काव्यशिल्प Digital Media: महाराष्ट्र

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts

Wednesday, February 06, 2019

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार

१५ फेब्रुवारी रोजी पुण्यात वितरणढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. ६ : राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर झाला असून, १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तमाशा क्षेत्रात विठाबाई नारायणगावकर यांनी केलेली प्रदीर्घ सेवा विचारात घेता त्यांच्या नावे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य सरकारतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र शासनातर्फे सन २००५ पासून तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार विविध कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना घोषित करण्यात आला आहे. गतवर्षीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलाकार मधुकर नेराळे यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये ५ लाख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे औचित्य साधून राज्य शासनाच्यावतीने पाच दिवसाच्या ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ढोलकीफड तमाशा महोत्सव १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वाघोली बाजारतळ तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

ढोलकीफड तमाशा महोत्सवात दरदिवशी एका लोकनाट्य मंडळाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. गुरुवार दि. १४ फेब्रुवारी रोजी हरिभाऊ बडे नगरकर सह शिवकन्या बडे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ, शुक्रवार दि. १५ फेब्रुवारी रोजी भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, शनिवार दि. १६ फेब्रुवारी रोजी रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ, रविवार १७ फेब्रुवारी रोजी सौ. मालती इनामदार नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, सोमवार दि. १८ फेब्रुवारी रोजी श्रीमती मंगला बनसोडे करवडीकर सह नितीन बनसोडे करवडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ हि लोकनाट्य मंडळे ढोलकीफड तमाशा महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.

तरी रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा भरभरून आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक यांनी केले आहे.
चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते  संगीत नाटक अकादमी पुरस्कार

चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार


नवी दिल्ली दि. 6 : प्रसिध्द नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशीप प्रदान करण्यात आली.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ४ कलाकारांसह देशभरातील ४२ कलाकारांना वर्ष २०१७ चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यावेळी उपस्थित हेाते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांना सन्मानित करण्यात आले. श्री भडकमकर यांनी गेली दोन दशके नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य केले आहे. नाटक, सिनेमा, कथा कादंबरीच्या माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार लेखक म्हणून सहजपणे वावरणारे श्री. भडकमकर उत्तम कलावंतही आहेत. ‘चुडैल’ हा कथासंग्रह, ‘असा हा बालगंधर्व’ ही बालगंधर्वांचा जीवनपट उलगडणारी कादंबरी आणि आजच्या मालिका विश्वाच्या पडदयामागच्या वास्तवाच दर्शन घडवणारी ‘एट एनी कॉस्ट’ ही कादंबरी वैशिष्टयपूर्ण ठरली. दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयात कलेचे धडे गिरवणारे श्री.भडकमकर यांनी अनेक मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटांची पटकथाही त्यांनी लिहीली आहे. ‘आम्ही असू लाडके’ हा मराठी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शीत केला आहे. विविध नाटकही त्यांनी लिहीली आहेत.

नाट्य दिग्दर्शनातील योगदानासाठी सुनील शानबाग यांना सन्मानित करण्यात आले. सुनील शानबाग यांची नाट्य दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे. प्रसिध्द नाट्य दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या सोबत त्यांनी 1974 ते 1984 अशा सलग दहा वर्ष 25 कलाकृतींमध्ये कलाकार व सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली. श्री. शानबाग यांनी कला क्षेत्रातील मित्रांच्या सहकार्याने 1985 मध्ये ‘अपर्णा रिप्रेटरी कंपनीची’ स्थापना केली व या माध्यमातून वर्षाला 50 नाट्य प्रयोग होत असत. श्री. शानबाग यांनी विजय तेंडुलकर लिखीत ‘सायकल वाला’, महेश एलकुंचवार लिखीत ‘प्रतिबिंब’ आणि ‘शफत खान यांचे किस्से’, सयाजी शिंदे लिखीत ‘तुंबुरा’ आणि रामु रामनाथन यांच्या नाटकांचे दिग्दर्शन्‍ केले आहे.

प्रसिध्द तबलावादक पंडित योगेश सामसी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. श्री सामसी यांनी पं. एच. तारंथनराव यांच्याकडून वयाच्या चौथ्यावर्षांपासून तबला वादनाचे धडे घेतले. यानंतर श्री. सामसी यांना सलग दोन दशक प्रसिध्द तबला वादक उस्ताद अल्लारखाँ खान यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसिध्द गायक व नृत्यकालाकारांना श्री सामसी यांनी तबल्याची साथ केली यात उस्ताद विलायत खाँ, पं. अजय चक्रवर्थी,पं. भिमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं.शिवकुमार शर्मा आदी दिग्गजांचा समावेश आहे.

लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना लोककलेतील योगदानासाठी गौरविण्यात आले. लोककला अकादमी अंतर्गत शाहीर अमरशेख अध्यासनाचे प्रमुख असलेले डॉ खांडगे १९७८ पासून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी इंडियन नॅशनल थिएटर, लोककला संशोधन केंद्राचे ज्येष्ठ नाटककार अशोक परांजपे आणि ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाला सुरुवात केली. डॉ. खांडगे यांनी चीनमध्ये लोककला लोकसंगीत परिषदमध्ये चार वेळा प्रतिनिधित्व केले, तर सॅन होजे येथे विश्व मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी व्याख्यान दिले. नॅशविलमध्ये अमेरिकन फोकलोअर सोसायटीमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय ते राज्य आणि केंद्राच्या विविध सांस्कृतिक समित्यांवर कार्यरत आहेत. ‘प्रयोगात्म लोककला’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे.

१ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९५२ पासून संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

डॉ संध्या पुरेचा यांना अकादमीची फेलोशीप

ललीत कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली. प्रसिध्द भरत नाटयम नृत्यांगणा असलेल्या डॉ. पुरेचा या मुंबई स्थित कला परिचय संस्थेच्या संचालीका तसेच सरफोजीराजे भोसले भरत नाट्यम प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या सचिव आहेत. आचार्य पार्वती कुमार यांच्याकडून डॉ. पुरेचा यांनी भरत नाटयमचे धडे घेतले. त्यांनी ‘नाट्य शास्त्र’विषयावर संशोधनही केले आहे. त्यांना या कार्यक्रमात फेलोशीप ३ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
छत्रपतींचे स्मारक प्रेरणेचा स्त्रोत - मुख्यमंत्री

छत्रपतींचे स्मारक प्रेरणेचा स्त्रोत - मुख्यमंत्री




हिंगोली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिंगोली नगरपालिकेच्या वतीने हिंगोली शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या अनावरण समारंभास पालकमंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार रामराव वडकुते, आमदार विक्रम काळे, आमदार संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवरायांच्या भव्य स्मारकाचे अनावरण करण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, सर्वसामान्यांना अत्याचाराच्या जोखडातून दूर सारुन स्वराज्याची संकल्पना रुढ केली. अशा महापुरुषांचे स्मारक आपल्या सर्वांना सदोदीत प्रेरणा देत राहिल. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व महान होते. त्यांनी छोट्या छोट्या विखुरलेल्या लोकांना एकत्र आणून स्वराज्यासाठी लढा दिला. स्वराज्यातून सुराज्याकडे वाटचाल करीत परिवर्तन घडवले. समाजातील जातीभेद, भेदभाव दूर करुन सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार दिला. त्या शिवरायांच्या राज्याची संकल्पना त्यांच्याच अशिर्वादाने राज्य सरकार काम करीत आहे. शेवटच्या माणसापर्यंत काम करीत वेगवेगळे निर्णय घेत हे सरकार वाटचाल करीत आहे. असे सांगून मुख्यमंत्र्यांनी हिंगोली येथील शिवाजी महाराजांचा हा पुतळा अत्यंत तेजस्वी असल्याचे सांगत आयोजकांचे अभिनंदन केले.

प्रारंभी पुतळ्याचे रिमोटद्वारे अनावरण करुन मुख्यमंत्री व मान्यवरांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. प्रास्ताविकात नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी माहिती दिली. हिंगोली नगर पालिकेने शासनाच्या मान्यतेने पुतळ्यासाठी विश्रामगृहा शेजारची 6200 चौ. फु. जागा 41 लाख 26 हजार रुपयांना खरेदी केली व त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारला. यासाठी व सुशोभिकरणाच्या कामांसाठी विविध योजनेतून 76 लाख 19 हजार रुपये खर्च करण्यात आला. या पुतळ्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्यांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी स्वागत केले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलीस अधिक्षक योगेश कुमार , यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, January 08, 2019

43 नक्षलवादी व समर्थकांना अटक, 19 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

43 नक्षलवादी व समर्थकांना अटक, 19 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण



नागपूर, ता. 8 - गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपृष्ठात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना यंदाच्या वर्षात अभुतपुर्व यश प्राप्त झाले. नुकत्याच संपलेल्या 2018 या वर्षात पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या बळावर वर्षभरात 50 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. तर 43 नक्षलवादी व समर्थकांना अटक करण्यात आली आहे. तसेच 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असून यंदाच्या वर्षात पोलीसच नक्षलवाद्यांवर वरचढ ठरले आहेत.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठे आव्हान असलेली नक्षल चळवळ महाराष्ट्रात 1980 च्या दशकात सुरू झाली. तत्कालीन आंध्रप्रदेश (सध्याचा तेलंगणा) मधून या चळवळीने तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचा भाग असलेल्या सिरोंचा या भागात सर्वप्रथम प्रवेश केला. सुरुवातीला राज्याच्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि नांदेड या सहा जिल्ह्यात कार्यरत असलेला नक्षलवाद हा आता केवळ गडचिरोली जिल्हा तसेच गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यापुरताच मर्यादीत राहिला आहे. नक्षलग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणा-या लोककल्याणकारी व विकासाच्या विविध योजनांमुळे तसेच पोलिसांचा दुर्गम भागातील ग्रामस्थांशी वाढलेला जनसंपर्क व संवादामुळे शासनाच्या विकासाला जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळू लागला आहे. पोलिसांच्या यशस्वी विशेष रणनितीमुळे 2018 या वर्षात नक्षली चळवळीला मोठ्या प्रमाणावर हादरा बसून नक्षल चळवळीची प्रचंड मोठी हानी झाली आहे. नक्षल्यांबरोबरीच्या लढाईत पोलिसांनी उत्तम कामगिरी राहिली.

2018 या वर्षात एकूण 50 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. यंदाच्या वर्षात केवळ एका महिण्यात 44 नक्षलवादी, तर एकाच चकमकीमध्ये एकूण 40 नक्षलवादी ठार करण्यात फार मोठे यश प्राप्त झाले. पोलिसांनी 43 नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यातही यश मिळविले असून 19 नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारला. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला. 80 गावांनी गावबंदी ठराव करून नक्षल्यांना गावाबाहेरच रोखल्यामुळे नक्षल्यांचा जनाधार ओसरला. या वर्षात मोठ्या प्रमाणावर नक्षली मारले गेल्यामुळे नक्षल्यांचे संख्याबळही कमी झाले आहे. एकीकडे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन अनेक नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करीत असल्यामुळे नक्षल्यांना त्यांचे उर्वरीत संख्याबळही टिकवून ठेवणे कठीण झाले आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील स्थानिक जनतेने नक्षल्यांना गावबंदी करून शासनाच्या विकासाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे नक्षल भरतीसाठी तरूण मिळत नसल्याने नक्षल्यांची चळवळ कमकुवत झाली आहे. स्वतःचे अस्तित्व संपण्याच्या भितीमुळेच नक्षली सध्या भ्याड हल्ला करून निरापराध सामान्य नागरीकांचे बळी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये स्थानिक गावक-यांनी नक्षली बॅनर, नक्षल नेत्यांचे पुतळे जाळल्याने, तसेच नक्षल स्मारक तोडल्यामुळे उरलेला जनाधारही नक्षल्यांचा कमी झालेला आहे. त्यातच पोलिसांनी चहुबाजुने केलेल्या नाकेबंदीमुळे नक्षलवादी सध्या बॅकफुटवर येऊन हतबल झालेले आहेत.




गडचिरोली पोलीस दलातील शूर जवानांचे अभुतपुर्व यश -
शरद शेलार, विशेष पोलिस महानिरीक्षक, नविअ, म.रा. नागपूर

हिंसेचे समर्थन करणा-या नक्षलवाद्यांना प्रतिउत्तर देऊन गडचिरोली पोलीस दलातील शूर जवानांनी सरलेल्या वर्षात अभुतपुर्व असे यश प्राप्त केले आहे. या हिंसक प्रवाहात भरकटलेल्या नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू असून नुकतेच शरण आलेले सात जहाल नक्षलवादी, हे त्याचीच परिणिती आहे, अशी प्रतिक्रिया नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख तथा विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिली.
विविध योजनांतून सामाजिक सुरक्षाही लाभणार

विविध योजनांतून सामाजिक सुरक्षाही लाभणार


राज्यातील कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ
 मुंबई - राज्यातील कोतवालांच्या मानधनात सेवाज्येष्ठतेनुसार भरीव वाढ करण्यासह आरोग्य, अपघात व निवृत्तीवेतनाच्या योजना लागू करून त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यास आज झालेल्या राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा राज्यातील दहा हजाराहून अधिक कोतवालांना लाभ होणार आहे.

राज्यातील मानधनावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार अशा प्रकारची एकछत्र योजना तयार करण्यासाठी अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय सचिव समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या शिफारशींवर शासनाने निर्णय घेऊन कोतवालांसाठी विविध निर्णय घेतले आहेत. पूर्वी एक हजार लोकसंख्येपर्यंत एक कोतवाल, 1001 ते 3000 लोकसंख्येपर्यंत दोन कोतवाल आणि 3001 व त्यापेक्षा अधिक लोकसंख्येपर्यंत तीन कोतवालांची संख्या निश्चित करण्यात आली होती. मात्र, एका साझास एक कोतवाल या धोरणानुसार कोतवालांची पदे भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात साझ्यांची संख्या 12 हजार 637 असून त्यासाठी कोतवालांची एकूण 10 हजार 610 पदे मंजूर आहेत. वाढती लोकसंख्या व वाढत्या नागरीकरणामुळे क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ यामुळे एकूण 16 हजार 268 इतकी पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोतवाल हे शासनाचे अवर्गीकृत कर्मचारी असून त्यांना सेवाप्रवेश नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, त्यांना महाराष्ट्र नागरी सेवेचे नियम लागू नाहीत. कोतवालांना 1 जानेवारी 2012 पासून सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. आजच्या निर्णयामुळे कोतवालांना सेवाज्येष्ठतेनुसार 10 वर्षापर्यंत सेवा झाल्यास 7500 रुपये, 11 ते 20 वर्षापर्यंत 7500+3 टक्के, 21 ते 30 वर्षापर्यंत 7500+4 टक्के व 31 वर्षांहून अधिक सेवा झालेल्या कोतवालांसाठी 7500+5 टक्के इतके मानधन मिळणार आहे. तसेच 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक कोतवालास 15 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

महसूल विभागातील गट ड मधील पदांवर कोतवालांची नियुक्ती केली जाते. अशा प्रथम नियुक्तीच्या पदांपैकी नियमित पदांमधून 25 टक्क्यांऐवजी आता 40 टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासाठी सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. या कोट्यातील पदांवर पदोन्नतीस पात्र ठरलेल्या कोतवालांची संबंधित पदावर नियुक्ती होईपर्यंत त्यांना दरमहा 15 हजार इतके मानधन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात योजना, अटल निवृत्तीवेतन योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोतवालांचा समावेश करून सामाजिक सुरक्षा दिली जाणार आहे. या योजनांच्या हप्त्यांची रक्कम देखील शासनाकडून भरण्यात येणार आहे.

-----0-----

  • जागतिक बँकेच्या सहाय्याने 2220 कोटींची गुंतवणूक
  • कृषी व कृषीपूरक घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी
  • राज्यात स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी करणार

राज्यातील कृषी व कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा राज्यातील शेती क्षेत्रास मोठा लाभ होणार असून ग्राम विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने (IBRD) सुमारे 2220 कोटी रुपयांची (300 दशलक्ष डॉलर) गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये जागतिक बँकेच्या कर्जाचा हिस्सा 70 टक्के (1554 कोटी रुपये), राज्य शासनाचा हिस्सा 26.67 टक्के (592 कोटी रुपये) आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनचा हिस्सा 3.33 टक्के (74 कोटी रुपये) राहणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालावधी सहा वर्षे इतका ठरविण्यात आला आहे.

आजच्या निर्णयानुसार प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळासह प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. या कक्षासाठी प्रथम टप्प्यात पूर्णवेळ 37 पदे (14 शासकीय व 23 कंत्राटी) कृषि आयुक्तालयाच्या आस्थापनेवर अस्थायी स्वरुपात निर्माण करण्यात येतील. आराखडा तयार झाल्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात येईल. कृषी विभाग नोडल एजन्सी म्हणून कार्य करणार असून कृषी, पदुम, पणन, सहकार आणि ग्रामविकास विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांच्या (VSTF) अध्यक्षतेखाली प्रकल्प समन्वय समिती (PCC) स्थापन करण्यात येईल. या प्रकल्पाशी निगडीत धोरणात्मक बाबींवर राज्य पातळीवरुन निर्णय घेण्यासह प्रकल्पाच्या राज्यस्तरीय सनियंत्रणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी मालाच्या पणन विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यामध्ये शेतमाल बाजार प्रवेशाच्या नोंदी, प्रतवारी, गुणवत्ता तपासणी, संगणकीकृत शेतमाल लिलाव पद्धती, साठवणूक सुविधा, निर्यात सुविधा निर्मिती, अस्तित्वातील सुविधांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजार समित्यांना ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकीकृत बाजार नेटवर्कद्वारे (Network) जोडण्याची सुविधा यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती व त्यांच्या सक्रीय सहभागातून शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे, शेतमालाचे काढणीपश्चात व्यवस्थापन व प्राथमिक प्रक्रियेद्वारे मुल्यवृद्धी करणे, ग्राहकांसाठी सुरक्षित खाद्य (Safe Food) उत्पादित करण्यास मदत करणे आणि या सर्व उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांच्यासाठी उपजीविकेचे स्त्रोत निर्माण करणे आदी या प्रकल्पाचे प्रमुख उद्देश आहेत.

प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपन्या, साधारण स्वारस्य गट, शेतकरी स्वारस्य गट यांची स्थापना करण्यासह त्यांचे बळकटीकरण आणि कौशल्य विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत स्थापित संस्थांची वार्षिक उलाढाल वाढविणे व त्यांची जोडणी प्रस्थापित खाजगी व्यावसायिकांशी करण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यात येणार आहे. शेतकरी उत्पादक संस्था, उत्पादक समूह व इतर संबंधित संस्थांचा विकास व्यापार केंद्र म्हणून केला जाईल. तसेच विभागनिहाय बाजार सुलभता केंद्राची (Market Facilitation Center) स्थापना केली जाईल. प्रभावी कृषि पणन व्यवस्थेसाठी बाजार केंद्रांशी जोडणी करण्यासह या बाजार केंद्रात कृषि उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी उत्पादक संस्था, ग्रामीण बाजार, वखार महामंडळ, खाजगी बाजार इत्यादींचा समावेश असेल. ग्रामीण बाजारांतून वितरण केंद्रांची स्थापना आणि धान्य व फळे-भाज्या बाजार समुहाची स्थापना केली जाणार आहे.




  • राज्यातील नगर पंचायत व परिषदेच्या १४१६
  • रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार

राज्यातील विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असलेल्या 1416 कर्मचाऱ्यांना या पालिकांच्या सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यास आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास अस्थायी पदनिर्मिती करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ 11 मार्च 1993 ते 27 मार्च 2000 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

राज्य शासनाच्या 6 मे 2000 च्या निर्णयानुसार राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील 10 मार्च 1993 पूर्वीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार 1416 कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यास आज मंजुरी देण्यात आली. दरम्यान कनिष्ठ अभियंता व आरोग्य निरीक्षक या पदांचा समावेश राज्य संवर्गात करण्यात आल्याने या पदावर कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे समायोजन लिपिक या पदावर करण्यात येणार आहे. या पदांना आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता तपासून त्यांचे समावेशन करण्यात येणार आहे

Monday, January 07, 2019

"पीएम नरेंद्र मोदी" चित्रपट; २३ भाषांतील पोस्टरचे अनावरण

"पीएम नरेंद्र मोदी" चित्रपट; २३ भाषांतील पोस्टरचे अनावरण


मुंबई, दि. 7 : पीएम नरेंद्र मोदी चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटातून राजयोगी व्यक्त्तित्वाच्या आणि वैश्विक नेत्याचे जीवन जगासमोर येणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

लिजंड ग्लोबल स्टुडिओ प्रस्तृत पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या ग्रॅण्ड पोस्टरचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते गरवारे क्लब हाऊस वानखेडे स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते व ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय, संदिप सिंग, चित्रपटात मुख्य भुमिका साकारणारे अभिनेता विवेक ओबेरॉय आणि दिग्दर्शक ओमंग कुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले, हे ग्रॅण्ड पोस्टर एकाच वेळी तेवीस भाषांत प्रदर्शित होणार आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भारताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने या युगातील वैश्विक असे नेतृत्त्व जगाला दिले आहे. त्यांच्याकडे आकांक्षा पूर्ण करणारे नेतृत्त्व म्हणून जनता मोठ्या आशेने पाहते आहे. त्यामुळे असा चित्रपट बनविणे हा सुद्धा एक मोठा विचार आहे. या चित्रपटासाठी एक चांगली टीम तयार झाली आहे. ज्यामुळे एक प्रेरक चित्रट निर्माण होईल. कारण भारतातील युवा पिढीकडे मोठी क्षमता आहे. पण त्यांना गरज आहे,ती अशा प्रेरक जीवन दर्शनाची. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबीतून येऊन अगदी चहा विक्रेता, संन्यस्त आणि संघटन कुशलता ते राजकीय व्यासपीठ आणि प्रधानमंत्री पद अशा वाटचातीलून युवा पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. त्या अर्थाने ते राजयोगी आहेत. त्यांच्यामध्ये राजा आणि योगीत्व असा संयोग आहे. त्यामुळेच या चित्रपटाच्या माध्यमातून युवा पिढीला मोठी प्रेरणा मिळेल.

