काव्यशिल्प Digital Media: अंबुजा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label अंबुजा. Show all posts
Showing posts with label अंबुजा. Show all posts

Wednesday, March 07, 2018

अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा

अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रा

Sonpur to Chandrapur Padyatra of Ambuja project affected | अंबुजा प्रकल्पग्रस्तांची सोनापूर ते चंद्रपूर पदयात्रागडचांदूर/प्रतिनिधी:
अंबुजा कंपनीकडून होत असलेल्या अन्याय आणि फसवणुकीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात सोनापूर ते चंद्रपूर अशा पदयात्रेला मंगळवारी सुरूवात केली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी राजुरा एसडीओ कार्यालयासमोर धरणे देवून ही पदयात्रा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
सोनापूरवरुन जयघोषात निघालेल्या पदयात्रेचे दुपारी गडचांदुरात माजी जि. प. सभापती अरुण निमजे यांनी स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर उपस्थित होते. त्यानंतर राजुरा येथे पदयात्रा पोहचताच भवानी मंदिर संस्थान, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आॅटो चालक-मालक संघटना, बार असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष गृप व टैक्सी चालक-मालक संघटना यांच्याकडूनही स्वागत करण्यात आले. या पदयात्रेचा बोंडे मंगल कार्यालयात आज मुक्काम असून बुधवारी राजुरा येथून ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अंबुजा प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २० जानेवारीपासून चंद्रपुरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. परंतु, उपोषणाची अजुनही दखल घेण्यात आली नाही. उलट दबावतंत्राचा प्रयोग होत असल्याने प्रहारने पदयात्रा काढली आहे. अंबुजा प्रकल्पाकरिता १९९९ मध्ये ५२० प्रकल्पग्रस्त शेतकºयांची १२२६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. परंतु, कित्येक प्रकल्पग्रस्तांना अजुनही स्थायी नोकरी आणि योग्य मोबदला दिला नाही. याच अन्यायाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.