काव्यशिल्प Digital Media: वाशिम

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label वाशिम. Show all posts
Showing posts with label वाशिम. Show all posts

Friday, November 24, 2017

लाच स्वीकारताना लिपिकासह पकडले

लाच स्वीकारताना लिपिकासह पकडले

वाशिम- जिल्हापरिषद माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक गोविंद श्रीराम टाले वय 51 वर्ष आणि खाजगी इसम शेख इरफान शेख मेहबूब वय 26 वर्ष रा वाशिम या दोघांनी शिक्षण विभागाचीजाहिरातीला परवानगी दिली किंवा नाही याबाबत लेखी खुलासा देण्यासाठी 5000 रुपये लाच स्वीकारताना एसीबी ने त्यांना आज रंगेहात पकडले
तक्रारदाराने दि 23 नोव्हेंबला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार दिली की तक्रारदार हे सेवादास शिक्षण संस्था पाळोदि अंतर्गत वसंतराव नाईक माध्यमिक विध्यालाय पाळोदि येथे वरिष्ठ लिपिक व संचालक आहेत सादर संस्थेत पद भरती बाबत माजी सदस्याने जाहिरात दिली सादर जाहिराती  समंधणे तक्रारदार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक वाशिम यांना भेटून माजी सदस्याने  बोगस जाहिरात दिल्याबद्दल सांगितले त्या जाहिरातीस शिक्षण विभागाकडून मान्यता दिली का याबाबत शिक्षण विभाग माध्यमिक यांना लेखी अर्ज देऊन लेखी खुलासा मागितला शिक्षणाधिकारी यांनी  वरिष्ठ लिपिक गोविंद टाले यांना भेटण्याचे सांगितले लेखी खुलासा देण्याबाबत टाले यांनी 5000 रुपयांची मागणी केली  लाच लुचपत विभागाने पडताळणी केली असत गोविंद टाले यांनी 23 नोव्हेंबर रोजी पंचसमक्ष लाचेची मागणी केलीत्यावरून 24 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचला  टाले बाबू यांनी लाच रक्कम आरोपी खासगी इसम शेख इरफान शेख मेहबूब यांचेकडे देण्यास सांगितले  लाच स्वीकारताना दिघासना रंगेहात पकडण्यात आले  दोन्ही आरोपीना अटक करून त्यांच्या विरुद्ध वाशिम शहर पोलुस स्टेशनला लाच लीचपत प्रतिबंधक कायदा 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम चे अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नाशिककर ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती व पोलीस उप अधीक्षक आर व्ही गांगुर्डे ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन बी बिहाडे यांनी केली