काव्यशिल्प Digital Media: पवनी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पवनी. Show all posts
Showing posts with label पवनी. Show all posts

Monday, January 14, 2019

पवनी अ.भा.वि.प तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा

पवनी अ.भा.वि.प तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा

मनोज चीचघरे/पवनी:


अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा पवनी तर्फे "सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा" शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी येथे आयोजित करण्यात आली होती .त्यात एकूण 94 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे विदर्भ प्रांत सहमंत्री तसेच भंडारा जिल्हा संयोजक योगेश बावनकर, विदर्भ प्रांत कार्यकारनी सदस्य अखिल मुंडले, नगर सहमंत्री उल्हास सावरकर, महाविद्यालयीन प्रमुख आकाश हटवार, सौरभ सावरकर, कपिल मेश्राम, नीलेश मोहरकर, आशिक वाघधरे, अमित खोब्रागडे, सूरज अवसरे, दीपक बनारसे, अमोल लांजेवार, अमोल जीभकाटे, निशांत शिवरकर, भावेश खांदाडे इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.

Sunday, January 13, 2019

स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ जयंती साजरी

स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ जयंती साजरी

मनोज चिचघरे/भंडारा पवनी: 

 तालुक्यातील भुयार येथे येथे जि.प.डिजिटल पब्लिक स्कूल येथे युग पुरुष स्वामी विवेकानंदजी व राज माता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली, या जयंतीनिमित्त आनंद मेळावा आयोजित करण्यात आले होते खरी कमाई, ५५ विध्यार्थीनी विविध प्रकारचे साहित्य विक्री करिता आणले होते, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या  कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहून यांनी विध्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उपस्थित मा, शाळा समिती चे अध्यक्ष रामभाऊ भोयर, मा, लक्ष्मण कावळे, मा दिवाकर भोयर, मा, सोमा नागपूरे, मा शरद देवाळे, मा  विलास बाळबूधे, मा मनोज चिचघरे पत्रकार भुयार या कार्यक्रमाला उपस्थित होते, कार्यक्रमचे संचालक मा, वैद्य सर यांनी केले, मा, दोनाडकर सर, मा, गिरडकर सर, संपूर्ण शिक्षक वर्ग उपस्थित होते, आभार प्रदर्शन मा, हाडगे सर यांनी केले.

Saturday, January 05, 2019

रूग्णांना फळ वाटप करून आ.परिणयजी फुके यांचा वाढदिवस साजरा

रूग्णांना फळ वाटप करून आ.परिणयजी फुके यांचा वाढदिवस साजरा

पवनी/प्रतिनिधी:

आ.डॉ.परिणयजी फुके यांचा वाढदिवस ग्रामीण रुग्णालय कोंढा-कोसरा येथे रुग्णालयातील रुग्णांना त्यांच्या फळे व बिस्किटे वाटून साजरा करण्यात आला.
०५ जानेवारीला सकाळी ०९.०० वाजता ग्रामीण रुग्णालय कोंढा-कोसरा येथे रुग्णालयातील रुग्णांना त्यांच्या फळे व बिस्किटे व फळे वाटण्यात आले. 
यावेळी कोंढा ग्रामीण रुग्णालयाचे मा.डॉ.तलमले मॅडम, मा.डॉ.कढिखाये, पंचायत समिती सदस्य मा.सौ.कल्पनाताई गभणे, कोसरा ग्रामपंचायतचे सरपंचा मा.सौ.शेवंताबाई जुगणाईके, भाजयुमो जि.महामंत्री मा.तिलकजी वैद्य, भाजयुमो ता.अध्यक्ष तथा सरपंच ग्रामपंचायत वलनी मा.दिपकजी तिघरे,भाजप पवनी शहर महामंत्री मा.अमोलजी तलवारे, मा.दत्तूजी मुनरतीवार, भाजप किसान आघाडी ता.महामंत्री मा.प्रकाशजी कुर्झेकर, भाजयुमो सोशल मिडिया सहसंयोजक मा.लोकेशजी गभणे, कोसरा ग्रा.पं.सदस्य मा.शिवाजी फंदी, कोंढा ग्रा.प.सदस्य मा.गौतमजी टेंभुर्ने, मा.संजूजी कुर्झेकर, निरगुडीचे पोलीस पाटील मा.महेशजी दहिवले, कोसरा म.गांधी तंटामुक्ती अध्यक्ष मा.विलासजी कामळीकर, मा.दिगंबरजी वंजारी, मा.हेमंतजी वैद्य, मा.वसंताजी गंथाळे, मा.शुभमजी मोहरकर, मा.सोनुभाऊ सेलोकर, मा.विलासजी गिरडकर, मा.प्रिंतेशजी रोकडे, मा.पंकजजी वंजारी, मा.शुभमजी गभणे, मा.भुषणजी बावणे, मा.विकासजी जिभकाटे, मा.रोशनजी कुर्झेकर, मा.दौलतजी बागडे, मा.आशीसजी कावळे, मा.संचितजी भुरे, मा.महेशजी जिभकाटे, मा.तरकेशवर राऊत, मा.जयपालजी जीभकाटे रोहितजी माकडे, मा.आशिकजी जिभकाटे, मा.अश्विनजी मोहरकर, मा.नितेशजी गभणे, मा.कुनलजी कुर्झेकर, मा.गुणवंताजी जांभुळकर, मा.अविनाश जी तुळणकर मा.महेशजी काजरखाने आणि कार्यकर्ते तथा समस्त कोंढा-कोसरा ग्रामवाशी मोठया संख्येने उपस्थित होते.

Thursday, January 03, 2019

किशोर पंचभाई यांची रेशीम शेतकऱ्यांना मदत

किशोर पंचभाई यांची रेशीम शेतकऱ्यांना मदत

मनोज चीचघरे/पवनी/भंडारा:

  नव्या जोमाने आधुनिक शेती पध्दतीची कास धरणारे जीवन फुंडे व संजय ब्राम्हणकर यांच्या एकत्रित रेशीम शेड आगीत भस्मसात झाले. पिकांसह शेड जळाल्याने त्यांचे स्वप्न हिरावले गेले. त्या शेतकर्याना आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक व भाजप किसान आघाडीचे नेते किशोर पंचभाई यांनी घटनास्थळी भेट देऊन  दहा हजार रुपयांची मदत दिली.
      अल्पभूधारक असलेल्या या शेतकऱ्याचे कोषाचे पिक  अंतीम टप्प्यात होते. ३५० डि एल एफ चे पिक घेणे मोठी उपलब्धी आहे. रेशीम शेतीमध्ये पिकविम्याची सोय नाही. अशा वेळी किशोर पंचभाई यांनी केलेल्या मदतीचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. ही मदत रोख स्वरूपात देण्यात आली.यावेळी आसगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यादव डोये, राजेंद्र फुलबांधे, राजु सावरबांधे, अमीत डोये, संदीप देशमुख उपस्थित होते.

Monday, December 10, 2018

हेराफेरीप्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

हेराफेरीप्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

मनोज चिचघरे/भंडारा पवनी:
 पवनी तालुक्यातील मौजा मोहरी येथील शेतजमीनच्या रेकॉर्ड मध्ये हेराफेरी करुन त्यात आधारावर बेकायदेशीरपणे विक्रीपत्र केल्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पवनीचे न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत.

 याबाबतचे वृत्त असे की भिमराव  हरी रामटेके व गोपीनाथ रामटेके यांच्या मालकीची शेतजमीन मौजा मोहरी येथे असुन गट क्रमांक १०४,आहे सदरची शेतजमीन वडिलोपार्जित त्यांनी किंवा त्यांच्या आईवडिलांननी कोणत्याही स्वरूपाच्या हस्तांतरनण लेखाद्वारे हि शेतजमीन मोहरी येथील मोरेश्वर लांजेवार यांना विकली नसंताना देखील या शेतीच्या रेकाँडेँमध्ये त्याचे नाव कापून स्वत:चे नावाने सातबारावर नोंद करून त्यात आथारावर दुसर्या व्यक्तीच्या नावाने बेकायदेशीरपने विक्रीपत्र करुन देण्यात आले.
यासंबंनधाने माहिती मिळताच पोलिस स्टेशन पवनी येथे फिर्यादी 
भिमराव रामटेके , मुक्का मोहरी यांनी लेखी फिर्यादी देवून देखील पवनी पोलिसांनी कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही न केल्यामुळे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पवनी यांचेकडे कलम ४६८,४७१,४२०,भा ,दं , वि , 
अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली होती,
या प्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पवनी यांनी पवनी पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, याप्रकरणी फिर्यादीची बाजु अँड महिंद्र म,गोस्वामी मांडत आहेत,

