সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, May 08, 2012

चंद्रपूर जिल्ह्या

चंद्रपूर जिल्ह्या

चंद्रपूर जिल्ह्यात एकुण 15 तालुके असुन माहे ऑक्टोंबर 2004 मध्ये कोरपना राजुरा विकास खंडामध्ये विभाजन होऊन जिवती या विकास खंडाची निर्मिती झाली याप्रमाणे जिल्ह्यात एकुण 15 पंचायत समित्या आहेत. जिल्ह्यात एकुण 847 ग्राम पंचायती आहेत. या जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा असून पुर्वी येथे गोंडराजे अनेक वर्षे राज्य करीत होते. पांडव वंशियांच्या इतिहासाची सुरुवात ही कोततामिलल नावाच्या गोंडवशीयापासून झाली असून गोंडवंशियांचा प्रथम  अधिपती भिम लालभिंग पासून होवून शेवटी निळकंठशहापर्यंत गोंडवंशिय राजवट होती. याच राजवटीत बल्लारशाह यांनी चंद्रपूर शहर भोवती मजबूत असा दगडी परकोट (भिंत) संरक्षणासाठी बांधली ती चंद्रपूर शहराची वैशिष्टे म्हणून आज अस्तित्वात आहे. याशिवाय भद्गावती, बल्लारपूर माणिकगड येथे सुध्दा मोठे किल्ले आहेत. येथे अंचलेश्वर महाकाली मातेची इतिहास प्रसिध्द मंदिरे गोंड राजांनी बांधली. येथे दरवर्षी चैत्र पोर्णिमेला महाकाली यात्रा भरते. या यात्रेसाठी परभणी, नांदेड, भागातून हजारो भाविक मोठ्या प्रमाणात येतात.
           
जिल्ह्यात पूर्व सिमेवर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी वैनगंगा आणि पश्चिम सिमेवर वाहणा-या वर्धा नदीने जिल्ह्याचे दोन नैसगिक सिमा आखल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात.
           
जिल्ह्यात विविध प्रकारची विपुल खनिज संपत्ती आहे. दगडी कोळसा, कच्चे लोखंड, चुनखडी यांचे फार मोठे साठे आहेत. तसेच उत्कृष्ठ विपुल नैसर्गिक संपत्ती हे ह्या जिल्ह्याचे वैशिष्ठे आहेत. जंगलात मौल्यवान सागवान लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. याशिवाय जळावू लाकूड, तेंदूपत्ता, बांबू, डिंक, इत्यादी वनउपजही मोठ्या प्रमाणत मिळतात.

जिल्ह्यातील ८० टक्के लोक शेतीवरच आपली उपजिविका करतात. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात भात हे प्रमुख पिक आहे. इतर भागात सोयाबीन, ज्वारी, कापूस तूर ही पिके प्रमुख आहेत. वर्धा, इरई, अंधारी, वैनगंगा, पैनगंगा, बारमाही वाहणा-या नद्या आहेत.

जिल्ह्यात एकुण चार सिमेंट कारखाने आहेत. तसेच प्रत्येक एक याप्रमाणे कागद, पोलाद, मॅगनिज, रेफ्रिजरेटर निर्माण करण्याचे कारखाने आहेत.
जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र :-  १०,७९३.०९ चौ.कि.मी.
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण व पूर्वभागात १८.४ ते२०.५ याउत्तर अंषावर व ७८.५ ते ८०.६ टक्केया पूर्णरेखांष या भौगोलिक पट्टयात बसला आहे.

जिल्हयाची लोकसंख्य :- जिल्हयाची २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २०,७१,१०१ याैकी ग्रामीण लोकसंख्या १५,१३,४०२ आहे.

प्राकृतिक रचना :-
टेकडयाचा भाग, नद्याचेसखोल मैदान व डोंगराळ भाग.

भूगर्भरचना :-
प्रस्तर लाव्हांचा समावेच्च आहे.  कार्बन, ऍमाच्चिस्ट कुळसाईट, ऍसे, जैस्पर यासारखी खनिजे, खडक साधारण काळा पांढ-या चुनखडी व वाळू. जमिन काळी असून ऍल्युमिनियम, कॉबोर्नेटमॅग्नेच्चियम व काही प्रमाणात पोटॅच्चियम नग व स्फुरद यांचा समावेच्च आहे.

नद्या :- वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी या नद्यामुळेशेतजमीन सुपीक बनली आहे.

तलाव :- जिल्हयात एकुण १६७८ माजी मालगुजारी तलाव असून मध्यम तलाव ७ आहेत.  नलेश्‍वर, चारगांव, आसोलामेंडा, लभानसराड, अमलनाला, चंदईनाला, घोडाझरी या तलावामुळे मत्स्यव्यवसाय मोठयाप्रमाणात होतो. ० ते१०० हेक्टर चे८० लघुपाटबंधारे तलाव आहेत.

वन :- जिल्हयात सर्वच तालुक्यात वनक्षेत्र विखुरलेल्या स्वरूपात आहेत.  जिल्हयातील ३,५०,२०० हेक्‍टर क्षेत्र वनाखालील असनू त्याचा जिल्हयाच्या एकुण भूक्षेत्राची ३२.०६ इतकी टक्केवारी आहे.

