काव्यशिल्प Digital Media: स्वच्छता

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label स्वच्छता. Show all posts
Showing posts with label स्वच्छता. Show all posts

Tuesday, February 13, 2018

इको-प्रोच्या किल्ला स्वच्छतेचा पालकमंत्र्यांकडून आढावा

इको-प्रोच्या किल्ला स्वच्छतेचा पालकमंत्र्यांकडून आढावा

चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाचा 332 वा दिवस
चंद्रपूर/प्रतिनिधी:
इको-प्रो च्या वतीने सुरू असलेल्या किल्ला स्वच्छता अभियानास सोमवारीअर्थमंत्री सुधीरभाऊ मुनंगटीवार यांनी भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली.चंद्रपूर शहरातील ऐतीहासीक गोंडकालीन किल्ल्याचे स्वच्छता अभियान 1 मार्च 2017 पासुन सुरू करण्यात आले असुन रोज नियमित संस्थेच्या स्वंयसेवकाच्या मदतीने श्रमदानाच्या माध्यमातुन चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज अभियानास 332 दिवस पुर्ण झालेले आहे. 
या अभियानाची पाहणी करण्यासाठी बगड खिडकी परीसरातील सर्वात सुंदर असलेल्या बुरूज क्रमांक 4 वर आज जिल्हयाचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री, अर्थ, नियोजन व वने यांनी भेट दिली. यादरम्यान गोंडराजांनी बांधलेला भक्कम आणी मजबुत किल्ला कसा दुरावस्थेत होता आणी स्वच्छतेनंतर यात कसा फरक पडला आहे, किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यापुर्वी आणी नंतरची स्थिति दर्शविनारे फोटोग्राफ दाखवित किल्ला अभियान ची सवीस्तर माहीती दिली. रामाळा तलाव पर्यटन विकास करतांना किल्ल्यास लागुन बांधण्यात आलेला रामाळा तलाव ते बगड खिडकी हा रस्ता वापरात नसल्याने मोठया प्रमाणात झाडी झुडपे वाढल्याने बंद झाला असल्याने त्याची साफसफाई सुरू असुन या रस्ताची पुर्वीप्रमाणे बांधकाम करण्याची गरज, शहरातील ऐतीहासीक पर्यटन विकासाच्या दृष्टीने हेरीटेज वाॅक आयोजित करण्याची, किल्लास लागुन होत असलेला संरक्षण भिंतीचे बांधकाम नंतर आतील भागाचा वापर ‘पाथ वे’ व 'सायकल ट्रेक' म्हणुन विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावी अशी मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केली. 
यावेळी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बुरूज क्रमांक 4, 5 आणी किल्लावरून चालण्याकरीता असलेल्या पादचारी मार्गावरून फिरून माहीती जाणून घेतली. किल्ला स्वच्छता अभियान यशस्वी करण्यास धडपणारयां सर्व इको-प्रो संस्थेच्या स्वंयसेवकाचे कौतुक केले. यावेळी शहराच्या सौदर्यकरणाच्या दृष्टीकोनांतुन किल्लाचे महत्व असुन याकरीता अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री यांचे सोबत विशेष कार्य अधिकारी डाॅ विजय इंगोले, पुरातत्व विभागचे वरीष्ठ संरक्षण सहायक प्रशांत शिंदे, प्रकाश धारणे, उज्वल धामनगे उपस्थित होते.
यादरम्यान इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे, इको-प्रो पुरातत्व संवर्धन विभाग प्रमुख रवींद्र गुरनुले, नितीन बुरडकर, अनील अडगुरवार, संजय सब्बनवार, ओम वर्मा, अभय अमृतकर, सुजीत घाटे, सुमीत कोहळे, अमोल उटट्लवार, जितेंद्र वाळके, हरीदास कोराम, सचिन धोतरे, वैभव मडावी, प्रतीक मुरकुटे, रोशन धोतरे, जयेश बैनलवार आदी इको-प्रो चे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.