Sunday, December 09, 2018

 दिव्यांग चित्रपटचे आँफिशियल पोस्टर विमोचन सोहळा उत्सवात साजरा

दिव्यांग चित्रपटचे आँफिशियल पोस्टर विमोचन सोहळा उत्सवात साजरा

भंडारा(मनोज चीचघरे ) :

 जागतिक दिव्यांग दिवश आणि त्यांच दिनाचे औचित्य साधून आमच्या हिराज प्रोडक्शन च्या वतीने दिव्यांंग (समाजाचा एक अंग)  ह्या चित्रपटाची निर्मिती के असून व त्या चित्रपटाचे आँफिशियल पोस्टर चे भवभुती रंग मंदिर या सभा गृहात विमोचन सोहळा आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी प्रामुख्याने कार्यक्रम चे अध्यक्षपदी ब्रदरभाई शेख व उद्घाटक जिल्हा पुरवठा अधिकारी मा, अनिल सव ईल साहेब व तसेच प्रमुख पाहुणे जयेशचंद्र रमादेजी ,डॉ नोव्हिल ब्रामनकर, श्री एच, एच ,पारदी सर, गुरमीत जावला, श्री, खेमेन्द कटरेजी, अतुजी सतदेवजी ,विश्वजीत बागडे, श्रीमती सुवर्णा हूबेकर, श्रीमती सविताताई बेदरकर,
श्रीमती आरती चवरे, दिपक बहेरकार, अमर वराडे, शिव नागपूरे, यांच्या उपस्थितीत पार पडले चित्रपटाचे निर्माते दिनेश एच फरकूडे यांनी जिल्हातील सौदर्यने नटलेल्या लोकेशन बंदल माहितीदेत हा चित्रपट करताना कितीतरी अवघड प्रसंग अडचणीना आपल्या भावनेतून व्याक्त केले,
  कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान

कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान

 मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संंस्थेचा पुढाकार 
 मनोज चिचघरे/भंडारा पवनी:


  गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात वन्यप्राणी पडणे हि आता नित्याचीब बाब झाली आहे अशाच प्रकारची घटना गुरुवाला सकाळच्या सुमारात संरक्षीत वन कोरंभी बिट कक्ष क्र,२१६मधून जाणार्या कालव्यात घडली, कालव्यात सांबर पडल्याची माहिती मिळताच मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशीय संस्था पवनी व वनविभागाच्या बचाव दलाच्या संयुक्त प्रयत्नाने नहरात पडलेल्या सांबराला सुखरुप बाहेर काढण्यात आले,  कालव्यात सांबर पडल्याची मिळताच वन विभागाने नहरात सांबर पडले असल्याची खात्री करून मैत्रच्या पदाधिकार्याना घटनास्थळी बोलवण्यात आले कालव्यात पडलेल्या सांबर हा थकून उपकालव्याच्या प्रवेशद्वाराला बसून असल्यामुळे त्याला पकडण्यात आले.
 सांबराला उचलून पडल्या जागेवरून वरती उचलण्याची कसरत करावी लागली, बचाव कार्यात महादेव शिवरकर, संगरत्न धारगावे, मादव वैध, चंद्रकांत काटेखाये, अमोल वाघमारे, गजानन जुमडे, प्रभारु क्षेत्रसाहेक ए, एस करपते, बिटरक्षक ए, व्ही,खैते, एच, ए, जायपाये ,बी बी, मुंढे, बावनथडे, कुझेँकर, वनमजूर डाहारे, पचारे, अशोक बोरकर, तलमले, यांचा समावेश होता,

Friday, December 07, 2018

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 मनोज चिचघरे/पवनी भंडारा:

पवनी तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय धानोरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे सचिव अशोक पिल्लेवान यांचे अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक अशोक पारधी यांचे प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक शिक्षिका छाया सोनडवले, शारीरिक शिक्षक राजकुमार नागपूरे, सहाय्यक शिक्षक रवींद्र मोहरकर, शिक्षकेतर कर्मचारी डी. डी. कांबळे व हिरालाल रामटेके उपस्थित होते. विद्यार्थी - विद्यार्थीनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श दृष्टीसमोर ठेवून अभ्यास करावा. प्रज्ञा, शील, करूणा ही त्रिसूत्री जीवनात अवलंबून आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करावा असे विचार मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी व्यक्त केले. विद्यार्थी - विद्यार्थीनींनी गीत सादर करुन श्रद्धांजली अर्पण केली.
    
