काव्यशिल्प Digital Media: कारंजा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label कारंजा. Show all posts
Showing posts with label कारंजा. Show all posts

Wednesday, February 06, 2019

कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला लाभ

कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला लाभ

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

पंचायत समिती कारंजा व कृषिव्यवसायिक संघ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२/०२/२०१९ रोज शनिवार ला पंचायत समिती कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे कृषी प्रदर्शन व चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेशजी खवशी यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून राविभाऊ शेंडे अद्यक्ष कृषी व्यावसायिक संघ वर्धा जिल्हा हे होते यावेळी कार्यकर्माचे स्वागताध्यक्ष मंगेशभाऊ खवशी सभापती,उपसभापती रंजनाताई टिपले पं स कारंजा हे होते.

 तसेच समाजकल्याण सभापती निताताई गजाम जी प वर्धा, उमेशकुमार नंदागवळी गट विकास अधिकारी, जी प सदस्य रेवताई धोटे, सरीताताई गाखरे, अनिल आदेवर कृषी अधिकारी,पं स सदस्य जगदीश डोळे,टिकाराम घागरे,पुष्पा ताई चरडे, आम्रपाली बागडे,रोशनीताई ढोबळे सह आदी मान्यवर उपस्थित होते. सदर चर्चासत्रात संत्रा, मोसंबी व लिंबू फळपीक तसेच कापूस, सोयाबीन, तूर या पीकाचे तज्ज्ञ मार्गदर्शन द्वारे सखोल मार्गदर्शन डॉ श्रीवास्तवव NRCC नागपूर,डॉ अंजिता जार्ज, डॉ आर येस शिरजूशे, डॉ आर के दास, व महाले यांनी केले.

या प्रदर्शनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला व त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला,ऍपल बोर, ऊस, पपई, संत्रा, भाजीपाला, डाळ, तांदूळ इ संपूर्ण शेतमाल विकल्या गेला तसेच तालुक्यातील महिलाबचत गटांनी गृहोपयोगी व खाद्यपदार्थ, पापड, लोणचे, मशरूम, गुळपट्टी इ पदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली.

तालुक्यातील प्रगतिशील शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला त्यात केशवराव भक्ते हेटीकुंडी, सुनील ढोले बोरगाव ढोले, विनोद नासरे खरसखंडा, प्रशांत पुरी जोगा, वसंता अवथळे ब्राह्मणवाडा, श्रीराम चोपडे कारंजा, ज्ञानेश्वर भांगे कारंजा, श्रीमती सुनीता नेत्राम गाडगे बोनदरठाना , गजानन पेठे बोरगाव, माणिकचंद देशमुख नारा, प्रभाकर खवशी नारा,रमेश लोहकरे नागाझरी,विश्वजित आखरे चिंचोली,किशोर बंनगरे जसापूर, छायाताई गळहट चोपण या शेतकरी शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला.

या कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण म्हणून, ऍग्री केअर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीताफळ ज्युस व शेक, युवा प्रगतशील शेतकरी किशोर बंनगरे यांची विषमुक्त पपई, ऍपल बोर, ऊस,उमेद अभियानाचे विविध स्टॉल, पशुसंवर्धन विभाग आणि पाणी फौंडेशनचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरले.

Thursday, January 10, 2019

वर्ध्यात गळफास घेऊन आत्महत्या

वर्ध्यात गळफास घेऊन आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

  सेलगाव(उमाटे) येथील रहिवासी सुरेश नत्थुजी गाखरे वय (४५वर्षे) यांनी आपल्याच शेताजवळील वनविभागाच्या जागेतील सागवानाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी बकरी चारणाऱ्या गुराखी डोमा कुरमती हा तेथे गेला असता त्याला प्रेत झाडाला लटकले असल्याचे दिसले.त्यांनी लगेचच त्याने गावात जाऊन त्याच्या घरी जाऊन हा घटनेची माहिती दिली.तत्काळत्याच्या नातेवाईक मंडळी व आजूबाजूच्यांनी शेताकडे धाव घेतली. वासुदेव दत्तूजी गाखरे यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करून प्रेत हे ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे उत्तरीय तपासणी करिता आणले. उत्तरीय तपासणी झालेले प्रेत पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकाला दिले. मृतकाच्या मागे पत्नी आणि एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी मृतकाचा मुलगा दुचाकी अपघातात मरण पावला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास केंद्रे व योगेश चाहेर आणि त्यांचा चमू करीत आहे.
 जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची कारंजा येथे भेट

जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची कारंजा येथे भेट

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

  कारंजा शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सहभाग घेतला असून कारंजा शहरातील नागरिक या अभियानाला चांगला प्रतिसाद देत असून अधिकारी लोकप्रतिनिधी सुद्धा शहर स्वच्छ करण्यात समोर आले आहे . बुधवार दि. ९/०१/२०१९  ला सकाळी  वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी नगर पंचायत कारंजा यांनी तयार केलेला घनकचरा व्यवस्थापन व कंपोस्ट खत युनिट ला भेट यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांना घन कचरा व्यवस्थापन व कम्पोस्ट खत युनिट ची  कारंजा नगरपंचायत च्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी माहिती दिली. 

व जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण युनिटची पाहणी केली. यावेळी सनसाईन स्कूल आणि गरुकुल पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेवर मार्गदर्शन केले. काही ठिकाणी त्यांनी काही उपाययोजना दिल्या कारंजा नगर पंचायतला प्रत्येक प्रभागात स्वच्छतागृही गट तयार करून स्वच्छता चळवळ राबविण्याचे  जिल्हाधिकारी यांनी सुचविले. सोबत त्यांनी या व्यवस्थापन उपक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन पाहून समाधान व्यक्त केले. 

आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्व संस्थांच्या उत्सुर्फ प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी तहसील कार्यालय येथे  कारंजा नगर पंचायत च्या वतीने उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन कुमावत, मुख्याधिकारी , पल्लवी राऊत , नगराध्यक्षा कल्पना मस्के, नगर उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर, सह नगरसेवक  प्रेम महिले , सतीश इंगळे, मंगला जीवरकर, भगवान बुवाडे, विनोद जीवरकर सह नगरपंचायत कर्मचारी हजर होते.सध्या कारंजा नगर पंचायत यांनी स्वच्छतेचा विडा उचलून कारंजा शहर कचरा मुक्त करण्यासाठी सर्व प्रयन्त करत आहे. दररोज स्वच्छत्ता मोहीम राबविण्यात येत आहे.

Sunday, January 06, 2019

मागण्या मंजूरीनंतरच भरला कारंजाचा आठवडी बाजार

मागण्या मंजूरीनंतरच भरला कारंजाचा आठवडी बाजार

उमेश तिवारी:कारंजा (घाडगे)वर्धा:

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आठवडी बाजारात दुकानदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा मिळवून देणे व बाजार परीसर स्वच्छ सुंदर व सुव्यवस्थीत राखण्यासाठी कारंजा नगरपंचायत प्रशासनाने कामे सुरू केली असता आज आठवडी बाजाराच्या दिवशी दुकानदारांनी अचानकपणे आपल्या मागण्या साठी काही काळ बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला.
दुकानदारांच्या मागण्या मंजूर करीत असल्याच्या आश्वासनानंतरच बाजार भरविण्यात आला. भाजीपालामालाचे व दुकानदाराचे कोणतेही नुकसान होऊ नये व परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये म्हणून सुरवातीलाच सकाळी नगरपंचायतचे पदाधिकारी उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर , शिक्षण सभापती प्रेम महिले ,माजी उपसरपंच उमेश चाफले यांचेसह मुख्य कार्यपालन अधिकारी पल्लवी राऊत यांनी दुकानदारासोबत चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू केली असता दुकानदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

 त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत आठवडी बाजार भरण्यासाठी अडथळे येत गेले. ४ जानेवारी पासून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध कामे कारंजा शहरात सुरू आहे त्याच दृष्टीने आठवडी बाजारात सुद्धा स्वच्छता व शिस्त राखावी म्हणून प्रशासनाने काही चांगली कामे करण्याचा सपाटा लावला होता त्या अंतर्गत शनिवारी बाजारात सपाटीकरण करण्यात आले. सदर कामे करीत असतांना रविवारी बाजारात अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याची माहिती सुध्दा काही नागरीकांनी प्रशासनाला दिली होती.

आज आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारात आलेल्या दुकानदारांना सपाटीकरणात ओटेच नसल्याचे दिसून आले.दुकाने मांडताना प्रशासनाची भूमिका मान्य नसल्यामुळे दुकानदारांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि या बाबीमुळे तात्पुरती तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली त्यातूनच प्रशासनाने योग्य तोडगा काढण्याच्या दृष्टीने दुकानदारा सह चर्चा केली व त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. दुकानदार आपल्या पूर्ववत जागेवरच बसतील ,सपाटी करणात तोडण्यात आलेले मातीचे ओटे ८ दिवसात तयार करून देण्यात येईल, या मुख्य मागणी सह इतरही मागण्या मान्य करण्यात येत असल्याचे नगरपंचायतच्या मुख्यकार्यकारी अधीकारी पल्लवी राऊत यांनी उपस्थिता समोर सांगितले.

यावेळी दुकानदाराच्या वतीने माजी सभापती मोरेश्वर भांगे, माजी सरपंच शिरीष भांगे माजी सरपंच शांताराम ढबाले, नगरसेवक संजय कदम, नगरसेवक शेख निसार, किशोर भांगे, काकडे सर व इतरही नागरिक उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी मैराळे यांच्या सह पोलिसांनी सहकार्य केले.स्वच्छ शहर सुंदर शहर करण्यासाठी प्रशासन चांगले काम करीत असल्याची चर्चा उपस्थित नागरीक करीत होते.परंतु बाजार सुव्यवस्थीत करण्याची शनिवारची वेळ योग्य नव्हती असा सूर उमटत असल्याचे दिसून येत होते.

Friday, January 04, 2019

कडाक्याच्या थंडीच्या लाटेत  शेतपीके करपली

कडाक्याच्या थंडीच्या लाटेत शेतपीके करपली

कारंजा - काटोल तालुक्याचे शेतकरी पुन्हा हवालदिल
उमेश तिवारी/कारंजा वर्धा:
 राज्याच्या उपराजधानी सह उपराजधानीच्या लगतच्या वर्धा जिल्हा व नागपुर जिल्ह्यातील काटोल -तालुक्याच्या  सालई-नांदोरा खुर्सापार,सबकूंड, वाई -चिखली-कचारी सावंगा,बोरगाव,कोंढाळी,तरोडा;  सह लगतच्या वर्धा जिल्ह्याचे काजळी-जोगा हेटी;धानोली,मेट गरमसुर  या परिसरातील शेतीतील पीकांन वर २८,२९,३०डिसेंम्बर  चे रात्रीला पडलेल्या थंडिच्या कडाक्यात   शेतातिल मुख्यत्वे  करून तूर  -यापिकासह-मिरची--चना-कपाशी-व हळद  पीकांन वर करपा गेल्याने उभे पीक  शेतकर्यांचे हातून गेल्यात जमा आहे. खरीप आधीत हातून गेले,ज्या शेतकर्यांकडे थोडे फार पाण्याचे साधन होते या मुळे  काही पीक तूर हळद मिरची  कपाशी  तर  भाजिपाला बागयती   ०५-१%शेतकर्यांकडे होत्या त्या ही २८-व-२९डिसेंम्बर चे रात्रीच्या कडाक्याच्या थंडी च्या लाटेच्या प्रभावाखाली आल्याने या सर्व पीकांन वर करपा गेल्या मुळे संपुर्ण नागपुर व वर्धा जिल्ह्यालाच  पुर्ण दुष्काळग्रस्त जिल्हे घोषीत करन्याची मागणी कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे व उप सरपंच स्वप्निल व्यास व त्यांचे  सर्व ग्रा. प. सहकार्यांनी  केली आहे.तसेच काजळी चे शेतकरी साहेबराव घागरे यांनी मागणी केली आहे.

Tuesday, January 01, 2019

कारंजाच्या सामीक्षा यावलेचे हस्तलेखन परिक्षेत यश

कारंजाच्या सामीक्षा यावलेचे हस्तलेखन परिक्षेत यश

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

समीक्षा सुरेंद्र यावले ही कारंजा येथील मुलगी धनवेट राष्ट्रीय महाविद्यालय नागपूर येथून हस्तलेखन स्पर्धेतील द्वितीय बक्षीस, उद्दिष्ट परीक्षा उत्तीर्ण होणारा दुसरा पुरस्कार,
सर्वोत्तम लायब्ररी विद्यार्थी पुरस्कार म्हणून प्रथम पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार म्हणून प्रथम पुरस्कार,
एमए (मराठी साहित्य) तृतीय विद्यापीठातील टॉपर्समध्ये 70% गुण मिळवले असून कारंजा शहर आणि शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयात सामीक्षाचे कौतुक  होत आहे.


Sunday, December 30, 2018

पतीने साडीने आवळला पत्नीचा गळा

पतीने साडीने आवळला पत्नीचा गळा

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे): 
पतीने पत्नीला साडीने गळा आवळुन मारल्याची घटना आज रविवार दुपारी १ वाजताच्या सुमारास कारंजा येथून जवळच असलेल्या येनगाव रस्त्यावर सोनेगाव (रिठे) या शिवारात घडली. आरोपी गोवर्धन तुळशिराम निकोसे(वय३८वर्ष) राहणार धावडी यांनी आपल्याच पत्नीची अर्चना गोवर्धन निकोसे (वय ३० वर्ष) तिच्याच साडीने गळा आवळुन जीवन यात्रा संपवून टाकली . मृतकाचे लग्नाला १३ वर्ष झाले होते. २ मुली आणि १ मुलगा असा मृतकाचा संसार होता.

पती पत्नी मध्ये नेहमीच वाद व्हायचा म्हणून मृतक ८ दिवसापासून माहेरी मासोद (कामठी) गेली होती. दि. २९/१२ ला आरोपी स्वतः जावून पत्नीची समजूत घालून गावाला आणले. आणि ३०/१२ तारखेला ही घटना घडली. आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. मृतकाची उत्तरीय तपासणी उदयाला ३१डिसेंबरला होईल.निकोसे हा परिवार धावडी(बु.) गावाचा असून कारंजामध्ये किरयाने राहत आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करत आहे.

Saturday, December 08, 2018

शशीभुषण उर्फ छोटू कामडी यांची काँगेस अध्यक्ष पदी निवड

शशीभुषण उर्फ छोटू कामडी यांची काँगेस अध्यक्ष पदी निवड

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):
   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.श्री.अशोकराव चव्हाण व आर्वी विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री. अमरभाऊ काळे  यांच्या उपस्थित मा.श्री.शशिभूषण उर्फ छोटू कामडी यांची तालुका काँग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
    शशिभुषण कामडी हे मूळचे कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील रहिवासी आहे . त्यांच्यावर पक्षाने त्यांची कारकीर्ती बघून तालुक्यतील काँग्रेस अध्यक्ष पद देण्यात आले.

       न.पं.अध्यक्षा सौ.कल्पना सं.मस्के, न.पं.उपाध्यक्ष नितीन दर्यापुरकर, पं.स.सदस्य टीकाराम घागरे, न. पं.बांधकाम सभापती नरेश चाफले, न. पं.सभापती सौ.मंगला बुवाडे, न. पं.सभापती प्रेम महीले, सर्व न. पं. नगरसेवक,नगरसेविका तसेच संजय मस्के, सितेश भादे, चंदू भांगे,कमलेश कठाने,भगवान बुवाडे,सोम मुदगल,अमित बंडे,पवन ढोले,नौशाद सौदागर,अनिल नांदने, विजय ढोले इत्यादींनी अभिनंदन केले.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत गुरुकुल पब्लिक स्कूल प्रथम

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत गुरुकुल पब्लिक स्कूल प्रथम

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):
शिक्षण विभाग कारंजा घा.यांच्या कडून दोन दिवसीय तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आले होते.
   स्पर्धेचा विषय - भाजीपाला, घनकचऱ्यातून विविध मानव उपयोगी वस्तू बनविणे हा होता.
 यात गुरुकुल पब्लिक स्कूल ने पहिला क्रमांक प्राप्त केला या विज्ञान प्रदर्शनात विधी बारंगे,हर्षाली अग्रवाल, सृष्टी पुर्वे,अनुष्का चौधरी, रुचिता देहटवार, आर्या रामधम इत्यादी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. या प्रतिकृतीसाठी तृप्ती पालीवाल, कांचन फुसाटे,ममता चोपडे इत्यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Friday, December 07, 2018

गावात वाचनालय सुरू करून बाबासाहेबांना वाहिली श्रद्धांजली

गावात वाचनालय सुरू करून बाबासाहेबांना वाहिली श्रद्धांजली

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

  वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कन्नमवार ग्राम वासियांनी डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्य गावात वाचनालयाची सुरुवात करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे

बाबासाहेबांची संपुर्न जिवणभर पुस्तक वाचनाला खुप महत्व दिले आणी म्हणूनच ते उच्च विद्याविभुषीत झाले.हाच ऐक उदात्त हेतु  ठेउन गावात वाचनालय उघडुन महामानवाला  श्रध्दांजली गावात वाचनालय सुरू करून देण्यात आली.

समस्त गावकरी यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम येथे उद्घाटन पार पडले.

 यावेळी गावातिल मंडळींनी वाहीली.नुकताच या वाचनालयाचे उद्घाटन जि.प.सद्स्य सौ.सरीता गाखरे, गट विकास अधिकारि उमेश नंदागवळी,बँक आँफ महाराष्ट्र चे शाखा प्रबंधक वाघमारे,श्रीधरराव धामणकर सरपंच निकोसे,वैशाली बागडे,विजय बंन्सोड,केशवराव भक्ते ,सचिव बन्सोड ,बार्टीचे समतादुत सिध्दार्थ सोमकुवर  सह आदी मान्यवर उपस्थीत होते.

Thursday, December 06, 2018

दुचाकी-बंदर धडकेत बंदराचा मृत्यू; दुचाकीस्वार गंभीर जखमी

दुचाकी-बंदर धडकेत बंदराचा मृत्यू; दुचाकीस्वार गंभीर जखमी

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):
  कारंजा तालुक्यातील गोधणी या गावचा युवक अनिकेत हनुमंता बागडगे वय २३ वर्ष हा नागपूरला BE (Mechanical.)  शिक्षण घेत होता मंगळवारी सकाळी गोधनि येथे आपल्या घरी भेटीला आला होता.

नागपूरला परीक्षा होती म्हणून दुपारला नागपूर साठी दुचाकीने निघाला . कारांजवरून अडीच किलोमीटर  चांदेवानी फाट्याजवळ बंदर राष्टीय महामार्ग ओलांडताना अनिकेत च्या दुचाकी क्रमांक MH32V6416 धडकला. दुचाकीस्वार खाली पडला  तो गंभीर जखमी झाला. कारंजा उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. पुढील उपचारासाठी नागपुर येथे नेण्यात आले. कारंजा येथील ओरिएंटल टोल च्या युवकांनी प्रदीप वलगावकर, अनिल नांदने, अनिल चोपडे, निलेश नासरे यांनी मृत बंदराला समाधी देऊन समाजाला एक संदेश व दिशा दिली  आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत कारंज्याच्या विद्यार्थ्यांना यश

शिष्यवृत्ती परीक्षेत कारंज्याच्या विद्यार्थ्यांना यश

उमेश तिवारी/कारंजा वर्धा:

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत प्रथम स्तरावर  वंश सोम मुद्गल इंग्लिश प्रायमरी स्कूल कारंजा द्वितीय स्तरावर वैष्णवी हेमराज हिंगवे जिल्हा परिषद शाळा आजनडोह हे दोन्ही इयत्ता ५ वि चे विद्यार्थी आहे या दोन्ही विद्यार्थ्यांना शिक्षणविभाग जिल्हा परिषद वर्धा तर्फे आमदार पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यश नितीन मडावी, सभापती नीता गजाम इत्यादी उपस्थितीत गुनगौरव प्रमाणपत्र देण्यात आले.
कारंजा येथे शाळेचे मुख्याध्यपिका व कर्मचारी रुंद न. प.उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकार, न. से. प्रेम महिले, संजय मस्के, कमलेश कठाने,दिलीप जसुतकर, राम मोटवानी, बाबू मोटवानी, रुपेश मस्के,बाळु ठाकरे इत्यादी कडून कौतुक करण्यात आले.

शेतशिवारात फासावर लटकलेला मृतदेह आढळला

शेतशिवारात फासावर लटकलेला मृतदेह आढळला

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे)

