काव्यशिल्प Digital Media: मेळावा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मेळावा. Show all posts
Showing posts with label मेळावा. Show all posts

Monday, June 04, 2018

8 जूनला सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांचा मेळावा

8 जूनला सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांचा मेळावा

चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या विद्युत अभियंत्यांना कंत्राटदार व पर्यवेक्षक परवाना मिळवून देण्याकरीता 8 जून 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता विद्युत निरीक्षक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग परिसर नागपूर रोड चंद्रपूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा चंद्रपूर जिल्हयातील विद्युत अभियंत्यांनी या मेळाव्यास अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन विद्युत निरीक्षक विभाग चंद्रपूर यांनी केले आहे.


Sunday, June 03, 2018

४ जून रोजी चंद्रपूर येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा

४ जून रोजी चंद्रपूर येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा

Image may contain: 6 people, people smiling, textचंद्रपूर/प्रतिनिधी:
 भारत सरकारचे केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर राज्याचे, उर्जामंत्राी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार विद्यूत प्रल्पग्रस्त कृती समिती, चंद्रपूर च्या वतीने चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राशी निगडीत प्रकल्पग्रस्तांचा मेळावा दि. 4 जून 2018 रोजी सकाळी 10 वाजता डब्ल्यू.आर.सी. हाॅल, उर्जानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. 
या मेळाव्यास केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून या प्रसंगी जि.प.चे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते पूर्व पालकमंत्राी संजय देवतळे, भद्रावती पं.स.च्या सभापती विद्या कांबळे, भाजपा वरोरा विधानसभा प्रमुख विजय राऊत, भाजपा जिल्हा महामंत्राी राहुल सराफ, भाजपाचे भद्रावती तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, जि.प. सदस्य, मारोती गायकवाड, जि.प. सदस्य यशवंत वाघ, जि.प. सदस्या वनिता आसुटकर, जि.प. सदस्य रोशनी अनवर खान, भद्रावती पं.स. सदस्य महेश टोंगे, चंद्रपूर पं.स. सदस्य संजय जाधव, चंद्रपूर पं.स. सदस्य श्रीमती खेमा रायपुरे आदींची उपस्थिती राहणार आहे. 
प्रकल्पग्रस्तांच्या या मेळाव्यात प्रलंबित असलेल्या विविधांगी प्रश्नावर तसेच बाधीत गावाच्या विकासाकरिता सीएसआर निधीचा वापर महाऔष्णिक केंद्राच्या अधिकाऱ्यांशी विविध मुद्यांवर चर्चा तसेच विविध प्रश्न आणि समस्यांवर या मेळाव्याच्या माध्यमातून उहापोह होणार असल्याने सीएसटीपीएस प्रकल्पग्रस्त बाधीत गावातील सर्व सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रगत कुशल कामगार व नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यास बहुसंख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन सर्वश्री देवंेंद्र मालुसरे, अनिल सोमलकर, आनंद रामटेके, आशिष कोल्हे, धिरज डाहाकी, शंकर येरगुडे, ज्योती बोढाले, निशा डाहाकी, वर्षा येरगुडे, आतिश जुनघरे, प्रकाश चुधरी, मधुकर गोहणे, भाग्यश्री सोमलकर, प्रियंका रत्नपारखी, प्रमोद बोढाले, मनिषा चुधरी, आशिष राजुरकर, रोशन पिंपळकर, सुर्यभान येरगुडे, संदीप इखारे, आशिष गोहणे, अमोल येरगुडे, प्रफुल कातकर, प्रविण मोहितकर, प्रकाश झोमलकर, चेतन माहुलकर आदींनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकातुन आवाहन केले आहे.
                                               -------------------------------------------------------   
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