हवामान व पर्जन्य  :- चंद्रपूर जिल्हयाचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. पावसाळयात दमट असते. उन्हाळयात तापमान जास्त असते. जिल्हयात पावसाचे प्रमाण जास्त असुन सिंदेवाही, ब्रम्हपुरी, नागभीड, मूल, पोंभुर्णा, सावली इत्यादी तालुक्यात पाऊस जास्त पडतो.  जिल्हयाचे सर्वसाधारण  पर्जन्यमान १३०९.५० मि.मि. आहे.
 
जलसिंचन :- कोल्हापूरी बंधारे ५५१ सिंचन क्षमता १९३०० हेक्टर, जवाहर विहिरी ६५३४, इतर विहिरी १९३५,तेलपंप ४७७६, विजपंप १२८७१०.
 
ग्रामीण व नागरी लोकसंखेचेप्रमाण :- जिल्हयाच्या एकुण लोकसंख्यापैकी ७३.०७ टक्के लोक ग्रामीण भागात तर २६.९३ टक्के शहरात राहतात.

अनुसुचित जाती जमाती :- २००१ च्या जनगणनेनुसार जिल्हयातील एकुण लोकसंख्येत अनुसुचित जाती प्रमाण १४.३ टक्केअसून अनुसुचित जमातीचेप्रमाण १८.१ टक्के आहे.

कामगार :- २००१ चे जनगणेनुसार जिल्हयातील एकुण कामगारांची संख्या ९,३०,७९१ आहे. काम करणा-यापैकी २५.७ शेतकरी, ३९.३ शेतमजूर , २.२ घरगुती उद्योग व ३२.९ टक्‍के इतर सेवेत.

भूधारक  :- १९९०.९१ च्या कृषि गणनेच्या माहितीनुसार जिल्हयात  एकुण २,०१,५०० भूधारक  असून एकुण शेतजमीन ५२००८१ हेक्टर आहे.

पिकपध्दती :- जिल्हयातील २००४-२००५  मधील एकूण पिकाखाली असणा-या ५,३९,८०० हेक्टर क्षेत्रापैकी खरीप हंगामात तृणधान्य पिकाखाली क्षेत्र १२९७७९ हेक्टर, कडधान्य पिकाखाली २४४५५ गळीत धान्यपिकाखाली १४८३१५ हेक्टर क्षेत्र आले आहे.

महत्वाचे उद्योग :- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य थर्मल विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्वाचे उद्योग स्थित आहेत. बाबा आमटेंचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे :- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी
वनराणी' होण्यासाठी "वधू'ची पायपीट

वनराणी' होण्यासाठी "वधू'ची पायपीट


चंद्रपूर - सकाळी 11 चा लग्नाचा मुहूर्त. वधूपक्षाची मंडळी पहाटेच जागी झाली. जिच्या हाताला हळद लागली होती ती "वधू' मात्र घरातून सकाळीच 5 वाजता निघून गेली. आयुष्यातील महत्त्वाचा क्षण अगदी जवळ येऊन ठेपला असताना तिला मात्र तिच्या भविष्याचीही चिंता होती. इकडे तिच्या घरच्या मंडळीची लग्नाची लगबग सुरू असतानाही ही "वधू' वनराणी होण्यासाठी मेंदी लागलेल्या हाताने रानावनात चक्क 16 कि. मी. पायी चालत होती.

चंद्रपूर वनविभागामार्फत सोमवारी (ता. सात) वनपाल पदासाठी शारीरिक चाचणी घेण्यात आली. यात चंद्रपूर तालुक्‍यातील येरूर या गावाची जया गुलाब वैद्य ही 22 वर्षीय तरुणीही उमेदवार होती. जयाने अध्यापनशास्त्राचे धडे घेतले असून सध्या बीएससीच्या द्वितीय वर्गाला ती आहे. या चाचणीत 16 कि. मी अंतर चार तासांत कापायचे होते. जुनोना येथून सुरू झालेल्या या पायदळीत शेकडो युवती सहभागी झाल्या होत्या; मात्र यात जयाची गोष्टच वेगळी होती. कारण जयाचा आज भद्रावती येथील एका मंगल कार्यालयात अमोल झाडे या युवकाशी विवाह सकाळी 11 वाजताच्या सुमाराला होणार होता; परंतु वनपालाची परीक्षा आल्याने तिला इकडे यावे लागले. आपल्या वडिलांसोबत सकाळी पाच वाजता ती जुनोना येथे पोचली. लग्नाची घटिका जवळ येत असताना जीवघेण्या उन्हात तिने 16 कि.मी.चे अंतर वेळेच्या आधीच पार केले. त्यानंतर ती वडिलांसोबत लग्नमंडपात भद्रावती येथे रवाना झाली. दुपारी 2 वाजताच्या सुमाराला जया आणि अमोलच्या डोक्‍यावर अक्षतांसह मोठ्यांचे आशीर्वाद पडले. तिच्या भावी आयुष्याची घडी बसविताना लग्नघटिकेचा वेळ थोडा टळला; मात्र त्याचा आनंद वधू आणि वर दोन्ही पक्षांच्या चेहऱ्यावर दिसत होता.