সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 31, 2013

नक्षलबंदचा फटका- दुर्गम भागातील ५0 बसफेर्‍या बंद

नक्षलबंदचा फटका- दुर्गम भागातील ५0 बसफेर्‍या बंद

 गडचिरोली व अहेरी आगाराचे एक लाखाचे नुकसान
गडचिरोली- नक्षलवादी संघटनांनी आज पुकारलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगारातून दुर्गम भागात जाणार्‍या ५0 बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या. यात छत्तीसगड राज्यात जाणार्‍या आंतरराज्यीय बसफेरीचाही समावेश असून बसफेर्‍या बंद राहिल्याने दोन्ही आगारांचे प्रत्येकी ५0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. काही बसफेर्‍या परत बोलाविण्यात आल्याची माहिती आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी येथे दोन आगार आहेत. या दोन्ही आगारातून जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागात बसफेर्‍या सोडल्या जातात. गडचिरोली आगारातून छत्तीसगड राज्यात जाणारी मानपूर व राजनांदगाव या दोन बसफेर्‍या सोडल्या जातात. आज नक्षलवाद्यांनी बंद पुकारल्यामुळे या दोन्ही बसफेर्‍यांसह जारावंडी, कुरखेडा, एटापल्ली, भामरागड या गडचिरोली आगारातून सुटणार्‍या बसफेर्‍या बंद ठेवण्यात आल्या. मुरुमगाव बसफेरीही केवळ धानोरापर्यंतच सोडण्यात आली. गडचिरोली आगारातून सुटणार्‍या ३0 बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या.
तर अहेरी आगारातील अहेरी- भामरागड, कोठी, व्यंकटापूर, छल्लेवाडा, खांदला (राजाराम), झिंगानूर, रेगुंठा आदी बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या. एटापल्ली, देचलीपेठा मार्गावरील खासगी वाहतुकही बंद होती. काल भामरागडला गेलेली बस आज सकाळी परत आली. मात्र त्यानंतर एकही बसफेरी या मार्गावर सोडण्यात आली नाही. या आगारातून सुटणार्‍या २0 बसफेर्‍या रद्द करण्यात आल्याची माहिती अहेरी आगार प्रशासनाने दिली आहे. एटापल्ली-कसनसूर-जारावंडी, गेदा, गट्टा आदी मार्गही बंद होते.
जिमलगट्टा येथील व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. रांगी येथील बाजारपेठही आज बंद ठेवण्यात आली होती. एटापल्ली परिसरात अनेक ठिकाणी नक्षल पत्रके आढळून आली.

Wednesday, January 30, 2013

 संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करा

संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करा

चंद्रपूर -  वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र, तिथे आज सर्वाधिक दारू विकली जाते. मग दारूबंदीचा उपयोग काय? संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करा. अशी  मागणी दारूविक्रेत्यांनी शासनाला केली. जिल्ह्यात दारूबंदीचे आंदोलन जोरात असताना त्याला विरोध करण्यासाठी दारूविक्रेत्यांसह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारोंच्या गर्दीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (ता. 30)मोर्चा काढून आपल्या भावना शासनदरबारी मांडल्या. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी "श्रमिक एल्गार'ने डिसेंबर महिन्यात पदयात्रा काढली. त्यानंतर राज्य शासनाने सकारात्मक आणि नकारात्मक बाबींवर आढावा घेण्यासाठी दारूबंदी समिती स्थापन केली. त्यानंतर जिल्ह्यातील काही संघटनांनी संयुक्त कृती समिती स्थापन करून दारूबंदीची मागणी रेटून धरली आहे. दारूबंदीचे समर्थक एकत्र येत असताना दारूविक्रेत्यांनीही आपली ताकद मोर्चाच्या माध्यमातून दाखविली.

Tuesday, January 29, 2013

नेहरु येवा केंद्राचा युवा पुरस्कार यार्ड संस्थेला

नेहरु येवा केंद्राचा युवा पुरस्कार यार्ड संस्थेला


चंद्रपूर दि.29- युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार व्दारा संचालीत नेहरु युवा केंद्र चंद्रपूरचे वतीने वरोरा येथील युथ अवेअरनेस ॲन्ड रुरल डेव्हलपमेंट (यार्ड) या संस्थेला युवा दिनानिमित्त जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने अध्यक्ष अरुण चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या संस्थेने शासन व युनिसेफ यासारख्या संस्थांचे मदतीने आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता, माता-बालसंगोपन, एडस जागृती, कुष्ठरोग दुरीकरण, रोहयो, शेती विकास यासारखे उपक्रम जिल्हयातील वेगवेगळया भागात राबविले. संस्थेने कार्यक्षेत्रात युवा व किशोरी, महिला, शेतकरी इत्यादीचे संघटन करुन ग्राम विकासाला चालना दिली आहे. गुडीया मॉडेल, ग्राम विकास दल, विधवा महिलांचे संघटन यासारखे नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले आहे.
नेहरु युवा केंद्र चंद्रपूरचे वतीने 12 जानेवारी 2013 रोजी विशेष समारंभात यार्ड ला जिल्हा युवा मंडळ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यीक ना.गो.थुटे, उदघाटक समाजसेवक डॉ.विकास आमटे यांचे हस्ते झाले. त्यावेळी प्रामुख्याने वृक्षमित्र मोहन हिराबाई हिरालाल, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रभाकर माटे, जिल्हा युवा समन्वयक जमुना डंगावकर, डॉ.प्रमोद गंपावार, युनिसेफ सल्लागार उपेंद्र पिल्लई इत्यादी उपस्थित होते. सुत्र संचालन हर्षवर्धन डांगे यांनी केले.
3 मार्च ला जिल्हाभरात महा लोक अदालत

3 मार्च ला जिल्हाभरात महा लोक अदालत


* न्याय आपल्या दारी
* प्रलंबित प्रकरणे निकाली काढणार
* कुठलीही फी आकारली जाणार नाही

चंद्रपूर दि.29- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 3 मार्च 2013 रोजी चंद्रपूर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात महा लोक अदालतचे आयोजन करण्यात आले असून न्यायालयात प्रलंबित असलेली व दाखलपूर्व प्रकरणे झटपट निकाली काढण्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कुठलीही फी आकारली जाणार नाही.
ही महालोक अदालत, जिल्हा न्यायालय, सहधर्मदाय आयुक्त न्यायालय, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, शाळा न्यायाधिकरण व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकाच दिवशी म्हणजे 3 मार्चला आयोजित केली जाणार आहे.
न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे (प्री लिटीगेशन) यांचा याप्रसंगी निपटारा करण्यात येणार आहे. महालोक अदालतमध्ये जास्तीत जास्त वाद संपुष्टात यावे यासाठी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांना विधी न्याय सेवातर्फे माहिती देण्यात आली असून त्यांनी आपल्या जिल्हयातील तसेच परिसरातील नागरिकांनी यासाठी मदत करावी असे सुचविले आहे.
सामंजस्याने वाद मिटविणे यातच खरे शहाणपण, त्यासाठी तुम्हाला मदत करेल महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण असे ब्रिद असलेल्या या महालोक अदालतमध्ये प्रकरणे मिटविण्यासाठी न्यायाधिश, वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे. यासाठी कुठलीही फी आकारली जाणार नसून केवळ एक साधा अर्ज करायचा आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती उषा ठाकरे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

Monday, January 28, 2013

कृषी व्यवसायाला राष्ट्रीय व्यवसाय घोषित करू- राजनाथसिह

कृषी व्यवसायाला राष्ट्रीय व्यवसाय घोषित करू- राजनाथसिह

ब्रह्मपुरी- विदर्भात बेकारी आणि दारिद्य्र आहे. इथला शेतकरी गरीब असूनही तो स्वाभिमानी आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या भ्रष्टाचारामुळे मध्यवर्गीयांसमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. आदिवासींचा विकास खुंटला आहे. पीडित समाजाचा विकास होणार नाही, तोपर्यंत देश महासत्ता होणार नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही कृषी व्यवसायाला राष्ट्रीय व्यवसाय घोषित करू. तसेच रोजगार हमी योजना शेतीसाठी राबवू. शेतकèयांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. शेतक-यांना उत्तम खत, उत्तम बियाणे व qसचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचे राजनाथसिह यांनी भाषणात सांगितले.

येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या पटांगणावर भाजपच्या वतीने शेतकरी व शेतमजूर मेळाव्याचे आज (ता.२८) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मागदर्शक म्हणून राजनाथqसह उपस्थित होते. यावेळी मंचावर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नितीन गडकरी, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्मृती इराणी, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार अतुल देशकर, आमदार नाना पटोले, आमदार शोभाताई ङ्कडणवीस, आमदार सुधीर पारवे, जि. प. अध्यक्ष संतोष कंभरे, अशोक नेते, नीता केळकर, वनिता कानडे आदींची उपस्थिती होती. 
...तर हातभट्टीच्या दारूविक्रीवर बंदी नको - आठवले

...तर हातभट्टीच्या दारूविक्रीवर बंदी नको - आठवले

चंद्रपूर- दारूबंदी होणार नसेल, तर हातभट्टीच्या दारूविक्रीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. 
महाराष्ट्र शासनाचे दारूबंदी संदर्भातलं आजवरचं धोरण पाहता संपूर्ण दारूबंदी होणं अशक्य आहे. त्यामुळे शासनानं व्यसनमुक्ती कार्यक्रमावर भर द्यावा. आमचा दारूबंदीला पाठिबा आहे. मात्र देशी - विदेशी दारू विक्रीला शासन परवानगी देतं तर, हातभट्टीच्या दारूला बंदी घालते. त्यामुळे शासनाने संपूर्ण दारूबंदी करावी अन्यथा हातभट्टीच्या दारू विक्रीलाही परवानगी द्यावी असं वक्तव्य आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय. 
चंद्रपुर येथे बोलताना रामदास आठवले यांनी दारुबंदीसंदर्भात विधान केलं. संपूर्ण दारुबंदी अशक्य असल्य़ाचं दिसून येत आहे. त्यामुळे दारू विक्रीला परवानगी मिळणारच असेल, तर फक्त विदेशी दारूलाच का? हातभट्टीच्या दारूला का नाही? असा सवाल रामदास आठवलेंनी केला आहे.
वाहन चालकाचा मृतदेह आढळला

वाहन चालकाचा मृतदेह आढळला

पडोली येथील एका धाब्यावर कोटेश्वर शंकरराव काळे (वय ४५) या वाहन चालकाचा मृतदेह संशयास्पद आढळला. ट्रकचालक काळे यांनी वर्धेवरून ट्रकने पडोली येथे २७ रोजी आले होते. आज २८ रोजी पडोली येथील धाब्यावर असलेल्या खाटेवर मृत अवस्थेत दिसुन आले.

Sunday, January 27, 2013

कु-हाडीने वार करून  निर्घृण हत्या

कु-हाडीने वार करून निर्घृण हत्या


बल्लारपूर - क्षुल्लक वादातून दाम्पत्याने एकावर कु-हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बल्लारपूर तालुक्यातील मानोरा शेतशिवारात घडली. भाऊजी बाबूला ढोंगे (वय ५५) असे मृताचे नाव आहे.
 दारुबंदीसाठी  जेल सत्याग्रह

दारुबंदीसाठी जेल सत्याग्रह


चंद्रपूर,   जिल्ह्यात दारुबंदीसाठी अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकत्र्यांनी जेल सत्याग्रह करीत अटक करवून घेतली. अ‍ॅड. गोस्वामी व त्यांचेसह १७७ महिला पुरुषांनी जामीन नाकारल्याने नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली. १२ डिसेंबर २०१२ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महिन्यात चंद्रपूर जिल्हा दारुबंदीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याबाबत शासनाने आपले वचन न पाळल्याने ता. १३ जानेवारी २०१३ रोजी सत्याग्रहाची शपथ घेत प्रजासत्ताक दिनाचे दिवशी जेल सत्याग्रह जाहीर करण्यात आले. त्यानुसार आज जिल्हा भरातून हजारो महिला पुरुष जेल सत्याग्रहांसाठी उपस्थित झाले. ता. २६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शासकीय ध्वजारोहणासाठी जात असतांना पोलिसांनी सावरकर चौकातच पोलिसांनी अटकाव केला व सत्याग्रहींना धरपकड सुरु केली. या धरपकडीत व ओढातान झाल्याने २५ ते ३० महिलांना किरकोळ इजा झाली काही महिलांच्यासाड्या ङ्काटल्यात पोलिसांनी अटक करून सोडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सत्याग्रहींनी जेलचिच मागणी केली. जामीन नाकारले त्यामुळे पोलिसांनी २७२ सत्याग्रहींना अटक करण्यात आली. त्यात पुरूष व १९२ महिला आहेत, यातील ९५ महिलांना जामीन दिल्याने उर्वरित १७७ सत्याग्रहीना जेलमध्ये टाकण्यात आले. महिला सत्याग्रहींना नागपूर कारागृहात तर पुरुष सत्याग्रहींना चंद्रपूर कारागृहात ठेवण्यात आले. शासनाच्या विवेक बुद्धीला आवाहन करण्याच्या हेतुने हे आंदोलन करण्यात आले. सत्याग्रहींनी जामीन घ्यावा यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर.पाटील, यांनी प्रयत्न केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांचे माङ्र्कतीने सत्याग्रहीचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र अ‍ॅड. गोस्वामी यांनी जामीन घेण्यास इन्कार केला. आदोलनाला जेष्ठ सामाजीक कार्यकत्र्यां डॉ. राणी बंग यानी भेट दिली. चंद्रपूर येथील सामाजीक कार्यकर्ते जयश्री कापसे, डॉ. गोपाल मुंधडा, पप्पु देशमुख, प्रा. सुरेश चोपणे, डॉ. योगेश्वर दुधपचारे, आदींनी पालक मंत्री संजय देवतळे यांची भेट घेऊन सत्याग्रहींच्या आंदोलनावर भूमिका घेण्याची विनंती केली. आज जामीन दिलेल्या ९५ महिलांनी घरी जाण्यास नकार देऊन पोलिस स्टेशन मध्येच ठाण मांडून कारागृहात ठेवण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रहींना पाठींबा देण्यासाठी धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.,
गांधीवादी नेते ठाकूरदास बंग यांचं निधन

गांधीवादी नेते ठाकूरदास बंग यांचं निधन

वर्धा: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि गांधीवादी नेते ठाकूरदास बंग यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वर्ध्यातील चेतनविकास या त्यांच्या फार्महाऊसमध्ये बंग यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाकूरदास बंग ९५ वर्षांचे होते.

ठाकूरदास बंग यांचा अलिकडचा परिचय म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांचे ते वडील होते. बंग यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी चार वाजता राहत्या घरीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ठाकूरदास बंग यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला होता. भारत छोडो, खादी आणि सर्वोदय चळवळीत ठाकूरदास बंग यांचा मोठा सहभाग होता.

स्वातंत्र्य चळवळीतील बंग यांच्या योगदानासाठी १९९२मध्ये त्यांना माजी राष्ट्रपती के.शंकरनारायणन यांच्या हस्ते जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर प्रतिष्ठित नाग भूषण या पुरस्कारानेही त्यांचा २०१२मध्ये गौरव करण्यात आला होता. 
 जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द

जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द


पालकमंत्री ना.संजय देवतळे
    
   चंद्रपूर दि.26- गेल्या 62 वर्षात देशाने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करुन जगभर नाव लौकिक मिळविला आहे.  याच काळात महाराष्ट्र राज्याने जनकल्याणाच्या विविध योजना आखून व त्याची योग्य अंमलबजावणी करुन सामान्य मानसाला विकासाच्या प्रवाहात आणले आहे.  आपल्या जिल्हयातही विकासाचे अनेक कामे प्रगती पथावर असून जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.संजय देवतळे यांनी केले. या विकास कार्यात  जिल्हा वासियांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
    यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, महापौर संगीता अमृतकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, शोभाताई फडणवीस, नाना शामकुळे, माजी खासदार शांताराम पोटदुखे, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार, उपविभागीय अधिकारी आशितोष सलील व विविध विभागाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
     प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात ते जिल्हा वासियांना संबोधित करीत होते.  सर्व प्रथम पालकमंत्री देवतळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  त्यानंतर आपल्या शुभसंदेशात देवतळे म्हणाले की, शासकीय योजनांचा लाभ  घेण्यासाठी आधार नोंदणी अतिशय महत्वाची झाली असून चंद्रपूर जिल्हयात पहिल्या टप्प्यात 5 लाख 70 हजार 702 तर  दुस-या टप्प्यात 2 लाख 47 हजार 263 असे एकूण 8 लाख 17 हजार 965 नागरीकांची आधार नोंदणी झाली आहे.  जिल्हयात हे काम जलगतीने होत असून त्यासाठी 148 मशिन कार्यरत आहेत.  नागरीकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर जावून नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. 
     चंद्रपूर येथे शासनाने वैद्यकिय महाविद्यालय मंजूर केल्याचे सांगून ही जिल्हयासाठी मोठी उपलब्धी असल्याचे देवतळे म्हणाले. ब्रम्हपूरी , राजूरा, वरोरा येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तर पोंभूर्णा व जिवती येथे 30 खाटांचे रुणालय मंजूर करुन शासनाने नागरीकांच्या उत्तम आरोग्याची सोय केले असल्याचे त्यांनी सांगितले.
     जिल्हयातील ऐतिहासिक व पुरातत्विय महत्व असलेल्या स्मारकाचे जतन व दुरुस्तीचे कामे जिल्हयात मोठया प्रमाणात सुरु असल्याचे सांगून माणिकगड किल्ल्याच्या देखभाल व दुरुस्तीवर 4 कोटी खर्च होणार असल्याचे देवतळे म्हणाले. जिल्हयातील प्रदुषणाचे गुणांकन कमी करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
     राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणाचा उल्लेख करुन पालकमंत्री म्हणाले की, या धोरणाचा लाभ लहान उद्योगांना होणार आहे.  जिल्हयात नव्याने येवू पाहणा-या उद्योगातून जिल्हयात 11 हजार 161 कोटीची गुंतवणूक अपेक्षित असून यातून 6 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
     चंद्रपूर शहर पंचशताब्दी अंतर्गत शहराच्या विकासासाठी 25 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून या निधीतून पायाभूत सुविधा, नव्याने विकसित भागात पाणी वितरण व्यवस्था व शहरातील मुख्य मार्गावरील भुमिगत विद्युत वाहिणीचे काम करण्यात येणार आहे.  यामुळे चंद्रपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग मुंबई विभागा पुरताच केंद्रीत होता. त्याचे विकेंद्रीकरण करुन विभागीय स्तरावर सांस्कृतिक विभागाचे कार्यालय सुरु करण्यात आले.  यात नागपूर, औरंगाबाद व पुणे या शहराचा समावेश आहे.  प्रत्येक जिल्हयामध्ये सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने प्रत्येकी 5 लाख रुपयाचा निधी जिल्‍हयांना मंजूर केला असून सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात     येणा-या सांस्कृतिक पुरस्काराच्या रक्कमेत दुप्पटीने वाढ केली असल्याचे देवतळे म्हणाले.
     जिल्हयाचा विकास आराखडा तयार करणा-या जिल्हा वार्षिक योजनेतून 112 गावाच्या पेयजल योजनेसाठी 8 कोटी रुपये खर्च केला असून  ग्रामीण व शहरी भागातील नागरीकांना सामाजिक न्याय विभागाने 8 हजार 500 घरकुलाचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नौबध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना सुरु केली असून याचा लाभ बचत गटांनी घेण्याचे आवाहन देवतळे यांनी केले.
     यासोबत कृषी, शिक्षण, महात्मा गांधी तटामुक्त गाव, शिक्षण हक्क कायदा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आदिवासी बांधवांचा विकास, आरोग्य, सामुहिक प्रोत्साहन योजना  आदिचा त्यांनी आपल्या भाषणातून  सविस्तर आढावा घेतला. जिल्हयातील नागरीकांनी या विकास कार्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
     आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पोलीस विभाग, होमगार्ड विभाग, शाळा व स्काऊड गाईड आदिनी उत्कृष्ट परेड संचलन करुन मान्यवरांना सलामी दिली.  त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे, जिल्हा परिषदेची वक्तृत्व स्पर्धा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, हरित सेना पुरस्कार व वैयक्तिक स्वरुपाच्या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
     यानंतर जिल्हा पोलीस विभाग चंद्रपूर तर्फे कराटयाचे प्रात्यक्षिक व जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर व्दारे खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सामुदायिक कवायतीमध्ये मासपीटी, डंबेल्स व लेझिमचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. या सोहळयास शहरातील असंख्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
     मुख्य समारोहा पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रशासकीय इमारत येथे अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Friday, January 25, 2013

 बंडु धोतरे यांना  ‘संघर्ष सन्मान पुरस्कार’

बंडु धोतरे यांना ‘संघर्ष सन्मान पुरस्कार’

पुण्याच्या मुक्तांगण संस्थेतर्फे सन्मान
    
चंद्रपूरः मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापिका डाॅ. अनिता अवचट यांच्या स्मृतीदिनानिमीत्य दवर्षी 10 फेब्रुवारी रोजी मुक्तागंण परिवारातर्फे ‘संघर्ष सन्मान पुरस्कार’ दिले जातात. वैयक्तिक आयुष्यात व सामाजीक क्षेत्रात संघर्ष करणाÚया व्यक्तीची यासाठी निवड केली जाते.
    चंद्रपूर जिल्हयात इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने पर्यावरण रक्षणासाठी व सामाजीक क्षेत्रात करित असलेल्या कार्याचा सन्मान करण्यासाठी मुक्तागंण संस्था, पुणे च्या विश्वस्त मंडळाने या वर्षीचा पुरस्कार इको-प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडु धोतरे यांना देण्याचे ठरवीले आहे. मानचिन्ह व रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
    रविवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी साडे दहा वाजता एस. एम. जोशी सभागृहात मुक्तागण संस्था, पुणे व्दारा आयोजीत कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जाईल. यावेळी डाॅ. आंनद नाडकर्णी हे बंडु धोतरे यांचेशी संवाद साधणार आहेत. असे एका पत्रान्वये संस्थेच्या विश्वस्त मुक्ता पुणतांबेकर यांनी कळविले आहे.
खेडुले कुणबी समाज  स्नेहमीलन सोहळा

खेडुले कुणबी समाज स्नेहमीलन सोहळा

चंद्रपूर, : खेडुले कुणबी समाजाच्या वतीने स्नेहमीलन सोहळा व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारंभ ता. २८ रोजी स्थानिक खेडुले कुणबी समाज भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दहावी आणि बारावीमध्ये ७५ टक्के गुणतर पदवीधर ६० टक्के गुण प्राप्त विद्याथ्र्यांचा सत्कार सोहळा होईल. दुपारी एक वाजता हळदीकुंकू कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खेडुले कुणबी समाजाच्या अध्यक्षांनी केले आहे.
जिल्हयात गेल्या चार वर्षात एड्सच्या रुग्णात घट

जिल्हयात गेल्या चार वर्षात एड्सच्या रुग्णात घट


    चंद्रपूर,बल्लारपूर व सिंदेवाही अती जोखिम गट
  750 प्रशिक्षित समुपदेशक कार्यरत

चंद्रपूर,दि. 24 :- चंद्रपूर जिल्हयात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या गेल्या चार वर्षात झपाटयाने घटली असून गरोदर माता रुग्ण निम्म्याने कमी झाले आहेत. नियमित चाचणी व समुपदेशन यामुळे एड्स सारख्या भयंकर आजारावर ताबा मिळविता आला आहे.
     एका अहवालानुसार चंद्रपूर जिल्हयात सन 2009-10 मध्ये 80 हजार लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली यात 1123 व्यक्ती एचआयव्ही बाधित निघाले तर 23 हजार गरोदर मातांची तपासणी करण्यात आली यात 79 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. 2010-11 मध्ये 1 लाख 20 जणांची तपासणी केली त्यात 1244  पौझिटीव्ह निघाले. 35 हजार गरोदर माता तपासणीत 68माता पॉझिटीव्ह सापडल्या. 2011-12 मध्ये 1 लाख 30 हजार तपासणीत 921  पॉझिटीव्ह तर 38 हजार 500 गरोदर माता तपासणीत 63 माता पॉझिटीव्ह आढळल्या. 2012 च्या डिसेंबर पर्यंतच्या तपासणीत 470 व्यक्ती व 35 गरोदर माता पॉझिटीव्ह आढळल्या या आकडेवारीवर नजर टाकल्यास पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सतत कमी झालेली आढळेल.
     पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांचे सतत समुपदेशन करण्यात येते. मात्र हे रुग्ण ब-याच वेळा स्थलांतरीत असल्याने त्यात सातत्य ठेवणे कठीण असले तरी यासाठी अनेक स्वयंसेवीसंस्थांची मदत घेतली जाते. विशेषत: देहविक्रय करणा-या महिलांच्या बाबतीत ही अडचण मोठया प्रमाणात येते. ज्यांना क्षयरोग आहे अशा रुग्णात एचआयव्हीचे जीवाणू असण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ज्यांना क्षयरोग आहे. त्यांची एचआयव्ही तपासणी व ज्यांना एचआयव्ही आहे त्यांची क्षयरोग तपासणी सुध्दा आरोग्य विभागाकडून करण्यात येते.  
     चंद्रपूर जिल्हयात चंद्रपूर, बल्लारपूर व सिंदेवाही तालुके अति जोखिम गट म्हणून पुढे आले असून चंद्रपूर तालुक्यात 356, बल्लारपूर तालुक्यात 71 तर सिंदेवाही तालुक्यात 43 एचआयव्ही पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर गरोदर मातामध्ये चंद्रपूर 27, बल्लारपूर 5 व सिंदेवाही 2 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. चंद्रपूर शहराचा परिसर हा औद्योगिक वसाहतीचा परिसर असून या ठिकाणी स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
त्याच प्रमाणे देहविक्रय करणा-या स्त्रीयांच्या तपासणीत 5 स्त्रीया व ट्रक चालकांच्या तपासणीत 3 ट्रक चालक पॉझिटीव्ह आढळले. एड्सच्या दृष्टीने हा हाय रिस्‍क ग्रुप असून एचआयव्ही वहनासाठी हा ग्रुप मदत करतो. पॉझिटीव्ह आढळलेल्या सर्वच रुग्णांवर उपचार केले जातात. एचआयव्ही बाधितांचे समुपदेशन करण्यासाठी 750 प्रशिक्षित समुपदेशक कार्यरत आहेत.मात्र ब-याच वेळा रुग्ण स्थलांतरीत झाल्याने उपचार अर्धवटच राहतात असेही निदर्शनास आले आहे. आरोग्य विभागाने एड्सबाबत शुन्य गाठायचे आहे असा निर्धार केलेला आहेच.                                
 सिंचन विहीरीचा लक्षांक तात्काळ पूर्ण करा

