(चंद्रपूर:ललित लांजेवार)
सावली तालुक्यातील शिर्शी गावामध्ये सोमवारी संध्याकाळी 6 वाजता अंगणात शेकोटीजवळ जेवत बसलेल्या जितेंद्र हजारे यांच्या 4 वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला ओढत नेले होते.त्या मुलीचा तब्बल ५ दिंसानंतर शोध लागला असल्याची माहिती आहे. सोमवारी हि मुलगी आजीसोबत शेकोटी जवळ बसून जेवत असतांना संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान तिला त्या परिसरातील बिबट्याने मागून हल्ला करत जंगलात खेचत नेले होते.त्यामुळे तिचे फक्त रक्ताने माखलेले कपडे मिळाले होते , त्यामुळे गावात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.