राजुरा व कोरपना तालुक्यातील भेट व नुकसानीची पाहणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थीती उद्भलेल्या कोरपना व राजुरा या तालुक्यातील अनेक आपादग्रस्त गावांना दि. 11 जुलै रोजी या क्षेत्राचे खासदार तथा केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भेट दिली. याप्रसंगी त्यांनी संकटग्रस्त ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या विविधांगी समस्या, अडचणी ऐकुण घेतल्या तसेच प्रशासकीय स्तरावरिल प्रश्न आस्थेने ऐकुण या प्रश्नांची सोडवणुक केली जाईल असे आश्वासन या भेटीदरम्यान दिले उपस्थित अधिकाऱ्यांना पूराची झळ बसलेल्या गावातील लोकांच्या अडचणी निस्तारतांनाच त्यांचे प्रशासकीय स्तरावरिल प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
कोरपना तालुक्यातील नाल्यांच्या पाण्यामुळे पूर प्रभावीत इंजापूर, वडगांव, आसन (खुर्द) व खिरडी तसेच राजुरा तालुक्यातील चंदनवाही व पांढरपोैनी या गावांना भेटी देवुन एकंदर परिस्थिती जाणुन घेतली लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीसुध्दा केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी ऐकुण घेतल्या. त्यांच्या या दौÚयात राजुराचे तहसिलदार डाॅ. रविंद्र होळी व कोरपनाचे तहसिलदार गाडे, तलाठी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. कोरपना तालुक्याचे भाजप तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, रमेश मालेकर, राजु घरोटे, संजय मुसळे, कवडु जरिले, सतिश उपलंचीवार, रोहन काकडे, सतिश दांडगे, बेसुरवार, पुरूषोत्तम निब्रड, पुरूषोत्तम भोंगळे, हरिभाऊ घोरे व राजुरा तालुक्यातील सतीश धोटे, तालुका महामंत्राी दिलीप वांढरे, विजय धानोरकर, दिलीप गिरसावळे, फिरोज पठान, आशिष करमरकर, संदिप गायकवाड आदी भाजप पदाधिकारी व कार्यकत्र्यांची यावेळी उपस्थिती होती.
ना. अहीर यांनी क्षतीग्रस्त जि.प. शाळांची केली पाहणी
वडगांव व आसन (खु.) या गावातील जि.प. शाळांची दूरवस्था झाली असतांना जि.प. प्रशासन या शाळांच्या दुरूस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष करित असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याच्या बाबींकडे या दोन्ही गावांतील लोकांनी केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. अहीर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी प्रत्यक्ष मोक्यावर जावुन या शाळांची पाहणी केली. त्यावेळी या दोन्ही शाळांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शाळेच्या भिंतींना सर्वत्रा भेगा पडल्याचे तसेच स्लॅब गळती लागल्याचे चित्रा मंत्रयांनी प्रत्यक्ष बघीतले. आसन या गावातील शाळेचे छत नादुरूस्त असल्याचे या भेटीत आढळुन आले. सदर प्रकार विद्याथ्र्यांच्या जिवणाशी खेळणारा असुन जि.प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घ्यावी व स्थानिक अधिकाÚयांनी या आशयाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करावा असे निर्देशीत केले. क्षतीग्रस्त झालेल्या या शाळांची इमारत निर्लेखीत करून नव्याने इमारत बांधकामाकरिता प्रस्ताव सादर करावा अशी सुचना त्यांनी या शाळांच्या मुख्याध्यापकांना केली.
पूरस्थितीला प्रशासकीय नियोजनशुन्यता कारणीभुत - ना. अहीर
पावसाळ्यात दरवर्षी केवळ नाल्यांच्या कारणामुळे या प्रभावीत गावामध्ये पाणी घुसल्याने पूरस्थिती उद्भवत असली तरी स्थानिक प्रशासनाने वर्षोंनुवर्षे या बाबींकडे दुर्लक्ष केल्यामुळे संततधार पाऊस पडल्यानंतर नाल्याच्या बॅक वाॅटरमुळे अनेक गावात पूरसदृष्य स्थिती उद्भवते नागरिकांकडुन, स्थानिक लोकप्रतिनिधीकडुन सातत्याने या नाल्यांच्या खोलीकरण व सरळीकरणाची मागणी होत असतांना त्याची दखल अधिकारी घेत नाहीत व लोकांना या निष्क्रीयतेचा आर्थिक फटका बसुन मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावी लागते. याकडे लक्ष वेधत ना. अहीर यांनी पूरसदृष्यस्थितीस कारक ठरणाऱ्या या नाल्यांची तज्ञांकडुन पाहणी करावी व या नाल्यांच्या खोलीकरण, सरळीकरण तसेच नाल्यांची दिशा वस्तीकडे राहणार नाही अशा पध्दतीचे नियोजन करून स्थानिक स्तरावरून संबंधीत विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश ना. अहीर यांनी दिले.
संततधार पाऊस तसेच नाल्यांच्या अतीव दाबामुळे पाणी गावामध्ये शिरल्याने ज्या लोकांच्या घराचे नुकसान झाले आहे. घरातील सामान व अन्नधान्य पावसामुळे नष्ट झाले. अनेक कास्तकारांच्या शेतशिवारात पाणी साचुन ज्यांच्या हंगामाचे नुकसान झाले अशा सर्व लोकांच्या नुकसानीचा सर्वे करून त्यांना शासन स्तरावरून नुकसान भरपाई उपलब्धतेकरिता भरपाई विषयक प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत व नैसर्गीक आपत्तीमुळे घरांची पडझड झालेल्या प्रभावीत कुटूंबीयांना खावटी उपलब्ध करून द्यावी अशी सुचनाही यावेळी केली.
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याने सर्व पात्रा नुकसानग्रस्त शेतकरी या मदतीपासुन वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यानी घ्यावी ज्यांना नुकसान होवुनही मदत मिळाली नाही त्यांच्या तक्रारी स्वीकारून मदत मिळवुन देण्याकरिता तालुका प्रशासनाने कार्यवाही करावी अशा सुचना ना. अहीर यांनी उपस्थित तहसिलदारांना केलीेे.