सिंचन विहीरीचा लक्षांक तात्काळ पूर्ण करा


- रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत
           चंद्रपूर दि.24- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरीचा लक्षांक तात्काळ पूर्ण करा अशा सूचना रोजगार हमी  योजना व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.  आज जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो आढावा बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते.  जिल्हाधिकारी विजय वाघमारे, उपवनसंरक्षक पी कल्याणकुमार, प्रकल्प संचालक अंकुश केदार व उपजिल्हाधिकारी दामोधर नान्हे उपस्थित होते.
      महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणा-या यंत्रणांच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.  यात प्रामुख्याने कृषी, जिल्हा परिषद सिंचन विभाग व वन विभाग यांचा समावेश होता.  जिल्हयात वैयक्तीक शौचालयाचे काम चांगले झाल्याचे सांगून मंत्री नितीन राऊत यांनी समाधान व्यक्त केले.  मात्र सिंचन विहिरीच्या कामाबाबत बोलतांना लक्षांक तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  वन विभागाला जास्त काम करण्याची संधी असून त्यांनी जास्तीत जास्त कामे करावी असे ते म्हणाले.
      रस्त्याच्या खडीकरणाचे काम वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करुन राऊत म्हणाले की, पांदन रस्त्याच्या कामासाठी व गाळ काढण्यासाठी लातूर पॅटर्न चा अवलंब करावा तसेच बुलडाणा जिल्हयात लोक सहभागातून रस्ते तयार करण्याचे काम अतिशय छान झाले असून त्याप्रमाणे आपल्या जिल्हयातही करावे असे राऊत म्हणाले. 
      ज्या गावामध्ये क्रीडांगण नसेल त्या गांवात क्रीडांगण उभारण्यासाठी सुध्दा हा निधी वापरता येईल तसेच दहन घाट व दफन भुमी बांधकामासाठी निधी वापरण्यासंबंधी लवकरच परवानगी देण्यात येईल असे सांगीतले.  रोहयोच्या अंमलबजावणीसाठी तालुका तसेच पंचायत समिती स्तरावर कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन करावे असे सांगून जास्तीत जास्त लोकांना रोहयोच्या कामात सहभागी करुन घेण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या.
      31 मार्च तोंडावर असल्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेच्या कुठल्याही यंत्रणेचा निधी वापस जाता कामा नये असे निर्देश देतांना कामाची गुणवत्ता जोपासावी असे ते म्हणाले. काम करतांना काही अडचणी असल्यास आपल्याला सांगा,  त्या तात्काळ सोडवू मात्र यंत्रणानी लक्षांक पूर्ण करण्यावर भर दयावा असेही नितीन राऊत म्हणाले.

Wednesday, January 23, 2013

 सिंदेवाही नगर पत्रकार संघाची कार्यकारीणी गठीत

सिंदेवाही नगर पत्रकार संघाची कार्यकारीणी गठीत


    सिंदेवाही.   सिंदेवाही नगर पत्रकार संघाची सहविचार सभा प्रा. षरद बिडवाईक यांच्या घरी मावळते अध्यक्ष श्री. नागराज मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पुढीलप्रमाणे कार्यकारीण्ी निवडण्यात आली.
   अध्यक्षः- श्री. विलास धुळेवार ( दै. सकाळ), उपाध्यक्षः- श्री.वहाब अली ( दै. नवभारत), सचिवः-श्री. प्रषांत गेडाम ( दै. पुण्यनगरी), सहसचिवः- श्री. ( दै. विदर्भाचा राखणदार), कोषाध्यक्षः- श्री. अमृत दंडवते ( दै. देषोन्नती), सदस्यः- प्रा. षरद बिडवाईक ( दै. हितवाद), श्री. नागराज मेश्राम ( दै. देषोन्नती), श्री. सोमेष्वर पाकवार (  दै.  सकाळ), श्री. अषोक सहारे (), श्री. राकेष बोरकुंडवार (दै. लोकमत), श्री.सुधाकर गजभिये(), श्री. जितेंद्र बेल्लोरकर (दै.तरूण भारत), श्री. मिलींद साखरे (दै. महाविदर्भ)
1,700 undergo eye surgery at Anandwan

1,700 undergo eye surgery at Anandwan



Fifty five-year-old Gangubai Patil finally has a reason to smile. One of the residents at Anandwan, a rehabilitation centre for leprosy patients that was started by Baba Amte, Patil was pleased when doctors told her she could get back to work within 40 days of having undergone a cataract surgery.

“Unlike the outside world, we get respect here; we are not victimised. We work and lead a beautiful life. I get restless if I have no work. I am glad the doctors have now allowed me to work,” Patil said, echoing the sentiments of the over 1,500 people permanently living at the rehabilitation centre who are now disease-free.

For the past 15 years, doctors from JJ Hospital and coordinators from iCare Foundation, a Mumbai-based non-governmental organisation (NGO), have been visiting Anandwan in the state’s Chandrapur district to treat eye-related problems of the people living there.

This year, more than 10,000 residents and tribals from surrounding areas attended the eye check-up camp, and 1,701 of them got operated for vision-related problems they suffered from.

“The crowd keeps increasing every year. Most people attending the camps here are tribals, disabled people and labourers. Patients come from different districts including Nagpur, Gadchiroli and Chandrapur,” Baba Amte’s son Dr Vikas Amte said, adding that most people are satisfied with the treatment they receive for their vision-related problems and that the dedication of Dr Lahane and the iCare Foundation team is unmatched.

Dr TP Lahane, the dean of JJ Hospital in Byculla who has been visiting the place for the last 15 years, said, “Cataract surgery is a bit complicated for leprosy patients. This is because post-operation care is very important. We advise the patients to rest for at least 40 days. This year, we operated on 1,701 patients with the help of my colleague Dr Ragini Parekh and others in the team.”

After surgery and the follow-up treatment, patients are provided with a free pair of spectacles, said Dr VG Pol, medical officer at the Maharogi Sewa Samiti set up by Baba Amte.

He added that some patients had been suffering from bilateral cataract for the past four years, and could barely see, but now they are very happy with their vision after the surgery.
---------------------------------------


आनंदवन कि नेत्र शल्य चिकित्सा

५५ वर्षीय गंगूबाई पाटिल में मुस्कान के लिए एक कारण है. आनंदवन  कुष्ठ रोगियों कि बाबा आमटे द्वारा शुरू किया गया था. इस पुनर्वास केंद्र में निवासियों के, पाटिल, जब डॉक्टरों ने उसे बताया कि वह वापस पाने के लिए एक मोतियाबिंद सर्जरी आया 40 दिनों के भीतर काम कर सकता था.

बाहर की दुनिया के विपरीत, हम सम्मान यहाँ मिलता है, हम नहीं पीड़ित हैं. हम काम करते हैं और एक सुंदर जीवन का नेतृत्व. मैं बेचैन हो अगर मैं कोई काम नहीं है. पाटिल ने कहा कि मुझे खुशी है कि डॉक्टरों को अब मुझे काम करने के लिए अनुमति दी है, स्थायी रूप से जो अब कर रहे हैं रोग मुक्त पुनर्वास केंद्र में रहने वाले 1,500 से अधिक लोगों की भावनाओं गूंज.

पिछले 15 वर्षों के लिए, जेजे अस्पताल और Icare फाउंडेशन, मुंबई स्थित एक गैर सरकारी संगठन (एनजीओ) से समन्वयकों से डॉक्टरों को राज्य के चंद्रपुर जिले में किया गया है Anandwan का दौरा करने के लिए वहाँ रहने वाले लोगों की आंख से संबंधित समस्याओं का इलाज.

इस साल 10,000 से अधिक निवासियों और आदिवासियों के आसपास के क्षेत्रों से आंख जांच शिविर में भाग लिया है, और उनमें से 1701 दृष्टि से संबंधित समस्याओं से सामना करना पड़ा वे के लिए ऑपरेशन किया गया.

"भीड़ हर साल बढ़ती रहती है. अधिकांश शिविरों में उपस्थित लोगों को आदिवासियों, अक्षम लोगों और मजदूर हैं. बाबा आम्टे के पुत्र डॉ. विकास आम्टे ने कहा कि मरीजों को नागपुर, गढ़चिरौली और चंद्रपुर सहित विभिन्न जिलों से आते हैं, उनका कहना है कि ज्यादातर लोगों को उनकी दृष्टि से संबंधित समस्याओं के लिए उपचार वे प्राप्त से संतुष्ट हैं और कि डॉ. Lahane और Icare फाउंडेशन टीम के समर्पण बेमिसाल है.

डॉ. टी.पी. Lahane, Byculla में जेजे अस्पताल के डीन, जो पिछले 15 वर्षों के लिए किया गया है जगह पर जाकर, ने कहा, "मोतियाबिंद सर्जरी एक कुष्ठ रोगियों के लिए थोड़ा जटिल है. इसका कारण यह है के बाद आपरेशन की देखभाल बहुत महत्वपूर्ण है. हम कम से कम 40 दिनों के लिए आराम करने के लिए रोगियों को सलाह. इस साल, हम अपने सहयोगी डॉ. रागिनी पारिख और टीम में दूसरों की मदद के साथ +१७०१ रोगियों पर संचालित है. "

सर्जरी और अनुवर्ती उपचार के बाद रोगियों को चश्मे के एक मुक्त जोड़ी के साथ प्रदान की जाती हैं, डॉ. वी.जी. पोल, Maharogi सेवा बाबा आम्टे द्वारा स्थापित समिति में चिकित्सा अधिकारी ने कहा.

