काव्यशिल्प Digital Media: तावडे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label तावडे. Show all posts
Showing posts with label तावडे. Show all posts

Friday, January 12, 2018

 शिक्षण कायद्याच्या कक्षेत राहून शाळाबंदीची कार्यवाही

शिक्षण कायद्याच्या कक्षेत राहून शाळाबंदीची कार्यवाही

रत्नागिरी/प्रतिनिधी:  
इमेज परिणाम
शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षणाचा हक्क कायद्याच्या कक्षेत राहूनच राज्यातील सुमारे १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पुन्हा एकवार अधोरेखित केले.राज्यभरातील शिक्षकांनी केलेल्या अभिनव आणि कल्पक प्रयोगांचे एकत्रित दर्शन घडवणारी ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना, शासनाच्या शैक्षणिक धोरणाबाबत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या टीका-तक्रारींना शिक्षणमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय आधीच्या आघाडी सरकारने घेतला होता.

त्यामध्ये बदल करून किमान पटसंख्या १० पर्यंत खाली आणण्यात आली. तरीही त्यामुळे सुमारे साडेपाच हजार शाळा बंद कराव्या लागल्या असत्या. म्हणून प्रत्यक्ष जागेवर दोन शाळांमधील अंतर मोजून मोठय़ा पटसंख्येच्या शाळेपासून १ किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या कमी पटसंख्येच्या शाळांचे मोठय़ा शाळेमध्ये सम्मीलन करण्यात आले. या प्रक्रियेत इमारत बदलली असली तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. राज्यामध्ये २०१४ साली लागू झालेल्या शिक्षणाचा हक्क कायद्याच्या आधीन राहूनच ही कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामध्ये काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या तर त्या दुरुस्त करण्याची तयारी आहे.बहुजनसमाजाला अधिक गुणात्मक शिक्षण मिळण्यासाठी राज्य शासनाने प्रथमच विविध उपाययोजना केल्या असल्याचे सांगून तावडे म्हणाले मुलांना जास्त चांगले शिक्षण मिळण्यासाठीच खासगी उद्योगांना कंपनी कायद्याच्या कलम ८ अन्वये ना नफा, ना तोटा तत्त्वावर शाळा काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिक्षकांना अकारण त्रास देण्याचा किंवा त्यांचे काम वाढवण्याचा शासनाचा हेतू नाही. उलट, त्यांची शाळाबाह्य़ कामे कमी व्हावीत म्हणून निवडणूक आयोगाला स्वतंत्र मनुष्यबळ नेमण्यासाठी निधी देण्याचीही तयारी शासनाने दाखवली आहे. राज्याच्या दुर्गम भागात ऑनलाइन कामामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन काही सवलतही देण्यात आली आहे. पण या पद्धतीमुळे शिक्षण विभागातील निरनिराळ्या पातळ्यांवरील चिरीमिरी बंद झाली आहे आणि हेच काहीजणांचे दु:ख आहे, असाही टोमणा तावडे यांनी मारला.

अध्ययन-अध्यापनातील अडथळे दूर करण्यासाठी शिक्षकांना सक्षम करण्याच्या हेतूने आयोजित ‘शिक्षणाची वारी’ या प्रदर्शनामध्ये राज्यभरातील शिक्षकांनी केलेले अभिनव प्रयोग ५५ स्टॉल्सच्या माध्यमातून मांडण्यात आले असून संबंधित शिक्षकही त्याबाबत विवेचन करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत.या शिक्षकांच्या बांधिलकीचे शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच असे उपक्रम जिल्हा पातळीवर आयोजित होण्याची गरज प्रतिपादन केली. कार्यक्रमापूर्वी त्यांनी प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या स्टॉल्सना भेट देऊन तेथील विविध शैक्षणिक प्रयोगांबाबत माहिती घेतली.

हे प्रदर्शन येत्या शनिवापर्यंत मुंबई विभागातील रायगड आणि कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग या जिल्ह्य़ांमधील निवडक शालेय शिक्षकांसाठी दररोज सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत खुले राहणार आहे. तसेच दुपारी तीननंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अन्य शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि नागरिक वारीला भेट देऊ शकतील.शालेय शिक्षणामधील गणित, भाषा वाचन विकास, कला व कार्यानुभव, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, क्रीडा इत्यादी विषय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत परिणामकारक पद्धतीने पोचवण्यासाठी केले प्रयोग या वारीमध्ये पाहायला मिळणार आहेत. यापैकी बरेचसे साहित्य संबंधित शिक्षकांनी स्वत: तयार केले असून त्याबाबतची पद्धत समजावून सांगितली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातून स्पोकन इंग्लिश, जलद गतीने शिक्षण आणि लेक वाचवा या विषयावरील स्टॉल मांडण्यात आले आ