया, हाजी अनिस अहमद, गेव्हआवारी, नागपूर इत्यादी राजकीय क्षेत्रातील गणमान्य व्यक्तिसह धर्मादाय आयुक्ताद्वारे आयोजित ७५ आत्महत्याग्रस्त शेतकèयांच्या मुलामुलींचा चंद्रपूरला सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडणारे सध्या मुंबई विरार येथील न्यायाधीश आर.एन. चव्हाण, श्रीहरी देवस्थान चिमुरचे अध्यक्ष निलम राचरलावार, सुभाषभाऊ शिदे, राहुलबाबू पुगलिया सह संस्थेच्या पाठीशी तन-मन-धनाने उभे असणारे नरेंद्रबाबुजी पुगलिया उपस्थित राहणार आहे.
आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट सदर उपक्रम मागील १६ वर्षांपासून अविरत रावित आहे. दि. १७, १८ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसंग लान, चंद्रपूर येथे दिव्यांग उपवर वधू यांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्यात भारतातील ६ राज्यातून आलेल्या विवाह उत्सुक २०० दिव्यांग उपवर वधूंनी आपला परिचय करून दिला. सदर बहुतांश दिव्यांग बांधवा समवेत त्यांचे पालक उपस्थित नव्हते हे विशेष. पालक तथा समाजातील मान्यवर सोबत नसतांना सुद्धा ज्या आत्मविश्वासाने संसारातील अडचणीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी पाहून सामान्य माणसाला लाजवेल अशी त्यांची धडपड पाहून संस्थेच्या पदाधिकारी तथा कार्यकत्यांना त्यांच्या कार्याची दिव्यांगाणी दिलेली सकारात्मक पावतीच होती. सदर परिचय मेळाव्यात आपला परिचय करून दिलेल्या दृष्टीबाधित, कर्णबधिर, अस्थिव्यंग उपवर वधूंना योग्य जोडीदार मिळवून देण्याकरिता आस्थाचे पदाधिकारी तीन महिन्यापासून अथक परिश्रम करीत होते. त्यांच्या परिश्रमाचे फेलित ३७ जोडप्यांचे विवाह जोडण्यात संस्थेला यश आले. सदर जोडीदार शोधत असताना दिव्यांग बांधवांना संसारात दैनंदिन घडामोडी करिता कोणतीही अडचण येणार नाही, त्यांचा संसार सुखी व संपन्न होईल या सर्व बाबींची पूर्तता करण्यात संस्थेच्या कार्यकत्र्यांनी प्रयत्न केलेत. ज्या दिवांग बांधवांची आर्थिक स्थिती उत्तम आहे अथवा ज्यांचे पालक त्यांच्या पाठीशी उभे आहेत ते बांधव आपल्या घरी विवाह संपन्न करीत आहे. तर समाजा समोर वेगळा आदर्श उभा व्हावा व दिव्यांग बांधव सुद्धा यशस्वी संसार करून दिव्यांगत्वावर मात करू शकते याचा आदर्श निर्माण करण्यासाठी आर्थिक सामाजिक परिस्थिति उत्तम असतानाही १० फेब्रुवारी २०१९ रोजी होऊ घातलेल्या २१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणार आहेत.

सदर सोहळ्यात दिनांक ९.२.२०१९ रोजी संध्याकाळी ७ वाजता सर्व दिव्यांग वधूवरांना नृत्य व संगीत अविष्कारात मेहंदी व हळद लावण्यात येईल ज्यात चंद्रपुरातील संगीत नृत्य सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील सुप्रसिद्ध मान्यवर स्वयंम प्रेरणेने येऊन मोफेत सेवा देतात. सदर कार्यक्रमाला श्रीमती ताराजी गांधी, श्रीमती शकुंतलाजी बांठिया, श्रीमती नगिनाजी पुगलिया, गुंजनदिदी बाफेणा, सौ. किरणताई देरकर, वणी, सौ. सीमाताई खुटेमाटे बल्लारशहा इत्यादि मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दिनांक १०.२.१९ रोजी सकाळी गौरव सेलिब्रेशन सभागृहातून सर्व वधू-वर तयार होऊन चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली देवीचे दर्शन घेण्याकरिता नाचत गात जातील. सभागृहात वरात आल्यानंतर वधू वरासह सर्व मान्यवर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येईल. याच कार्यक्रमात जे आर्थिक दुर्बल प्रशिक्षित २५ दिव्यांग बांधव आहेत त्यांना व्यवसाय उपयोगी साहित्य मोफेत देऊन त्यांना व्यवसाय करून स्वतः आत्मनिर्भर करण्याकरिता संस्था सहकार्य करेल ज्यात पप्पू लुनावत तथा ज्वेलर्स व्यावसायिक मंडळी सहकार्य करणार आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या कलागुणांनी दिव्यांग क्षेत्रात समाजासमोर आपली वेगळी ओळख निर्माण करणाèया दृष्टीबाधित आकाश भैसारे संगीतकार लाखणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अमोल कर्चे, मुंबई, अस्थिव्यंग कु. शिरीन नाज पठाण, चंद्रपूर कर्ण बधिर सुरेश पहाडे कॉम्प्यूटर ऑपरेटर, बी.एम.सी. मुंबी यांचा शाल श्रीफेळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

ठिक ११ वाजता २१ जोडप्यांचे धार्मिक विधी नुसार मान्यवर प्रमुख अतिथि तथा समाज बांधवांच्या उपस्थितीत विवाह संपन्न होईल . नव दाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्यासह नववधूस सुभाषभाऊ qशदे विप्लव ज्वेलर्स तर्फे सोन्याचे मंगळसूत्र देण्यात येईल. तरी सर्व चंद्रपूरवासी मान्यवरांनी सदर विवाह सोहळ्यास उपस्थित राहून आस्थाच्या या जगावेगळा सोहळा यशस्वी करावा असे आवाहन केले आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता रोहितबाबू पुगलिया, संजयकुमार पेचे, महेश भगत, अविनाश गायधणे, विनोद भोयर, यशवंत देशमाने, आतिश आक्केवार, रमेश रामटेके, प्रकाश राजुरकर तथा आस्था परिवारातील सर्व सहकारी संस्था तथा मित्र परिवार अथक परिश्रम घेत आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी

अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी

चंद्रपूर/अमोल जगताप:

जुनोना येथील रहिवासी श्री गजानन वाढई आपल्या काही सहकाऱ्यांसोबत जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले असतांना कक्ष क्र.478 मध्ये अचानक अस्वलाने गजाजन वाढई ह्यांच्या वर हल्ला चढवला ,सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अस्वलीला हुसकावून लावले,जखमीला लागलीच उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले पुढील तपास वन विभाग जुनोना करीत आहे
कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग; मात्र शेतकर्‍यांसाठी रिकामी झोळी?

कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग; मात्र शेतकर्‍यांसाठी रिकामी झोळी?

प्रशांत गेडाम / प्रतिनिधी

सिंदेवाही -  कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग करण्याची घोषणा केली व सुरूवात झाली आहे.  पण , मात्र शेतकर्‍यांची झोळीस रिकामीच आहे. यंदा झालेल्या अल्पवृष्टीमुळे व  सततच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडूनदेखील अद्याप पाहिजे तशी मदत न मिळाल्यामुळे आता जगायचे कसे, हा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. 

एकीकडे दुष्काळ, नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आहे. दुसरीकडे सरकारी कर्मचार्‍यांना गलेगठ्ठ पगार असूनही आता सातवा वेतन आयोग देण्याच्या हालचाली सुरू आहेत. सरकारी कर्मचारी आणि शेतकर्‍यांची तुलना करून शेतकर्‍यांची थट्टा तरी करू नये, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. महागाईचे चटके कर्मचार्‍यांना बसतात. पण शेतकर्‍यांना साधे एक वेळचे जेवण करण्यासाठी कष्ट उपसता उपसता आयुष्य संपून जाते. कर्मचारी पुरणाच्या पोळीवर तूप टाकून खातो. मात्र सणाच्या दिवशी साधी भाकरीदेखील शेतकर्‍यांना अनेकदा दुर्लभ होते, हे वास्तव आहे. 

पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी होती. परंतु आता मात्र कोणताही शेतकरी आपल्या मुलाला शेतकरी बनविण्यासाठी हिंमत करीत नाही. मात्र शेती विकून नोकरीसाठी लाखो रुपये खर्च करण्यासाठी तयार असतो. शेती करणे, शेतीसाठी लागणारा खर्च निघणे सोडा, साधे वर्षभर जगण्यासाठी लागणारे आर्थिक उत्पन्नदेखील हाती येत नाही.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कंगाल झाला आहे. पेरलेल्या पिकाची हमी नाही. स्वत: उत्पादन काढून स्वत:च्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. शेतात रात्रंदिवस हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करूनही सरतेशेवटी त्याच्या हाती काहीच येत नाही. कर्मचार्‍याप्रमाणे शेतकर्‍यांना गलेगठ्ठ वेतन नाही. उत्पादन घरी येईपर्यंत शेतकर्‍याला त्याच्या उत्पादनाची कोणतीच खात्री नसते. 

वारंवार होणार्‍या नापिकीमुळे शेतकरी मृत्युला कवटाळतो. दुष्टचक्रातून स्वत:ची सुटका करण्याचा आत्मघातकी पर्याय निवडतो आणि वाट बघतो ते शासन आम्हाला योग्य न्याय मिळवून देईल त्याची.??

Tuesday, February 05, 2019

वैद्यकीय अधिकाऱ्याची (walk-in-interview) दर सोमवारी भरती

वैद्यकीय अधिकाऱ्याची (walk-in-interview) दर सोमवारी भरती

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वैद्यकीय आस्थापनावर डॉक्टरांची असलेली कमी संख्या व त्यामुळे होणारा रुग्ण सेवेतील खोळंबा दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय सेवेत काम करू इच्छिणाऱ्या डॉक्टरांसाठी वॉक - इन -इंटरव्यूह ( walk-in-interview ) दर सोमवारी सुरू केले आहे.

doctor साठी इमेज परिणाम
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय यामध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या संमतीनुसार जिल्ह्यांमध्येच एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वॉक - इन -इंटरव्यूह व्दारे भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या संधीचा एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांनी लाभ घ्यावा. तसेच ग्रामीण व शहरी भागात आपली वैद्यकीय सेवा उपलब्ध करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

महिन्यातील प्रत्येक आठवड्याच्या सोमवारला सकाळी 11 ते 2 या कालावधीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या दालनात वॉक - इन -इंटरव्यूह होणार आहे. जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व अन्यत्र काम करणाऱ्या डॉक्टरांनी या संधीचा फायदा घ्यावा व जिल्ह्यातील जनतेला आपली सेवा द्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 ट्रक दुचाकी च्या अपघातात दुचाकी चालक ठार

ट्रक दुचाकी च्या अपघातात दुचाकी चालक ठार

वरोरा येथील घटना
वरोरा(शिरीष उगे):

शहरातील वणी-वरोरा बायपास रोड वर बालाजी लॉन जवळ ट्रक दुचाकी अपघात आज दि 5 फेब्रुवारी ला रात्री 9 वाजता झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून सतीश हेपट ठार झालेल्या दुचाकी चालक चे नाव आहे. 
त्यांचे वय 24 असून तालुक्यातील शेम्बळ येथील रहिवासी आहे. सतीश दुचाकीने क्र. एम.एच.34बी.पी.0179 या दुचाकीने वरोरा वरून शेम्बळ येथे जात होता ट्रक क्र. एम.एच.34 ए बी.4972 या ट्रक ने ओव्हरटेक च्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिल्ली यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याच्या माघावर आहे. सादर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी .दाखल करण्यात आले आहे. घटनेची मिळताच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
जनता कॉलेज चौकात भिकाऱ्यास चिरडले

जनता कॉलेज चौकात भिकाऱ्यास चिरडले




चंद्रपूर/ प्रतिनिधी
नागपूर मार्गावरील जनता कॉलेज चौकात भरधाव वेगातील ट्रकने  भिकाऱ्यास चिरडले. या दिलेल्या धडकेत त्याच्या जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली.
चंद्रपूर नागपूर मार्गावरीलजनता कॉलेज परिसर चौकात मोठी वर्दळ असते. अशातच एक भिकारी रस्ता ओलांडत होता. मात्र, त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रक ने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांना घटनास्थळ गाठून ट्रक चालकाला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Monday, February 04, 2019

आता कचऱ्यातून मिळवा भेटवस्तू ...

आता कचऱ्यातून मिळवा भेटवस्तू ...



प्लास्टिकमुक्त चंद्रपूरसाठी मनपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम... 

चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्त चंद्रपूरसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेतसार्वजनीक जीवनात मोठ्या प्रमाणावर सुरुअसलेला प्लास्टिकचा वापर बंद करण्यास महानगरपालिका प्रयत्नरत आहेआजघडीला बहुतेक घरीव्यापारी केंद्रांवरप्लास्टिकच्या पिशव्याग्लास  अन्य वस्तूंचा मोठय़ाप्रमाणावर वापर करण्यात येतोयास प्रतिबंध करता यावा म्हणून यासाठी अभिनव उपक्रम म्हणून महानगरपालिकेतर्फे  बंगाली कॅम्पबस स्टँडगोल बाजार येथे  प्लास्टिकसंकलन करणारे स्टॉल्स सुरु करण्यात येत आहेचंद्रपूरकर आपल्या घरातील प्लास्टिकची विल्हेवाट लावता यावी याकरीता नागरिक आपल्या घरातील प्लास्टिक कचराया केंद्रावर दर रविवारी जमा करू शकतातएक जागरूक नागरिक या नात्याने या मोबदल्यात त्यांना भेटवस्तू दिली जाणार आहेया योजनेचा फायदा घेण्याकरिताकमीतकमी  किलो प्लास्टिक नागरिकांना संकलन केंद्रावर दर रविवारी जमा करता येईल.   
      २३ जून२०१८ रोजी महाराष्ट्र सरकारने राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होतीप्लास्टिक पिशव्यांचा अतिवापर हास्वच्छताप्रदूषणासह अनेक नागरी समस्यांच्या दृष्टीने आव्हान ठरले होतेया पिशव्यांची उपलब्धता आणि किंमत हे यामागील महत्त्वाचे घटक होतेबंदी घालण्यात आलेल्यावस्तूत  ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या   इंच बाय १२ इंच आकारापेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरी बॅगउत्पादनविक्री  वितरणावर बंदी२००मिलिपेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच पिशवीहॅन्डल असलेल्या - नसलेल्या प्लास्टिक पिशव्याथर्माकोल  एकदाच वापरल्याजाणाऱ्या डिस्पोसेबल वस्तूअन्न पदार्थ पँकिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे भांडे  स्ट्रॉसजावटीसाठी वापरात येणारे प्लास्टिक  थर्माकोल यांचा समावेश आहेप्लास्टिक बंदी कायद्यानुसारबंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्यास पहिले ३०००दुसऱ्यांदा ५०००  तिसऱ्यांदा २५,००० रुपये दंड  शिक्षेची तरतूद आहे
      प्लास्टिक बदल्यात भेटवस्तू देणारे  स्टॉल्स /   येत्या रविवारी १०.०२२०१९ रोजी सकाळी १००० ते संध्याकाळी .०० वाजेपर्यंत बंगाली कॅम्पबस स्टँडगोल बाजारयेथे असणार आहेतएका महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्लास्टिक कचरा देणाऱ्या व्यक्तीला एक विशेष भेटवस्तू आणि "चॅम्पियन फॉर कॉजपुरस्कार देऊन गौरविण्यातयेईल.  चंद्रपूर महानगरपालिकेच्या " कचऱ्यातून भेटवस्तू " या योजनेचा सर्वांनी लाभ घेऊन आपले शहर प्लास्टिकमुक्त करण्यास योगदान द्यावे असे आवाहन पालिकेतर्फेकरण्यात येत आहे 
        

दैनंदिन जीवनात वापरले जाणारे प्लास्टिक नैसर्गिकपणे नष्ट होत नाही त्याच्या विघटनास अनेक वर्षे लागतातशंभर टक्के प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासमहानगरपालिका प्रयत्नरत आहे पण नागरिक म्हणून आपलेदेखील याबाबत काही कर्तव्य आहेहे प्रत्येकाने समजून घ्यायला हवेप्लास्टिकबंदीची अंमलबजावणी हीसक्तीने  होता लोकसहभागातून व्हावी हा आमचा हेतू आहेप्रत्येकाने मी कॅरीबॅगचा वापर करणार नाहीअसा निर्धार केलातर या समस्येतून मुक्तता होईल -

