काव्यशिल्प Digital Media: चंद्रशेखर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label चंद्रशेखर. Show all posts
Showing posts with label चंद्रशेखर. Show all posts

Monday, January 15, 2018

 चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री

चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री

नागपूर/प्रतिनिधी:  
इमेज परिणाम
राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शासनाने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. 
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचे शासकीय परिपत्रक जारी केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर या जिल्ह्याला कुणीही पूर्णवेळ पालकमंत्री नव्हते. यापूर्वी बावनकुळे यांची भंडारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर आता पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळे यांच्याकडे आता नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.