याप्रसंगी निर्माता सुरेश ओबेरॅाय तसेच दिग्दर्शक ओमंग कुमार, अभिनेता विवेक ओबेरॅाय यांनी, हा चित्रपट म्हणजे एक मोठे आव्हान तसेच मोठी संधी असल्याचे सांगितले. विद्यमान प्रधानमंत्री असलेल्या नेतृत्त्वाबाबत, त्यांच्या कारकिर्दीतच चित्रपट साकारण्याची ही अभूतपूर्व संधी असल्याचे, त्यांनी नमूद केले.
समृद्धी महामार्गाच्या कामाचा लवकरच प्रारंभ

समृद्धी महामार्गाच्या कामाचा लवकरच प्रारंभ


राज्याचं आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवणारा महामार्ग

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 7 : नागपूर-मुंबई द्रूतगती समृद्धी महामार्गासाठीच्या पर्यावरण आणि वन विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून लवकरच कामाचा प्रारंभ करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विविध बँकेच्या व्यवस्थापक-प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित हेाते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नागपूर-मुंबई द्रूतगती समृद्धी महामार्गासाठीचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. हा देशातील महत्वाचा रस्ता प्रकल्प आहे. हा महामार्ग महाराष्ट्र राज्याला 20 वर्ष पुढे घेऊन जाणारा आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट होऊन अनेक उद्योग धंद्यांना चालना मिळणार आहे. महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्रामुळे शेतीचा आणि परिसराचा विकास होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.

हा महामार्ग जेएनपीटीला जोडला जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीला गतिमानता येऊन व्यापार-उद्योग वाढीस लागतील. हा महामार्ग खऱ्या अर्थाने राज्याला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना समृद्ध करुन राज्याचे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवणारा महामार्ग असणार आहे.

प्रारंभी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या पूर्वतयारी प्रगतीबाबतचे सादरीकरण केले. यावेळी ते म्हणाले, समृद्धी महामार्गाची लांबी 710 किमी असून हा महामार्ग दहा जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गाशी 30 तालुके आणि 354 गावे जोडली जाणार आहेत. तसेच या मार्गावर 24 कृषी समृद्धी केंद्रे असणार आहेत. तेथे कारखाने, दुकाने, वर्कशॉप असतील. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. हा महामार्ग अजिंठा, वेरुळ, लोणार ही पर्यटनस्थळे आणि शिर्डी, शेगाव या तीर्थक्षेत्रांशी जोडला जाईल. तसेच दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा आणि जालना-वर्धा येथील ड्राय पोर्ट हे जेएनपीटीशी जोडले जाणार आहे. हा महामार्ग जगातील उत्तम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन बांधण्यात येणार आहे. या कामासाठी 13 कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत.

यावेळी बँकेच्या प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी,स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, देना बँक, आंध्रा बँक, इंडियन बँक, ॲक्सीस बँक, येस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कार्पोरेशन बँक तसेच एलआयसी, हडको, आयआयएफसीएलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली, 7 : उत्कृष्ट कार्य करणा-या महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना आज केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने येथील प्रवासी भारतीय भवनात आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार 2017-18’चे वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. विरेंद्र कुमार व सचिव राकेश श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने चालविण्यात येणा-या ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ आणि ‘राष्ट्रीय पोषण आहार’योजनेंतर्गत विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या देशातील विविध राज्यांतील अंगणवाडी सेविकांना यावेळी पुरस्कार वितरीत करण्यात आले. महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांनाही यावेळी सम्मानीत करण्यात आले.

यावेळी अमरावती जिल्हयात वरूड बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत कुरळी अंगणवाडीच्या अर्चना सालोडे आणि टेंभुलखेडा अंगणवाडीच्या वनिता कोसे या अंगणवाडी सेविकांना सन्मानीत करण्यात आले. तसेच, चंद्रपूर जिल्हयातील वरोरा बाल विकास योजना प्रकल्पांतर्गत येनसा अंगणवाडीच्या अंजली बोरेकर, कोल्हापूर जिल्हयातील करवीर प्रकल्पांतर्गत हनबरवाडी अंगणवाडीच्या अक्काताई ढेरे आणि ठाणे जिल्हयातील मुंब्रा प्रकल्पांतर्गत रेती बंदर अंगणवाडीच्या स्नेहा क्षिरसागर या अंगणवाडी सेविकांना यावेळी सन्मानीत करण्यात आले.

महाराष्ट्रातील या सर्व अंगणवाडी सेविकांनी विविध जनजागृती कार्यक्रम हाती घेत लहान मुलांची आधार कार्ड नोंदणी, कुपोषण मुक्त अभियान,स्वच्छ भारत अभियान, स्वानंदी अभियान, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ अभियान यशस्वीपणे राबविले आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेवून त्यांना राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Monday, December 24, 2018