 श्रीसंजय काकडेआयुक्तचंशमनपा     
स्व.बाळासाहेब ठाकरे शिष्यवृत्तीचे वाटप

स्व.बाळासाहेब ठाकरे शिष्यवृत्तीचे वाटप

चंद्रपूर/प्रतिनिधी:
युथ आँफ चांदा फाउंडेशन तर्फे इंदिरा गांधी प्राथमिक शाळा ,इंदिरा नगर येथे आयोजित वार्षिक सांस्क्रुतिक कार्यक्रमात विद्यार्थांना गुनवंत विद्यार्थांना स्व. बाळासाहेब ठाकरे शिष्यव्रुती देद्यात आली. 
   5, 6, 7 मधिल मागच्या वर्षी गुणवंत  विद्यार्थांनारोख रक्कम, प्रमानपत्र व शिल्ड देन्यात आले.तसेच विविध क्रिडा, न्रुत्य ,निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरन करन्यात आले. यावेळी वाहतुक निरिक्षक मा.जयवंत चव्हान साहेब , मा.महेशजी मेंढे , युथ आँफ चांदा संस्थेचे अध्यक्ष मा.निलेशजी बेलखेडे , वाहतुक शाखेचे जुनघरेजी,केंदरेजी, संस्थेचे अध्यक्ष मा.भरत बजाज सर,मुखाध्यापिका सौ.साखरकर मँडम उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्रशासनाच्या व शिक्षकवर्गाच्या वतीने नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणार्या युथ आँफ चांदा (YOC) फांउंडेशन ,चंद्रपुर च्या सदस्यांचा शाल ,श्रिफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे मुकेश जक्कुलवार, शुभम लोखंडे, मिनाक्षि पिसे, पियुष्या हेडाऊ,मनिष वांढरे ,सागर मुँधडा , कुंदन वाढगुरे यांची उपस्थिती होती.

तब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक

तब्बल २१ वर्षांनी सापडले चंद्रपूरचे बेपत्ता वनरक्षक

ललीत लांजेवार/नागपूर: 
लाखोंच्या संख्येत आयोजित कार्यक्रमात किव्हा मेळाव्यात एखादी व्यक्ती आप्तजनांपासून हरवली असल्याचे आपण ऐकले असेल, मात्र त्यांच गर्दीच्या व लाखोंच्या संख्येत असलेल्या मेळाव्यात एखाद्या व्यक्तीचा 21 वर्षानंतर शोध लागणे म्हणजे हरवलेल्या व्यक्तीच्या परिवाराला नवसंजीवनीच मिळणे होय, अशीच नवसंजीवनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील बोनगीलवार परिवाराला मिळाली आहे, एक नव्हे २ नव्हे तर तब्बल २१ वर्षानंतर बेपत्ता झालेले बोनगीलवार परीवाराचे प्रमुख राजाराम बोनगीरवार हे पश्चिम बंगाल मधील गंगासागर मेळाव्याच्या निमित्याने सापडले.

कोलकातापासून 100 कि.मी. अंतरावर असलेल्या दक्षिण चौबीस जिल्ह्यातील गंगा नदीच्याकाठी दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त गंगासागर मेळाव्याचे आयोजन होत असते. प बंगाल मधील गंगासागर मेला जगप्रसिध्द असून लाखो भाविक येथे स्नानानाकरिता येतात. याठिकाणी होणाऱ्या मोठ्या गर्दीमुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता तेथील प्रशासन सज्ज असते.त्यासाठी विविध सामाजिक संघटना व स्वयंसेवक या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी काम करत असतात, अश्यातच वेस्ट बंगाल रेडिओ क्लबचे अम्बरीश बिस्वास हे या मेळाव्यात स्वयंसेवक म्हणून काम करीत असता राजाराम बोणगीरवार हे आजारी अवस्थेत त्यांच्या चमुला सापडले.

वेस्ट बंगाल रेडिओ क्लबच्या सदस्यांनी त्यांना ताबडतोब वैद्यकिय सेवा पुरवून चौकशी केली. चौकशीत राजाराम हे महाराष्ट्रातील आहेत असे समजले. तसेच त्यांनी आपल्या गावाचे नाव कोठारी असे सांगितले.
बंगाल रेडिओ क्लबचे बिस्वास आणि महाराष्ट्रातील एक निवृत्त उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर यांनी कोठारी कुठे आहे हे शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला व पोलीस स्टेशनचे ठानेदार सहायक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्याशी संवाद साधून माहिती दिली.त्यांना कोठारी येथून राजाराम बेपत्ता असल्याची महिती मिळाली. कोलकात्याहून छायाचित्र पाठविण्यात आले. परंतु कुटूंबीयांनी ओळखले नाही. राजाराम वनविभागात कार्यान्वित होते. त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात 2002 मध्ये नोंद केल्याचे आढळले.



त्यामध्ये राजाराम यांचे वर्णनाची नोंद आहे, शरीरावरील खुणांची माहिती ठानेदार यांनी बिस्वास यांना दिल्यावर ते इसम बोनगिरवार असल्याची खात्री पटली. तहसीलदार बल्लारपूर यांनीही यात मदत केली.राजाराम यांचा शोध घेण्याकरिता त्यांच्या मुलासह ठाणेदार अंबिके यांनी पोलिस हवालदार पुलगमकर, पोलिस शिपाई विनोद, सचिन पवार यांना कोलकत्ता येथे रवाना केले. तेथे काकद्वीप रुग्णालयात त्यांची भेट झाली. अन त्यांना चंद्रपूर येथे आनण्याचे प्रयत्न सुरु झाले,पोलिसांनी संपूर्ण कायदेशीर कारवाई करत त्यांना रविवारी चंद्रपूर येथे आणले, तब्बल 21 वर्षांनी मुलांना वडील मिळाले. हे काम वेस्ट बंगाल रेडिओ क्लब च्या सदस्यांमुळे शक्य झाले. वडिलांना बघताच बोनगिरवार परिवाराच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा दिसू लागल्या,

पोलीस स्टे. कोठारी चे ठाणेदार संतोष अंबिके यांच्या कार्यतत्परतेने जवळपास 21 वर्षापासून बेपत्ता असलेल्या कुटुंबियाची अविस्मरणीय भेट घडवून आणल्याने पोलीस प्रशासनाचे व त्यांच्या सहकार्यांचे आभार राजाराम बोनगीरवार यांचे पुत्र सुनील बोनगिरवार यांनी मानले.
या संपूर्ण प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर मानसिक त्रासामुळे त्यांनी घरदार व संसार सोडला असे माहित पडते.

२२ वर्षानंतर बोनगिरवार चंद्रपूर येताच त्यांचे पोलीस अधीक्षक यांचे उपस्थितीत पुष्पगुच्छ व शालश्रीफळ देवुन त्यांची विचारपूस करण्यात आली, राजाराम यांना रविवारी संध्याकाळी त्यांचे नातेवाईकांकडे सुखरुप सुपुर्त करण्यात आले. तेव्हा त्यांच्या कुटंबियांच्या डोळयात आनंदाश्रू आले होते. आत्ता २२ वर्षानंतर घरातील व्यक्‍ती परत मिळाल्याने बोनगिरवार कुटंबियांच्या घरी वेगळे भावनीक आनंदाचे वातावरण आहे. या २२ वर्षाच्या भटकंतीवासाला चंद्रपूर पोलिसांचे मोलाची साथ मिळाली, पोलीस अधीक्षक श्री. महेश्‍वर रेड्डी यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी,शेखर देशमुख राजुरा यांचे नेतृत्वात पोहवा. श्‍यामराव पुल्लगमकर,पोल्लैस शिपाई विनोद निखाडे यांनी बोनगिरवार यांना शोधण्यास मोलाचे कार्य केले.

