उमरेड जवळ उदासा येथे खाजगी ट्रॅव्हल्स आणि
ट्रकमध्ये भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू
नागपूर ते सिंदेवाही जात असतांना उमरेड तालुक्यातील उदासा शिवारातील घटना
ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू
झाला तर चार गंभीर जखमी
व उमरेड ग्रामीण रुग्णालयात ३० प्रवाश्यांवर उपचार सुरू आहे
आज मंगळवारी रात्री ८ वाजताची घटना
राहुल ट्रॅव्हल्सचा अपघात
उदासा शिवारात एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रक चाक पंक्चर झाल्याने रोडच्या कडेला उभा होता. दरम्यान, वेगात असलेली ट्रॅव्हल्स त्या ट्रकच्या मागच्या भागावर धडकली.
उमरेड मार्गावरील उदासा शिवारात मंगळवारी रात्री साडेआठ वाजतादरम्यान ट्रॅव्हल्स उभ्या टिप्परवर धडकली. यात पाच ठार तर दहा प्रवासी जखमी झाले.नागपूरवरून वडसा येथे जाण्यासाठी राहुल ट्रॅव्हल्सची एमएच ३४-ए-८४७५ या क्रमांकाची बस सायंकाळच्या सुमारास निघाली. उदासा शिवारात येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या एमएच-४०-एके-२३४४ क्रमांकाच्या गिट्टी भरलेल्या टिप्परवर धडकली. बसचा समोरील भाग चक्काचूर होऊन पाच प्रवासी जागीच ठार झाले. जखमी जिवाच्या आकांताने मदतीसाठी धावा करीत होते. या मार्गावरून जाणारे प्रवासी आणि गावकरी धावून आले. जखमींना तातडीने उमरेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नागपूरला हलिवण्यात आले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सततच्या अपघातांमुळे संतापलेल्या जमावाने टिप्पर पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मृतांमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी कीर्ती सुरेशसिंग चौरे (३२, रा. कोल्हारी), रामदास सीताराम मडावी (५५, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर), संजय रामटेके, रा. भुयार यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. त्या दोघांची नावे कळू शकली नाही. जखमींमध्ये लक्ष्मीकांत वामन लोढे (२९, रा. रत्नापूर), गीता के. झोडे (३५, रा. मकरधोकडा), विनोद मारोती ढोक (३७, रा. रत्नापूर), रागिनी व्ही. चहांदे (१९, रा. तुकूम), सुनील एस. डेकाटे (४५, रा. रत्नापूर), परसराम जे. पराते (४०, रा. भिवापूर), शैलेश बी. विजयकर, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर, राहुल एस. तायडे (२६, रा. सिंदेवाही), शुभांगी देवीदास राऊत (२४, रा. तुकूम), आकाश ठवकर (२६), लक्ष्मण चहांदे (३०), जयप्रकाश सायरे (३५, रा. कामठी), चंद्रा तिकारे (२५, रा. अंतरगाव), गायत्री तिकारे (२३, रा. अंतरगाव), अमर मांढरे (६५, रा. सावरगाव), प्रियंका बनवारे (२३, रा. रमावा) यांच्यासह अन्य तिघांचा समावेश असल्याचे समजते आहे.