Saturday, February 10, 2018
Friday, February 09, 2018
लाखोंचे बक्षीस असणारे नक्षलवाद्यांना चंद्रपूरातून अटक
चंद्रपूर/प्रतिनिधी:

Wednesday, December 06, 2017
गडचिरोलीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात आज भल्या सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला. यात ५ महिला, तर २ पुरुष नक्षल्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मागील महिन्यात ५ निरपराध नागरिकांचे हत्यासत्र चालविणाऱ्या नक्षल्यांना जबर फटका बसला आहे.
Tuesday, November 28, 2017

नक्षलवाद्यांकडून युवकाची गळा चिरून हत्या
पोलीस आणि नक्षलवाद्यांचा वाद काही संपता संपेना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी एटापल्ली तालुक्यातील गट्टा - जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या झारेवाडा येथील जंगलात सशस्त्र नक्षल्यांनी एका युवकाची गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. मनोज राजू नरोटे रा. झारेवाडा, असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार गट्टा -जांभिया पोलिस ठाण्यापासून १० किमी अंतरावरील झारेवाडा गावानजीकच्या जंगल परिसरात आज मनोज नरोटे याचा मृतदेह आढळून आला. ३ वर्षापूर्वी झारेवाडा येथील रमनी आत्राम या महिलेचा खून झाला होता. तेव्हापासून मनोज नरोटे फरार होता. २ महिन्यांपूर्वीच तो गावात परत आला असल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली. मात्र, आज त्याचा मृतदेह आढळून आला. रमनी आत्रामच्या खुनात मनोज नरोटे याचा सहभाग असल्याचा काही जणांचा संशय होता. त्यामुळे मनोजची हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत साशंकता आहे.
चालू आठवड्यात नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन धानोरा तालुक्यातील ३ युवकांची हत्या केली. शिवाय कोटगूल येथील भू-सुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर पडियलमेट्टा जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले. या दोन घटनांमध्ये चार पोलिसही जखमी झाले आहेत. या घटनांवरून झारेवाडा येथील मनोज नरोटेच्या हत्येत नक्षल्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, घटनास्थळी नक्षल्यांनी कुठल्याही प्रकारचे पत्रक न टाकल्याने साशंकता आहे.
Thursday, November 23, 2017
गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात एकाची नक्षलवाद्याकडून हत्या
गडचिरोली ,-/पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी मंगळवारी(ता.२१) रात्री धानोरा तालुक्यातील रानवाही येथील इसमाची गळा चिरुन हत्या केली. जाधव जांगी(४८), असे मृत इसमाचे नाव आहे.
मंगळवारी रात्री २० ते २५ नक्षलवादी जाधव जांगीच्या घरी गेले. त्यांनी जाधवला झोपेतून उठवून बाहेर नेले. दुसऱ्या दिवशी(ता.२२) सकाळी त्याचा मृतदेह राजनांदगाव जिल्ह्यातील औंधी पोलिस ठाण्यांतर्गत रायमनोरा येथील जंगलात आढळून आला. मात्र, जाधव जांगीच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीच्या किंवा शस्त्राच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे त्याची हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत पोलिस साशंक आहेत. दुसरीकडे, घटनास्थळी आढळलेल्या पत्रकावरुन ही हत्या नक्षल्यांनीच केल्याचा अंदाज आहे. १० व ११ जुलै २०१७ रोजी पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत रानवाही व मुंगनेर-येनगावच्या हद्दीत पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षली ठार झाल्या होत्या. नक्षल्यांची माहिती जाधव जांगी यानेच पोलिसांना देऊन चकमक घडवून आणली, जाधव हा पोलिसांचा खबऱ्या आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.
एकाच दिवशी नक्षल्यांनी दोन हत्या केल्या आहेत. २१ नोव्हेंबरच्या दुपारी पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत झाडापापडा येथे कोंबडा बाजारात सुनील तिलकबापू पवार या युवकाची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेत दोन युवक जखमी झाले. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून नक्षल्यांच्या कारवाया थंडावल्या होत्या. परंतु आता त्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
Thursday, November 09, 2017
नक्षल्यांनी पेरून ठेवलेले भू-सुरूंग स्फोटके पोलिसांनी केली नष्ट
भामरागड /प्रतिनिधी-
उपविभागांतर्गत ताडगाव पोलिस मदत केंद्रातील ताडगाव ते पेरमिली मुख्य मार्गावर नक्षल्यांनी बॅनर लावून तसेच पत्रके टाकून त्याखाली पेरून ठेवलेली ८ किलो भू-सुरूंग स्फोटके पोलिसांनी नष्ट केली. पोलिसांच्या सतर्कतेने कोणतीही जिवीत वा वित्तहानी झाली नाही.
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस उपअधीक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या नेतृत्वात क्युआरटी भामरागड, पोलिस मदत केंद्र ताडगाव व सीआरपीएफच्या जवानांना नक्षल्यांनी ताडगाव - पेरमिली मार्गावर बॅनर लावून तसेच पत्रके टाकून त्याखाली भू-सुरूंग स्फोटके पेरून ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस जवानांनी घटनास्थळ गाठून नक्षल्यांनी बॅनर जवळ जमिनीत पेरून ठेवलेले अंदाजे १-१ किलो वजनाचे ५ ब्लास्ट, ३ किलो वजनाचा १ ब्लास्ट असे एकूण ८ किलो वजनाचे ६ ब्लास्ट प्राणहिता बीडीडीएस पथकाचे पोलिस उपनिरीक्षक हिवरकर यांच्या मदतीने जागेवरच नष्ट केले.
सदर कामगिरी भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलिस उपनिरीक्षक राजरत्न खैरनार, क्युआरटी पथक भामरागड, ताडगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक होनमाने, सीआरपीएफ सी-९ चे असिस्टंट कमांडंट मुनीर खान यांनी चोख बंदोबस्त लावून कुठलीही जिवीतहानी व वित्ताहनी न होवू देता यशस्वीरित्या पार पाडली.