काव्यशिल्प Digital Media: भाजप

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label भाजप. Show all posts
Showing posts with label भाजप. Show all posts

Thursday, July 26, 2018

केंद्र व राज्यसरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पाहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीनिशी कार्य करावे- विजय चौधरी

केंद्र व राज्यसरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पाहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीनिशी कार्य करावे- विजय चौधरी

भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची आढावा बैठक संपन्न

चंद्रपूर प्रतिनिधी:- 
भारतीय जनता पार्टी, ओ.बी.सी. मोर्चा, चंद्रपूर महानगर व ग्रामीण यांच्या पदाधिकाऱ्याची आढावा बैठक डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहामध्ये प्रदेश मा. अध्यक्ष विजयदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापौर अंजलीताई घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी श्री चौधरी यांनी पदाधिकाऱ्याकडून संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार कडून राबविण्यात आलेल्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले. 

दि. 24 जुलै 2018 पासून नागपूर येथील ‘‘संवाद से संपर्क’’ अभियानाची सुरूवात प्रदेश अध्यक्ष मा. विजयदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. हा प्रवास पुढील 12 दिवसांपर्यंत निरंतर सुरू राहणार असून या दरम्यान विदर्भ व मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्हयाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व ओ.बी.सी. संघटनांसोबत विविध जाती धर्मातील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्याच्या भेटी घेतल्या जाणार आहे. या दरम्यान गेल्या दोन दिवसांमध्ये नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली येथे पक्षकार्यकत्र्यांची आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर आज प्रदेश पदाधिकाऱ्याचे चंद्रपूर मध्ये आगमन झाले. यादरम्यान दुपारी 1.00 वाजता संपन्न झालेल्या या बैठकीप्रसंगी व्यासपिठावर प्रदेश अध्यक्ष विजय चैधरी, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाध्यक्ष ग्रामीण हरीषजी शर्मा, प्रदेश महामंत्री संजय गाते, प्रदेष उपाध्यक्ष किशोर पाटील, विदर्भाचे अध्यक्ष सुभाश घाटे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्रावण चैव्हाण, ओ.बी.सी. मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बगमारे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, महामंत्री शशीकांत मस्के, श्रीकांत भोयर, स्वप्नील बनकर, ग्रामीण जिल्हा महामंत्री अंकुश आगलावे, राकेश बदकी, संदीप पारखी, महिला जिल्हा अध्यक्षा सारीकाताई संदूरकर व ग्रामीण महिला अध्यक्षा मनिशा चिमुरकर, सह अनेक ओ.बी.सी. मोर्चाचे पदाधिकारी उपस्थिती होते. कार्यक्रमाप्रसंगी श्री चैधरी म्हणाले की आतपर्यंत सर्वात जास्त अन्याय ओ.बी.सी. समुदायावरती झाला आहे. ऐकेकाळी ओ.बी.सी च्या न्याय हक्कासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देखील ओ.बी.सी. संदर्भातील भुमिका बदललेली नाही. यानंतर काकासाहेब कालेलकर आयोगाची नियुक्ती करण्यात आली मात्र त्यालादेखील कॉग्रेस सरकारने बगल दिली. गेल्या 40 वर्षापासून ओ.बी.सी. समाज अन्याय सहन करत होता. मात्र राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात पहिल्या ओ.बी.सी. मंत्रालयाची स्थापना आपल्या राज्यात करण्यात आली. त्यासाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी 9000 कोटी पेक्षा अधिक निधी दिला. त्याचप्रमाणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने राष्टीय ओ.बी.सी. आयोगाची स्थापना करण्याची हालचाल सुरू केली आहे. संसदेमध्ये हे बिल मागील अधिवेशनामध्ये ठेवण्यात आले होते मात्र त्याला काॅग्रेस सरकारने विरोध केला. राज्यसभेमध्ये संख्याबळ नसल्याकारणाने त्यावेळी हे बील पास होवू शकले नाही. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पुर्ण बहुमत आले असून येत्याकाळामध्ये राश्ट्रीय ओ.बी.सी. आयोगाला मंजूरी मिळाल्याषिवाय राहणार नाही. श्री. चैधरी म्हणाले की, आयोगाला मंजूरी मिळाल्यानंतर ओ.बी.सी. समाजाला संवैधानिक अधिकार प्राप्त होणार आहे. 
कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना श्री चौधरी यांनी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाष बगमारे व महानगर अध्यक्ष श्री विनोद शेरकी यांना तीन कलमी कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रात तात्काळ अमलात आणण्याचे आदेश दिले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजना समाजातील प्रत्येक असंघटीत कामगारापर्यंत घेवून जाण्यास सांगितले केवळ 85 रू. भरून कुठल्याही बांधकाम मजुराला या योजनेचा लाभार्थी बनता येईल या लाभाथ्र्यांस एका महिन्याच्या आत 5000 रू. ची मदत राज्यसरकार कडून प्राप्त होईल. तसेच राज्यातील 18 योजनांचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे ओ.बी.सी. समाजातील 348 जातींच्या पदाधिकाऱ्यापर्यंत तसेच अंतर्गत संघटनेच्या नेतृत्वापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेण्याचे निर्देष दिले. येत्याकाळात संबंधीत समाजांच्या समस्या व मागण्या संदर्भात राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. याचबरोबर केंद्र व राज्यसरकारच्या योजनांचा लाभ पदरात पाडून घेतल्यानंतर ज्या लाभाथ्र्यांना त्याचा फायदा झाला त्यांची 60 सेकंदाची एक व्हिडीओ क्लीप बनवून ती वाॅट्सप च्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचविण्याची सुचना केली. 
कार्यक्रमाप्रसंगी महापौर अंजली घोटेकर, महामंत्री संजय गाते, हयांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश बगमारे व सुत्रसंचालन, शशीकांत मस्के यांनी केले. तर उपस्थित मांन्यवर, पदाधिकारी व कार्यकत्र्यांचे विनोद शेरकी यांनी आभार व्यक्त केले.

Tuesday, July 24, 2018

 विजय चौधरी यांचा विदर्भ "संवादसे संपर्क" अभियान दौरा

विजय चौधरी यांचा विदर्भ "संवादसे संपर्क" अभियान दौरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी हे दि. २४ जुलै २०१८ ते १ ऑगष्ट २०१८ विदर्भातील व मराठवाडा विभागातील संधटनात्मक दौरा करणार आहेत. या प्रवासादरम्यान भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची कार्य समिती बैठक घेऊन मोर्चाचा कामकाजाच्या आढावा घेतला जाणार आहे. तसेच ओबीसी मोर्चाचे दोन कार्यक्रम दिले जाणार आहे. याशिवाय जिल्याच्या ठिकाणी ओबीसी समाजातील विविध प्रमुखांशी चर्चा करून केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टी सरकारने केलेल्या जंकल्याणकारी योजनांची माहिती देवून "संवादसे संपर्क" हे अभियान राबविले जाणार आहे.

Tuesday, April 10, 2018

सत्ताधारी भाजप सरकार बसणार उपोषणाला

सत्ताधारी भाजप सरकार बसणार उपोषणाला

bjp साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 सोमवारी केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने देशभर एक दिवसाचा उपवास कार्यक्रम ठेवल्यानंतर आता सत्तेत असणारे मोदी सरकार विरोधकांसाठी एकदिवसीय उपवास कार्यक्रम ठेवणार आहे. 
संसदेत  विरोधक गदारोळ घालून सातत्याने कोंडी करत असल्याचा निषेध करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे सह भाजपचे सर्व खासदार  १२ एप्रिल रोजी काॅंग्रेसच्या राष्ट्रविरोधी भुमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी उपवास उपोषण करणार आहे. हाच कार्यक्रम  चंद्रपूर येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात एकदिवसीय ‘‘सामुहिक उपवास’’ उपोषण करणार आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह नवी दिल्लीत एक दिवस उपोषण करणार आहेत.
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाजाचे बहुतांश दिवस वाया गेले. ही बाब देशातील जनतेपुढे नेण्यासाठी तसेच कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून घातल्या जाणाऱ्या गदारोळाचा विरोध करण्यासाठीच हे उपोषण असल्याचे संगीतल्या जात आहे. 
 12 एप्रिल 2018 रोजी गांधी चौक  चंद्रपूर येथे सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत हा सामुहिक उपवास कार्यक्रम होत असून या कार्यक्रमास राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री  तथा पालकमंत्राी चंद्रपूर जिल्हा
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर विधानसभेचे आमदार नानाभाऊ शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, राजुरा विधानसभेचे आमदार अॅड. संजय धोटे, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आर्णी विधासभा क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, महापौर सौ. अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेल्या या एकदिवसीय उपवास कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा
परिषद, पं.स. सभापती, मनपा सभापती, नगरपरिषद सभापती, जि.प. सदस्य, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक या उपवास कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Wednesday, March 14, 2018

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

मुंबई/काव्यशिल्प ऑनलाईन:
bjp shivsena साठी इमेज परिणाम
"शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार’, असा थेट दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतच केला आहे.‘शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार.’ असा दावा मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून केला.‘उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना तर मंत्री बनण्याची घाई झाली आहे. मात्र पुन्हा सत्ता आमचीच येणार.’ असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला,आमच्यात किती ही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ . काँग्रेस-राष्ट्रवादी 1999 मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ.’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.
एकीकडे शिवसेनेनं 2019 लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. अशावेळी मुनगंटीवार यांनी थेट सभागृहात आपण एकत्र लढणार असल्याचं म्हटल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. त्यामुळे शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Wednesday, February 28, 2018

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

आदिवासी समाज व चंद्रपूरची जनता किशोर जोरगेवारांन सोबत - सुरेश पचारे
चंद्रपूर (ललित  लांजेवार):   
shivsena bhajap साठी इमेज परिणाम
                       राज्याच्या राजकारणात भाजप शिवसेना यांच्यातला वाद काही नवीन नाही,खांद्याला खांदा लाऊन सत्तेत बसेले दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दररोज करतात,तुझ माझ जमेना, तुझ्या वाचुन करमेना अशी स्थिती  राज्यात या पक्षाची आहे.
                   मात्र चंद्रपूरच्या राजकारणात देखील आज परीयंत कधी न झालेला  शिवसेना भाजप वाद आता शहराच्या राजकारणात जोर पकडू लागल्याचे चिन्ह दिसु लागले आहे. सोमवारी चंद्र्पूर येथे शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेत वाहतुकीची कोंडी होत असणाऱ्या जटपूरा गेट येथून वाहतुकीचा मार्ग मोकळा करा व नंतरच सौंदर्यीकरण करा यासाठी आंदोलन केले, तसेच जिल्हाधिकारी यांना माहितेचे निवेदन देत सूचनाही सुचविल्या,हे आंदोलन होत नाही तर लगेच चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांनी या आंदोलनावर आक्षेप घेत एक प्रेस नोट माध्यमांत प्रकाशित केली. जटपूरा गेटला धक्का जरी लागला तर आदिवासी समाज चूप बसणार नाही.  असा घानाघात करत शिवसेनेच्या आंदोलनाला विरोध दर्शविला.
                     याच भाजप व शिवसेनेच्या तू-तू मै-मै मध्ये आता चंद्रपूरचे शिवसेनेचे नगरसेवक व शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी एक प्रेस नोट काढत भाजपला थेट प्रतिउत्तर देत धारेवर धरले आहे. पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला असा खोचक उत्तर शिवसेना नेते किशोर जोरगेवार याची बाजू राखत सुरेश पचारे यांनी भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांना दिले आहे. 
                   याच सोबत प्रसिद्धी पत्रकात शिवसेने भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांच्यावर बराचश्या प्रश्नांची भडीमार केली आहे.  शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेतल्या नंतर भाजपाच्या नगर सेविका शितल कुळमेथे यांना आदिवासी समाजाच्या पुरातन वास्तुंचा साक्षात्कार झाला आहे. जेव्हा महानगर पालीकेने गिरनार चौकातील विर बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या नावाचा फलक काढून तो कच-यात टाकला तेव्हा त्या परदेशात होत्या का? असा टोला हाणत किशोर जारगेवार यांच्या लोकोपयोगी आंदोलनाला आदिवासी समाजाचा पाठींबा असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगर सेवक सुरेश पचारे यांनी स्पष्ट केले आहे. 
शिवसेनेचा विकासकामांना कधिच विरोध नव्हता ना तो असेल मात्र नको त्या गोष्टीवर खर्च करुन मुळ समस्या जैसे तेच ठेवली जात असेल तर त्याला मात्र शिवसेना तिव्र विरोध आहे असे देखील या पत्राच्या माध्यमातून म्हटल्या गेले आहे , सौंदर्यीकरनाला आमचा विरोध नाही मात्र पहिले येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवा व नंतर हे सौंदर्यीकरण करा अशी भुमीका किशोर जोरगेवार यांनी घेतली आहे.
                         यात गोंड कालीन जटपूरा गेटचे अतिस्व मिटण्याचा प्रश्नच येत नाही. आणि शिवसेना असे पर्यंत तरी चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा असलेले गोंड कालीन वास्तूंना हात लावण्याची कोणाची हिम्मत नाही. आदिवासी समाज हा चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव आहे या समाजाचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभला आहे मात्र त्याच्या वीर पुत्रांचे एकही  स्मारक शहरात नाही. त्यामुळे जटपुरा गेट समोर विर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक व्हावे अशी सेनेची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र आता नगरसेविका शितल कुळमेथे यांनी प्रेसनोट प्रकाशित करुन यात जातीय राजकार घोडण्याचा प्रयत्न केला आहे. याला आदिवासी समाज कधीही स्विकारणार नाही. गोंड कालीन वास्तुंची दशा आजघडीला अतिशय बिगट झाली आहे. त्यासाठी कूळमेथे यांनी आजवर किती निवेदण दिलेत? पहिले  हे सांगावे ,त्याच्या स्वताच्या भानापेठ प्रभागात नागरिकांनी गोंड कालीन परकोटांवर अतिक्रम केले आहे. त्यांना ते दिसत नाही का ? ईक्रो प्रो संघटणेच्या वतीने परकोट स्वच्छता मोहीम  राबवली जात असतांना शितल कुळमेथे यांनी कितीदा उपस्थिती लावली पाहिले हे सांगावे केवळ राजीकय हेतुतून समाजाच्या नावाचा गैरवापर करून उघीच  बडबड करु नये, आदिवासी समाज हा जागरुत आहे. आणि भाजपाने या समाजासाठी काय केले हेही या समाजाला चांगल्याने कळते त्यामूळे अश्या नगर सेवीकांच्या मागे हा समाज कधिच उभा राहणार नाही.  हे आदिवासी समाजाचे नेते तसेच आदी जनचेतना जागर या संस्थेचे अध्यक्ष अशोक तुमराम यांनी किशोर जोरगेवार यांच्या धरणे आंदोलनात उपस्थित राहून दाखऊन दिले आहे. त्यामुळे कुळमेथे यांनी पहिले त्यांच्या प्रभागातील परकोटांवर नारिकांनी केलेले अतिक्रमण काढावे त्यात भाजप त्यांना मदत करत नसेल तर तसेही सांगावे आम्ही गोंड कालीन वसा वाचवीण्यासाठी प्रयत्नशील असुन हे अतिक्रमण काढण्यात आम्ही तुम्हाला मदत करु असा सल्लाही पचारे यांनी शितल कुळमेथे यांना दिला आहे. 
                        याअगोदर पाच ठिकाणी गोंड कालीन परकोट तोडल्या गेले ते कुणाला विचारून तोडण्यात आले व त्यावेळेस कोणते अधिकारी होते? तसेच २.५० कोटी रुपये जटपुरा गेटच्या सौदर्याकरीता सरकारकडून दिले आहे जटपुरा गेट येथे वाहतूक कोंडी हि खूप मोठी समस्या आहे आणि इथल्या लोकप्रतीनिधीकडून तिथे सौंदर्यीकरणासाठी २.५० कोटी रुपये खर्च करीत आहेत ते पैसे तिथे खर्च करण्याची काही गरज नाहि तेच २.५० कोटी रुपये परकोटाच्या डागडुजी करीता खर्च करावे. या जटपुरा गेटच्या सौंदर्याकरीता शहरातील मोठे व्यापारी तसेच अनेक कंपन्या करायला तयार आहे पण त्यांना हे शासन करू देत नाही.  आणि तेच काम फुकट होत असताना त्याठिकाणी २.५० कोटी रुपये खर्च करण्याची काही गरज नाही आहे या संपूर्ण विषयाकडे नगरसेविका शितल कुळमेथे यांनी लक्ष द्यावे आणि विनाकारण दोषारोपण करू नये.  असा सवाल देखील पचारे यांनी करत भापला चांगलच सवालाच्या घेऱ्यात उभे केले.  त्यामुळे दररोज होणाऱ्या भाजप शिवसेना वादात नक्कीच चंद्रपूरच्या नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार का ? कि हे दोन्ही पक्ष दररोज आप-आपल्या कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून एकमेकांवर टीका करतच राहणार हे मात्र योग्य ती वेळच ठरवेल.त्यामुळे शिवसेनेच्या या खोचक सावलांचे उत्तर भाजप कोणत्या पद्धतीने देते ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे. 
shivsena bhajap साठी इमेज परिणाम

Tuesday, February 27, 2018

 शिवसेनेचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी:भाजपचा घणाघाती आरोप

शिवसेनेचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी:भाजपचा घणाघाती आरोप

विकासाला बगल देत राजकारण
bjp logo साठी इमेज परिणाम चंद्रपूर(ललित लांजेवार)
सोमवारी जटपुरा गेट येथे शिवसेनेने केलेल आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी आहे असा अनाघाती आरोप आता चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजपच्या  महिला नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी केला आहे,  चंद्रपूर शहराला ५००  वर्षांचा इतिहास आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव लाभलेले असल्याची नोंद आहे.  येथील परकोट,किल्ले,मंदिर,  समाधी स्थळे, हे गुंड राज्याचे वैभव दर्शविणारे केंद्र आहे.  त्यांच्या सौंदर्यात लाइटिंगमुळे  भर पडणार आहे.  वाहतुकीची कोंडी आणि लाइटिंग हा सबंध सामान्यांच्या बुद्धीला न पटणारा आहे.त्यामुळे जोरगेवार हे  राजकीय हेतूने पूर्वजांनी 500 वर्षांपासून जतन केलेल्या पुरातत्त्व संपत्तीला संपवण्याचा डाव खेळात आहेत असा आरोप  भाजपच्या  महिला नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी शिवसेनेवर केला आहे. या जटपुरा गेटला धक्का जरी लागला तर आम्ही आदिवासी समाज रस्त्यावर उतरू असा ईशारा यावेळी नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी दिला  आहे,
                चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाज 500 वर्षांपासून गोंड राजांनी उभारलेल्या वैभवाचे जतन करत आलेला आहे.  या संपत्तीला अधिक वैभव लाभण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने लावण्यासाठी भरीव निधी देऊन मदत केली आहे.  इतिहासाला आपण जपायला हवे परंतु विकासापोटी असंतुष्ट प्रवृत्तीचे लोकी  ऐतिहासिक वारसा जतन न करता तो नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहे हे आम्ही आदिवासी समाज कदापी खपवून घेणार नाही, 

 ५००  वर्षांचा पुरातत्त्व गोंड राजाचा इतिहास आम्ही फक्त पुस्तकाद्वारे पुढच्या पिढीला न सांगता तो प्रत्यक्षात जतन करून ठेवू, या सौंदर्यीकरण आला कुठलाही विरोध केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाहीर  निषेध करू असे देखील म्हणाले. 
पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न 
अशा प्रकारचे पुरातन वस्तू यांचे जतन करण्यासाठी दिल्ली,औरंगाबाद येथे अशा प्रकारची लाइटिंग लावण्यात आलेली आहे. याच प्रकारची लाइटिंग चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवात वाढ करण्याकरिता लावण्यात येणार आहे यामुळे चंद्रपूर आकर्षणाचे केंद्र बनेल व  गोंड राज्याच्या ऐतिहासिक पुढची पिढी  माहिती करून घेण्याचा प्रयत्न करेन.  की आमच्या आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे विकासाला साथ देत विकासासोबत राहायला हवे असा सल्ला देखील यववेली देण्यात आला

Saturday, February 17, 2018

कॉंग्रेसला मोठे खिंडार;प्रभारी सरपंचाचा भाजपात प्रवेश

कॉंग्रेसला मोठे खिंडार;प्रभारी सरपंचाचा भाजपात प्रवेश

घुग्‍गुस/प्रतिनिधी:
घुग्‍गुसचे प्रभारी सरपंच श्री. संतोष नुन्‍ने यांनी महाराष्‍ट्राचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उ‍पस्‍थीतीत आज शनिवारी दुपारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. त्‍यांच्‍या प्रवेशाने घुग्‍गुस मधील कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. 
चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात श्री. संतोष नुन्‍ने यांनी त्‍यांच्‍या समर्थकांसह भाजपात प्रवेश घेतला. चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, आमदार नानाजी शामकुळे यांनी श्री. संतोष नुन्‍ने यांचे स्‍वागत करत पक्षप्रवेशाबाबत त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, आ. नानाजी शामकुळे आणि जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांची विकासाभिमुख कार्यशैली, सर्वसामान्‍य जनतेला न्‍याय देण्‍याची त्‍यांची हातोटी यामुळे प्रभावित होवून आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असुन यापुढे घुग्‍गुस शहरात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक बळकट करण्‍यावर आपला भर राहील असे श्री. संतोष नुन्‍ने यावेळी बोलताना म्‍हणाले. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर तालुका भाजपाचे तालुकाध्‍यक्ष नामदेव डाहूले, भाजपा शहर अध्‍यक्ष विवेक बोढे, जिल्‍हा परिषद सदस्‍य सौ. नितू चौधरी, पंचायत समिती सदस्‍य निरीक्षण तांड्रा, विनोद चौधरी, पुंडलिक उरकुडे,सौ. वैशाली ढवस, सौ. सुचिता लुटे,पिंटु मंडल, उमेश गुप्‍ता, मुकेश कामतवार, सुरज कडसाईत, कुंदन कुंभारे, प्रकाश बोबडे, सिनू इसराप, साजन गोहणे, हसन शेख, सौ. पुजा दुर्गम,  सौ. सुषमा सावे, शंकर गोगला, शाम आगदारी, अमोल थेरे, श्रीकांत सावे, निरंजन डंभारे, शंकर सिध्‍दम, अनिल मंत्रीवार, रत्‍नेश सिंग, सुरेंद्र झाडे, सचिन कोडापे, राजु लुटे, अजगर खान, तुळशिदास ढवस, राजेश मोरपाका, यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

उपाध्यक्ष पदासाठी भाजपातच धूसफूस

उपाध्यक्ष पदासाठी भाजपातच धूसफूस

तालुका वार्ताहर / रामटेक: 
रामटेक नगर परिषदमध्ये वर्षभरापुर्वी नगराध्यक्ष व १३ नगरसेवक निवडून आल्याने भाजपाला एकहाती सत्ता प्राप्त झाली. मात्र, नगरपालिकेतील राजकारण वर्ष उलटल्याने अचानकच तापले. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. सरकारने जरी उपाध्यक्षांचा कार्यकाळ अडिच वर्षांचा ठरविला असला तरी प्रत्येक वर्षी एकेका नगरसेवकाला उपाध्यक्ष होण्याची संधी देण्याचे भाजपा गटात ठरले होते. मात्र, विद्यमान उपाध्यक्षा कविता मुलमुले यांनी कालावधी पूर्ण होवूनही राजीनामा न दिल्याने नगरपालीकेतील राजकारण तापल्याचे भाजपाच्या अंतर्गत सुत्राकडून माहिती मिळाली.
रामटेक नगरपालीकेत थेट जनतेतून भाजपाचे दिलीप देशमुख नगराध्यक्ष निवडून आले. त्यांचेसोबत नगरपालीकेत भाजपाचे १३ सदस्यही निवडून आले. भाजपाच्या नगरसेविका कविता मुलमुले यांची उपाध्यक्ष पदावर सर्व सदस्यांनी निवड केली. मात्र, असे करताना दरवर्षी उपाध्यक्षपदाची संधी अन्य नगरसेवकांना देण्याबाबत ठरविण्यात आले होते. यासाठी वर्ष संपताच उपाध्यक्षांनी आपला राजीनामा सादर करावा. या पदासाठी प्रशासन निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल व निवडणूकीच्या माध्यमातून उपाध्यक्षाची निवड केली जाईल असे ठरले होते. यावर विद्यमान उपाध्यक्षा कविता मुलमुले यांनीही होकार दिला होता. तसे राजीनामापत्र त्याचवेळी लिहून दिले होते. मात्र, आता त्या या पदाचा राजीनामा देण्यास तयार नसल्याचे वृत्त आहे.
उपाध्यक्षपदाची संधी आपल्याला मिळावी यासाठी वर्षभरापासून वाट बघणार्‍या नगरसेवकांचा यामुळे हिरमोड झाला आहे. याबाबत भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवकांची सभा संपन्न झाली. मात्र, त्यात तोडगा न निघाल्याने सत्तापक्षाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) नागपुरला भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडल्याचे समजते.
यापुर्वी झालेल्या बैठकीत रामटेकचे आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा महामंत्री गजभिये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास तोतडे यांनी सर्व नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. सर्वच नगरसेवकांनी विद्यमान उपाध्यक्षांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यावा. नवीन उपाध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा करावा, असे मत व्यक्त केल्याचे समजते. मात्र, या बैठकीला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व उपाध्यक्षा कविता मुलमुले यांचे पतीदेव संजय मुलमुले हे अनुपस्थित राहीले. भाजपातील या अंतर्कलहाची मात्र रामटेक शहरांत खमंग चर्चा आहे.

Sunday, January 07, 2018

नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडूभाऊ क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश

नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडूभाऊ क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश

नागभीड तालुक्यात काँग्रेसला मोठी खिंडार 
नागभीड/प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षाची “सबका साथ सबका विकास” आधारित ध्येय धोरणे आणि पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी  व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस यांच्या  मागील तीन वर्षाच्या शासन काळात झालेला चौफेर विकास तसेच चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचा केलेला कायापालट याने प्रभावित होऊन नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि नागभीड तालुका कॉंगेसचे पदाधिकारी मुरलीधर उर्फ बंडूभाऊ क्षीरसागर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 
                                                                    चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच भारतीय जनता पक्षाचा ध्वज देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया म्हणाले कि, प्रतिपक्षाचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याने हे सिद्ध झाले आहे कि भारतीय जनता पक्षाची “सबका साथ सबका विकास” आधारित ध्येय धोरणे हि सर्वागीण असून त्यामुळे सर्वांचा विकास होत आहे. भाजपच्या नेतृत्वात देश आणि राज्य उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.  यावेळी मुरलीधर उर्फ बंडूभाऊ क्षीरसागर यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया यांच्या नैतृत्वावर विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी भाजपचे जेष्ट नेते वसंतभाऊ वारजूकर, नागभीड नगर परिषदेचे अध्यक्ष प्रा. उमाजी हिरे, नागभीड नगर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, नागभीड नगर परिषदेचे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आवेश पठाण, प्रदीपभाऊ तर्वेकर,सुधाकर अमृतकर,राजेंद्र चिलबुले,रवींद्र पोलकमवार, दशरथ ऊके, रुपेश गायकवाड, सुनील किटे,संजय मालोदे, आदीसह अनेक भाजपा नागभीड चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday, January 06, 2018

राज्यासाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’

राज्यासाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’


नागपूर : विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी , उद्योगांचा अभाव, वीज भारनियमन,कुपोषण व नक्षलवाद अशा समस्या मार्गी लागव्यात, तसेच विदर्भाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच जनतेची मते जाणून घेण्यासाठी ७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढणार असल्याचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रात सत्ता आल्यास विदर्भाचे स्वतंत्र राज्य होईल, असे आश्वासन भाजपा नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. गेल्या साडेतीन वर्षापासून केंद्रात सत्ता असूनही विदर्भाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपा नेत्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. दुसरीकडे राज्य सरकारवर तब्बल ४.५० लाख कोटींचे कर्ज आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेता संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. नव्याने निर्माण झालेले उत्तराखंड राज्य प्रगतीच्या बाबतीत देशात सर्वात पुढे आहे. याचा विचार करता स्वतंत्र राज्य झाल्यास विदर्भाचा विकास होईल. आजवर विदर्भासाठी राखून ठेवण्यात आलेला निधी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी वळविण्यात आला. यामुळे विदर्भ मागास राहिला. परिणामी विदर्भ शेतकरी आत्महत्यात सर्वात पुढे असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.

Wednesday, January 03, 2018

भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड

भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड


 चंद्रपूर/प्रतिनिधी: 
चंद्रपुरात भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरु असतांनाच काही आंदोलनकर्त्यांनी चंद्रपूरचे भाजपचे आमदार नाना शामकुळे यांच्या गंजवॉर्ड स्थित कार्यालयावर दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असल्याची ताजी बातमी हाती येत आहे .जवळपास ४० त्यांच्या कार्यालयाकडे आले यात २० महिला व २० युवकांचा समावेश होता. काल भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.या आंदोलनाने चंद्रपुरात हिंसक वळण घेत येथील आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.यात तेथे राहणाऱ्या शहरातील प्रसिद्ध व्यापारी सारडा यांच्या गाडीच्या काचा  देखील फोडण्यात आल्या. तोडफोड सुरु असतांना मात्र आमदार नाना शामकुळे आपल्या कार्यालयात उपस्थित नव्हते , (सविस्तर वृत्त काही वेळातच )


Saturday, December 30, 2017

अमोल कोंडबतुनवार यांचे निधन

अमोल कोंडबतुनवार यांचे निधन

सच्चा कार्यकर्ता हरपला- सुधीर मुनगंटीवार. 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य , तथा जिल्हा संयोजक श्री अमोल कोंडबत्तूनवार यांचे चंद्रपूर नागभीड-नागपूर मार्गावरील भुयार येथे अत्यंत दुर्दैवी अपघाती निधन झाले.सावली मार्गे आपल्या तीन मित्रांसोबत अमोल चारचाकी गाडीने जात होते मात्र भुयार येथे रस्त्यावर एक बर्फाची लादी पडली होती. या लादीला  कट मारून जाण्याच्या गडबडीत समोरूनयेणाऱ्या ट्रक ला जोरदार धडक बसली. यात अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. 