 पवनी येथे SDO द्या:प्रकाश पचारे यांची मागणी

पवनी येथे SDO द्या:प्रकाश पचारे यांची मागणी

मनोज चिचघरे/भंडारा पवनी:

पवनी तहसिल ही भंडारा उपविभागत महसूल येत असून भंडारा उपविभागीय अधिकारी महसूल यांनी आठवड्यात दोन दिवस पवनी तहसील कार्यालयात द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी शांतनु गोयल आणि उपविभागीय अधिकारी डॉ कृष्णानाथ पांचाळ यांना निवेदन देऊन केली.
यावेळी अखिल भारतीय मच्छिमार काँगेसचे सचिव प्रकाश पंचारे व माजी जि, पं, सभापती विकास राऊत ,राष्ट्रीय कॉग्रेस तालुका अध्यक्ष शंकरराव तेलमासरे ,व पवनी शहर काँग्रेस अध्यक्ष मनोहर उरकुडकर प्रकाश भोगे ,यांंनी ही मागणी केली आहे.
 पवनी तहसील ही भंडारा उपविभात येत असून उपविभागीय अधिकारी दर्जाचे कामे भंडारा येथून करावे लागते ,पवनी तालुक्यातील यात जनतेचा वेळ व पैसा वाया जात असतो, विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व क्रीमिलियर सटिँफीकेट व जात वैधता प्रमाणपत्र तसेच शेतीविषयक वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये करणे व इतर उपभिगागीय अधिकारी यांच्या दर्जाचे काम भंडारा येथील करावे लागते ,जनतेचा वे व पैसा खर्च होतो जर भंडारा उपविभागीय अधिकारी महसूल यांनी दोन दिवस पवनी तहसील येथे दिले तर जनतेचा वेळ आणि व पैशाची बचत होवू शकते याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे .
मागण्यांची पूर्तता झाल्याने शिवसेनेकडून आंदोलनाला स्थगिती

मागण्यांची पूर्तता झाल्याने शिवसेनेकडून आंदोलनाला स्थगिती

 मनोज चिचघरे/ भंडारा पवनी:

स्थानिक लोक व लोक प्रतिनिधी यांच्या रेल्वे उड्डाणपूल तुमसर च्या पोच मार्गाच्या नूतनीकरण करणे या मागण्यांची पूर्तता करण्याकरिता महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मुख्य अभियंता साबा प्रादेशिक विभाग नागपूर यांनी रामटेक तुमसर राज्यमार्ग दोन्हींवर साखळी क्रमांक 135 मधील तुमसर उड्डाणपुलाच्या पोच मार्गाचे नूतनीकरण करण्याचे काम विशेष दुरुस्ती कार्यक्रम 2018 अंतर्गत मंजूर करण्यात आलेले आहे शासनाच्या सांबा विभाग नियमावलीनुसार शासनाच्या नियम व अटींचे अधीन राहून पोहोच मार्गाचे नूतनीकरण करण्याकरिता मुख्य अभियंता साबा प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या निर्देशानुसार नव्याने निविदा बोलविण्याची योग्य ती कारवाई करण्यात येत आहे त्यापूर्वी मूळ कंत्राटदाराकडून सेवा रस्त्यावरील खड्डे खडी व डांबराने बुजविण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे.
 सेवा रस्त्यावरील राहात यापूर्वीच काढण्यात आलेली आहे वाल च्या बाजूला शिल्लक राहिलेले राग काढण्याचे काम कंत्राटदाराकडून सुरू करण्यात आले आहे तात्पुरता उपाय म्हणून राग हवेत उडू नये याकरिता सेवा रस्त्यावर पाणी शिंपणे सुरू करण्यात आले आहे भाऊ दास पी परिवार शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर.यावेळी पोलीस स्टेशन बैठकीतमध्ये शिवसेनेचे तुमसर- मोहाडी विधानसभा प्रमुख शेखर कोतपल्लीवार, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, शिवसैनिक अमित एच. मेश्राम, युवा सेना जिल्हा समन्वयक मनोज चौबे, वाहतूक सेना उपजिल्हा अध्यक्ष जगदीश त्रिभुवनकर, तालुका अध्यक्ष गुड्डू डहरवाल, विभाग प्रमुख किशन सोनवाने, शिवसेना उपशहर प्रमुख किशोर यादव सह शिवसैनिक उपस्थित होते.
विद्या कृषी विकास हायस्कुल येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