Tuesday, May 29, 2018

प्रकल्पग्रस्तांचा चंद्रपूर येथे 1 जून ला भव्य मेळावा

प्रकल्पग्रस्तांचा चंद्रपूर येथे 1 जून ला भव्य मेळावा

प्रकल्पग्रस्त साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 भारत सरकारचे केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर राज्याचे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार विद्यूत प्रकल्पग्रस्त कृती समिती, चंद्रपूर च्या वतीने चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राशी निगडीत प्रकल्पग्रस्तांचा मेळावा दि. 1 जून 2018 रोजी सकाळी 10 वाजता डब्ल्यू.आर.सी. हाॅल, उर्जानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. 
या मेळाव्यास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून या प्रसंगी जि.प.चे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते पूर्व पालकमंत्राी संजय देवतळे, भद्रावती पं.स.च्या सभापती विद्या कांबळे, भाजपा वरोरा विधानसभा प्रमुख विजय राऊत, भाजपा जिल्हा महामंत्राी राहुल सराफ, भाजपाचे भद्रावती तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, जि.प. सदस्य, मारोती गायकवाड, जि.प. सदस्य यशवंत वाघ, जि.प. सदस्या वनिता आसुटकर, जि.प. सदस्य रोशनी अनवर खान, भद्रावती पं.स. सदस्य महेश टोंगे, चंद्रपूर पं.स. सदस्य संजय जाधव, चंद्रपूर पं.स. सदस्य श्रीमती खेमा रायपुरे आदींची उपस्थिती राहणार आहे. 
प्रकल्पग्रस्तांच्या या मेळाव्यात प्रलंबित असलेल्या विविधांगी प्रश्नावर तसेच बाधीत गावाच्या विकासाकरिता सीएसआर निधीचा वापर महाऔष्णिक केंद्राच्या अधिकाÚयांशी विविध मुद्यांवर चर्चा तसेच विविध प्रश्न आणि समस्यांवर या मेळाव्याच्या माध्यमातून उहापोह होणार असल्याने सीएसटीपीएस प्रकल्पग्रस्त बाधीत गावातील सर्व सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रगत कुशल कामगार व नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यास बहुसंख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन सर्वश्री देवंेंद्र मालुसरे, अनिल सोमलकर, आनंद रामटेके, आशिष कोल्हे, धिरज डाहाकी, शंकर येरगुडे, ज्योती बोढाले, निशा डाहाकी, वर्षा येरगुडे, आतिश जुनघरे, प्रकाश चुधरी, मधुकर गोहणे, भाग्यश्री सोमलकर, प्रियंका रत्नपारखी, प्रमोद बोढाले, मनिषा चुधरी, आशिष राजुरकर, रोशन पिंपळकर, सुर्यभान येरगुडे, संदीप इखारे, आशिष गोहणे, अमोल येरगुडे, प्रफुल कातकर, प्रविण मोहितकर, प्रकाश झोमलकर, चेतन माहुलकर आदींनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकातुन आवाहन केले आहे.

Monday, January 15, 2018

चंद्रपुरात कृषी मेळावा व विभागीय जलसाक्षरता केंद्राचे भव्य आयोजन

चंद्रपुरात कृषी मेळावा व विभागीय जलसाक्षरता केंद्राचे भव्य आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:   
चंद्रपूर जिल्हयातील कृषि आधारीत अर्थव्यवस्थेला व एकूण शेती व्यवस्थेला जलव्यवस्थापन, कृषि व्यवस्थापन व बदलत्या परिस्थितीत शेतीमधील बदल स्विकारण्याबाबतचे विचार मंथन आज पासून चंद्रपूरच्या चांदा क्लबवर सुरु झाले आहे.राज्यातील वापरायोग्य पाण्याची उपलब्धता, वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग, अनियमित पर्जन्यमान यामुळे पाण्याच्या वापरावरील ताण वाढणार आहे, यासाठी जलजागृती आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्याला जलसाक्षर करण्यासाठी नियोजन करण्याची आखणी केली होती. नागपूर महसूल विभागात चंद्रपूरची विभागीय जलसाक्षरता केंद्रासाठी निवड करण्यात आली. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जलसाक्षरता कार्यशाळेचे व विभागीय जलसाक्षरता केंद्राचा शुभारंभ करण्यात आले.
                           याचवेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, महिला स्वंयस्वायत्ता समुहामार्फत कृषि प्रदर्शनी व वस्तु विक्री प्रदर्शनीलाही प्रारंभ झाला. 15 ते 19 जानेवारी या काळामध्ये ही प्रदर्शनी चालणार असून या ठिकाणी कृषि तंत्रज्ज्ञानातील नवनवीन अविष्कार बघायला मिळणार आहे. शेतीशी नाळ जुळली असणा-या प्रत्येक विद्यार्थ्याने, गृहीनीने व शेतक-यांने या चार दिवसांच्या कार्यक्रमात चांदा क्लब मैदानाला भेट दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये जिल्हयातील एकूण शंभर महिला बचत गट सहभागी होत आहे. 
                   या प्रदर्शनीमध्ये सहभागी गटांच्या माध्यमातून बाजाराच्या मागणीनुसार विविध गृहोपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचे, धने, शेवया, चटनी, रेडीमेड कपडे, खादीचे कपडे, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांब पोळी, पुरण पोळी, झुनका भाकर, मोहाची भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तू, टेबल क्लॉथ, मेंढीच्या केसापासून बनलेल्या गादया, उशा, घोंगडी, लाकडी शिल्प, टोपल्या, सुप-परडे, खराटा, झाडू, कंदील, शोपीस, हातसळीचे तांदुळ, सुहासीक तांदुळ, कापडी बॅग, मशरुम, टेराकोटा, गांडूळ खत, गोमुत्र अर्क, आयुर्वेदिक उत्पादने, तुरदाळ, उडीद, चणा, मुग, मटकी, चवळी इत्यादी ग्रामीण भागातील कडधान्ये विक्रीला उपलब्ध होणार आहेत.