  कारंजा तालुक्यातील ठाणेगाव येथील ३० वर्षीय युवक राहुल महादेव मूने यांचा मृतदेह ठाणेगाव शिवरामध्ये फासावर लटकलेला आढळुन आला.
   घटना या प्रकारे सांगितली जाते की दि. २५ ऑक्टोबर पासून राहुल घरून निघाला व घरी परत आला च नाही. घरून जाते वेळी त्याच्याजवळ मोबाईल होता. घरच्या लोकांनी व पोलिसांनी मोबाईल न. लावले असता राहुलचा मोबाईल बंद येत होता. घरच्या लोकांनी विचारपूस केली असता काहीच पत्ता लागला नाही.
  ४ डिसेंबरला गावातीलच बकरी चारण्याराला पळसाच्या झाडावर गळफास लावलेल्या युवकाचा मृतदेह दिसला. बकरी चारणाऱ्या वयक्तीने मुतकाचा भाऊ रुपेश मूने याला या घटनेची माहिती दिली. फासावरली लटकलेल्या मृतदेहाची पडताडणी केल्यावर हे शव राहुल मूने यांचे आहे असे समजून आले. मृत्यू हा बरेच दिवसा पूर्वी झालेला असल्याने तो सडलेल्या अवस्थेत आढळुन आला. जेथे शव आढळले ती जागा वीटभट्टीचे ठिकाण आहे. उत्तरीय तपासणीसाठी वर्धेवरून   चिकित्सकांची चमू बोलावण्यात आली.
 मृतकाचा मोबाईल स्वतःच्या खिशामध्ये आढळुन आला.

Wednesday, December 05, 2018

जागतिक माती आरोग्य दीवस साजरा

जागतिक माती आरोग्य दीवस साजरा

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

माझ गाव माझा गौरव या अंतर्गत  प्राथमिक शाळा कुंडी   येथे जागतिक माती आरोग्य दिन  कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था नागपुर व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने   करण्यात आले होते. यात गावात सभा आयोजीय करून गावातील लोकाना व शाळेतील विघार्यांना  मातिचे आरोग्य कसे सांभाळले पाहिजे याचे महत्व  पटवून देण्यात आले. त्याचप्रमाने  तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून या कार्यक्रमाला  सुरवात झाली. या कार्यक्रमासाठी अद्यक्श म्हणून डाँ.अनुपकुमार क्ष्रीवास्तव हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून  डाँ.शिवणकर,डाँ.आय.पी. सिंग,डाँ.हुच्चे,डाँ.शिरगुरे सर,परतेती मँडम,डाखोळे सर, उपसरपंच लताताई बारंगे  सर्व ग्रामपंचायत सदस्य ,  मुख्यध्यापक प्रशांत  माहुरे,बार्टीचे  समतादुत सिध्दार्थ सोमकुवर ,विनायक भांगे व बंश्री परतेती  हे उपस्थीत होते तर  गावातिल बहुसंख्य शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेला उत्फुर्त प्रतिसाद दर्शवला.कार्यक्रमाचे संचालन बिपिनचंद्र महल्ले यांनी केले तर आभार डाँ . अंबादाज हुच्चे यांनी मानले .

Sunday, December 02, 2018

सोलर कंपनीचा गार्ड १२ दिवसापासून बेपत्ता

सोलर कंपनीचा गार्ड १२ दिवसापासून बेपत्ता


उमेश तिवारी/कारंजा 

सुनील परशुराम चोपडे 
राहणार:- कारंजा (घाडगे) तह. कारंजा, जिल्हा वर्धा.
हा मुलगा सोलर कंपनीत गार्ड या पदावर कार्यरत होता दि. १९/११/२०१८ सकाळी ९ वाजता वॉर्ड न. १६ घरून कंपनीच्या  सुपरवाईजर सोबत कामावर गेला असून आजपर्यंत तो घरी परतला नाही. कंपनीत विचारपूस केली  असता तो गाडीवर ड्रायव्हर सोबत गार्ड म्हणून गेला असून ओडिशा येथील केळझर झोडा या गावी पाठविले ही माहिती मिळाली. ट्रक परत आला परंतु  सुनील अजूनपर्यंत परत आला नाही. कुणाला आढळल्यास खाली फोन न. दिले आहे या वर संपर्क साधावा ही विनंती त्याचे वडील परशुरामजी चोपडे यांनी केली आहे. 
संपर्क मो.न.१.परशुरामजी चोपडे ७७६९८२६०५४ नितीन कामडी  ८८०६९०७००१ दिलीप जसुतकर २८६०६००७ यांना संपर्क साधावा.

