काव्यशिल्प Digital Media: अडामे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label अडामे. Show all posts
Showing posts with label अडामे. Show all posts

Wednesday, February 14, 2018

मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर शाहु यांचे उपोषणाची सांगता

मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर शाहु यांचे उपोषणाची सांगता

 अडामे यांचेबाबत अहवाल जिल्हाधिकारींना रवाना 
अवैध बांधकामाबाबत कारवाई करण्याचे आश्वासन 
रामटेक तालुका प्रतिनिधी- 
        रामटेक नगरपालीकेचे बाजार करवसुली ठेकेदार राजेश शाहु यांनी बुधवार दिनांक 14/02/2018 रोजी आपले उपोषणाची सांगता केली.रामटेक  नगरपालीकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी त्यांना लेखी आश्वासन  दिल्याने त्यांनी आपले उपोषण  मागे घेतले आहे.

                                              यावेळी रामटेकचे माजी आमदारअॅड.आशिष  जयस्वाल,नगराध्यक्ष दिलीप देशमुख,जुम्मा प्यारेवाले आदी  मान्यवरांच्या हस्ते लिंबूसरबत घेवून शाहु यांनी उपोषण  संपविले याबाबत सविस्तर वृत्त असे की,बाजार डयुज  ठेकेदार राजेश शाहू  हे लोकांकडून ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त  वसुली करतात,वसुली केलेल्या रकमेची पावती देत नाहीत  अशा तक्रारी नगरसेवक रामानंद अडामे यांनी प्रशासनाकडे    केल्या होत्या मात्र प्रशासन कारवाई करीत नाही यासाठी  अडामे यांनी रामटेक नगरपालीकेच्या समोर दिनांक  12/02/2018 रोजी उपोषण सुरू केले होते.त्याच दिवशी  ठेकेदार राजेश  शाहु  यांनी अडामे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरबांधकाम करीत असल्याने त्यांचेवर कारवाईची मागणी करीत आमरण उपोशणाला सुरूवात केली होती ठेकेदार शाहु यांची पोलीसांत तक्रार करण्यात आली व त्यांचेवर 406 कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात  आला व त्यामुळे अडामे यांनी त्याच दिवशी उपोषण सोडले. 
                            मात्र शाहु यांनी आपल्या मागण्या होईपर्यंत उपोशन सोडणार नसल्याची भुमीका घेतली होती.अखेर  मुख्याधिकारी जुम्मा  प्यारेवाले यांनी नगरसेवक अडामे यांच्या अतिक्रमण व अवैध  बांधकामााबाबत जिल्हाधिकारी यांना तात्काळ अहवाल  पाठविण्याचे व बांधकाम परवानगी न घेता केल्याने योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी विवेक तुरक,बिकेंद्र महाजन,नगरसेवक सुमीत कोठारी,सुरेखा माकडे,कमलेश शरणांगत,बंडु सांगोडे व अन्य उपस्थित होते.