महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा 15 जुलै 2018 ला चंद्रपूर जिल्हयातील 9 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 या वेळेत घेण्यात येणार आहे.
परीक्षेस येतांना प्रवेशपत्रासोबत ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बॅकेचे पासबुक शाळा, महाविद्यालयाचे अद्यावत ओळखपत्र यापैकी एखादा पुरावा जवळ असणे आवश्यक आहे.
तसेच परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 मिनीटे आधी परीक्षागृहात प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्र परीसरात किंवा परीक्षागृहात परीक्षार्थी, पर्यवेक्षक, लिपीक, शिपाई यांना मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली असून असे साहित्य आढळल्यास प्रशासकीस कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी कळविले आहे.
शिक्षक पात्रता परिक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू
15 जुलै 2018 रोजी होणा-या शिक्षक पात्रता परिक्षा 2018 परिक्षा केंद्राच्या परिसरात जिल्हादंडाधिकारी, चंद्रपूर यांनी सकाळी 6.00 ते सायं. 7.00 वाजेपर्यंत कलम 144 लागू केली आहे. त्या अनुषंगाने परिक्षा केंद्राच्या परिसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सदर परिक्षा केंद्राच्या 100 मिटर क्षेत्राअंतर्गत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालीना प्रतिबंध राहील, उपरोक्त कालावधीत परिक्षा दिनी परिक्षा केंद्राच्या 100 मिटर क्षेत्रअंतर्गत झेरॉक्स फॅक्स, ई-मेल, मोबाईल फोन आणि इंटरनेट सवलती किंवा अन्य कोणतेही कम्मुनिकेशन सवलतीवर प्रतिबंध राहील.सदर आदेश जनता विद्यालय, हिंदी सिटी हायस्कुल, विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूल, भवानजीभाई चव्हाण हायस्कुल, सेंट मायकेल इंग्लीश स्कुल, ज्युबली हायस्कुल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज व सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर या ठीकाणी लागू राहील.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम वा समुह प्रचलित कायदेशिर तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी चंद्रपूर, तहसिलदार चंद्रपूर, महानगर पालिका कार्यालय चंद्रपूर, शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक व माध्यमिक जि.प. च्या नोटीस बोर्डावर आणि सार्वजनिक ठिकाणी आदेशाचे प्रत चिटकवून नागरिकांना अवगत करावे असे निर्देश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहे.