काव्यशिल्प Digital Media: मैत्रय

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मैत्रय. Show all posts
Showing posts with label मैत्रय. Show all posts

Saturday, March 10, 2018

चंद्रपुरात मैत्रेय गुंतवणूकदारांची बैठक

चंद्रपुरात मैत्रेय गुंतवणूकदारांची बैठक

Maitreya investor's meeting at Chandrapur | चंद्रपुरात मैत्रेय गुंतवणूकदारांची बैठकचंद्रपूर/प्रतिनिधी:
 मैत्रय ग्रुप आॅफ कंपनीमध्ये फसवणूक झालेल्या ग्राहकाची बैठक श्यामाप्रसाद मुखर्जी येथे पार पडली ही बैठकीत नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

मैत्रय कंपनीने ग्राहकांची फसवणूक केली. यासंदर्भात अन्याय मिळावा यासाठी शुभम सतीश गेडाम, मनोज पोतराजे, अभी सुरेश वाढरे, रोशन गिरडकर, नितीन तुरणकर, मयूर शेटीया, कामेश उरकुडे पाठपुरावा करीत होते.
दरम्यान, अमीन शेख सुभाष कासनगोट्टुवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. सदर कंपनीने ग्राहकांवर अन्याय केल्याने अनेकांनी व्यक्तिगतरित्या तक्रार केली होती. पण, दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोतमारे यांना मैत्रय ग्रुप आॅफ कंपनीच्या फसवणुकीची चौकशी करण्याचे निर्देश दिले.दरम्यान, ठाणेदार गोतमारे यांनी एस्को अकाऊंटची चौकशी सुरू केली. यासंदर्भात सभेमध्ये ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहकांनी ३० मार्चपर्यंत सुभाष कासनगोट्टुवार यांच्या तुकूम येथील जनसंपर्क कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करण्याबाबतही या सभेत चर्चा करण्यात आली. मैत्रेय ग्रूपने गुंतवणूकदारांना अनेक आमिष दाखविले होते. परंतु त्याची पुर्तता केली नाही.
अन्याय झालेल्या ग्राहकांनी न घाबरता पोलीस ठाणे अथवा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे न घाबरता तक्रार दाखली करावी, असा संकल्प यावेळी करण्यात आली. मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीने अन्याय केलेले अनेक गुंतवणूकदार यावेळी उपस्थित होते