काव्यशिल्प Digital Media: नरखेड

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label नरखेड. Show all posts
Showing posts with label नरखेड. Show all posts

Monday, November 20, 2017

खर्च झाले 88 हजार पण, काम काहीच नाही

खर्च झाले 88 हजार पण, काम काहीच नाही

खापा (घुडण) - अमरजीत जांभुळकर
नरखेड़ तालुक्यातील दोन हजरांच्या घरात असलेल्या लोकसंख्येचे गांव खापा येथील वादां चा वा ग्रामपंचायत तक्रारीं चा  महापुर हा काही केल्यास थंबता थंबे नासा झाला आहे गावातील कोंडवाडा दुरुस्तीच्या नावाखाली 88 हजार 600 रूपयाचा घोटाला झाल्याची बाब माहिती अधिकारतून पुढे आली आहे,

गावमध्ये गुरांच्या कोंड वाडयावर 88 हजरांच्या निधी खर्च करण्यात आला आहे मात्र हयात कोडवाडयाची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती झाली नाही आजच्या स्थितीत कोडवाड्याची अवस्था ही भयान आहे ,
  नरखेड़ तालुक्यामधे अनेक गावात 19 में 2016 ला मोठे वादळ आले होते यात खापा ,जामगांव ,घोगरा अश्या अनेक गांवचा समावेश होता यात अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते ज्या प्रमाणे घरांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे खापा येथील ग्रामपंचयतिच्या मालकीच्या गुरांच्या कोडवाड्याचे पूर्णपणे छप्पर उडून गेले होते उडून गेलेले छप्पर आणि त्यातच काही दुरुस्तीसाठी ग्रामपंचयतीने 14 वा वित्त आयोगातुन निधिही खर्च केला परंतु त्या खर्च केलेल्या निधितुन काहीच दुरुस्ती न झाल्याने ही बाब गवकार्यांच्या लक्षात आल्याने गावातील श्याम मानमोड़े यांनी महितीच्या अधिकारचा उपयोग करीत कोंडवाड्यावरील ख़र्चची माहिती घेतली या आधारावर श्याम मानमोड़े यांनी नागपुरचे विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी ,नरखेड़ पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी ,यांच्याकडे कामात घोळ झाल्याची तक्रार केली आहे , त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कोंडवाडा दुरुस्तीच्या नावाखाली गांव सरपंच व ग्राम सचिव यांनी 88 हजार 600 रुपये खर्च केला ,पण कोंडवाडा मात्र ज्या स्थितीत 19 में 2016 नंतर होता त्याच स्थितीत आजदेखिल आहेच इतकेच नव्हे तर एकीकडे केंन्द्रपासुन तर राज्यापर्यन्त संपूर्ण शासन डिजिटल इंडिया करिता असून संपूर्ण पेमेंट ऑनलाइन करण्यावरच ज्यास्त भर देत आहे पण मात्र ग्रामपंचायतिने मटेलिअल सप्लायर पासून तर मजूरा पर्यंत सर्वांना रोखिने पगार दिला आहे ,ही गंभीर बाब असून देखील रोखिने शासकीय व्यवहार करने म्हणजेच घोटल्याला जन्म दिलेला आहेच ,

* असे झालेत कोंडवाड्याचे रोखिचे व्यवहार *

   या कोंडवाड्याच्या कामावर 14 एप्रिल 2016 ला 20 हजार रु ,28 में ला मजूरिच्या नावावर 7 हजार 500 रु 3 जून 2016 मजूरिच्या नावावर 7 हजार रु 9 जून 2016 ला मटेरियल 33 हजार रु 7 जून 2016 ला मजूरिच्या नावावर 9 हजार 600 पुन्हा 30 आगस्ट 2016 ला 3 हजार अश्या प्रकारे एकूण 88 हजार 600 रुपये खर्च करण्यात आले आणि ज्या मजूरांच्या नावी ही मजूरी काढण्यात आली ते मजूर कधी कोंडवाड्याच्या कामाला गेलेच नाही ,जऱ कामच झाले नाही तर मजूर कामाला जातिल तरी कुठे आणि कशे , कोंडवाडा खर्च 88 हजार झाला मात्र तो नादुरुस्तीच त्याची स्थिती ही जैसे तेच , असल्याने या कामात मोठा भ्रष्ट्राचार असून ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांनीच घोटाळा केला असल्याने या घोटाळा बाजां वर चौकशी करुण कार्यवाही करण्याची मांगणी करण्यात आली आहे .

९०२११६६१४४
९८६०८४८२४२