या संपूर्ण शोध प्रकरणात पुन्हा एकदा इंटरनेटने आपली महत्वाची भूमिका बजावली आहे,इंटरनेटच्या माध्यमातून कोठारी शोधणे सोपे झाले अन बोनगिरवार आपल्या घरी आले.
 कोल माफीया शेख हाजीबाबा शेख सरवरला अटक

कोल माफीया शेख हाजीबाबा शेख सरवरला अटक

नागपूर :अग्निशस्त्र तस्करी प्रकरणी फरार चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील कोल माफीया शेख हाजीबाबा शेख सरवर खान रा.नकोडा याला दहशतवाद विरोधी पथकाद्वारे अटक करण्यात आली आहे.त्याचे ताब्यातून एक अग्निशस्त्र जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 
नक्षल्यांना अग्नीशस्त्रा पुरवठा करण्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने २४ जानेवारी रोजी रात्री नागपूर येथील रेल्वे स्टेशन येथे संजय संदीपन खरे वय ४३ वर्ष रा.अशोकनगर वडगाव ता. वणी व सुपतसिंग वय ४१ वर्ष रा.लक्ष्मीपूर बिहार या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल व २० जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. सदर अग्निशस्त्राचा पुरवठा हाजीबाबास करण्यात येत होता. असे निष्पन्न झाल्यानंतर एटीएस ने हाजीवर नजर रोखली होती. परंतु तो फरार झाला होता.एटीएसने सात दिवसानंतर गिरड येथे त्याच्या मुसक्या आवळून आज (सोमवार) नागपूरला आणले आहे.
हाजीबाबा याचा कोळसा तस्करीचा व्यवसाय असून ,त्याची घुग्गुस भागात प्रचंड दहशत आहे.त्याने यापूर्वी नकोडी येथील उपसरपंच म्हणून पदभार सांभाळला आहे.त्याचे विरुद्ध चंद्रपूरजिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.नागपूर येथील कुख्यात गुंड शेखू खान त्याचा प्रतिस्पर्धी असून त्याने पांच ते सहा वर्षापूर्वी घुग्गुस येथे जाऊन हाजीवर तुफान गोळीबार केला होता. हाजी यात थोडक्यात बचावला.हाजीला यापूर्वी नागपूर येथे लाहोरी बिअर बार येथील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली होती.हाजी आणि शेखू एकाच वेळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात असताना आपसी दुष्मनीतून मोठी समस्या निर्माण झाली होती.हाजीचे काही नक्षल कनेक्शन आहे काय? याचा एटीएस व्दारे शोध घेण्यात येत आहे.

कवडू लोहकरे यांना राज्यस्तरिय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

कवडू लोहकरे यांना राज्यस्तरिय जीवनगौरव पुरस्कार प्रदान


 बल्लारपुर येथील गुरुनानक पब्लीक स्कुल मध्ये थाटात पार पडला पुरस्कार वितरण समारंभ

चिमूर/रोहित रामटेके
चिमुर--:: पर्यावरण श्रेत्रामध्ये वृक्षसंवर्धन , जलसंवर्धन , वन्यजीव संवर्धन , प्लास्टिक मुक्त  शहर अभी यान, ऐतीहासीक वारसा संवर्धन इत्यादि सामाजिक  उपक्रमामध्ये भरिव व उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल पर्यावरण प्रेमी तथा पर्यावरण समीती अध्यक्ष कवडु लोहकरे यांना २०१९ या वर्षिचा जीवनगौरव पुरस्कार बल्लारपूर येथील गूरुनानक पब्लिक स्कुल या ठीकाणी पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटक वनविकास कार्पोरेशन चे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा चंदनसीह चंदेल यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेडी कार्यक्रमाचे अतिथी कैलाश खंडेलवार , फिल्म निर्माता  राजण सुर्यवंशि ,    फिल्म निर्माता विजय गुमगावकर, प्रेम झामनानी, डाॅ नामदेव उमाटे, नविन लादे ,  सौ .कल्पणा वाढे आदि प्रमुख पाहुणे उपस्थित  होते

या कार्यक्रमाला महाराष्ट्र  राज्यातील विविध व पर्यावरण श्रेत्रात कार्य करणारे दिग्गज लोकांची उपस्थिती होती.पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांना पर्यावरण श्रेत्रातील राज्यस्तरिय जीवनगौरव मीडाल्याबद्दल सर्व स्तरावरुन कौतूक होत आहे. पर्यावरण संवर्धन
समीती भिसी, पर्यावरण संवर्धन समीती चिमुर , पर्यावरण संवर्धन समीती नेरी , पर्यावरण संवर्धन समीती खडसंगी कडुन अभी नंदन करण्यात आले.