काव्यशिल्प Digital Media: रेती

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label रेती. Show all posts
Showing posts with label रेती. Show all posts

Thursday, February 15, 2018

नवीन GR विरोधात रेती वाहतूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नवीन GR विरोधात रेती वाहतूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्य सरकार ने नुकताच रेती वाहतुकी संदर्भात नवीन GR काढला आहे ज्यामध्ये रेती वाहतुकीसंदर्भातील नियमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. हा निर्णय रेती वाहतुकी संदर्भात योग्य नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रेती वाहतूक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात जिल्ह्यातील हजारो रेती वाहतूकदार आणि त्यांचे कामगार सहभागी झाले होते. 

  मात्र या नवीन GR ला रेती वाहतूक संघटनेचा विरोध असून त्यांच्या मते यामुळे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला बळ मिळणार आहे. या GR मध्ये रेती उत्खननासाठी यंत्र सामग्री च्या वापरास बंदी लावली आहे आणि ऑनलाईन पध्दतीने TP जनरेट करून ठराविक वेळेतच तिचा वापर करावा लागणार असल्याने हि बाब वाहतूक दारासाठी योग्य नसल्याने याचा विरोध करण्यात आला . मात्र वाहतूक दारांच्या मते दुर्गम भागात या अटी पाळणे अतिशय कठीण आहे त्यामुळे हा निर्णय वाहतुकीसाठी योग्य नसल्याने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते . या सोबतच नियम मोडणाऱ्यांवर लाखो रुपयांचा दंड आकारण्याचे देखील नवीन GR मध्ये प्रावधान करण्यात आले आहे. या मोर्च्यात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार देखील सामील झाले होते आणि त्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले.