काव्यशिल्प Digital Media: मेटल्स

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मेटल्स. Show all posts
Showing posts with label मेटल्स. Show all posts

Friday, February 16, 2018

लॉयड्स मेटल्सचा पाणी आणि वीज पुरवठा होणार बंद

लॉयड्स मेटल्सचा पाणी आणि वीज पुरवठा होणार बंद

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण करणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला  ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी ८ फेब्रुवारीला बजावला होता. मात्र ४८ तास उलटूनही  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश पायदळी तुडवत कंपनी  सुरुच ठेवली होती. त्यामुळे आदेशाचे पालन न करणाऱ्या या कंपनीचे पाणी,वीज बंद करा अश्या आशयाचे पत्र ८ दिवसानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने  पाटबंधारे विभागाला पाठविले आहे.

चंद्रपूरपासून २६ कि.मी.वर घुग्घुस येथे  लॉयड्स स्टील मेटल्स या कंपनीचा कारखाना आहे. या कारखान्यात प्रदूषण नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा निकामी आहे. परिणामी कंपनीद्वारे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडले असून परिसरातील शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कंपनीद्वारे सोडण्यात येणारे पाणीही घातक असल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव व २०१४ मधील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र या तक्रारीवर कोणत्याही हालचाली न झाल्याने महेश मेंढे यांनी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे धाव घेऊन प्रदूषणाची गांभिर्यता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर उपसभापती ठाकरे यांनी चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला चौकशीचे आदेश बजावले होते .
  ७ फेब्रुवारी रोजी कंपनीला ४८ तासांचा क्लोजर नोटीस बजावला होता. आदेशाचे पालन न झाल्यास कंपनीला होणारा पाणी व वीज पुरवठा खंडीत करण्याचेही आदेशात नमूद केले होते. वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी होते वा नाही याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर येथील विभागीय कार्यालयावर होती. विभागीय कार्यालयाने येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता, एमआयडीसीच्या घुग्घुस उपविभागाचे उपअभियंता, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व घुग्घुस येथील एमएसईडीसीएलचे सहाय्यक अभियंता यांना कंपनीचा वीज व पाणी पुरवठा बंद करण्याबाबतचे पत्र पाठविले आहे.  




.