काव्यशिल्प Digital Media: पर्यावरण

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पर्यावरण. Show all posts
Showing posts with label पर्यावरण. Show all posts

Thursday, November 08, 2018

अजगराला जीवदान..

अजगराला जीवदान..

 शंकरपूर/प्रतिनिधी:

 येथूनच जवळच असलेल्या डोमा येथील शेतकरी शिवशंकर मुन यांच्या शेतामध्ये धान कापणी करीत असताना मजुरांना अजगर साप दिसला असता त्यांनी शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य आमोद गौरकर यांना अजगर साप असल्याची माहिती दिली असता तरुण पर्यावरणवादी मंडळाचे  सदस्यांनी शिव शंकर मुन यांच्या शेतात अजगराला पकडण्यात आले. यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक अजगरा पाहायला गर्दी केली होती.
सदर अजगर दहा फूट असून वनविभागामार्फत सुरक्षित डोंगरगाव तलाव जंगलात सोडण्यात आले आहे यावेळी वनविभागाचे कर्मचारी प्रदिप ढोणे, लांजेवार,  व तरुण पर्यावरणाची मंडळाच्या सदस्य जगदीश पेंदाम, महेश शिवरकर, मेजर कासवटे, निकेश शिवरकर, आकाश कन्नाके उपस्थित होते.

Thursday, June 14, 2018

पत्रकार दिनेश एकवनकर पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

पत्रकार दिनेश एकवनकर पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र नाभिक महामडंळाचे विदर्भ प्रसिद्धी प्रमुख तथा दिनचर्या वर्तमान पत्राचे संपादक दिनेश एकवनकर यांना २०१८ चा पर्यावरण मित्र पुरस्कारानी सन्मानीत करण्यात आले.दिनेश एकवनकर हे नाभिक समाजाच्या समाजकार्या बरोबर ते पत्रकार, आणी पर्यावरणासाठी नेहमी सर्कीय सहभाग दर्शवितात. आपल्या वृतपत्राच्या दिनचर्या दिनदर्शीकेतून ‘झाडे लावा झाडे जगवा‘ पाणी अडवा पाणी जिरवा, प्रदुषणमुक्त, ‘स्वच्छ भारत‘ असा प्रसार आपल्या वर्तमान पत्रातून जन जागृती करीत असतात.त्यांचा अशा विविध सामाजिक समाज उपक्रमाची दखल घेवून तसेच जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने पर्यावरण मेळाव्यात हा पूरस्कार मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला. जिल्हापरिषद कन्नमवार सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक मोरेश्वर टेमुर्डे, माजी विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र्राज्य, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डि. के. आरिकर संस्थापक, पर्यावरण संवर्धन व विकास समिती,राष्ट्र्वादी कॉंग्रेस पार्टीचे महासचिव हिराचंदजी बोरकूटे, गडचांदूरच्या नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,गोंडपिपरीचे नगराध्यक्ष मा. संजय झाडे, मा. निपचंद शेरकी अध्यक्ष,रयत नागरी सह.पत संस्था मूलयांची मंचावर प्रामुख्याने उपस्थीती होती.

Tuesday, June 05, 2018

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात अव्वल ठरावा:देवराव भोंगळे

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात अव्वल ठरावा:देवराव भोंगळे

आता एकच लक्ष 13 कोटी वृक्ष
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त्य संयुक्त रॅलीजागर  
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जुलैपासून एक महिना संपूर्ण जिल्हयात वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम राबविण्यात यावा. गेल्या वर्षी चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात दुस-या क्रमांकावर होता. यावेळी मात्र 13 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहील. यासाठी नियोजन करु या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज येथे केले.दिनांक 05 जून 2018 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमीत्य निसर्ग संवर्धन व पर्यावरण जनजागृती वाढविण्यासाठी तसेच सन 2018 चे पावसाळयात 01 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये वृक्ष लागवडीबाबत मोठया प्रमाणात प्रचार व प्रसार व्हावा याकरीता भव्य संयुक्त रॅलीचे वनविभागाच्या वतीने आयोजन करण्यांत आले.

रॅली महानगरपालीकेचे पटांगण, गांधी चौक येथुन निघून जटपूरा गेट-बस स्टॅण्ड मार्गे रामबाग वनवसाहत येथे संपन्न करण्यांत आली. महापौर अंजलीताई घोटेकर, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य मुकूल त्रिवेदी, जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांचेहस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरूवात करण्यांत आली. रॅलीमध्ये वनविभाग, वन्यजीव विभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण, महानगरपालिका, राजस्व विभाग, पोलीस विभाग, कारागृह विभाग, महावितरण, इत्यादी इतर प्रशासकीय यंत्रणा, अशासकिय संस्था, प्रामुख्याने ईको-प्रो, हरित चळवळ इत्यादींनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. रॅलीची सांगता रामबाग कॉलनी येथे करून उपस्थितांना पर्यावरण, वृक्ष लागवडीबाबत व प्लॅस्टीकच्या बंदीबाबत सविस्तर मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवरावजी भोंगळे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी केले.
पूर्वी बहुउद्देशिय संस्था, पोंभुर्णा यांनी कलापथकाच्या माध्यमातून पर्यावरण व वृक्ष लागवडबाबत लोकांना संदेश दिला. तसेच पंडीत जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, महानगरपालिका, चंद्रपूर येथील शिक्षक उमेश आत्राम यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरण, वृक्ष लागवड व वन्यजीव संरक्षणाबाबत कलेचे सादरीकरणद्वारे जनजागृती करण्यांत आली.
पर्यावरण दिनाचे औचित्त्याने दिनांक 14 मे 2018 रोजी चंद्रपूर जवळच्या जंगलात ‍बिबटला जेरबंद करण्यांत दाखविलेल्या धैर्याबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे चंद्रपूर यांचे महापौर, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांनी तसेच कार्यक्रमस्थळी मा. श्री. देवरावजी भोंगळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर व कर्मचारी यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रामुख्याने श्री. बडकेलवार, समन्वयक अधिकारी, 50 कोटी वृक्ष लागवड, श्री. ब्राम्हणे, श्री. करे, श्री. धोतरे,‍ विभागीय वन अधिकारी व वनविभागाचे, ईतर विभागाचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वनविश्रामगृह परिसरात वृक्षारोपन करण्यांत आले.कार्यक्रमाचे संचालन श्री. शेंडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. संतोष थिपे, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे.), चंद्रपूर यांनी केले.


Monday, June 04, 2018

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5जून रोजी भव्य रॅलीचे आयोजन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5जून रोजी भव्य रॅलीचे आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2018 रोजी सकाळी 8 वाजता महानगर पालिका पटांगण, गांधी चौक चंद्रपूर येथून निसर्ग संवर्धन व पर्यावरण जनजागृती वाढविण्यासाठी भव्य संयुक्त रॅलीचे आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर तर मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक ऋषीकेश रंजन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी, जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोत्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहे. या रॅलीमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे या वर्षीच्या 13 कोटीच्या वृक्ष लागवडीच्या अभियानाला यशस्वी करावे, असे आवाहन वन‍ विभाग, वन्यजीव विभाग व वन विकास महामंडळाने जनतेला केले आहे.


Wednesday, February 14, 2018

 पर्यावरण संवर्धन समीतीचा प्लास्टिक मुक्तीचा निर्धार

पर्यावरण संवर्धन समीतीचा प्लास्टिक मुक्तीचा निर्धार

चिमुर/प्रतिनिधी:
 कोणत्याही सामाजिक ऊपक्रमाची सुरुवात स्वत: पासुन करायची या भावनेने प्रेरित होउन पर्यावरण संवर्धन समीती भिसी तर्फे भिसी प्लास्टिक मुक्तीची सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्र भीसी पासुन करण्यातआली. 
                      प्लास्टिक हा पर्यावरणाला धोका पोहचविणारा घटक आहे . प्लास्टिकमुळे पर्यावरण प्रदूषण  दिवसेदीवस वाढत आहे .त्यातच भीसी येथील प्राथमीक आरोग्य केंद्र प्लास्टिकच्या साम्राज्यात फसले होते. प्लास्टिक कूजत नसल्यामुळे प्लास्टिकचे प्रमाण वाढतच आहे. भीसी येथिल आरोग्य केंद्रामध्ये सलाईन, ईन्जेक्शन , विघटन न होणारे पदार्थ  असल्यामुळे  सर्व परिसर प्लास्टिकमय झाला होता.
 पर्यावरण संवर्धन समीती भीसी कडुन प्राथमीक आरोग्य केद्र प्लास्टिक मुक्त करण्यात आले  यावेळी  पर्यावरण संवर्धन समीतीचे अध्यक्ष कवडू लोहकरे,  प्रा. गजानन माडवे ,पंकज वर्मा, सुरेशजी बैनलवार, श्रीकांत ठोबरे ऊमाकांत कामडी,  कुणाल खवसे, कैलास रामटेके , सचीन खडके ,प्रविन लोहकरे , मोहन केडझरकर, आशिष पडोडे , अक्षय खवसे, रमेश हीवरे , आबीद शेख, चंद्रशेखर रेवतकर, आदि सदस्य उपस्थित होते . तथा आरोग्य केद्रा तील कर्मचारी वृंद उपस्थित  राहून प्लास्टिक मुक्तीसाठी सहकार्य केले . पर्यावरण समीतीच्या सामाजिक उपक्रमाचे जीकडे - तीकडे कौतुक होत आहे. 

