काव्यशिल्प Digital Media: कुक्कुटपालन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label कुक्कुटपालन. Show all posts
Showing posts with label कुक्कुटपालन. Show all posts

Monday, October 15, 2018

पशुपक्ष्यांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन डिसेंबरमध्ये:प्रदर्शनीत कुक्कुटपालनाचा सहभाग

पशुपक्ष्यांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन डिसेंबरमध्ये:प्रदर्शनीत कुक्कुटपालनाचा सहभाग

कुक्कुटपालन प्रदर्शन साठी इमेज परिणाम
संग्रहित 
मुंबई/प्रतिनिधी:
 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे हे उपक्रम वाढीस लागले आहेत. शेतकऱ्यांना पशुधनाचा फायदा घेता यावा यासाठी जालना जिल्ह्यात राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन डिसेंबर महिन्यात केले जाणार आहे. या प्रदर्शनासाठी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग उपस्थित राहणार आहेत. देशभरातील मान्यताप्राप्त विविध जातिवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, घोडे, वराह तसेच जातिवंत कुक्कुट पक्षी यांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. पशुपालकांमध्ये पशुपालनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे हा यामागचा उद्देश असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी जवळपास 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पशुपालकांत पशुपालनाची आवड निर्माण व्हावी, यासह देशी/ संकरित पशुधनाचे जतन व संवर्धन करणे, तसेच पशुधनाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी हे प्रदर्शन घेतले जाणार आहे. जालन्यात जवळपास 150 एकर जागेवर हे प्रदर्शन होणार असून, या प्रदर्शनामध्ये सेल्फ साफिसिएंट गावाचा सेटअप उभारला जाणार आहे. या प्रदर्शनात आधुनिक गोपालन, म्हैसपालन, शेळी- मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन आदी गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात इतर राज्यांचा सक्रिय सहभाग असेल. सोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 100 पशुपालकांचा सहभाग असेल. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट पशुधनास रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.



 कुक्कटपालन व्यवसायात तोटा झाल्याने पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या

कुक्कटपालन व्यवसायात तोटा झाल्याने पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या


 

  उस्मानाबाद/प्रतिनिधी:
कुक्कटपालन व्यवसायात सातत्याने हो
पत्नीचा खून साठी इमेज परिणामरा तोटा, पावसाअभावी नापिकी, कर्ज कसे फेडायचे या नैराश्येतून शिराढोण (जि. उस्मानाबाद) येथील एका शेतकऱ्याने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आला.येथील शेतकरी रामभाऊ गुलाबराव यादव (वय 55) हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. या व्यवसायात त्यांची पत्नी सीताबाई यादव (वय 50) या मदत करतात. यादव कुटुंबाकडे शेतीसाठी व कुक्कुटपालन व्यवसायासाठी बँकेचे जवळपास साडेतीन लाख रुपयांचे कर्ज होते. हे पती- पत्नी शेतातस वास्तव्यास असतात. गेल्या तीन ते चार वर्षात पावसाअभावी नापिकीमुळे उत्पन्नात घट आली आणि कुक्कुटपालन व्यवसायत सातत्याने नुकसान व तोटा झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हे पती- पत्नी तणावाखाली होते, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे रामभाऊ यादव यांनी मध्यरात्री झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून केला व त्यानंतर स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माजीद शेख, पोलिस उपनिरीक्षक महेश कांबळे, पोलिस नाईक बाबासाहेब मोराळे, अमोल उंबरे, दयानंद गाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.