उन्होंने कहा कि कुछ मरीजों को पिछले चार वर्षों के लिए किया गया था द्विपक्षीय मोतियाबिंद से पीड़ित है, और मुश्किल से देख सकता था, लेकिन अब वे सर्जरी के बाद उनकी दृष्टि के साथ बहुत खुश हैं.
 विकास कामांना गती दया – खासदार हंसराज अहिर

विकास कामांना गती दया – खासदार हंसराज अहिर


 चंद्रपूर - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांना गती दया अशा सूचना खासदार हंसराज अहिर यांनी दिल्या. ते जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय दक्षता व संनियत्रण समितीच्या सभेत बोलत होते.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुमरे, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, सर्व सभापती, समिती सदस्य व प्रकल्प अधिकारी अंकुश केदार यावेळी उपस्थित होते.
      बैठकीच्या सुरुवातीला मागील सभेच्या इतिवृत्तास मंजूरी देण्यात आली.  यासभेत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, संपूर्ण ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, भुमिअभिलेख्यांचे संगणीकरण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे मार्फत राबविण्यात येणा-या केंद्र पुरस्कृत योजना, राष्ट्रीय ग्रामीण जिवनन्नोती अभियान, इंदिरा आवास योजना व मागास क्षेत्र आमदार निधी कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. 
      पंचायत समिती मुल अंतर्गत टेकडी उश्राळा व पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत सिंगडझरी येथील पंधा-याचे काम निकृष्ठ झाल्याचा प्रश्न सदस्यांनी मागील बैठकीत मांडला होता. त्याच्या अनुपालन अहवालावर निर्णय देतांना अध्यक्षांनी त्रि सदस्यीय चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दिले. त्या सोबतच मुल तालुक्यात प्रादेशिक नळ योजने अंतर्गत टेकाडी प्राधिकरण योजने अंतर्गत 19 गावांच्या पाणी पुरवठयाबाबत निर्णय देतांना खासदार अहिर यांनी सर्वांनी पाणी मिळेल असे नियोजन करा अशा सुचना पाणी पुरवठा विभागाला दिल्या.
      यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा आढावा घेतांना खासदार म्हणाले की, मागेल त्यांना काम देण्याचे शासनाचे धोरण असून त्यानुसार जिल्हयात कार्यवाही करुन जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल याचे नियोजन करा.
      वीज बिल न भरल्यामुळे बंद पडलेल्या नळ योजना विषयी बोलतांना खासदार म्हणाले की, अशा योजनांची यादी विज मंडळाकडून मागवून घ्यावी व जिल्हा परिषदेच्या निधीतून ते अदा करता येतील का याबाबत तात्काळ माहिती सादर करावी जेणे करुन ऐन उन्हाळयाच्या दिवसात नागरीकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही. इंदिरा आवास योजनेची सर्व घरकुल मार्च 2013 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधीतांना दिल्या. बोरवेल वरील सौर दिवे जास्तीत जास्त प्रमाणात घेण्याबाबत त्यांनी सांगीतले. 
श्रमिक एल्गारचे तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन

श्रमिक एल्गारचे तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन


घोडेवाही येथील स्वस्त धान्य दुकानदाराला
 हटवण्याचे मागणीसह उपायुक्तास कार्ड परत

मौजा घोडेवाही येथील वादग्रस्त स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी घोडेवाही येथील कार्डधारकांनी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात तहसिल कार्यालय सावली येथे ठिय्या आंदोलन करून उपायुक्त यांना कार्ड परत केले.
सावली तालुक्यातील मौजा घोडेवाही येथील कार्डधारक रास्तभाव दुकानदार उत्तम निमगडे याचे मनमानी कारभाराविरूघ्द गेल्या 5-6 वर्शापासुन तक्रारी करीत आहेत. अवैद्यरित्या मालाची विक्री करतांना रंगेहात पकडले, तिनदा ग्रामसभेत सदर दुकानदारला हटविण्याबात ठराव घेण्यात आला, जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी सदर दुकानदाराचा परवाना रद्दही केला असतांना दुकानदाराचे अपील अर्जावरून उपायुक्त रमेश मावसकर (पुरवठा) नागपूर यांनी उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याचे कारण देऊन पुन्हा निमगडे यालाच दुकान पुर्ववत दिले. परंतु सदर दुकानदाराला 15 एकर शेती, थ्रेशर मशीन, टॅªक्टर, स्लॅपचे घर असल्यामुळे या आदेशाविरूध्द गावात राष निर्माण होऊन कार्डधारकांनी तहसिल कार्यालयातच ठिय्या मांडला व 150 राशन कार्ड उपायुक्त नागपूर यांना तहसिलदारचे मार्फतीने परत केले. 
कार्यालयातच ठिय्या मांडुन येथुन हटणार नाही अषी भुमिका घेतल्याने ही माहीती जिल्हा पुरवठा अधिकारी यांना नायब तहसिलदार यांनी दुरध्वनीव्दारे दिल्यानंतर चैकशी करण्याचे निर्देश देण्यात आले यामुळे लगेच नायब तहसिलदार सेलोकर यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री. अलोने यांचेसह घोडेवाही येथे जाऊन 40 कार्डधारकांची चैकशी केली असता सर्वच कार्डधारकांनी सदर दुकानदार मनमानी करीत असल्याने दुकान देऊ नये अशी भुमीका मांडली.
आंदोलनात श्रमिक एल्गारचे महासचिव विजय कोरेवार, डाॅ.कल्याणकुमार, विजय सिध्दावार, सरपंच सत्यवान दिवटे, तमुस अध्यक्ष संजय दुधे, भास्कर आभारे, अनिल मडावी व शेकडो महीला पुरूष सहभागी होते.
एड्स: शुन्य गाठायचा आहे

एड्स: शुन्य गाठायचा आहे


 जिल्हाधिकारी विजय वाघमारे
चंद्रपूर दि.23 एड्स या भयंकर रोगापासून चंद्रपूर जिल्हयाला मुक्त करण्यासाठी सर्व उपाययोजना आखण्यात येणार असून एड्सबाबत शुन्य गाठायचा आहे, असे मत जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व संनियंत्रण समितीच्या बैठकीत व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद सोनोने , मनपा उपायुक्त देवतळे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
     जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना आखल्यामुळे चंद्रपूर जिल्हयात गेल्या चार वर्षात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ती शुन्य व्हायला पाहिजे असेही वाघमारे म्हणाले. औद्यागिक वसाहतीत स्थलांतरीत कामगार मोठया प्रमाणात आहेत अशा ठिकाणी तपासणी मोहिम राबविण्यात येते. मात्र काहीवेळा स्थलांतरीत कामगारांचे समुपदेशन करण्यासाठी उद्योग समुहाकडून सहकार्य मिळत नसल्याचे स्वयंसेवी संस्थांनी सांगितले. यावर उद्योग समुहांना पत्र पाठविण्याचे बैठकीत ठरले.
     एचआयव्ही बाधितांना शासकीय योजनांचा लाभ देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आधार कार्ड व रेशन कार्डसाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सुचना वाघमारे यांनी केल्या.
     एचआयव्ही बाधितांसाठी सर्व शासकीय रुग्णालयात समूपदेशन सेवा देण्यात येत असून उपकेंद्रस्तरावरही चाचणी सेवा पुरविण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. अति जोखमीचे गट देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, ट्रक चालक व स्थलांतरीत कामगार यांचेकरीता विशेष हस्तक्षेप लक्ष्यगट स्थापन करण्यात आल्याचे ते म्हणाले. ग्रामसभेमध्ये हा विषय ठेवावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. खाजगी रुग्णालयात आयसीटीसी केंद्र स्थापन करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

Tuesday, January 22, 2013

 आरोपपत्र दाखल न केल्याप्रकरणी तपास अधिकारी निलंबित

आरोपपत्र दाखल न केल्याप्रकरणी तपास अधिकारी निलंबित

प्रहारच्या पत्रपरिषदेनंतर पोलिस अधीक्षकांनी घेतली दखल

चंद्रपूर : साडेचार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही दुर्गापूर पोलिसांनी कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल न केल्याने आरोपी जा मिनावर सुटला.  आरोपीला  मदत करण्यासाठी तपास अधिकाèयांनी दोषारोपपत्र दाखल केले नाही, असा आरोप पीडित  मुलीच्या कुटुंबीयांकडून होत आहे. दुर्गापूर पोलिसांचा हा प्रकार पोलिस  महासंचालकांस मोर गेल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. दरम्यान, याप्रकरणी प्रहार संघटनेने पत्रपरिषद घेऊन  माहिती दिल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी दखल घेऊन आरोपपत्र दाखल न केल्याप्रकरणी तपास अधिकारी सोलापूरे यांना निलंबित केले.
दुर्गापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाèया किटाळी येथे २१ सप्टेंबर २०१२ रोजी साडेचार वर्षांच्या अल्पवयीन  मुलीवर घराशेजारील सुखदेव तातोबा साव (वय ५२) याने अत्याचार केला. जिल्हा सा मान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालावरून दुर्गापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. जी. सोलापुरे आणि दुर्गापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी डी. डब्ल्यू. भगत हे करीत होते. आरोपीला शिक्षा होण्यासाठी पोलिसांना ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे अपेक्षित होते.  मात्र, या कालावधीत पोलिसांनी हयगय केली. त्या मुळे आरोपीच्या वकिलाने जा मीन अर्ज न्यायालयात सादर केला. त्यावर न्यायाधीश ग. भो. यादव यांनी सुनावणी दिली. त्यात पोलिसांनी ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र सादर न केल्याने आरोपीला जा मीन देत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोपीविरुद्ध खटला चालविताना पोलिसांनी साक्षीदारांच्या बाजू ऐकून घेतलेल्या नाहीत. शिवाय आरोपीस  मदत करण्यासाठीच तीन  महिन्यांचा कालावधी लोटू दिला, असा आरोप पीडित  मुलीच्या कुटुंबीयांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची  माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देश मुख यांनी नागपूर येथील विशेष पोलिस  महासंचालक राजेंदर qसग यांना प्रत्यक्ष भेटून दिली. यावेळी हा प्रकार ऐकून  महासंचालकही चकित झाले. विनयभंग qकवा बलात्काराच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी कठोर कायदे होत असताना पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल करण्यात दाखविलेली दिरंगाई म्हणजे असा माजिक कृत्यांना खतपाणी घालण्याचा प्रकार झालेला आहे. दुर्गापूर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी जाणीवपूर्वक दोषारोपपत्र दाखल न करून आरोपीस  मदत केल्याचा आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देश मुख यांनी केला आहे. 

Monday, January 21, 2013

दुकाने जाळली ...लाखोंचे नुकसान

दुकाने जाळली ...लाखोंचे नुकसान


दुकाने जाळली ...लाखोंचे नुकसान
 गोंडपिपरी:- ग्रामपंचायतीलगत असलेल्या दुकानांना आज पहाटेच्या सुमारास आग लागली.  दोन दुकाने जळून खाक झालीत.आगीत पाच लाख रूपयांचा माल जळाला.हि आग लागली नसून लावण्यात आल्यांचे दुकानदारंानी म्हटले आहे. आगीने कर्ज घेउन दुकान थाटणा-या दुकानदारांवर मोठेच संकट ओढवले आहे.
 गोंडपिपरी ग्रामपंचायत लगत संजय सातपुते यांचे कुषन वर्क चे दुकान आहे.गेल्या चार वर्षापासून ते हे दुकान चालवितात.आपल्या कुषन च्या व्यवसायाला जोड म्हणून त्यांनी पंधरा दिवसापूर्वी फर्निचर व आलमारी चा व्यवसायाला सुरवात केली. यासाठी बॅक आॅफ इंडिया गोंडपिंपरी व इतर बॅकातून त्यांनी  दोन लाख रूपयाचे कर्ज घेतले.सोबतच मित्रमंडळीकडूनही एक लाखाची मदत घेेतली. इतर दुकानापेक्षा स्वस्त्यात माल विकत असल्याने अल्पावधीतच हे दुकान चालायला लागले.ग्रामपंचायतींच्या जागेवर हे दुकान आहे. यामुळे या दुकानात विघूत पुरवठा नव्हता. कुषनचे सामान आत तर फर्निचर व आलमारी  चे साहित्य ते बाहेर ठेवीत होते. अषातच आज पहाटे च्या सुमारास त्यांना आपल्या दुकानातून धूराचा वास आला. काही कळायच्या आतच दुकानाला भिषन आग लागली. अषात सातपूते यांनी दुकानासमोरील षेजा-याला आवाज दिला. त्यांनी  तातडीने या आगीला विजविण्यासाठी षर्थीचे प्रयत्न केले.यांनंतर सकाळच्या सुमारास अग्नीषामक दलाची गाडी दाखल झाली. त्यांनी उरलीसुरली आग विझविली. मात्र यात संजय सातपूते यांच्या दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.लगतच्या पेंटर महेष दूर्गे याचेही दूकान पुर्णतःजळाले.तर जवळ असलेल्या संजय येरोजवार यांच्या सायकल दुकानालाही या आगीचा काहीसा फटका बसला.घटनेची माहिती पोलीसांना,तालुका प्रषासनाला देण्यात आली. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
रास्त धान्य दुकानाबाबत उपआयुक्ताचे आदेशाविरूध्द घोडेवाहीत रोष -

रास्त धान्य दुकानाबाबत उपआयुक्ताचे आदेशाविरूध्द घोडेवाहीत रोष -


श्रमिक एल्गारचा आंदोलनाचा इशारा

सावली तालुक्यातील घोडेवाही येथील स्वस्त धान्य दुकान भ्रष्टाचारी व्यक्तीलाच पुर्ववत उपायुक्ताचे आदेशाने मिळाल्यामुळे घोडेवाही येथे जनतेमध्ये प्रशासनाविरूध्द रोष निर्माण झालेला असुन श्रमिक एल्गारच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
घोडेवाही येथील स्वस्त धान्य दुकान श्री. उत्तम कचरू निमगडे यांचेकडे 1992 पासुन होते. कार्डधारकांना कमी धान्य देणे, कार्डधारकांसोबत उध्दट वागणे, धान्य संपल्याचे सांगुन वापस पाठविणे, असा नेहमीचा त्रास होत असल्याने गावकÚयांचे तक्रारीवरून 2006 मध्ये 6 महीण्याकरीता पुरवठा अधिकारी यांचे आदेशानुसार तात्पुरता रद्द करण्यात आले होते पुन्हा त्याच दुकानदाराला वाटप करण्याचे आदेश दिल होतेे. आणखी जिल्हा पुरवठा अधिरी यांचे चैकशीत अनियमीतता आढळल्याने दि. 29.11.11 ला परवाना निलंबित करण्यात आले आणि पुन्हा त्याच दुकानदाराला दुकान चालविण्याचा आदेश देण्यात आला. पुर्वीप्रमाणेच कार्डधारकांना दुकानदाराकडुन त्रास होत असल्याने 2 आक्टोबर 2011 व 3 मे 2011 चे ग्रामसभेत सदर दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा ठराव पारीत केलेला होता. त्या ठरावानुसार तहसिलदार सावली यांनी प्रत्यक्षात चैकशी केली व चैकशीत धान्य वाटपात अनियमितता आढळल्याने हा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांचेकडे सादर केला. याअहवालावरून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दि.13.7.12 चे आदेशानुसार परवाना रद्द केला. पुरवठा अधिकारी यांचे आदेशाविरूध्द दुकानदार निमगडे यांनी उपआयुक्त पुरवठा यांचेकडे अपिल दाखल केली. उपायुक्त (पुरवठा) रमेश मावसकर यांनी दुकानदाराची सुनावणी घेऊन दुकानदाराकडे उदरनिर्वाहाचे साधन नसल्याचा दाखला देत पुरवठा अधिकाÚयाचा दि.13.7.12 चा आदेश रद्द करून हयाच दुकानदाराला पुर्ववत दुकान देण्याचे आदेश दिले.
सदर आदेशामुळे घोडेवाहीत असंतोष निर्माण झालेला असुन ग्रामसभेच्या ठरावाला न जुमानता व ग्रामपंचायतीला बाजु मांडण्याची संधी न देता एकतर्फी आदेश पारीत केलेला आहे व सदर दुकानदाराकडे 15-16 एकर जमीन,, ट्रक्टर, स्लपचे घर असतांना उदरनिर्वाहाचे साधन नसल्याचे आदेशात नमुद केले आहे. यामुळे या आदेशाविरूध्द घोडेवाहीत रोष असुन श्रमिक एल्गारच्या माध्यमातुन आंदोलन करण्याचा इशारा गावकÚयांनी दिला आहे.

Sunday, January 20, 2013

गडचिरोलीत चकमक, सहा नक्षलवादी ठार

गडचिरोलीत चकमक, सहा नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी झालेल्या चकमकीमध्ये सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी रात्री झालेल्या चकमकीमध्ये सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
आहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरातील गोविंदगाव येथे नक्षवलादी येणार असल्याची माहिती आहेरी पोलिसांना मिळाली. शनिवारी रात्री पोलिस अतिरिक्त पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आणि नक्षलवाद्यांच्यात चकमक झाली. यात सहा नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शंकर ऊर्फ मुलेश्वर जक्तु लकडा(४३),विनोद ऊर्फ चंद्रय्या(३०), मोहन ऊर्फ कोवासे (२५), गिता उसेंडी(२८), झुरू मट्टामी(२८) आणि सुनीता कोडापे(१८) अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.
चकमकीनंतर शोध मोहिमेत पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी सापडला. यामध्ये दोन एस.एल.आर रायफल, दोन .३०३ रायफल व एक आठ एम एम सिंगल बॅरल बंदुक व काही जिवंत काडतुसे आणि इतर नक्षल साहित्याचा समावेश आहे.  ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह अहेरी येथेली पोलिस मुख्यालयात आणण्यात आले आहेत.
क्रांतिभूमिचा विकास पारतंत्र्यात

क्रांतिभूमिचा विकास पारतंत्र्यात


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी जाज्वल्य इतिहासाची साक्ष व अलौकिक कामगिरीची मुहूर्तमेढ रोवून स्वातंत्र्याचा प्रथम उपभोग घेणारे चिमूर शहर. भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी निधड्या छातीवर गोळ्या झेलणारा १६ वर्षीय शहीद बालाजी रायपूरकरची शहीदभूमी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आचार्य भन्साळी, विनोबा भावे आदी थोर महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून नवपिढीला प्रेरणा देणारे स्वातंत्र्याचे स्ङ्कुqल्लग पेटविणाèया चिमूर क्रांतिभूमीत अनेक मान्यवर, अनेक अधिकारी व पदाधिकारी होऊन गेलेत. पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मात्र, विकासकामे पूर्ण झालेली नाहीत.
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते आजतागायत या भूमीची उपेक्षाच झाली आहे.

तलावाचे अस्तित्व धोक्यात                          
शहराच्या उत्तर भागाला श्रीहरी बालाजी देवस्थान संस्थानाच्या मालकीच्या ७५ एकर जागेत पुरातन तलाव आहे. त्यातील ४० एकर जागा क्रीडासंकुलाकरिता जिल्हा प्रशासनाने अधिग्रहण करून त्यावर स्टेडिअम, न्यायालयीन इमारत, अनुसूचित जाती निवासी शाळा आदी बांधकाम केले. हे बांधकाम तलावाच्या पाणी येण्याच्या भागाकडून झाले आहे. चिमूर शहरातील पाण्याची पातळी नेहमीच वर राहात होती. परंतु, आता वाढते अतिक्रमण व इमारत बांधकामामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होत आहे. सध्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.
तलावाजवळून वरोरा-चिमूर हा महामार्ग जातो. तलावात प्लास्टिक पिशव्या, जोडे, चप्पल, टायरट्यूब व गावातील घनकचरा टाकण्यात येत असल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष नाही. या तलावात गावातील लोक कपडे धुणे व मच्छीमारी आदी कामे करायचे. पण, आता पाणीच नसल्याने तेसुद्धा बंद झाले आहे.
                          
क्रीडासंकुल अपूर्णावस्थेत
चिमूर येथे वीर स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरqसहराव यांनी चिमूर येथे राष्ट्रीय क्रीडासंकुलाची घोषणा करून ५० लाखांचा धनादेश जिल्हाधिकाèयांना दिला. त्यानंतर पाच ते सहा वर्षांनी येथे तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांनी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या गौरव समारंभानंतर क्रीडासंकुलाचे भूमिपूजन केले. आज हे दोन्ही महामहिम हयात नाहीत. मात्र, १९९४ पासून क्रीडासंकुलाच्या बांधकामाचा दगड पुढे सरकलेला नाही. आतापर्यंत बांधकामासाठी दोन कोटींचा खर्च झाला. बॅडqमटन हॉल, व्ही. आय. पी. पॅव्हेलियन, मैदानाचे सौंदर्यीकरण व नाली गटार बांधकाम, प्रेक्षक गॅलरी आदी कामे पूर्ण झालीत. मात्र, उर्वरित कामे अपूर्णावस्थेत आहेत. अनेक साहित्य व सामानांची मोडतोड व चोरी होत आहे. यांच्या देखभालीकरिता कोणतीही व्यवस्था येथे नाही. हे क्रीडासंकुल जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अखत्यारित येते. परंतु, एकही जबाबदार कर्मचारी या क्रीडासंकुलाकडे लक्ष देत नाही.
                          
चिमूर आगारात भंगार गाड्या
एस. टी. बससेवा ही ग्रामीण भागासह चिमूर शहरातील नागरिकांसाठी दळणवळणाची महत्त्वाची सोय आहे. चिमूर आगारात मागील काही वर्षांपासून आगार व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकाची दुरवस्था होत आहे. बसस्थानकात वीजदिव्यांची व्यवस्था, पंखे, दूरचित्रवाणी व रंगरंगोटी नाही. एसटी चालक-वाहकांच्या मेहनतीने व नागरिकांच्या सहकार्याने चिमूर आगार नफ्यात आघाडीवर आहे. परंतु, नागरिकांच्या सुरक्षित परिवहनाची हमी घेणाèया बसगाड्या भंगार अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी बसगाड्यांच्या तुटक्या ङ्कुटक्या गाड्यांत प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. परंतु, एसटीचे वरिष्ठ अधिकारी व आगार व्यवस्थापकाच्या दुर्लक्षामुळे आगाराच्या दोन्ही मुख्य द्वारावर अतिक्रमण वाढले आहे. याकडे दुर्लक्ष होत असले, तरी प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन बसस्थानकात प्रवेश करावा लागतो. अनेक विद्यार्थी आपली शाळा संपल्यानंतर बसची तासन्तास वाट पाहात असतात. मात्र, त्यांना उशिरापर्यंत स्वतःच्या गावाकडे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध होत नाही.
                          
अतिक्रमणाचा विळखा
चिमूर शहरातील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ झाली आहे. वरोरा-चिमूर-कान्पा मार्गावरून दोन मोठी वाहने जाण्याइतका रस्ता असूनही मोठी वाहने नीट जाऊ शकत नाहीत. तसेच चिमुरातील मुख्य बाजारपेठेत पायदळ ये-जा करणाèया नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मासळ चौक ते नवीन बसस्थानकाकडे जाणाèया मुख्य रस्त्यावर मोठमोठी व्यापारी दुकाने लागल्याने पार्किंगसाठी जागा नाही. दुचाकी वाहनचालक आपली वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. त्यामुळे मोठे वाहन जाण्यास अडचण निर्माण होत आहे. चिमूर शहरातील मुख्य बाजार मार्केट मार्गावर बड्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून रस्ता गिळंकृत केला आहे. चिमुरातील जवळपास सर्वच मुख्य मार्गावर अतिक्रमण करून रस्त्यावर दुकाने थाटल्याने कधी- कधी रिक्षासुद्धा जाणे कठीण होत आहे.
                          
उच्चशिक्षणाची सोय नाही
चिमूर हे विधानसभा आणि लोकसभेचे क्षेत्र असले, तरी येथे उच्चशिक्षणाची कोणतीही सोय नाही. तालुक्यातील विद्याथ्र्यांना उच्चशिक्षणासाठी बाहेर जावे लागते. येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, आय. टी. आय. आहे. मात्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय पदविका, कृषी पदविका आदी अभ्यासक्रमांचे शिक्षण नाही.
                          
आरोग्यसेवेचा खेळखंडोबा
ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षांपासून प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र, नर्स, वॉर्डबॉय, डॉक्टर यासह अनेक पदे रिक्त असल्याने गरीब रुग्णांना वेळेवर उपचार व औषध मिळत नाही. औषधांचा अपुरा पुरवठा, अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य असून, निवाèयाची व्यवस्था नाही. प्रभारी अधिकाèयाकडे अनेक वर्षांपासून प्रभार असल्याने ग्रामीण रुग्णालयाचे बेहाल झाले आहे. रुग्णालयाच्या परिसरातच १०० पलंगांचे श्रेणीवर्धक करून उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने भविष्यात येथे चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील. मात्र, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाèयांची पदे भरण्याची गरज आहे. येथील रुग्णांना नागपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, चंद्रपूर येथे उपचार करावा लागतो. येथील ग्रामीण रुग्णालयात नेहमीच औषधांचा तुटवडा, रुग्णांना तपासणारी यंत्रे, एक्स- रे मशीन नेहमीच बंदावस्थेत असतात. त्यामुळे रुग्णांना मोठ्या रुग्णालयात रेङ्कर करावे लागते.
                          
रस्त्यांवर खड्डे
शहरातील वरोरा-चिमूर-कान्पा मुख्य मार्ग उखडलेला असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे डबक्याचे स्वरूप येते. नेहरू चौकात पावसाळ्यात पाणी साचलेले दिसून येते. मासळ चौक ते नवीन बसस्थानक मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची गैरसोय होते.
                          
आठवडी बाजार रस्त्यावर
चिमूर ग्रामपंचायतीचा आठवडी बाजार वरोरा-चिमूर-कान्पा या महामार्गावरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर भरतो. मात्र, भाजी, ङ्कळविक्रेते, जनरल, हॉटेल, स्टील भांडे व इतर दुकाने, रेडिमेड, मनेरिया, चहाटपरी, पानठेले इत्यादी दुकाने रस्त्यावरच थाटली जातात. त्यामुळे महामार्गावरून धावणारे एसटी, ट्रक, ट्रॅक्स कमांडर आदी वाहनांची गैरसोय होते. तलावाजवळील पाच एकर जागा बाजारासाठी नियोजित केली असली, तरी तेथे बाजार सुरू करण्यासाठी कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही.
                          
घाणीचे साम्राज्य
येथे भरत असलेल्या शुक्रवारी आठवडी बाजारातील भाजीपाला, केरकचरा व इतर टाकाऊ वस्तू रस्त्यावरच टाकण्यात येतात. त्यामुळे कुजून-सडून त्यापासून सुटणारी दुर्गंधी ये-जा करणाèया नागरिकांना सहन करावी लागते. चावडीवर गावातील घनकचरा, कापलेले केस, घरातील कचरा तसेच इतर खराब झालेले साहित्य टाकण्यात येते. त्याचाही ङ्कटका नागरिकांना बसत आहे. चिमूर ग्रामपंचायतीने मागील काही दिवसांपासून नाल्यांचा उपसा न केल्याने त्यापासून दुर्गंधी सुटत आहे.
                           
महागणदारीयुक्तङ्क शहर
महाराष्ट्र शासनाकडून हागणदारीमुक्त गाव संकल्पना लाखो रुपये खर्च करून राबविण्यात आली. मात्र, चिमूर शहरात ही योजना ङ्कोल ठरली आहे. सार्वजनिक शौचालय आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन देखभाल करीत नसल्याने शौचालयाची दुरवस्था झाली आहे. परिणामी नागरिकांना उघड्यावरच शौचास जावे लागते. शहरातील चावडी, क्रीडासंकुलावर दुतङ्र्का घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांची आठवण म्हणून मुख्य मार्गावर उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकावरही घाण केली जात आहे.
                          
चिमूर रेल्वेसेवेपासून वंचित
चिमूरपासून अवघ्या ५० किमी अंतरावर म्हणजे वरोरा व नागभीड येथे रेल्वेसेवा आहे. मात्र, चिमूर हे इतिहासकालीन शहर असूनही रेल्वेसेवा उपलब्ध नाही. चिमूर तालुक्यात मुरपार येथे वेकोलिची कोळसा खाण असून, तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांच्या पुढाकाराने त्यावेळी वरोरा-चिमूर-उमरेड व वरोरा-चिमूर-कान्पा-नागभीड या दोन्ही भागाकडील रेल्वेच्या लाइनसंदर्भात सर्वे करण्यात आला होता. परंतु, आज १५ ते २० वर्षे लोटूनही रेल्वेमार्गाविषयी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.
                           
चिमूरकर एटीएम सुविधेपासून वंचित
चिमूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे मोठी मुख्य बाजारपेठ आहे. चिमूर शहरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध झाली. परंतु, येथे मर्यादित खातेदारांचे व्यवहार आहेत. चिमुरात बँक ऑङ्क महाराष्ट्र, स्टेट बँक ऑङ्क इंडिया या दोन राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा असूनसुद्धा या बँकेद्वारे अद्यापही एटीएम सुविधा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे येथील व्यवहार करणाèया ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पैसे काढण्याकरिता गेलेल्या ग्राहकांना रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे चिमूरकर एटीएमच्या प्रतीक्षेत आहेत.
                          
मोकाट जनावरांचा हैदोस
येथे ठिकठिकाणी मोकाट जनावरे मुक्तसंचार करताना दिसतात. मोकाट जनावरे व डुकरे वाहतुकीस अडसर बनत असल्याने अपघात व रोगराई होत आहे. येथील वरोरा-चिमूर-कान्पा या मुख्य मार्गावर अनेकांना प्राण गमवावा लागला आहे.
                           
रस्त्यावरच मांसविक्री
आठवडी बाजाराच्या दिवशी मटण मार्केट ऐन महामार्गावरच भरतो. हे विक्रेते टाकाऊ पदार्थ रस्त्यावरच ङ्केकतात. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना नाकावर रुमाल घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
                           
अवैध वाहतूक
पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळे अवैध वाहतूक ङ्कोङ्कावत असल्याचे चित्र पहावयास मिळते. नवीन बसस्थानक, जुना बसस्थानक, चावडी चौक, qपपळनेरी चौकातही अनेक ट्रॅक्स, कमांडर, जीप, ऑटो अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करीत असल्याने अपघातात वाढ होत आहे. याकडे स्थानिक पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास अनेक मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागू शकते. यापूर्वीही अवैध वाहतुकीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. चिमूर शहरात सद्य:स्थितीत मोठमोठे अपघात होऊन अनेक कुटुंबांतील व्यक्तींना आपले जीव गमवावे लागले.
                           
दारूविक्रीला उधाण
चिमूर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रथम स्वातंत्र्य मिळविणारे गाव असले, तरी येथे दारूविक्रीला उधाण आले आहे. १५ हजार २७१ लोकसंख्या असलेल्या ७३ टक्के साक्षर गावात दारूची आठ दुकाने आहेत. अनेक ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही. गल्लीबोळात अवैधरीत्या मिळणारी देशी, गावठी मोहाची दारू, गल्लोगल्ली परवानाधारकांप्रमाणे लावलेली दुकाने तसेच मनोरंजन क्लबच्या नावावर प्ले गेम, व्हिडिओ गेम, तीन पानी यासारखा जुगार येथे चालतो.
चिमूर शहरात सरकारी परवानाप्राप्त देशी दारूचे एकही अधिकृत दुकान नसले, तरी शहरातील वाल्मीक चौक, आंबेडकर चौक, चावडी मोहल्ला, जुना बसस्थानक, नवीन बसस्थानक परिसरात अवैधरीत्या खुलेआम देशी दारूविक्री होत आहे. केसलापूर, कवडशी येथील परिसरात गावठी मोहाची दारू खुलेआम विकली जाते. अनेक मद्यपी रस्ते, गल्लीत पडून राहतात. शहरातील अनेक भागांत दारू सहज उपलब्ध होत आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. गरीब कुटुंबातील महिलांसह शाळकरी मुलेही या विळख्यात सापडली आहेत. शहरात नेरी, भिसी, खडसंगी येथून अवैधरीत्या दारूचा पुरवठा होत आहे.
                           
पिण्याच्या पाण्याची समस्या
चिमूर शहरात पाण्याच्या तीन टाक्या आहेत. एक टाकी मोडकळीस आली असून, पाणीपुरवठा विभागाने निरलेखनाचा कारवाई अहवाल ग्रामपंचायतीला सादर केला. एक नवीन टाकी निर्माणाधीन आहे. चारगाव धरणापासून पाणी आणून चिमूरकरांची तहान भागविण्यासाठी नऊ कोटी रुपयांची योजना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अद्यापही पाइपलाइन व टाकीचे काम पूर्ण झालेले नाही. जुन्या तीन टाक्यांपैकी हजारी मोहल्ला परिसरातील टाकी सदोष पाइनलाइनमुळे निकामी झाली आहे. नागरिकांना थेट पंपाद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याने त्या पाण्यात ब्लिqचग व स्वच्छतेची शाश्वती नाही. इंदिरानगर ठक्कर वॉर्ड, नेहरू वॉर्ड, गुरुदेव वॉर्ड यासह अनेक भागांत आजही पाणी व्यवस्थित नाही. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून संपूर्ण चिमूरला एकच वेळा पाणी देण्यात येत आहे. अनेक भागात नळाद्वारे पाणी येऊ शकत नसल्याने जिथे मुबलक पाणी आहे, त्यांच्या घरून महिनेवारी पद्धतीने पाणी विकत घ्यावे लागते.
                          
शहीद हुतात्मा स्मारकाकडे दुर्लक्ष
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणारे चिमूर शहर म्हणून इतिहासात नोंद आहे. मात्र, येथील शासकीय हुतात्मा स्मारक दुरवस्थेत आहे. विद्युतव्यवस्था नसल्याने रात्रीला अंधार असतो. रंगरंगोटी नाही, बागबगीचा नाही. हुतात्मा स्मारकाची देखरेख एका खासगी संस्थेला देण्यात आली असून, स्मारक परिसरात लग्नसोहळे, मेळावे, कार्यक्रम घेतले जातात.
                           

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक कुटुंबांकडे दुर्लक्ष
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाèया शहीद स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या कुटुंबांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांची कुटुंबे व्यथित जीवन जगत आहेत. त्यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाने पाठ ङ्किरविल्याचे चित्र आहे.
                           
आमदारसाहेब चिमूरकरांच्या समस्येकडे लक्ष द्या...
राज्याचे माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांना मध्यंतरीच्या काळात लाल दिवा मिळाला. अत्यंत महत्त्वाचे जलसंपदा खाते प्राप्त झाले. परंतु, लाल दिव्याचा प्रकाश अद्याप चिमुरात पडलेला नाही. चिमूर ग्रामपंचायतीची सत्ता त्यांच्याकडेच आहे. येथे अनेक मोठे उद्योगधंदे उपलब्ध करून सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. चिमूर येथील मितेश भांगडिया हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. पण, शहराच्या विकासासाठी आतापर्यंत कोणताही निधी दिलेला नाही. दोन आमदार, एक खासदार असूनही चिमूर नगर परिषद, तसेच चिमूर जिल्हा होऊ शकले नाही. qसचन सुविधा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, शैक्षणिक  क्रीडा सुविधा, सामाजिक व सांस्कृतिक विकासाची गरज आहे.

खासदारांना पाहिलंत का?
गडचिरोली-चिमूर हे लोकसभा क्षेत्राचे खासदार मारोतराव कोवासे आहेत. मात्र, चिमूरच्या जनतेला त्यांना पाहण्याचा योग आलेला नाही. २००९ मध्ये ते निवडून गेले. मात्र, आजवर त्यांचे कधीच दर्शन झाले नाही.
                           
चिमूर शहर दृष्टिक्षेप :-
ग्रामपंचायत स्थापना १९४२
लोकसंख्या १५२७१
स्त्री ७३९०
पुरुष ७८८१
वॉर्डाची संख्या ६
सदस्यसंख्या १७
पोलिस ठाणे १
ग्रामीण रुग्णालय १
महाविद्यालये ४
साक्षरता प्रमाण ७३%
हुतात्मा स्मारक १
शहीद स्मारक १
ग्रामपंचायत वाचनालय १
आठवडी बाजार-शुक्रवार
स्वातंत्र्यसंग्राम सैनिक २३
बसस्थानक १
पाळणाघर १

यांना समस्या सांगा :-
खासदार मारोतराव कोवासे ९४२२१५०७७२
आमदार मितेश भांगडिया ९४२२११०२३५
आमदार विजयभाऊ वडेट्टीवार ९६६५६९९९९९
प्रभारी सरपंच बाळकृष्ण ग. बोभाटे ९४२१७२०७६१
प्रभारी ग्रामविकास अधिकारी पी. डब्ल्यू. अल्लीवार ९४२०११२१४१
प्रभारी संवर्ग विकास अधिकारी लता साळवे ९८२२७१३७६८
तहसीलदार नीलेश काळे ९४२३६८७९१५
पोलिस निरीक्षक पंजाबराव मडावी ९४२१७१९४८८
पंचायत समिती सभापती विनोद चोखरे ९९२११६७०७२
उपसभापती अरुणाताई नन्नावरे ९७६३८९३७८७

माहिती संकलन :-गणपतराव खोबरे, तालुका बातमीदार, चिमूर, मो. ९४२१७२०७७४
 सुभाष शेषकर, शहर बातमीदार, चिमूर, मो. ९४२१७२०७५०