সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, July 16, 2018

‘त्या’ शेतजमिनीचे वेकोलिने अधिग्रहण करावे:हंसराज अहीर

सेक्शन 4 नोटीफिकेशनच्या मान्यतेकरिता मुख्यालयास अहवाल पाठविण्याची सुचना
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 वेकोलि सास्ती एक्सपान्शन प्रकल्पामुळे कायमस्वरूपी पुराचा धोका निर्माण झालेल्या बाबापूर, कोलगांव, सास्ती या गावांना पुर स्थितीपासून संरक्षण देण्याकरिता नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात यावे, ओवरबर्डनच्या डम्पींगमुळे ही समस्या अधीकच गहन बनल्याने वेकोलिने या ओबीची विल्हेवाट लावावी तसेच रस्त्याअभावी शेतीची कास्त करण्यास अशक्य झालेल्या शेतकÚयांच्या जमिनी संपादीत करण्यासाठी वेकोलि मुख्यालयाकडे अहवाल सादर करावा अशा सुचना केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी तालुका प्रशासन व वेकोलि व्यवस्थापनास संयुक्तपणे केल्या आहेत. 
दि. 14 जुलै रोजी वेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस भाजपा नेते खुशाल बोंडे, जिल्हा उपाध्यक्ष अरूण मस्की, किसान आघाडीचे महामंत्राी राजू घरोटे, मधुकर नरड, तहसिलदार डाॅ. रविंद्र होळी, क्षेत्रिय महाप्रबंधक बी.सी. सिंग, जि.प. सदस्य सुनिल उरकुडे, बादल बेले, अॅड. प्रशांत घरोटे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, विस्तारक सतिश दांडगे, सचिन डोहे, बंडू बोढे, दिलीप गिरसावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
सास्ती, कोलगांव, बाबापूर, मानोली या गावातील शेतकÚयांनी ना. हंसराज अहीर यांची भेट घेवून वेकोलिच्या ओ.बी. डम्पमुळे शेतात मशागत करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. तहसिलदारांनी या ठिकाणी रस्ता उपलब्ध करणे शक्य नसल्याची बाब मंत्राी महोदयांच्या निदर्शनास आणुन दिली. यावेळी ना. अहीर यांनी वेकोलि व्यवस्थापनाने शेतकÚयांच्या अडचणीची दखल घेत त्यांचे मशागत होत नसल्याने होत असलेले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सेक्शन 4 नोटीफिकेशनकरिता अहवाल सादर करून मुख्यालयाची मान्यता प्राप्त करून घ्यावी असे निर्देश क्षेत्रिय महाप्रबंधकांना दिले. शेतकÚयांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता प्राधान्याने घ्यावी अशी सुचना केली. 
वाहिती करण्यास अडचण निर्माण झालेल्या अंदाजे शंभर एकर जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. अधिग्रहणाशिवाय पर्याय नसतांना वेकोलि व्यवस्थापन या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याबद्दल ना. अहीर यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. 
या बैठकीमध्ये वेकोलि सास्ती वसाहतीतील समस्या व मुलभुत प्रश्नांबाबतही चर्चा झाली. वसाहतीमधील अनेक महिलांनी ना. हंसराज अहीर यांची भेट घेवून त्यांचेकडे तक्रार निवेदन सादर केले होते. या वसाहतीमध्ये स्ट्रीटलाईटची व्यवस्था नसल्याचे तसेच गटारे तुंबून असल्याचे व पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात गंदगी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होवून येथील रहिवास्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सर्वत्रा डुकरांचा हैदोस माजला असून रोगराईची शक्यता वाढली असल्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आल्यानंतर ना. हंसराज अहीर यांनी येत्या आठवडाभरात या सर्व तक्रारीचे निवारण करण्यात यावे असे निर्देश देवून कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सुचना क्षेत्रिय महाप्रबंधकास दिल्या. या बैठकीत पं.स. सदस्या नयना परचाके, कोलगांवचे सरपेच पुरूषोत्तम लांडे, ग्रा.पं. सास्तीचे सदस्य कृष्णाअवतार संबोज, पुरूषोत्तम हिंगाणे, मारोती जेनेकर, सुनिल वांढरे, महिला आघाडीच्या सदस्या भावना भोयर व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.