राजुरा तालुक्यातील विरूर पुलिस स्टेशन हद्दीतील पंचाला गावात सोमवारी बरसलेल्या मुसळधार पावसामुळे
घराची भींत पडून एकाच परिवारातील ३ जण ठार,तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे,सोमवारी परिसरात मुसळधार पाउस आला.त्या पावसाच्या पाण्याने भिंतीत ओलावा साचला.मंगळवारी सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान हि भिंत तेथे बसलेल्या चारही लोकांच्या अंगावर पडली, यात बापूजी वडस्कार ६८ , धनराज वडस्कार ४० , चंद्रकांत वडस्कार ३७ यांचा जागीच मृत्यू झाला तर विठ्ठल वडस्कार हे गंभीर जखमी आहेत,हे संपूर्ण लोक एकाच परिवारातील असल्याची प्राथमिक माहिती आहेजिल्ह्यातील अनेक भागात रात्री 12 वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. काही भागात वादळी पाऊस झाला. यामध्ये पंचाळा येथील बापूजी वडस्कर यांच्या घराचे छप्पर कोसळले. आज सकाळी हे छप्पर काढण्यासाठी चंद्रकांतला बोलाविले होते. बापूजी, धनराज, चंद्रकांत व विठ्ठल हे चौघेही छप्पर बाजूला करीत असताना रात्री झालेल्या पावसात भिजलेली भिंत अचानक कोसळली. भिंतीच्या मलब्याखाली चौघेही दबले. यात तिघांचा मृत्यू झाला. घटनेची वार्ता पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत तिघांचा प्राणज्योत मालवली होती.
Showing posts with label ठार. Show all posts
Showing posts with label ठार. Show all posts
Tuesday, June 05, 2018
Tuesday, January 16, 2018
ट्रक आणि कारच्या धडकेत एक ठार ; एक जखमी
by खबरबात
सिंदेवाही /प्रतिनिधी:
सिंदेवाही-चंद्रपूर मार्गावरील सरडपार ते सिंदेवाही मुख्य रस्त्यावरील कळमगाव कार्नरवर ट्रक व कारची जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगलवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. चंदन कोठेवार असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव असल्याचे कळते.
सरडपार ते सिंदेवाही मुख्य रस्त्यावरील कळमगाव कार्नरजवळ ट्रकने समोरून येत असलेल्या कारला जोरदार धडक दिली. यात कारचा समोरील भाग पूर्णपणे चकणाचुर झाला असून यात चंदन कोठेवार ठार झाले.तर वृत्त लिहिपरियंत जखमीचे नाव कळू शकलेले नव्हते. गंभीर अपघातग्रस्ताला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याचे कड़ते.