काव्यशिल्प Digital Media: तलाव

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label तलाव. Show all posts
Showing posts with label तलाव. Show all posts

Friday, March 02, 2018

चंद्रपूरच्या विद्यार्थ्याचा नागपुरातील तलावात बुडून मृत्यू

चंद्रपूरच्या विद्यार्थ्याचा नागपुरातील तलावात बुडून मृत्यू

Two students drowned near Nagpur | नागपूर नजीक अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
नागपूर/(ललित लांजेवार):
पिकनिकसाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोन मित्रांचा गुरवारी हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) शिवारातील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरवारी होळीच्या दिवशी घडली.
एकून पाच मित्र हे होळीच्या दिवशी पिकनिक साजरी करण्यासाठी याठिकाणी गेले होते.यातील दोन जन पोहण्यासाठी तलावात उतरले, मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना होळीच्या दिवशी  गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
सिद्धेश लक्ष्मीनारायण माळोदे (२०, रा. श्रीहरीनगर, मानेवाडा रोड, नागपूर) व मंथन मधुकर मंदारधरे (२०, रा. ऊर्जानगर, चंद्रपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

 सिद्धेश व मंथन वानाडोंगरी येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीईच्या प्रथम वर्षाला होते. मंथन हा वानाडोंगरी येथे राहायचा. ते त्यांच्या अन्य तीन मित्रांसोबत दुपारी १२ वाजताच्या सुमारास हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) शिवारातील तलावाजवळ पिकनिकसाठी गेले होते.

सर्वांनी मौजमस्ती केल्यानंतर सिद्धेश व मंथन पोहता येत नसतांना देखील तलावात पोहण्यासाठी उतरले.  त्यांनी काठावर बसलेल्या  इतर तिघांनाही पोहण्याचा आग्रह धरला , मात्र तिघांनी त्यांना याबाबद साफ नकार देत काठावर बसणे पसंत केले. दरम्यान, दोघेही खोल पाण्यात गेले आणि पाण्यात जोर जोऱ्यात हात पाय मारू लागले . ही बाब लक्षात येताच काठावरील तिघांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. परिणामी, तिघांनी आरडाओरड केल्याने शिवारातील नागरिक गोळा झाले.
काहींनी या घटनेची माहिती लगेच हिंगणा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचाही पाण्यात शोध घेतला. दुपारी २ वाजताच्या सुमारास दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.मोहगाव (झिल्पी) शिवारातील तलावाजवळ आतापारीयंत अनेक विध्यार्थ्यांचा  बुडून मृत्यू झाला आहे,या तलावाची ओळख देखील जीवघेणा तलाव म्हणून आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने या तलावाच्या काठावर मोठा सूचना फलक लावला आहे. या तलावात आंघोळ करण्यासाठी किंवा पोहण्यासाठी कुणीही उतरू नये, असे आवाहन या सूचना फलकाद्वारे पाटबंधारे विभागाने केले आहे. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून विध्यार्थी याठिकाणी पिकनिक साजरी करण्यासाठी  येतात मात्र यातील काहीच जन हे घरी परततात म्हणून या तलावाला जीवघेणा तलाव असे नाव ठेवण्यात आले आहे, याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.