Saturday, December 01, 2018

नगरपंचायत कारंजा (घा) विषय समिती सभापती पदावर अविरोध निवड

नगरपंचायत कारंजा (घा) विषय समिती सभापती पदावर अविरोध निवड

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे)
                                                                     
     नगरपंचायत कारंजा (घा) विषय समिती सभापती निवड मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये दिनांक 30/11/2018 रोज शुक्रवार ला ठिक दुपारी 12.00 वाजता सभा आयोजित करण्यात आली सदर सभा मा.श्री.प्रकाश शर्मा उप विभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी,आर्वी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.श्रीमती पल्लवी दि. राऊत, मुख्याधिकारी,न.पं.कारंजा (घा) यांचे मार्गदर्शनात तसेच मा.श्रीमती कल्पनाताई संजयराव मस्की अध्यक्ष,नगरपंचायत कारंजा (घा) यांचे उपस्थितीत पार पडली.
    सर्व विषय समिती सभापती यांनी विहीत वेळेत नामनिर्देशन पत्र मा श्रीमती पल्लवी दि. राऊत मुख्याधिकारी न.पं.कारंजा यांचेकडे सादर केले. तसेच श्री.नितीन मधुकरराव दर्यापुरकर उपाध्यक्ष हे पिठासीन अधिकारी यांनी पाणी पुरवठा समिती सभापती पदाचे पदसिद्ध सभापती असल्याचे जाहिर केले असुन श्री.नरेश नामदेवराव चाफले, यांची सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदावर चौथ्यांदा व श्री.प्रेमसिंग भारतसिंग महिले यांची खेळ व शिक्षण समिती सभापती पदावर तिसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आलेली आहे.तसेच श्रीमती मंगलाताई भगवान बुवाडे यांची नियोजन व विकास समिती सभापती पदावर व श्रीमती कल्पनाताई रमेशराव सरोदे यांची महिला व बालकल्याण समिती सभापती पदावर अविरोध निवड करण्यात आली.
    निवड झालेल्या सर्व विषय समिती सभापती यांचे मा.श्री.अमरभाऊ काळे,आमदार आर्वी विधानसभा , मा.श्री.प्रकाश शर्मा उप विभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी,आर्वी. , मा.श्रीमती कल्पनाताई संजयराव मस्की,अध्यक्ष नगरपंचायत कारंजा. मा.श्रीमती पल्लवी दि. राऊत,मुख्याधिकारी,न.पं.कारंजा तसेच कारंजा शहरातील प्रतिश्ठीत नागरीक दिलीपभाऊ राठी, श्री उमेशऱाव चाफले, श्री केशवराव चोपडे, श्री महादेवराव सरोदे, श्री प्रकाशभाऊ मोटवाणी, श्री किशोर नासरे, श्री बाबाराव मस्की, श्री बाबाराव हुकूम, श्री गजानन मांडवेकर, श्री रोशन राऊत, श्री शेख भुरू, श्री राजेंद्र सातभाई, श्री बकुलभाऊ जसाणी, श्री भिमराव कनेर, श्री प्रमोद मानकर यांनी  सर्व विषय समिती सभापती, व उपस्थित सर्व समिती सदस्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Friday, November 30, 2018

रागाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून

रागाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून

उमेश तिवारी/कारंजा(घा):

  कौटुंबिक भांडणात पतीचा राग अनावर होऊन त्याने कुर्हाडीने पत्नीचा खून केल्याची घटना  गुरुवारी  सकाळी ११ च्या दरम्यान कारंजा (घाडगे) तालुक्यातील जुनापनी (टॉवर) या गावी घडली. मृतक पत्नीचे नाव सौ.संध्या केशव भस्मे वय ३२ वर्ष असे आहे. घटने नंतर पती केशव भस्मे हा स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला. मृतक महिला माहेर वर्धा जिल्ह्यातील खरागना येथील असून ती श्री.दिवाकर लाडे यांची कन्या आहे. तिचे लग्न ११ वर्षा पूर्वी झाले असून तीला २ लहान मुली आहेत. पती केशव भस्मे हा कारंजा येथील किराणा दुकानात नौकरी करीत होता. आज तो घर कामासाठी घरीच होता. मृतक सांध्यांचे वडील काही दिवसांपूर्वी जुनापाण्यात आले होते. ते शेतात होत. पती केशव भस्मे हा घरी कुराडीने काम करीत असतांना पत्नीसी वाद झाला त्याने तिच्या डोक्यावर कुराडीने एवढा जबर वार केला की तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने  जमिनीवर पडली. यात मुलीने आरडाओरडा केला.आजूबाजूच्या नागरिकांनी तिला कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणले आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसानी ताबडतोब कार्यवाही व पंचनामा केला व प्रेताची उत्तरीय तपासणी केली तिचा अंत विधी तिच्या माहेरी खरागना येथे होणार असल्याचे समजते. उपविभागीय पोलिस अधिकर्यांनी घटने स्थळी भेट दिली असता त्यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास करीत आहे. पोलिसांनी ३०२ चा गुन्हा नोंदविला आहे.

