काव्यशिल्प Digital Media: पशुसंवर्धन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पशुसंवर्धन. Show all posts
Showing posts with label पशुसंवर्धन. Show all posts

Friday, June 15, 2018

 सुशिक्षित बेरोजगारांना पशुसंवर्धनाचे प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगारांना पशुसंवर्धनाचे प्रशिक्षण

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारासाठी पशुसंवर्धनावर आधारीत प्रशिक्षणाचे आयोजन 28 जून ते 12 जुलै 2018 या कालावधीत महाराष्ट्र  उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर तर्फे करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण 15 दिवसाचे असून  पशुधन व्यवसाय क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून त्या प्रशिक्षणामध्ये  पशुसंवर्धनावर आधारीत विविध विषयांची माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी किमान 10 वी पास व 18 ते 45 वर्ष वयोगटातील  सुशिक्षित बेरोजगार असावा. त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला मार्क शीट, राशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे जे उमेदवार हे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी 27 जून 2018 पर्यत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, बस स्टॉप समोर चंद्रपूर येथे संपर्क साधवा, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
चार दिवसीय निशुल्क शिबीर 

शेती तसेच शेतीपूरक व्यवसायात आवड असणाऱ्या शेतकरी व बेरोजगारांसाठी स्व.प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून चंद्रपूर व जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी तसेच बेरोजगारांसाठी  सुवर्ण संधी चालून आली आहे.स्व.प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे नेते व चंद्रपुर विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी निशुल्क ४ दिवसीय पशु संगोपन आणि संवर्धन प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात करण्यात आले,चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट येथून जवळच असलेल्या वेंडली गावातील संजय सिंघम यांचे फार्म हाऊसवर या संपूर्ण चार दिवस चालणाऱ्या पशु संगोपन आणि संवर्धन प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर १८,१९,२०,२१, जून २०१८ चार दिवस चालणार असून  यात शास्त्रोक्त शेलीपालन व्यवसाय प्रशिक्षण,कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण,मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण,दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागपूर येथील पशुवैद्यकीय जाणकारांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांना लाभणार आहे.