काव्यशिल्प Digital Media: परिवहन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label परिवहन. Show all posts
Showing posts with label परिवहन. Show all posts

Thursday, August 02, 2018

मुलांच्या शाळेपर्यंतच्या सुरक्षित प्रवासासाठी  पालकांनी देखील जागरुक असावे:व्ही.एन.शिंदे

मुलांच्या शाळेपर्यंतच्या सुरक्षित प्रवासासाठी पालकांनी देखील जागरुक असावे:व्ही.एन.शिंदे

चंद्रपूर/प्रतिनिधी: 

शाळेमध्ये जाणारी आपली मुले कोणत्या वाहनातून प्रवास करतात. या वाहनाचे चालक प्रशिक्षित आहे अथवा नाही ? शाळा या वाहन चालकांबाबत कोणती काळजी घेते ? यासंदर्भातील चौकशी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे स्कूल बस व अन्य वाहनाबाबत पालकांनी जागरूक रहावे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी आज येथे केले. 
आपला पाल्य, आपला मुलगा ज्या शाळेमध्ये शिकतो आहे. त्या शाळेतील वाहन व्यवस्थेबाबत पालकांनीदेखील जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापनाने देखील या भागावर अतिशय लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक घरातला मुलगा शहरातील शाळांमध्ये जाताना अतिशय सुरक्षितरित्या शाळेमध्ये पोहोचला पाहिजे. याबाबत सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार वाहनांच्या तपासणीची काळजी घेतली जाते. 

तथापि, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, पालक आणि अन्य सर्वच घटकांनी याबाबत जागरूक असणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. माननीय न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहनातून वाहतूक करण्यासाठी पालकवर्गामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या संदर्भात आज पालक व शाळेच्या परिवहन समिती सोबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जनजागृती मेळावा घेण्यात आला. पोलीस मुख्यालयात घेण्यात आलेल्या या मेळाव्याला अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर उपस्थित होते. यावेळी बोलताना हेमराजसिंग राजपूत यांनी देखील शालेय वाहतुकीच्या नियमांचे पालन सर्व घटकांनी करणे आवश्यक असून शाळा व्यवस्थापनाने याकडे मुख्यत्वे लक्ष घालावे, असे निर्देश दिले. प्रत्येकाच्या घरातील मुले ही लाख मोलाची असतात. त्यामुळे अतिशय जाणीवपूर्वक या वाहन व्यवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माननीय न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने देखील गाड्यांची तपासणी करताना काटेकोर नियमांचे पालन करावे, अशी सूचना देखील त्यांनी केली. 
यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी देखील शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना वेळोवेळी आमच्या मार्फत सूचना दिल्या जातात. तथापि, वाहन व्यवस्था ही मुख्याध्यापकांच्या नेतृत्वात काम करत असते. त्यामुळे यासंदर्भातील शाळेच्या परिवहन समितीने अधिक बारकाईने लक्ष घालावे. तसेच शहरातील सर्व नागरिकांनी देखील कोणत्याही शाळेची बस असेल तरी अतिशय सुरक्षितरित्या रस्त्यावर प्रवास करू शकेल व सुलभरीत्या शाळेत पोहोचू शकेल. अशा पद्धतीने शहराशहरात वातावरण निर्मिती करावी. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुख्याध्यापक पालक उपस्थित होते.

Tuesday, May 08, 2018

विना परमिट धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर चंद्रपूर RTO ची कारवाई

विना परमिट धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर चंद्रपूर RTO ची कारवाई

चंद्रपूर/रोषण दुर्योधन: 
चंद्रपूर नागपूर मार्गावर विना परमिट धावणाऱ्या ट्रॅव्हल्स वर आज आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 10 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत तर 17 गाड्यांना मेमो देण्यात आला आहे.
चंद्रपूर नागपूर मार्गावर मोठ्या प्रमाणावर खाजगी ट्रॅव्हल्स चालतात मात्र हे ट्रॅव्हल्स विना परवानगी ने चालत असल्याची माहिती आरटीओ आणि वाहतुक शाखेला मिळाली त्यानुसार आज डी.एन.आर, पर्पल, रॉयल,महालक्ष्मी, रामायण अश्या विविध खासगी बसेसवर RTO विभागामार्फत कारवाई करण्यात आली असून तब्बल 10 गाड्या जमा करण्यात आल्या  तसेच 17 गाड्यांना मेमो दिल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वमभर शिंदे यांनी दिली आहे. 
वीना परवाणा चालणाऱ्या या ट्रॅव्हल गाड्या सामान्य प्रवाशांसाठी धोकादायक असून या बाबत RTO विभागाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.सोबतच सध्या सुट्यांचा सीजन सुरु तसेच उन देखील जास्त असल्याने या वातानुकुलीत खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये बसण्यासाठी प्रवासी चांगलीच गर्दी करत आहे व काही खाजगी ट्रॅव्हल्स क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत असल्याची देखील तक्रार परिवहन विभागली होती.या तक्रारींच्या आधारावरच ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
---------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव 
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)