Monday, September 10, 2018

पोल्ट्रीफार्मवर सरकारने लक्ष ठेवावे;वाचा संपूर्ण बातमी

पोल्ट्रीफार्मवर सरकारने लक्ष ठेवावे;वाचा संपूर्ण बातमी

मुंबई/प्रतिनिधी:
 पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन कोंबड्यांची किंवा अन्य पक्ष्यांची तपासणी करण्याचा अधिकार सरकारला नसल्याची माहिती सरकारी वकिलांनी जुलै २०१८ उच्च न्यायालयाला दिली. त्यावर उच्च न्यायालयाने यामध्ये बदल करा, तसेच पोल्ट्री फार्ममध्ये जाऊनच कोंबड्यांची तपासणी करा. खाण्याअयोग्य कोंबड्या बाजारात आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात काय अर्थ? असे म्हणत, न्यायालयाने पोल्ट्री फार्ममध्येच कोंबड्यांची व अन्य पक्षांची तपासणी करण्याची सूचना जुलै २०१८ ला  राज्य सरकारला केली.कोंबड्यांचे वजन वाढविण्यासाठी त्यांना पोल्ट्री फार्ममध्येच अँटीबायोटिक्स देण्यात येतात. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्य सरकारला यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका सिटीझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन या एका सेवाभावी संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले की, बाजारात आल्यानंतर पाहणी करण्यात काय अर्थ? कोंबड्या बाजारात येण्यापूर्वीच त्यांची तपासणी करा. त्यामुळे लोकांच्या ताटात अपायकारक अन्न यायला नको. तसेच सरकारने पोल्ट्री फार्मवर नियंत्रण ठेवावे.
बाजारात आल्यानंतरच पाहणी
पोल्ट्री फार्मवर सरकारचे नियंत्रण आहे का, अशी विचारणा गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सरकारकडे केली होती. त्यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, पशुसंवर्धन विभागाकडून पोल्ट्री फार्मची पाहणी करण्यात येत नाही.व त्यांना कोणत्याच प्रकारचे सहयोग करण्यात येत नाही.कोंबड्या बाजारात आल्यानंतर देखील क्वचितच त्यांची त्याची पाहणी करण्यात येते.


Sunday, June 03, 2018

वादळाच्या तडाख्याने कुक्कुटपाल केंद्राचे छत उडाले

वादळाच्या तडाख्याने कुक्कुटपाल केंद्राचे छत उडाले

Storm Storm; Loss of millions | वादळाचा तडाखा; लाखोंचे नुकसानवर्धा/प्रतिनिधी:
 जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी वादळाचा चांगलाच फटका बसला. यात अनेक गावांतील घरांवरील छत उडाले. यामुळे अनेकांच्या घरांतील जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्याचे दिसून आले. या वादळात रसुलाबाद येथील कुक्कुटपाल केंद्राचे छत उडाले. यामुळे सुमारे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर गिरड लगतच्या केसलापूर येथील घरांवरील छप्पर उडाले. शेकापूर (बाई), विरूळ आकाली येथील घरांवरील छप्पर उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले.
रसुलाबाद येथे वाऱ्यामुळे परिसरातील अनेक घरांवरील टीना कवेलू ताडपत्री उडून गेली. शिवाय येथील युवा शेतकरी सागर भोयर यांच्या शेतामधील कुक्कुटपालन केंद्राचा नवा शेड पुर्णत: उडाला. या छतावरील टीना उडून १ किमी अंतरावर जावून पडल्या. या वादळात केवळ छतच उडून गेले नाही तर भिंंतही पडली. यावेळी सागर भोयर केंद्रावर हजर असल्याने ते जखमी झाले. या शेडमध्ये सात दिवसाचे कोंबडीचे पिल्ले होते. ते जखमी झाले तर काहींचा या वादळात मृत्यू झाला. यात त्यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले.
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


Wednesday, April 04, 2018

पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमिटेड ची स्थापना

पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमिटेड ची स्थापना

poultry farming साठी इमेज परिणामआदिवासी महिलांच्या मालकीची कुक्कुटपालन करणारी राज्यातील पहिलीच कंपनी
चंद्रपूर/प्रतिनिधी:                                                    अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा तालुक्यात पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमिटेड ची स्थापना करण्यात आली आहे. अशा पध्दतीची कुक्कुटपालन करणारी आदिवासी महिलांच्या मालकीची ही राज्यातील पहिलीच कंपनी आहे.
          टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने मूल, पोंभुर्णा व गोंडपिपरी या तालुक्यांमध्ये एक हजार आदिवासी महिलांना कुक्कुटपालन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पोंभुर्णा तालुक्यातील 345 महिलांना कुक्कुट शेड उपलब्ध करण्यात आल्या आहेत आणि 12 एप्रिल पर्यत बॉयलर पिल्ले देखिल या महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या आदिवासी महिलांच्या कंपनीची पहिली बोर्ड मिटींग जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत कंपनीच्या पुढील प्रवासाच्या व कार्याच्या दृष्टीने विस्तृत चर्चा झाली. आदिवासी महिलांच्या हक्काची ही राज्यातील प्रथमच कंपनी असून हा प्रकल्पच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला महत्वपूर्ण प्रकल्प असल्याने या संदर्भात जिल्हा प्रशासन पुर्णपुणे या प्रकल्पाच्या पाठीशी असल्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यावेळी बोलताना म्हणाले.
          भारत सरकारच्या कार्पोरेट कार्य मंत्रालयातर्फे पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमिटेड या कंपनीला  प्रमाणपत्र सुध्दा प्रदान केले असून सदर कंपनीच्या माध्यमातून कुक्कुटपालनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आदिवासी बहुल पोंभुर्णा तालुक्यात महिलांना आत्मनिर्भर करत रोजगार देणारा हा प्रकल्प निश्चितच राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.