चंद्रपूर शहरालगत मुल मार्गावर लोहारा गावाजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या मादी बिबट्याचा मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला .अपघातानंतर उपचारासाठी त्याला गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात आणले होते. तब्बल दोन महिन्यांच्या उपचारानंतरही या बिबट्याची किडनी काम करत नसल्याने बिबट्या मृत्यु झाला. बिबट्याला 16 मे रोजी गोरेवाड्यात आणले होते. प्राथमिक तपासणीत बिबट्याचा मागील उजवा पाय तुटला होता समोरच्या पायाला देखील मोठी जखम झाली होती . त्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली त्याच्या पायात रॉड टाकण्या संदर्भात विचार सुरू होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भाग्यश्री शेंडे यांच्या मार्गदर्शनात त्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याच्या किडनी निकामी झाल्यावर त्या त्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरीष उपाध्ये डॉक्टर विनोद धूत,भाग्यश्री शेंडे यांच्या उपस्थितीत डॉक्टर सोनकुसरे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर गोरेवाडा उपविभागीय व्यवस्थापकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सहाय्यक वनरक्षक वनपाल माडभुशी,वनपाल चव्हाण,वनरक्षक जाधव,वाघाडे आदी उपस्थित होते.
Saturday, July 21, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
आणखी एका वाघाचा मृत्यू:वन्यजीव प्रेमी नाराज चंद्रपूर /ललित लांजेवार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात आणखी एका छावा मादीच
रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू चंद्रपूर/प्रतिनिधी: रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्य
नागपूर-उमरेड मार्गावर अपघात;एक ठार नागपूर -उमरेड राज्यमार्ग ठरत आहे मृत्यू मार्ग उमरेड/प्रतीनिधी: नागपूर ते उमरेड हा राज्यम
विदर्भात वाघासाठी धोक्याची घंटा वनालगतच्या शेतातील विद्युत तारेचे कुंपन ठरतेय वाघासाठी 'काळ' वीज प्रवाहामुळे होणार
सिर्सीत बिबट्याचा चिमुकलीवर हल्ला सावली/प्रतिनिधी: सीर्शी या गावामध्ये सोमवारी संध्याकाळी 6 वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून जितें
आनंदवनातील मूकबधिर विद्यार्थ्यांचा विहिरीत आढळला मृतदेह घटपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप वरोरा /प्रतिनिधी: जगप्रसिद्ध असलेल्या वरोरा शह
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য