श्री दत्तजयंती ऊत्सव सोहळा भक्तीभावात

श्री दत्तजयंती ऊत्सव सोहळा भक्तीभावात


साध्वी सर्वेश्वरीताई यांचे नेतृत्व


विनोद खंडारे/ नांदुरा
शहरातील श्री भवानी शंकर मंदिर, बढे हाॅस्पीटल परीसरातील शिवालय आश्रम येथे प्रतिवर्षनुसार यंदाही श्री दत्तजयंती ऊत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावात झाला.
शुक्रवार दि. २१ डिसेंबर रोजी संस्थानचे श्री गजानन महाराज सभागृहात धुळे येथील वेदशास्त्रसंपन्न ब्रंम्हवृंदांचे पौरोहित्यात नवचंडी होमहवन, विधिवत महापुजा व सव्वालाख महामृत्युंजय जप विधीवत संपंन्न होऊन ऊत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.
  शनीवार दि.२२ डिसेंबर ,,श्री दत्तजयंती,, रोजी सकाळी ८ वाजता ऊत्सवात सहभागी होण्यासाठी श्री गजानन महाराज पादुका श्रीक्षेत्र मुंडगांव येथील अध्यक्ष, तथा विश्वस्त,यांचे ,,श्रीं च्या,, पादुका पालखीसह आगमन झाले.त्यानंतर श्रीं ची तथा श्री दत्तगुरू यांची विधीवत स्थापना करण्यात आली.शिवालय आश्रमाच्या सर्वोसर्वा तथाऊत्सवाच्या आयोजक साध्वी सर्वैश्वरीताई यांनी ब्रंम्हवृंदाचे पौराहित्यात श्रीं चा रूद्राभिषेक करण्यात येऊन महाआरती करण्यात आली.या प्रसंगी विविध पंचपक्वांण्यांचा छप्पनभोग महानैवद्य अर्पण करण्यात आला.त्यानंतर महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला.

    दुपारी ४ वाजता हभप रामभाऊ झांबरे यांचे नेतृत्वात भव्य दिंडी पालखी राजवैभवी शोभायात्रा नांदुरा शहराचे प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.यामध्ये श्री गजानन महाराज पादुका संस्थान,मुंडगांव येथील भजनी मंडळ,गायनाचार्य,मुदुंगाचार्य,टाळकरी,अश्व, भगव्या पताकाधारी  तसेच अकोला येथील संकल्प ढोलताषा पथक ईत्यादिसह पंचक्रोशीतिल हजारो भाविक, महिला सहभागी झालेले होते.रात्री ८ वाजता शोभायात्रा शिवालय आश्रम येथे पोहोचल्यावर श्रीं ची शयन आरती केल्यावर ऊत्सवाची सांगता करण्यात आली.

    कार्यक्रमात श्री गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगांव चे अध्यक्ष ज्वारसिंग आसोले, ऊपाध्यक्ष गणेशराव कळसकार,हभप रामभाऊ महाराज झांबरे,डाॅ. ऊमेश बढे, गजानन पाटिल(आडोळ),शंकरराव गावंडे(निपाणा),सुरजरतन कोठारी,पीएसआय रमेश धामोळे, हरीभाऊ भिसे, मुकेश डागा, छोटुभाऊ तळोले,सचिन भिसे ईत्यादी मान्यवरसहभागी झालेले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ सदगुरू श्री रामचंद्र महाराज सेवा परीवार सदस्यासह अनेकांनी परीश्रम घेतले होते.

Saturday, December 22, 2018

राजूर येथे जनावरे, शेतमालाचे राज्यस्तरीय प्रदर्शन

राजूर येथे जनावरे, शेतमालाचे राज्यस्तरीय प्रदर्शन


    (खबरबात प्रतिनिधी -विष्णु तळपाडे)
      अकोले तालुक्यातील राजुर येथे देशी व डांगी जनावरांचे तसेच शेतमालाचे भव्य राज्यस्तरीय प्रदर्शन २२डिसेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती राजुर ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच 'सौ.हेमलता पिचड यांनी दिली आहे .
        सालाबाद प्रमाणे राजुर येथील देशी व डांगी जनावरांचे तसेच शेतीमालाचे भव्य असे राज्यस्तरीय प्रदर्शन २२-२५डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे .
       २२व२३डिसेंबर रोजी स्पर्धेत भाग घेणाऱ्या जनावरांची नाव नोंदणी होणार असून सोमवार २४डिसेंबर रोजी सकाळी ११-२या वेळत डांगी व संकरीत जनावरांची निवड केली जाणार आहे.
               बक्षिस वितरण कार्यक्रम माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आ.वैभव पिचड यांच्या शुभहस्ते संपन्न होणारआहे.नाशिक विभागाचे आयुकत डाँ किरण कुलकर्णी,अहमदनगर जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डाँ.सुनिल तुंभारे,सिताराम गायकर आदी उपस्थित राहणार आहेत
             संपूर्ण राज्यात राजुर येथील प्रदर्शन प्रसिध्द असून राज्यभरातुन शेतकरी जनावरे व शेतमाल येथे विक्रीस आणतात.तमाशा रहाटपाळणे विविध खेळाची दुकाने अशी अनेक करमणुकीची साधने या प्रदर्शनामध्ये असल्यामुळे वडिलधारी मंडळी सोबत बालगोपाळांची मोठी गर्दी होताना दिसते .
        शेतकऱ्यांनी प्रदर्शनास मोठ्या संख्यानी उपस्थित राहुन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे!

Tuesday, November 27, 2018

निसर्गाचा प्रकोप आणि सरकारची कुंभकर्णी झोप

निसर्गाचा प्रकोप आणि सरकारची कुंभकर्णी झोप




   कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

     लोणखेडे - जवा दुष्काळ घिरट्या घाली, तवा बळीराजाला कुणीना वाली असच चित्र सध्या दिसते . सततचा दुष्काळ त्यातही यावर्षीचा महाभयंकर दुष्काळ यातुनही मार्ग काढीत कसाबसा पिकविलेला कांदा आज जेव्हा कवडीमोल भावाने विकला जातो, रस्त्यावर फेकला जातो , तेव्हा शेतकरी व त्याच्या कुटूंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात. दिनवानी होऊन शेतकरी राजा म्हणतो मी कसला राजा? राजा तर कुंभकर्णी झोप घेतोय..आणि शेतकरी राजाला कायमच सरणावर झोपवायची सोय करतोय.
 
