काव्यशिल्प Digital Media: माया

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label माया. Show all posts
Showing posts with label माया. Show all posts

Sunday, May 13, 2018

ताडोबात माया वाघिणीचा अनोखा अंदाज;व्हिडीओ व्हायरल

ताडोबात माया वाघिणीचा अनोखा अंदाज;व्हिडीओ व्हायरल

नागपूर/ललित लांजेवार:
कधी आपल्या पिल्लांसोबत तलावावर पाणी पिण्यासाठी आलेली माया तर कधी चितळाची शिकार करतांना पाठलाग करणारी,तर कधी बिनधास्त मुक्त संचार करणारी,तर कधी जीप्सितल्या  पर्यटकांची घाबर गुंडी करणारी ताडोबाची सेलिब्रेटी वाघीण माया तुम्ही नेहमीच बघितली असेल, वाघांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ताडोबाच्या घनदाट जंगलात शनिवारी म्हणजेच मातृ दिनाच्या पूर्व संध्येला माया हि वाघिन एका अनोख्या अंदाजात पर्यटकांना बघायला मिळाली. ताडोबाच्या जंगलात दुपारी बांबूंच्या वेढ्याने वेढलेल्या परिसरात माया वाघीण ही आपल्या दोन पिल्लांना स्तनपान करत असल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून ही माया  आपल्या दोन पिलांसोबत जंगल परिसरात भ्रमण करतांना दिसते आहे. या मुक्त भ्रमंतीचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसतात.मात्र शनिवारी ती आपल्या दोन पिल्लांना स्तनपान करताना पर्यटकांना दिसली. पर्यटकांनी देखील मायाला ह्या अंदाजात बघण्याचा मोह आवरता आला नाही.आणि गाडी थांबवून पर्यटकांनी व्याघ्र दर्शन केले.ह्या वाघीनीने गेल्या  डिसेंबर महिन्यात ताडोबा येथे २ पिल्लांना जन्म दिला होता.
त्यानंतर हि वाघीण ताडोबात चर्चेचा विषय ठरली आहे.  सध्या चंद्रपूरचे तापमान ४७ अंश  सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे.असे असले तरी देखील ताडोबात पर्यटकांची गर्दी ही कमी झालेली नाही.ऑनलाईन बुकिंग असल्याने दिवसेंदिवस पर्यटक या ठिकाणी जंगल भ्रमंतीला येत आहेत.अश्यातच मायाचा अंदाज पर्यटकांना चांगलाच आनंद देऊन गेला.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).