Thursday, November 29, 2018

  गळफास घेवुन आत्महत्या

गळफास घेवुन आत्महत्या

उमेश तिवारी/ कारंजा(घा)  :
एकार्जुन येथील रहवासी हेमराज मारोतराव देशमुख वय ४० वर्ष या व्यक्तिने आज दि.२८/११/२०१८ रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमरास त्याच्याच स्वतःच्याच घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
      पोलिसांना घटनेची माहिती मिळता पंचनामा करून मृतकाचे प्रेत आरोग्य तपासणी करीता कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
         मृतकाचे मागे पत्नी,मुलगा आणि वडील असा परिवार आहे. आत्महत्येचे  अद्याप कारण समजू शकले नाही. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.

Monday, November 26, 2018

उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक;एकाचा मृत्यू

उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक;एकाचा मृत्यू


उमेश तिवारी/कारंजा (घा):


 नागपूर वरून अमरावतीकडे जात असताना उभ्या  ट्रेलरला धडक बसल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू झाला. हि घटना सोमवारी संध्याकाळी ७ वाजत्याच्या दरम्यान कारंजा (घाडगे) वरून ९ किलोमीटर दूर राष्ट्रीय महामार्गवर काटोल फाट्याजवळ घडली.  सागर पुरुषोत्तम ढोले वय २९ वर्ष राहणार बोरगाव जिल्हा वर्धा असे या मृत्यू मुखी पडलेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.  ट्रेलर क्र. CG.04.HT.9912 रस्त्यावर उभा होता. दुचाकी स्वार सागर पुरुषोत्तम ढोले   दुचाकी क्र. MH.32.AA.0356 नागपूर वरून गावाला जात असतांना ट्रेलरच्या मागे येऊन धडकला.आणि तो खाली पडला.  या नंतर तत्काळ कारंजा येथून रुग्णवाहिका बोलवण्यात आली व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा करिता आणले असता रुग्णालयातच सागर ढोले याचा मृत्यू झाला.
राजकुमार तिरभाने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी:गजानन ढोबाळे

राजकुमार तिरभाने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी:गजानन ढोबाळे

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):

बेघर, निराश्रीत, भटक्या जमातींच्या मुलांना शिकविण्यासाठीची धडपड करणारे राजकुमार तिरभाने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.भारत देश स्वयंपूर्ण होण्याच्या वाटेवर जरी असला तरी देशातील असंख्य समस्या सुटने कठीण आहे यावेळी शासनाची वाट न बघता आपल्याला काही करता येऊ शकते का याचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे, असा विचार करणारे राजकुमार तिरभाने यांचा तनिष्का ग्रामीण विकास संस्था लिंगा मांडवी चे अध्यक्ष गजानन ढोबाळे व ग्रामगीताचार्य प्रशांत दादा मानमोडे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात गजानन ढोबाळे यांनी सत्कारमुर्ती तिरभाने सर यांच्याकडून इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे म्हटले. कोणताही मोबदला न घेता समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी आपलं घर, कुटूंब, आणि शाळा सांभाळून कारंजातील बेघर वस्तीत जाऊन मुलांना शिकविण्यासाठी रोजच जातात. ही प्रेरणादायी घटना आहे. यातुन इतरांनी प्रेरणा घेऊन नवा मार्ग पत्कारावा असे वाटते.
यावेळी श्री तिरभाने म्हणाले की आता त्या मुलांना पण शिकण्याची आवड निर्माण झाली आहे. मुलांना बाराखडी शिकवणे चालू आहे. त्यांना वाटतं की मला माझं नाव लिहीता यावं, घरातल्या सदस्यांची नावे लिहीता यावी अशी जिद्द मनात तयार झाली आहे.
ग्रामगीताचार्य प्रशांतदादा मानमोडे यांनी राष्ट्रसंतांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्व व ग्रामगीता प्रणित शिक्षणप्रणाली याविषयी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन श्री. सोमकुवर, शिक्षक सोहमनाथ विद्या मंदिर उमरी लाभले होते.त्यांनी सुद्धा गौरवउद्गार केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला संगीता शिरखेडकर, मनिषा ढोले, विजय कोडापे व इतर शिक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोमल डोंगरे तर आभार कुणाल भक्ते यांनी केले.