
Monday, October 01, 2018

Monday, June 11, 2018
४ जुलैला नागपूर बंद
Sunday, April 29, 2018
१ मे रोजी विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकणार
Sunday, April 15, 2018
महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार : चटप
Saturday, January 06, 2018
राज्यासाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’
नागपूर : विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी , उद्योगांचा अभाव, वीज भारनियमन,कुपोषण व नक्षलवाद अशा समस्या मार्गी लागव्यात, तसेच विदर्भाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच जनतेची मते जाणून घेण्यासाठी ७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढणार असल्याचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रात सत्ता आल्यास विदर्भाचे स्वतंत्र राज्य होईल, असे आश्वासन भाजपा नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. गेल्या साडेतीन वर्षापासून केंद्रात सत्ता असूनही विदर्भाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपा नेत्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. दुसरीकडे राज्य सरकारवर तब्बल ४.५० लाख कोटींचे कर्ज आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेता संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. नव्याने निर्माण झालेले उत्तराखंड राज्य प्रगतीच्या बाबतीत देशात सर्वात पुढे आहे. याचा विचार करता स्वतंत्र राज्य झाल्यास विदर्भाचा विकास होईल. आजवर विदर्भासाठी राखून ठेवण्यात आलेला निधी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी वळविण्यात आला. यामुळे विदर्भ मागास राहिला. परिणामी विदर्भ शेतकरी आत्महत्यात सर्वात पुढे असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.
Monday, December 11, 2017
विदर्भासाठी अडविली बस
काटोल - विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार व विदर्भवादी नेते डॉ आशिषजी देशमुख यांच्या विदर्भ वेगळा होण्यासाठी मुंख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस ला पाठाविलेल्या पत्राच्या समर्थनात कोंढाळी येथे विदर्भ राज्य वेगळा व्हायलाच पाहिजे या विदर्भातील सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र सरकार चे लक्ष वेधन्यासाठी बसेस अडवून व गावातील व्यापारी प्रतीष्ठाने बंद ठेऊन निषेध नोंदविला या आंदोलनाचे नेतुत्व प्रमोद धारपूरे यांनी केले या आंदोलनात काटोल पंचायत समिती उपसभापती योगेश शे चाफले,माजी प समिती सदस्य पप्पू( जावेद)पठान,ग्रामपंचायत कोंढाळी चे सदस्य प्रमोद शे चाफले,धर्मराज पाटील,विनोद रणनवरे,वैभव लाड,गुणवंता खवसे,कुणाल भांगे,वैभव जयपूरकर,प्रमोद चाफले,प्रविण सावरकर,लोकेश लोही व असंख्य विदर्भवादी कार्यकते उपस्थित होते
Sunday, December 10, 2017
वेगळ्या विदर्भाच्या लढ्यात इको-प्रोची उडी
चंद्रपूर/प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून रेंगाळत असलेल्या आणि राजकीय पक्षांनी दुर्लक्षित केलेल्या विदर्भ राज्याच्या लढ्यात सक्रीय उडी घेण्याचा निर्णय इको- प्रोच्या कार्यकारिणीने घेतला आहे. त्यानुसार विविध संघटनांनी पुकारलेल्या 11 डिसेंबरच्या विदर्भ बंद मध्ये संस्था सहभागी होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समीती व सर्व विदर्भवादी संघटनानी ‘विदर्भ बंद’ ची हाक दिलेली आहे. या ‘विदर्भ बंद’ ला चंद्रपूर जिल्हयातील इको-प्रो संस्थेचा पुर्ण पाठींबा आहे.
स्वंतत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भातील समस्या सुटणार नाही. विदर्भाचा विकास करायचा असेल तर स्वंतत्र विदर्भ राज्य हेच एकमेव पर्याय असून, या बंद मध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे. तसेच सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविदयालय, तसेच खाजगी वाहतूक व्यावसायीक, युवक-युवती, विदयार्थी आदीनी शातंतामय रितीने कडकडीत बंद पाळावे. या बंद दरम्यान कोणीही सार्वजनीक शांतता भंग करणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्था राखल्या जाईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन इको-प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे.
Friday, December 01, 2017

विदर्भ बंदसाठी आज बैठक
चंद्रपूर - 1 डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीची चंद्रपूर जिल्हा बैठक दिनूजी भवन साईबाबा मंदिर जवळ जनता कॉलेज येथे 12 ते 4 या वेळेत होत आहे. विदर्भ बंद संदर्भांत चर्चा व नियोजन होणार आहे.
Thursday, November 16, 2017
सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार
चंद्रपूर/प्रतिनिधी:

शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर न केल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही - शरद पवार
सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावे;शरद पवार यांचे चंद्रपुरात वक्तव्य
Tuesday, November 14, 2017

आता विदर्भ लांबणीवर
नागपूर - विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं.
निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचं आश्वासन दिलं होतं. पण जवळपास तीन वर्षं झाल्यानंतरही भाजप सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबद्दल कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या भूमिकेबाबत विदर्भवाद्यांमध्ये संभ्रम आहे.

Thursday, November 09, 2017
विदर्भात वाघासाठी धोक्याची घंटा
वीज प्रवाहामुळे होणारे वाघांचे मृत्यु थाबविण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी*
*शेतपिक संरक्षणकरिता हवी प्रभावी उपाय योजना....
ताडोबा-बफरच्या धर्तीवर 'व्यक्तिगत सौर ऊर्जा कुंपन'
अनुदान तत्वावर पुरविण्याची मागणी...*
चंद्रपूर : विदर्भात वर्षभरात वीज प्रवाहामुळे मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळे भविष्यातील व्याघ्र संवर्धनाची चिंता निर्माण झाली आहे. त्यावर वेळीच सावध होऊन योग्य उपाययोजना न केल्यास ही मोठी समस्या उभी राहील. विदर्भातील वाढती वाघांची संख्या आणी शेतपीक वाचविण्याकरिता शेतकरी बांधवांकडून होणारे प्रयत्न म्हणजे शेतकरी विरूध्द वाघ पर्यायाने वनविभाग असा नवा संघर्ष उभा होत आहे.
विदर्भात विदयुत प्रवाहामुळे होणारे वाघ मृत्यु ची त्वरित दखल घेऊन थाबविण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याची मागणी एका निवेदनद्वारे वनमंत्री सुधीर मुुनगंटीवार यांच्याकडे इको-प्रो संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. सोबतच वाघाचे मृत्यू आणि शेतपीक नुकसान थांबविण्याकरीता बफरच्या धर्तीवर ‘व्यक्तीगत पातळीवर सौर उर्जा कुंपन अनुदान तत्वावर’ देण्याची मागणी केली आहे.
मागील सप्ताहात 4 नोव्हेंबर 2017 ला चपराळा येथे रेडीओ काॅलर लावुन सोडण्यात आलेली वाघीण अशाच विदयुत प्रवाहाच्या धक्काने मारली गेली. 7 नोव्हे 2017 चिमुर वनक्षेत्रातील आमडी शेतशिवारातील वाघ मृत अवस्थेत आढळला. तिथेही विज तारेचे कुंपन लावण्यात आलेले होते. यासोबत मागील 13 आॅक्टोबर 2017 ला ब्रम्हपुरी येथुन सोडण्यात आलेली वाघीण सुध्दा शेतातील वीज प्रवाहाने बोर व्याघ प्रकल्प लगत वर्धा जिल्ह्यात मृत झाली होती. नागपुर जिल्ह्यात सुद्धा अशीच घटना आहे. प्रसिद्ध श्रीनीवास वाघ रेडीओ काॅलर असलेला ब्रम्हपुरी वनविभागात 27 एप्रील 2017 रोजी मृत अवस्थेत आढळला. त्यापुर्वी मध्य चांदा कोठारी अंतर्गत 3 नोव्हे 2016 ला एक वाघ मेलेला आहे. यांनतर 3 डिसें 2016 ला बाजुच्या तेलगांणा राज्यात कागजनगर येथे मध्य चांदा वनविभागातुनच स्थलांतरीत झालेला वाघ सुध्दा तिथेही याच कारणानी मेला.