विद्या कृषी विकास हायस्कुल येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

 मनोज चिचघरे/पवनी भंडारा

विद्या कृषी विकास हायस्कुल भुयार येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव मा घुमे साहेब,तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर राऊत तसेच जेष्ठ
शिक्षक लाखे सर, शेळके सर हे होते.यावेळी विध्यार्थी व पाहुण्यांचे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु ईशा गावंडे हिने केले, व पाहुण्यांचे आभार कु दिपाली मोहनकर हिने मानले.


महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रंथ भेट

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रंथ भेट

मनोज चीचघरे/ पवनी भंडारा:

भारतीय लोकशाहीला भक्कमपणे यशाच्या शिखरावर नेणारा भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय ग्रंथ " भारतीय संविधान " व जगाला समता , स्वातंत्र्य व बंधुतेची शिकवण देवून प्रज्ञा व करूणा स्थापित करणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्माची अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित महान ग्रंथ " बुद्ध आणि त्यांचा धम्म " हे दोन ग्रंथ अॅड.महेंद्र गोस्वामी यांनी पवनी वकील संघाचे सचिव अॅड. योगिराज सुखदेवे यांना प्रदान केले.
भारतरत्न परमपूज्यनिय डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी यांनी हे दोन्ही ग्रंथ वकील संघाला भेट दिले.

यावेळी अॅड. महेंद्र गोस्वामी यांचे सोबत पवनी तालुक्यातील जेष्ठ वकील अॅड. सुधाकर भुरे व अॅड. खुशाल अंबादे होते.

Sunday, December 02, 2018

गायत्री म्याग्निज कारखान्यात कामगार महिलांना मिळाला न्याय

गायत्री म्याग्निज कारखान्यात कामगार महिलांना मिळाला न्याय

मनोज चिचघरे/भंडारा(पवनी):

मानेक नगर रोड देव्हाडी येथील गायत्री म्याग्निज कारखान्यात महिला कामगारांचे प्लांट व्यवस्थापकाकडून त्या एकूण २६ महिला कामगारांना ८ दिवसांपासून कामावरून बंद करण्यात आले होते या कामगारांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती मिळताच भारतीय कामगार सेनेच्या वतीने कंपनीमध्ये जाऊन प्लांट व्यवस्थापकासोबत तेथे काम करत असलेल्या सर्व महिला कामगारांच्या मागण्यानुसार चर्चा करण्यात आली. कामगारांना दोन वर्षांपासून १३० रोजी होती परंतु त्यांच्या रोजीमध्ये अजूनपर्यंत वाढ करण्यात आली नव्हती त्यांच्या रोजीमध्ये २० रुपये वाढ करून एकूण १५० रुपये रोजी देण्यात यावे व आठवळ्यातून एक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. प्लांट मालकाने सध्या रोजीमध्ये १० रुपये वाढ केली असून येणाऱ्या ६ महिन्याच्या आत पुन्हा १० रुपये वाढ करण्याचे ठरविले तसेच आठवड्यातून एक दिवस सुट्टी देण्याचे जाहीर केले असून महिला कामगारांनी मान्य झालेल्या मागण्यावर आनंद व्यक्त केला. यावेळी भारतीय कामगार सेनेचे विभाग प्रमुख किसन सोनवाने, वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, शिवसेना जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेना जिल्हा समन्वयक मनोज चौबे, वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश त्रिभुवनकर, तालुका अध्यक्ष गुड्डू डहरवाल, बाल्या मिश्रा, शरणम नागदेव सह महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, November 30, 2018

गोसेखुर्द्च्या उजव्या कालव्यावरील लिफ्टचे काम सुरु करा:ढेंगरे

गोसेखुर्द्च्या उजव्या कालव्यावरील लिफ्टचे काम सुरु करा:ढेंगरे

मनोज चीचघरे/(पवनी)भंडारा:

 गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे, उन्हाळी धानपीकासाठी उजव्या कालव्यातुन पाणी पुरवठा केला जाणार आहे, कन्हाळगाव व भुयार क्षेत्रातील सर्व शेती सिंचनापासुन वंचित आहे, या क्षेत्रातिल शेती सिंचनाखाली आनण्यासाठी गोसेखुर्द्च्या उजव्या कालव्यावरील प्रस्तावित लिफ्टचे काम सुरु करावे, अशी मागणी पंचायत समिती सभापति बंडू ढेंगरे यांनी केली , उजव्या कालव्यातुन पाणी उपसा करण्यासाठी दोन लिफ्ट मंजुर करण्यात आलेल्या आहेत, परंतु लिफ्टचे काम अद्याप सुरु झालेले नाही, केंद्र व राज्य सरकार पुरेसा निधी उपलब्ध करुन देत नाही त्यामुळे लिफ्टचे काम प्रलंबित आहे, केंद्र सरकार निधी द्यावा यासाठी पंचायत समिती सभापती  बंडू ढेंगरे यांनी परीसरातील सरपंचाना सोबत घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंची भेट घेऊन निवेदन दिले, वन्यजीवाचे संरक्षण  व शेतशिवारात वंन्यजीवापासुन होनारा त्रास कमी करण्यासाठी उजव्याचे जंगलाकडील बाजुला तारेचे कुंपंण घालण्यात यावे अशी मागणी त्यानी त्यांवेळी केली. 

Monday, November 26, 2018

अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मनोज चिचघरे/पवनी (भंडारा)

नागभीड कडून दुचाकीने जात असतांना दुचाकीस्वराची उभ्या धान मळणी यंत्राला मागून धडक दिली.या धडकेत दुचाकीस्वाराचा गजीच मृत्यू झाला. निलेश भाऊराव तुपटे मु, रानपौना तालुका पवनी जी.भंडारा, असे या मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.पवनी (नागपूर ते नागभिड )रोडवरील भुयार गावाजवळील गजानन मैत्री ढाब्याजवळ हा अपघात घडला, पुढील तपास पवनी पोलीस करीत आहेत.
धान उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट

धान उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट

पवनी(भंडारा):
यावर्षी शेतीची बिकट अवस्था झाली असून काही कोरडवाहू असलेल्या शेतकर्‍यांचे एका पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात धानाचे नुकसान झाले अनेकांचे धान पानफोल झाल्यामुळे लोंबीत दाना भरला नसल्याने, मरळ झालेल्या धानाचे उत्पादन घटले असून कोरडवाहू शेतकर्‍यांची वाट लागली आहे,मागील दोन -तीन वर्षापासून तालुक्यातील शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे, पिकली तर शेती, नाही तर मातीं अशी अवस्था शेती व्यवसायाची आहे, दिवसेंदिवस शेतीचा खर्च वाढत आहे, शिवाय धानाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कमी भावामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च भरुन निघत नाही अशी ओरड शेतकर्‍यांची आहे,उत्पादनाचा खर्च वाढत असल्यामुळे तसेच धानावर रोगराई येत असल्यामुळे औषधीचा खर्च अवाढव्य येत आहे, रोवणी पासुन तर मळनी पर्यंत शेतकर्‍यांना शेतमजूराना मजुरी द्यावी लागते, मजुराचे दरही गगनाला भिडले आहे, रासायनिक खतांचे भाव वाढले आहे, धानाचे उत्पादनही घटले आहे त्यामुळे भारी वाणाच्या धानाचे दर ३५००रुपये प्रति क्विंटल करण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शंकरराव तेलमासरे यांनी केली आहे,
पवनी न्यायालयात संविधान दिन साजरा

पवनी न्यायालयात संविधान दिन साजरा

मनोज चिचघरे/पवनी(भंडारा):

भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ६९ वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.