      लोणखेडे गावातील शेतकरी काल चांदवड बाजारपेठेत कांदा विक्रीस घेऊन गेले कांदा चांगल्या प्रतीचा असूनही त्याला कवडीमोल दर मिळाला . सर्व स्वप्नं दुःखाश्रू बनून वाहू लागले  शेतकरी जाईल तरी कुठं ..? झोपलेल्यास उठविता येत परंतु कुंभकर्णी झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जागवण आता अशक्यच वाटू लागले .

      कांदा उत्पादक प्रचंड अडचणीत सापडलेला असताना त्याच्या दुःखावर फुंकर मारणार कुणीही नाही, ठोस निर्णय घेतला जात नाही..कृषीप्रधान देशात कृषकाचीच अशी दुरावस्था ही मोठी शोकांतीकाच म्हणावी लागेल.


मी ३३. ४० किलो चांगल्या प्रतीचा कांदा विकला फक्त ३९०/-रु. क्विंटल दराने मला हमाली काढून रुपये मिळाले  १२६७४/ त्यातून गाडीभाडे ४०००, कांदे काढणे मजूरी ३५००, लागवडीसाठी ३०००, खत, नांगरणी, निंदणी, फवारणी इ. साठी ९५००.  ४ महिने मी व माझे कुटूंबीय राबले ती मजुरी तर हिशेबातच नाही..आलेल्या पैशातून नफा व मजूरी तर सोडा पण टाकलेल्या भांडवलाचा निम्मे खर्चही निघाला नाही. खरंच आता या कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललेल्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांना कुणीच वाली नाही. म्हणून खूपच वाईट वाटत.
      गेल्या ३/४ वर्षापासून सतत दुष्काळ  पडतो.  शेती मालाचे उत्पादन निम्मे झाले , तर खर्च चौपट झाला  भाव मात्र घटतोय पण वाढत नाही, पाणी नाही, कसेबसे पिकल तर विकल जात नाही.. मग शेतकरी जगेल तरी कसा ?  त्याला सर्व पर्याय संपतात म्हणून हताशपणे  चुकीचे मार्ग पत्करतो...
         गौरव वाघ - एक शेतकरी 

Wednesday, November 21, 2018

धनगर समाजाने कधी जल्लोष करायचा?

धनगर समाजाने कधी जल्लोष करायचा?


गणेश न्याहळदे /धुळे, खबरबात
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडविणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आज चार वर्षे उलटूनही धनगर आरक्षणाचा प्रश्न या सरकारने मार्गी लावलेला नाही .धनगर समुदायाने कधी जल्लोष करायचा याची तारीख मुख्यमंत्र्यांनी सांगावी,अशी मागणी धनगर समाज संघर्ष समिती व समस्त धनगर समाज जैताने यांनी केली आहे.

धनगर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी टिस या संस्थेला या सरकारने काम दिले होते.आरक्षणाचा सर्व अभ्यास करून चार वर्षानंतर हा अहवाल संस्थेने सरकारकडे दिला आहे.त्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी, एक महिना या अहवालाचा अभ्यास करून धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल ,असे आश्वासन दिले होते परंतु मुख्यमंत्र्यांना याचा विसर पडलेला दिसतो आहे. केवळ केंद्र शासनाकडे अहवाल सादर करणे एवढेच काम नाही तर त्याचा तात्काळ पाठपुरवठा करून धनगर आरक्षण ची आंबलबजावनी झाली पाहिजे असे अशोक मुजगे म्हणाले.

ज्या वेळेस धनगर समाजाला जातीचे प्रमाणपत्र हातात पडतील त्याच वेळी धनगर समाजला आरक्षण मिळेल , परंतु हे सरकार केवळ चालढकल करीत आहे. चालू अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा व धनगरांना जल्लोषाची तारीख सांगावी आता धनगरांचा अंत पाहू नका अन्यथा धनगर समाज संघर्ष समिती तर्फे आंदोलनाचा इशाराही अशोक मुजगे यांनी दिला
यंदाना वरीसमा आमनाकडे कांदास्नी कया वांधा

यंदाना वरीसमा आमनाकडे कांदास्नी कया वांधा




धुळे / गणेश जैन, खबरबात
साक्री तालुक्यातील बळसाणे , दुसाणे , इंदवे , हाट्टी , ऐचाळे , म्हसाळे , लोणखेडी , घानेगाव , कढरे , सतमाने , छावडी , अमोदे, आगरपाडा , परसुळे , कर्ले , देवी व माळमाथा परिसर सांगितल्यावर कांदा उत्पादनाचे माहेर घर माळमाथा परिसरात कांदा उत्पादनाच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर असून वर्षाकाली साधारण पणे १८०० ते २००० ट्रक कांद्याचा भरून या भागातून पाठविला जातो.

यंदा सुरुवातीपासून पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले पुर्ण पावसाळ्यात या परिसरात असा एक ही जोरदार पाऊस झाला नाही यामुळे नद्या , नाल्यांना पूर आला नाही व शेतातील वहिरींच्या जलपातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही याकारणाने शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात कांदा लागवड करता आली नाही विहीरीत आहे तेवढ्या पाण्यावर शेतकऱ्यांनी अथांग प्रयत्नाने कांदा लागवड केली त्यातच पावसाने नुकसान केले

शेतकऱ्यांनी दिवस रात्र करून कांद्याला जगविले परंतु कांद्याला हमीभाव मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे कांदा खंडणी नंतर काय भाव मिळेल याचा भरवसा नाही कांद्याला एकरी खर्च जर पाहिले तर ४० ते ५० हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना येत असतो वाढलेले भाव मजूर दर वाढ अशा अनेक कारणांनी शेतकऱ्यांना मोठा खर्च येत असल्याने शेतकऱ्यांना सध्या १५० ते ८०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने खर्चच्या मानाने शेतकऱ्यांना कांदा पिक पुरवडत नसल्याचे शेतकऱ्याकडून सांगितले जाते आहे

शासनाने कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे या परिसरात शेतकऱ्यांची अर्थिक घडामोडी कांदा या पिकावरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यांची सर्वच अर्थिक गणित बिघडलेली आहेत याकारणाने माळमाथा चा शेतकरी मोठ्या कौतुकाने म्हणतात कांदास्नी यंदा भी करात वांदा कसा काय लावो दर वरीसले कांदा अशी भावना शेतकऱ्यांच्या मुखातून उमटत आहे

 
कांद्याला शासनाकडून किमान १५०० रुपयांचा वर हमीभाव मिळणे गरजेचे आहे तरच शेतकरी वर्गाला कांदा पीक पुरवडणार आहे सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे दर गडगडल्याने ऐन दुष्काळी कालावधीत बळसाणेसह माळमाथ्याचा शेतकरी वर्ग अर्थिक अडचणीत सापडला आहे
  वेडू उत्तम खांडेकर
    शेतकरी ( बळसाणे )झ
रुनमळी येथे जवान संदीप पवार यांचा सेवापूर्ती सोहळा

रुनमळी येथे जवान संदीप पवार यांचा सेवापूर्ती सोहळा


खबरबात/ गणेश न्याहळदे
जैताणे (वार्ताहर) ता. (साक्री)
अवघे वय वर्ष दोन असतांना पितृक्षत्र हरपले तरी देखील त्यांच्या आई ने दोघेही मुलांना शिक्षण देत एकाला देशाचे भविष्य घडवण्यासाठी तर दुसरा जवान संदीप पवारला देश्याच्या रक्षणासाठी या मातृभूमीला समर्पित केले त्या मातेने आपल्या जवान संदीपचा गावच्या वतीने सेवपूर्ती सत्कार पाहून आपण कृतघ्न झाल्याची भावना व्यक्त केली.
देशप्रेम व आपल्या राष्ट्राप्रति राष्ट्रनिष्ठा जोपासण्याचे काम समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांचे परम कर्तव्य असते.या राष्ट्राचा पोशिंदा म्हणजेच किसान आणि संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेला जवान हे दोन घटक मात्र निस्वार्थापणे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यात धन्यता मानत असतात असे प्रतिपादन नाशिक येथील भारतीय सैन्यदलातील कर्नल बी.एस. पाटील यांनी साक्री तालुक्यातील रुनमळी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित निवृत्त जवान संदीप पवार यांच्या नागरी सत्कार तथा कृतज्ञता सोहळ्यात केले.
 आपल्याच खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सेवापूर्तीनिमित्त सन्मान होणे खूपच कमी लोकांच्या नशिबी असते.हा गौरव म्हणजे त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाची पावतीच असते.सरक्षणदलात सेवेची संधी मिळणे बहुसंख्य ग्रामीण युवकांचे स्वप्न असते.महाराष्ट्र त्यात अग्रेसर असून सातारा जिल्ह्यासारख्या भागाचा आदर्श घेऊन प्रत्येक गावातून किमान 5 युवकांनी तरी सारक्षणदळात दाखल होऊन मायभूमीची सेवा केली पाहिजे.राष्ट्रीय उभारणीत सर्वात महत्वाचा वाटा असनाऱ्या किसान अर्थात बळीराजाही धरणीला आईची उपमा देऊन निस्वार्थापाने कर्म करत असते म्हणून समजणे त्यांच्याबद्दलही कृतज्ञतेची भावना जोपासली पाहिजे असे कर्नल पाटील यांनी पुढे बोलत असताना नमूद केले.
 या कार्यक्रमात संदीप पवार यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.संपूर्ण गाव तसेच पंचक्रोशीतील मान्यवर रावसाहेब पाटील,जितेंद्र पाटील,एस आर बापू रजाळे,देवा बापू नंदुरबार,यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.
       धनाई पुनाई विधायक मंडळाचे अध्यक्ष बाळूशेठ विसपुते,आदर्श विद्या मंदिर निजामपूर चे प्राचार्य जयंत भामरे,मराठा सेवा संघ धुळे जिल्हा संपूर्ण कार्यकारिणी सदस्य,साक्री पंचायत समिती माजी उपसभापती प्रा.डॉ.रविंद्र ठाकरे,रघुवीर खारकर ,माजी सरपंच खंडू माळचे आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विपिन पवार यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.चंद्रशेखर पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीततेसाठी संजीवन पवार, दिलीप पवार,साक्री तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत पवार,नंदकिशोर वेंडाइत,आदींनी परिश्रम घेतले.रुनमळी ग्रामपंचायत चौकात झालेल्या या कार्यक्रमास शेकडो नागरिकांनी वैयक्तिक तसेच सामूहिक कृतज्ञता व्यक्त करत संदीप पवार यांचा सन्मान केला

Wednesday, September 19, 2018

10 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळ विस्तार

10 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळ विस्तार

10 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळ विस्तार
कुणाची पङणार विकेट; कुणाला मिळणार बाप्पाचा प्रसाद
⚡ सध्या भाजप शिवसेनामधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे भाजपाच्या एकूण चार मंत्रिपदाच्या जागा रिक्त
 शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण, आता भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का? याकडे सर्वांचे लक्ष...
 एकनाथ खडसे यांचे कमबॅक अजूनही गुलदस्त्यात, कृषीमंत्री पद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहण्याची शक्यता...
 आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे-पाटील यांचे स्थान धोक्यात येण्याची शक्यता...
 राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुढील आठवड्यात प्रत्येक खात्याचा मुख्यमंत्री आढावा घेणार, यानंतर मंत्रिपद बदलाबद्दल संबंधितांना सांगितले जाणार...