काव्यशिल्प Digital Media: वणी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label वणी. Show all posts
Showing posts with label वणी. Show all posts

Friday, November 17, 2017

वणी वरोरा मार्गावर भीषण अपघात 1 ठार,1गंभीर जखमी

वणी वरोरा मार्गावर भीषण अपघात 1 ठार,1गंभीर जखमी

वरोरा/भद्रावती (शिरीष उगे):
वरोरा वणी मार्गावर झालेल्या बस मारुती वॅन अपघातात एक जागीच ठार तर एक जखमी  झाले आहे . हि घटना आज दि. १७ ला ४:३० वाजता शुशगंगा पोलिटेक्निक महाविद्यालय जवळ घडली.  वरोरा- वणी मार्गावरील बस क्र. MH 20 BL 2312 वणी वरून वरोरा मार्गे येत होती तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या  मारुती वॅन क्र. MH34 K 2355 ला जोरदार धडक दिली  त्यात वॅन मधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. मृतकाचे नाव  मोहम्मद कलाम अन्सारी (३५) असून  जखमीचे व्यक्तीचे नाव  मोहम्मद मोहबीन अन्सारी (३५) असे आहे .  दोघेही वरोरा येथील निवासी होते . धडक ऐवढि जोरदार होती की वॅन चे छत गाडी पासून पूर्णतः वेगळे झाले . जखमीला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .