সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, July 13, 2018

अवैध मुरुम चोरी प्रकरणात जेसिबी व ट्रक्टरसह मालकावर पोलीसांची कारवाई

रामटेक (तालूका प्रतिनिधी ) 
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम व रेती चोरी होत आहे त्यामुळे शासनाचे नुकसान होत आहे . महसुल विभागाकडुन कारवाई करण्यात येते. पण दंड भरुन परत अवैध उत्खनन वर आळा बस नसल्यामुळे शासनाने या अवैध चोराच्या मुसक्या बांधण्याकरीता थेट पोलीसांनी अवैध मुरुम व रेती चोरान विरोधात गुन्हा दाखल करुन आळा घालायला सुरुवात केली अाहे.रामटेक परिसरात मोठा प्रमाणात नदी नाले व पर्वत व डोंगरार भाग असल्यामुळे या परिसरात रेती व मुरुम चोरी होत असते . दिनांक ०९/०७/२०१८ ला काचुरवाही रोड वरील हातोडी शिवारात मुरुम उत्खनन होत असल्याची माहीती पोलीसांना मिळताच दुपारी चार वाजताचा सुमारास पोलीसांनी घटना स्थळी जाऊन जेसिबी अवैध मुरुम उत्खनन करीत असल्याचे दिसले. पोलीसांनी सदर उत्खनन करीत असलेल्या जेसिबी क्रमांक एम. एच.४० पी. २७३२ व ट्रक्टर एम.एच. ४०एल ८५६ सह जेसिबी मालक प्रभाकर भिवगडे रा. नेरला ,यांच्यासह जेसिबी व ट्रक्टर चालक मनोज पटले रा.दुधावाडा ( म. प्र ), विरेद्र् माहञे रा. शिवनी ( म.प्र. ), शुभम भगते रा. नेरला यांना अटक करण्यात अाली. व यांच्या विरुध्द कलम ३८९ , ३४ , १०९ , भादवी. अन्वेय गुन्हा दाखल करुन अटक करुन तेरा लाख विस हजाराचे मुद्देमाल जप्त करण्यात आले. ही कारवाई उपविभगिय पोलीस अधिकारी रामटेक लोहित मतानी  यांच्या आदेशाने रामटेक पोलीस निरीक्षक वंजारी  यांच्या मार्गदर्शनात स. पो. नि. वर्षा मते   पो. शि. रोशन पाटील ,राजू भोयर ,साबिर शेख, आशिक कुंभरे , सैय्यद आसिफ , भेंडेकर यांनी कारवाई केली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.