याच संविधान दिनानिमित्त विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवनी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजय यादव यांच्या हस्ते पवनी वकील संघाला अॅड महेंद्र गोस्वामी यांनी भेट दिलेला"भारतीय संविधान" हा ग्रंथ प्रदान करण्यात आला.याप्रसंगी माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी यांनी संविधान निर्मिती मध्ये छान.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी मार्गदर्शन केले. 
यावेळी सह न्यायाधीश सपना पाटील, अॅड महेंद्र गोस्वामी, अॅड देशमुख, अॅड भुरे, अॅड सावरकर, अॅड अंबादे, अॅड कावळे, अॅड जिभकाटे, अॅड शेंडे सह कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन अॅड मंगेश गजभिये यांनी केले. तर आभार प्रदर्शन अॅड. बावने यांनी केले.

Tuesday, June 12, 2018

पवनी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चा

पवनी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चा

Fisherman's Front at the Pawani Tehsil Office | पवनी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चापवनी/प्रतिनिधी:
 मत्स्य व्यवसायासासाठी तलाव कंत्राट धोरणासंदर्भात वारंवार आश्वासने देऊनही त्या आश्वासनांची पुर्तता न केल्यामुळे भंडारा जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेने सोमवारला पवनी तहसिल कार्यालयावर ‘दे धक्का’ आंदोलन केले. या आंदोलनात हजारो मासेमार बांधव सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही मासेमार समाज शासकीय योजनांपासून वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सरकारने कोणतेही ठोस पावले उचलले नाही त्यामुळे या समाजाचा वापर केवळ निवडणूक पुरते करून घेतला जात आहे. त्यामुळे या समाजाची सामाजिक, आर्थिक, बौद्धीक व राजकीय उन्नती होऊ शकलेली नाही. आता या समाजाला हक्काची जाणीव झाली असून संघटित होऊन आंदोलन करण्यात येत आहे.
भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १५ ही दे धक्का आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारला, पवनी तहसील कार्यालयात दे धक्का आंदोलन करण्यात आले. आमच्या मागण्याकडे लक्ष द्या अन्यथा आम्ही राज्यकर्त्यांना भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून देणार असा गर्भित ईशाराही दिला आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात ३० जुन २०१७ चा मत्स्य व्यवसायाचा शासन निर्णय रद्द करून तलाव, जलाशयाचे कंत्राट पुर्ववत लिजवर देण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्थेत विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त भटक्या जमातींना १३ टक्के आरक्षण देण्यात यावे. लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करण्यात यावी. धरणाखालील भागात मासेमारी व डांगरवाड्याच्या व्यवसाय पूर्णत: बंद पडल्यामुळे मासेमारांना प्रकल्पग्रस्त घोषित करून सुविधा पुरविण्यात यावे, मामा तलावातील गाळ उपसा करून तलावातील अतिक्रमणे काढण्यात यावे, जलाशयात पिढयानपिढया मासेमारी करीत असताना त्याची नोंद महसूल रेकॉर्डवर नमुद करण्यात यावे, २०० हेक्टरवरील जलाशयावर एकापेक्षा जास्त संस्थेची नोंदणी करण्याचा शासन निर्णय रद्द करून १००० हेक्टरवरील जलाशयावर दुसरी संस्था निर्माण करण्याचा शासन निर्णय करण्यात यावा, व्याघ्र प्रकल्पातील तलाव पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत केलेल्या तलावावर स्थानिक सहकारी संस्थांना मासेमारीकरिता देण्यात यावे, अनुसूचित जातीप्रमाणे जिल्हा व तालुका ठिकाणी भटक्या विमुक्त जाती जमातींना स्वतंत्र वसतिगृहे उघडण्यात यावे, भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी, पेसा कायदा रद्द करून अनुसूचित जमाती क्षेत्रातील सर्व तलावाचे मासेमारीचे हक्क परंपरागत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थाना देण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश आहे.
या दे धक्का आंदोलनाचे नेतृत्व भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे यांनी केले. या आंदोलनात संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे, जनार्दन खेडकर, आनंदराव अंगतवार, राजेश येमहोदव वाघमारे, हर्षल वाघमारे, मिरा नागपुरे, देविदास नगरे, अजय मोहनकर, शेखर पचारे, चंद्रशेखर पचारे, विकास शिरकर, श्रावण कांबळी, दागो कुंभले, निलकंठ वाघमारे, संजय चोचेरे, सुनिल शिवरकर, शरद शिवरकर यांच्यासह मासेमार बांधव सहभागी होते.