भाजपा चंद्रपूर जिल्हा संयोजक अमोल कोंडबतुनवार यांचे अपघाती निधन ही मनाला चटका लावणारी घटना असून त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे . भारतीय जनता पार्टी अमोलच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे .
आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Wednesday, November 15, 2017

ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौक ते मर्दान अली सिमेंट रस्ता ठरत आहे जीवघेणा

ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौक ते मर्दान अली सिमेंट रस्ता ठरत आहे जीवघेणा

प्रा.सुयोगकुमार बाळबुध्दें भा.ज.यू.मोर्चा ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितित नगर परिषदे ला निवेदन.

 ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
 ब्रम्ह्पुरी येथील शिवाजी चौक तें मर्दान अली या सीमेंट रस्त्यांची दूरावस्था झाली असून अपघाताच प्रमाण वाढले आहे त्या रस्त्याच्या संदर्भात मा.मुख्याधिकारी न.प.ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले.
 सदर रस्त्यांच बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले त्यामुळे रस्त्याला खूप असॆ खड्डे पडलेली आहेत अशी माहिती खासदार मा.अशोक नेते यानी  मागील महिन्याच्या आढावा बैठकीत नगरपरिषददेंला  आदेश देण्यात आले होते. सदर रस्त्यांच काम दिवाळी नंतर सुरू करू असॆ आश्वासन नगर परिषद तर्फे मा.खासदार साहेबाना देण्यात आले होतें.परंतु दिवाळी लोटूनही  एक महीना होत आला तरी नगर परिषद तर्फे कामाला सुरुवात झालेली नाही.
   सदर रस्त्याच काम तात्काळ करण्यात यावे त्या साठी  भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.परेश शहादाणी ,भा.ज.यु.मो.ब्रम्हपुरी शहराध्यक्ष प्रा.सुयोगकुमार बाळबुद्दें,शहर महामंत्री श्री.रितेश दशमवार ,शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवे ,शहर सचिव श्री.दत्ता येरवार यानी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.तात्काळ या रस्त्याच काम न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा ब्रम्हपुरी वासिय जनता आणि भा.ज.यु.मो.यांच्या वतीने नगर परिषद ला माहिती देण्यात आली.

Tuesday, November 14, 2017

आता विदर्भ लांबणीवर

आता विदर्भ लांबणीवर


नागपूर - विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं.
निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचं आश्‍वासन दिलं होतं. पण जवळपास तीन वर्षं झाल्यानंतरही भाजप सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबद्दल कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या भूमिकेबाबत विदर्भवाद्यांमध्ये संभ्रम आहे.
स्वतंत्र विदर्भाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी म्हणाले, "विदर्भातील शेतकरी सक्षम झाला पाहिजे. विदर्भात अनेक प्रकल्प सुरू आहेत. विदर्भ सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही."
vidarbh साठी इमेज परिणाम

Saturday, November 11, 2017

सरपंचांनी आदर्श ग्राम निर्माण करावेः डाॅ.पोतदार

सरपंचांनी आदर्श ग्राम निर्माण करावेः डाॅ.पोतदार

 राज्य सरकारचा त्रिवर्षपुर्ती अभिनंदन सोहळा
       नागपूर / प्रतिनिधी -   जिल्हयातील ग्रामिण भागातील भाजपा कार्यकत्र्यांच्या मेहनतीमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 136 ठिकाणी विजय मिळवुन मोठे यश संपादन करता आले.मात्र या यशाने हुरळुन न जाता ग्रामिण क्षेत्रात आणखी व्यापक काम करण्याची गरज आहे.आपआपल्या गावांचा विकास साधण्यासाठी सरपंचांनी जोमाने कामाला लागले पाहिजे भाजपच्या प्रत्येक सरपंचाने आपले गाव आदश्ज्र्ञ ग्राम म्हणुन निर्माण करावे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डाॅ.पोतदार यांनी केले.
जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना भाजयुमोद्वारा फळवितरण

जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना भाजयुमोद्वारा फळवितरण

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या जन्मदिवसानिमित्त
चंद्रपूर:  ‘‘रूग्णसेवा हिच नारायण सेवा’’ या ध्यासाने सदैव रूग्णसेवेस विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध आजारावर शिबीरे आयोजित करून रूग्णांना दिलासा देणारे केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या जन्मदिवसानिमित्त युवा नेते मोहन चैधरी यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या  माध्यमातून जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांना फळ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण वार्डामध्ये भरती असलेल्या रूग्णांना फळांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत केले. 
दि. 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमास नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे पदाधिकारी आमिन शेख, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले, पं.स. सदस्य प्रेम चिवंडे, नगरसेविका सौ. शीला चैहान, शितल इटनकर, शोभा पारीख, विनोद शेरकी, मनोज गौरकार, राहूल बोरकर, तुकूम भाजप मंडळ अध्यक्ष प्रमोद शास्त्राकार, इंजि. श्रीकांत भोयर, भाजप रूग्णालय प्रमुख अशोक सोनी, तेजा सिंह, मुकेश यादव, राहूल बोरकर, जगदिश दंडेले, बलवंत मून, अरविंद जामूनकर जितू शर्मा, धवल चावरे, ललीत गुलानी, अक्षय खनके, निलेश खोलापुरे, राजेश कोमल्ला, नरेश पुजारी यांचेसह भाजयुमोचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झाले होते. 
यावेळी वार्डातील परिचारीका, वाॅर्डबाॅय, सुरक्षारक्षक व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी ना. हंसराज अहीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून त्यांच्या हातून सदोदीत रूग्णसेवा घडत रहावी अशी भावना व्यक्त केली. वाॅर्ड नं. 1 ते 6 मधील रूग्णांना मोहन चैधरी यांच्या नेतृत्वात फळ वितरण करून  ना. अहीर यांचा वाढदिवस रूग्णसेवेत घालवीत साजरा करण्यात आला. 

