काव्यशिल्प Digital Media: रोडे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label रोडे. Show all posts
Showing posts with label रोडे. Show all posts

Monday, January 22, 2018

मराठी शाळा बंद करण्यात येऊ नये: मनसेचे  हाप पॅन्टवर आंदोलन

मराठी शाळा बंद करण्यात येऊ नये: मनसेचे हाप पॅन्टवर आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
    मराठी माणसाचे हित जोपासत आता मनसे सरकारविरोधात आक्रमक झाली आहे चंद्रपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हाप पॅन्टवर शिक्षण अधिकारी कार्यालयात तब्बल एकतास विध्यार्थी म्हणून बसून शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे , गोरगरिबांचे शिक्षण हिस्कावू देणार नाही, अश्या प्रकारचे नारे देत चंद्रपूर मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात  अनोखे आंदोलन पुकारले आहे ,
यावेळी  मनदीप रोडे यांनी शिक्षण अधिकारी यांनाच धारेवर धरत करोडो रुपये शासन शिक्षकांवर खर्च करते मात्र शाळेचा दर्जा कमी कसा होतो सोबतच मुलांची पटसंख्या कमी कशी काय होते याचे उत्तर मागितले. 
 
 गुणवत्तेमुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील १३१२ शाळांना कुलूप लागणार आहे. या शाळांतील विद्यार्थी अन्य ठिकाणी समायोजित केले जाणार असल्याचा दावा सरकार करत असली तरी  डोंगराळ, दुर्गम भागातील शाळांतील शेकडो मुलांना याचा फटका बसणार आहे. बंद होणाऱ्या अनेक शाळा दोन किमीपेक्षाही अधिक अंतरावर आहेत. नदी नाले ओलांडून, जंगलवाटांनी मुलांनी शाळांपर्यंत पोहचावे अशी अपेक्षा करणेच अमानवी आहे. त्यामळे मराठी शाळा बंद   करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असे देखील शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मनसेचा सूर होता . 
यावेळी आंदोलनात मनसे शहर उपाध्यक्ष राहुल चव्हाण,व्यंकटेश मुत्कलवार ,शहर सचिव सचिन कोतपल्लीवार , सुमित खेडनकर , सुमित करपे ,नितीन बावणे,नितीन कुमरे, नागाजी गंफाडे , यासह आदी मनसे आंदोलक कार्यकतें उपस्थित होते.