वरील काही घटनात वाघांना रेडीओ काॅलर असल्याने व कुणी माहिती दिल्याने या घटना बाहेर आलेल्या आहेत. जे वाघ विदयुत प्रवाहाने मृत झाले असतील आणि जमिनीत पुरले गेले असतील अशा काही घटना नाकारता येत नाहीत. वाघांसोबतच चंद्रपूरात 3 रानगवे एकसाथ विदयुत प्रवाहाने मेलेत, एका शेताच्या कुंपनात अनेक वन्यप्राण्यांचे हाडांचे सापळे काढण्यात आले यावरून तृणभक्षी प्राणी सुध्दा मोठया प्रमाणात मृत्युमुखी होत असल्याचे एकदंरीत चित्र आहे.
विदर्भातील शेतकरी कोरडवाहु शेती करणारा मोठा वर्ग आहे. जेमतेम एक पिकावर शेतकरीचे वर्षभराचे अर्थशास्त्र अवलंबुन आहे. उभे पिक वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न शेतक-यांकडून केले जाते. वन्यप्राण्यांपासून शेतपीक वाचविण्याकरीता शेतकरीकडुन अशा पध्दतीने तारेचे कुंपन शेताभोवती करून त्यात जिंवत वीज प्रवाह सोडला जातो. कारण, विदर्भातील शेतकरीची ‘अस्मानी आणी सुलतानी’ संकटातुन वाचलेले पिक वन्यप्राण्यापासुन वाचविण्याकरीता स्वतःच्या जिवाची पर्वा न करता शेतात जिवंत वीज प्रवाह सोडतात. अशा चुकीच्या पध्दतीने आपला जिव जाईल, हे माहीती असताना सुध्दा असे प्रयत्न सुरू आहेत. विदयुत प्रवाहाने शेतकरीच मरण्याच्या घटना जिल्हयात व विदर्भात घडलेल्या आहेत. अशा चुकीच्या पध्दतीने विदयुत प्रवाह शेतात सोडणे हे नक्कीच समर्थनीय नाही. परंतु, ही सर्व धडपड वन्यप्राण्यापासून उभे पिक वाचविण्यासाठी असते. यावर विदयुत विभागाचे व वनविभागाचे कुठलेही नियंत्रण नसते. वाघांच्या शेतात येण्यावर सुध्दा कुणाचेच नियंत्रण नसल्याने अनेक वाघ आणी वन्यप्राणी मृत्युमुखी होत आहेत.
विदर्भातील वाढलेली वाघांची संख्या, त्यांचे होणारे स्थलांतर, स्थंलातर होताना वन्यप्राण्याचे भ्रमणमार्ग हे फक्त जंगल नसल्याने शेतशिवार, गावे, रस्ते-हायवे, नदया-नाले हे सर्व ओलांडुन पुढील वनक्षेत्राचा शेकडो किमीचा प्रवास पुर्ण करतात. तसेच वनव्याप्त गावातील शेती, वनालगत असलेले शेतशिवार म्हणजे येथे वाघांचा वावर असतोच. शेतशिवारातील पाळीव प्राण्याची शिकार करण्यास किंवा शेतशिवारात येणारे रानडुक्कर, निलगाय व इतर तृणभक्षी प्राणी यांची शिकार करण्यास वाघ येतो अशावेळी तिथे अशा पध्दतीने शेतक-याने तारेचे कुंपन करून त्यात जिवंत विदयुत प्रवाह सोडण्यात आलेला असल्यास तिथे वाघांसाठी धोका संभवतो. वनविभाग सोबतच विद्युत् विभागने अश्या घटना घडणार नाही, विजेचा चुकीचा वापर होणार नाहीं याकडे लक्ष देने अत्यंत गरजेचे आहे.

