काव्यशिल्प Digital Media: ट्रक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label ट्रक. Show all posts
Showing posts with label ट्रक. Show all posts

Saturday, February 03, 2018

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक चढला दुभाजकावर

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक चढला दुभाजकावर

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर कडून नागपूर कडे जात असलेल्या भरधाव ट्रक चे नियंत्रण सुटल्याने एमएच ४० वाय २३२६ क्रमांकाचा ट्रक विद्या निकेतन शाळेजवळील दुभाजकावर चढल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर नागपूर महामार्गावर घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही  जीवितहानी झाली नसून येथील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
                      मात्र दुभाजकावर लावून असलेले स्ट्रीट लाईट चे नुकसान झाले आहे.संपूर्ण नागपूर चंद्रपूर महामार्गावर नवीनच स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहे.  हा अपघात होताच ट्रकचालक गाडी सोडून पसार झाल्याचे समजते अपघात होताच घटनास्थळी चांगलीच गर्दी बघायला मिळाली,चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडला असे सांगण्यात येत आहे.