काव्यशिल्प Digital Media: ramala lake

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label ramala lake. Show all posts
Showing posts with label ramala lake. Show all posts

Wednesday, November 21, 2018

 आईने पोटच्या मुलाला पदराला बांधून घेतली तलावात उडी

आईने पोटच्या मुलाला पदराला बांधून घेतली तलावात उडी

ललित लांजेवार:
चंद्रपूर शहरात रामनगर पोलीस स्टेशनच्या हदीतील रामाळा तालावात आईने आपल्याच पोटच्या मुलाला पदराच्या सहाय्याने  पोटाला बांधून तलावात उडी घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उजेळात आली. हे दोघेही दिनांक १९.११.२०१८ संध्याकाळी ६ वाजेपासून बेपत्ता होते.रुपाली आशिष गुज्जेवार वय २८ वर्षे व अभिर आशिष गुज्जेवार वय ५ वर्षे असे या मृत पावलेल्या माय लेकांचे नाव आहे. आई व मुलगा बेपत्ता असल्याची असल्याची तक्रार घरच्यानी २ दिवसा अगोदर संबंधित पोलीस स्टेशनला दिली होती.मात्र थेट २ दिवसानंतर शहरातील रामाळा तलावात मृतदेह तरंगतांना दिसून आल्याने या घटनेचा उलगडा झाला..गुज्जेवार परिवार हे शहरातील जुना पावर हाऊस पी.एच नगर येथे राहत होते. आईने मुलाला घेऊन तलावात उडीका घेतली असावी हे अजूनही स्पष्ट झाले नसून पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे.

रामाळा तलावाच्या हद्दीवरुन नेहमीच शहर पोलीस व रामनगर पोलिसात वाद राहिलेला आणि तो आज पुन्हा सर्वांसमोर आला आहे.घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटना स्थळावर पोहोचले मात्र मृतदेह काढण्यासाठी रामनगर पोलिसांची वाट बघत असल्याने पोलिसांचा असंवेदनशीलता बघयला मिळाली.