चंद्रपुर जिल्यातील मूल- चंद्रपूर मार्गावर अतिशय दुर्मिळ अशा हनी बैजर( चांदी )अस्वल प्राण्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली.
शनिवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान
मुल चंद्रपुर रोडवर मुल पासुन 3 की.मी.अंतरावर कक्ष क्रमांक 552 येथे चांदी अस्वलीचा मृत्यू झाला.
जगात मोजक्याच ठिकाणी (रैटल) हनी बैजर हा प्राणी आढळतो.त्यातील चंद्रपुर जिल्ह्यातील जंगलात देखील या प्राण्याचे वास्तव्य होते.विशेष म्हणजे हा प्राणी रात्रीच्या सुमारास जास्त बघितला गेला आहे,अनेक हौशी छायाचित्रकार या प्राण्याला कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतात मात्र वर्तमान स्थितीत अजून परीयंत कोणालाच दिसला नसल्याचे जाणकारांचे म्हणने आहे.
वारंवार रस्ते अपघातात होणाऱ्या प्राण्यांच्या मृत्यूमुळे
रोड बांधकामासोबत वन्यप्राण्यान करिता अंडर पासेस अत्यंत गरज असल्याची बाब पुन्हा स्पष्ट झाली.
अंडर पासेसच्या मागणीसाठी महिनाभर आधी ईकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात अन्य वन्यप्रेमींच्या उपस्थितीत मूल ते चंद्रपुर पैदल मार्च देखील काढण्यात आला होता.