Friday, November 10, 2017

रामू तिवारींची घरवापसी होणार?

रामू तिवारींची घरवापसी होणार?

चंद्रपूर - महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रामू उर्फ रितेश तिवारी भाजप सोडून पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असून यासाठी ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याची खात्रीजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉग्रेस मध्ये असतांना शहरातील काँग्रेस पक्षाच्या बळकटी देत कार्यकर्त्यांचा मोठा फोज फाटा तयार करणारे रामू तिवारी यंदाच्या मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज होहून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. मात्र मतदारसंघ नवा असल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्येच काम केले. सध्याही ते भारतीय जनता पार्टीतच सक्रिय आहे. मात्र आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या संबंधाने त्यांनी नुकतीच नागपूर येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेतल्याचीही खात्रीजनक माहिती आहे.

अविनाश पाल बाजार समिती अशासकीय प्रशासकीय मंडळात

अविनाश पाल बाजार समिती अशासकीय प्रशासकीय मंडळात

सावली/प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अशासकीय प्रशासकीय मंडळात मुख्य प्रशासक म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी पदभार स्विकारला.
या अशासकीय प्रशासक मंडळात उपमुख्य प्रशासक म्हणून विनोद गड्डमवार यांची तर प्रशासक म्हनुन दिलीपजी ठिकरे, पुनम झाडे, सुधाकरजी गोबाडे, अर्जुनजी भोयर, अरुनजी पाल, गुरुदेव भुरसे, अशोक नागापुरे, रविंद्र साखरे, सचिन तंगडपल्लीवार,  ढिवरूजी कोहळे, भुवनजी सहारे, सौ. पुष्पाताई शेरकी व शरद सोनवाने यांची नियुक्ति करण्यात आली.
पदभार स्विकारतांना संतोष सा. तंगडपल्लीवार सभापती बांधकाम समिती जि. प. चंद्रपूर, देवराव सा. मुद्दमवार जिल्हा सचिव भाजपा, सतिष बोम्मावार महामंञी, तुकाराम ठिकरे उपसभापती पं. स. सावली, मनिषा चिमुरकर सदस्य जि. प. चंद्रपूर, योगिता डबले सदस्य जि. प. मनोहरजी कुकडे होते.

Wednesday, November 08, 2017

नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे जनआक्रोश आज

नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे जनआक्रोश आज

नागपूर - ८ नोव्हे.२०१७ रोजी नोटबंदी ला १ वर्ष पूर्ण होत असून देशभरात काँग्रेस पक्षातर्फे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे . भाजप प्रणित केंद्र व राज्यात सत्तेत असलेले शासन जनतेविरुद्ध अनेक निर्णय घेत आहे. याचा फटका समाजातील सर्व घटकांना बसला असून  या  शासन विरुद्ध बुधवार  ८ नोव्हे.२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता   टेलीफोन एक्सचेंज चौक,नागपूर  येथे जनआक्रोश  आंदोलन करण्यात येणार आहे.  आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले आहे.

Tuesday, November 07, 2017

दारूच्या बाटलीवर भाजपच्या 'कमळ'चा लोगो

दारूच्या बाटलीवर भाजपच्या 'कमळ'चा लोगो


नागपूर/प्रतिनिधी :  दारूला महिलांचे नाव दिले तर दारूची अधिक विक्री होईल असं म्हणणाऱ्या गिरीश महाजनांचा नागपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दारूच्या बाटलीवर कमळ चिन्ह लावून कलेक्टर ला दारूच्या बाटल्या दिल्या.

केंद्रात आणि राज्यात भाजप ची सरकार आहे, त्यामुळे भाजप चे फॉलोवर अधिक आहे त्यामुळे बाटली वर मोदी किंवा कमळ लावले तर अधिक विक्री होऊ शकते अस राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष अलका कांबळे यांनी सांगितले. तसेच हा महिलांचा अपमान असून गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यानी त्यांना राजीनामा मांगवावा असे अलका कांबळे यावेळी म्हणाल्या.  

दारूची विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांची नावे द्यावीत असा अजब सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचे वृत्त सर्वत्र गाजले होते. बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते, ही वस्तुस्थिती आहे. तंबाखूजन्य पदार्थांनाही विमल, सुमन अशी बहुतांशी महिलांचीच नावे दिल्या गेली आहे. त्यामुळं सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी दारूचं नाव 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' करावे असे गिरीश महाजन म्हणाले होते.