Tuesday, November 28, 2017

ब्रम्हपुरी येथे कुणबी समाज मेळावा

ब्रम्हपुरी येथे कुणबी समाज मेळावा


ब्रम्ह्पुरी /प्रतिनिधी
कुणबी संघटना ब्रम्हपुरी च्या वतीने संविधान दी
दिनानीमीत्त कुणबी समाज प्रबोधन मेळावा विट्ठल रुक्मिणी सभागृह  येथे बहुसंख्य कुनबी बांधवाच्या समक्ष पार पडला.
ऐतिहासिकदृष्ट्या कुणबी हा भारतातील एक पुरातन कृषिवल समुदाय आहे. उत्तर भारतात या समुदायाला प्राय: असामी, रयत असं म्हटलं जातं. ऋग्वेदात याच समुदायाला 'विश' असं म्हटलं जात असे. दक्षिण भारतात याच कृषिवल समुदायाला कुळ, कुणबावा, कुणबी, कणबी, लेवा अशी अनेक प्रचलित नावं आहेत.मग कुनबी समाजाची आजतागायत झालेली दशा व दिशा यांची अनेक उदाहरणे देवून कुनबी समाजानी काय करावे आणि काय नाही करावे की आपाल समाज एकत्रित होउन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन नतमस्तक होणार त्या साठी कुनबी समाजामध्ये एकोपा आवश्यक असे रोखठोक वक्तव्य करतानी मार्गदर्शक  मा.श्री.दिलीपजी चौधरी यानी कुणबी समाजाला मार्गदर्शनातून व्यक्त केला.
तसेच कुनबी समाजाच्या विकासाकरीता सदैव कार्याशील  राहणारे नेहमी कुणबी समाजातील बांधवांना एकत्रित आणण्याकरीता झटनारे जी.प.उपाध्यक्ष चंद्रपूर मा.श्री. क्रिष्णलाल सहारे यानी मार्गदर्शन करताना कुनबी समाजाला प्रबोधन करत असताना कुणबी-ही महाराष्ट्रातील तुलनात्मकरीत्या सर्वात मोठी जात आहे. कुणबी समाज इतिहास पुरुष असून, महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. सामाजिक पुनर्रचनेच्या समता आंदोलनाचा अग्रदूत, स्वातंत्र्य आंदोलनाचा कणा, अर्थ उद्योगाचा/सहकाराचा अग्रणी आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्राचा राजकीय सत्तेचा शक्ती स्रोत आहे. वर्तमान काळात  आता कुणबि संघटनेच्या  माध्यमातून हा समाज पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. न्याय्य मागणी म्हणून एका विशिष्ट अजेंड्याखाली शहरोशहरी कुनबी समाज बांधणीच कार्य चालू आहेत असे वक्तव्य जी.प.उपाध्यक्ष श्री.सहारे साहेब यानी सांगितले आहे.
संकटाना सामोरे गेल्याशिवाय बदल घडू शकत नाही.
समाजात प्रबोधन करताना अनेक अडचणी येतात त्यावर मात करायला तरुणांनी शिकले पाहिजे, समाज सेवा आणि समाज परिवर्तन ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत. बदल समाज सेवा करून होणार नाही तर तो वैचारिक प्रबोधन केल्यानेच होणार आहे आणि त्यासाठी शिकलेल्या तरुणांनी पुढाकार घ्यावा..आम्ही हि चळवळ उभारली आहे ती जोमाने पुढे चालावी यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असे मत जी.प.सदस्य चंद्रपूर मा.श्री. प्रमोदभाऊ चिमुरकर यानी मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
या मेळाव्याला अन्य मान्यवरानी कुनबी समाजावर आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच या मेळाव्याच संचालन प्राध्यापक श्री.शिंगारे यानी केले ,प्रास्थाविक दोनोडे सर ,आभार मोंटू पिलारे यानी केले.अशा सुस्थितीत कुनबी समाज मेळावा संपन्न झाला.