Monday, January 22, 2018

प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशवी लघुउद्योग प्रेरणादायी:प्रविण टाके

प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशवी लघुउद्योग प्रेरणादायी:प्रविण टाके

संयुक्त महिला मंचचा पुढाकार
चंद्र्पुर/प्रतिनिधी:
पर्यावरण बचाव मोहिमेला हातभार लावण्यासाठी संयुक्त महिला मंच प्लास्टिक मुक्त भारत ही चळवळ राबविण्यासाठी कापडी पिशव्या बनवून जनजागृती करीत आहे.यातून आर्थिक विकास साधण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून महिलांसाठी हा लघुउद्योग प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जपणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके यांनी केले. स्थानिक इंदिरानगर येथील संयुक्त महिला मंच आयोजित कापडी पिशवी लघुउद्योग प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योजिका आरती प्रविण टाके यांची विशेष उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत इंदुमती पाटील यांनी केले.संस्थेने तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संयुक्त महिला मंचाने कापडी पिशवी लघुउद्योग सुरु करुन जनजागृती सोबतच महिला वर्गाला यातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मत उद्योजिका आरती प्रविण टाके यांनी व्यक्त केले. 

प्रास्तविक व संचालन डॉ प्रतिभा वाघमारे तर आभार वर्षा कोडापे यांनी माणले. कार्यक्रमाला शीला देवगडे, गजानन राऊत यांनी सहकार्य केले. प्रा.विमल गाडेकर यांच्या मार्गदर्शनात निमंत्रित महिलांना संस्थेतर्फे कापडी पिशवी भेट देण्यात आली.

Friday, November 17, 2017

राज्यात प्लास्टिक बंदी

राज्यात प्लास्टिक बंदी

पर्यावरण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी गुरुवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. याबाबत आगामी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण विभागाने दिली.गुरुवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण- डोंबिवली, वसई- विरार, मीरा -भाईंदर या महापालिकेचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. प्लास्टिकमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर बैठकीत चर्चा झाली. राज्यात सध्या ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. मात्र आता सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल्स आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूदही करण्यात येणार असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ३ ते ६ महिने शिक्षा आणि परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची समजते. प्लास्टिक बंदीमुळे शीतपेय आणि पाण्याची बाटलीवर बंदी येणार आहे. अशा परिस्थितीत काचेचा बाटल्या हा पर्याय उपलब्ध असेल. तर प्लास्टिक पिशव्यांवरऐवजी कापडी पिशव्यांचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल. यासाठी महिला बचत गटांची मदत घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Monday, November 13, 2017

प्रदूषणात चंद्रपूर राज्यात टॉप

प्रदूषणात चंद्रपूर राज्यात टॉप

चंद्रपूर प्रतिनिधी:
दिल्लीत प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असताना रविवारी चंद्रपूरचा मागील २४ तासांतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) ३२७ सरासरी होता. त्यामुळे राज्यात चंद्रपूर पुन्हा एकदा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्यातील नागपूर व नाशिक येथेही वायू गुणवत्ता निर्देशांक सर्वात घातक दिसून आला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटनुसार दिल्लीचा मागील २४ तासांतील वायू गुणवत्ता निर्देशांक सरासरी ४६० होता. तर चंद्रपूरचा ३२७ इतका होता. रविवारी रात्री ९ वाजता चंद्रपूर शहरातील केंद्राचा वायू गुणवत्ता निर्देशांक १८२ होता. पण, एमआयडीसी खुटाळा परिसरातील दुसऱ्या केंद्राचा एक्यूआय ५००वर गेल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वाधिक प्रदू्षित शहरांच्या यादीत असणाऱ्या चंद्रपूरचे प्रदूषण कमी झाल्याने चंद्रपूर, बल्लारपूर, ताडाली व घुग्घुस या भागातील मॉनिटोरियम रद्द करण्यात आले आहे.