काव्यशिल्प Digital Media: शेळी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label शेळी. Show all posts
Showing posts with label शेळी. Show all posts

Thursday, June 28, 2018

नागपुरातून १ लाख शेळ्या मेंढ्यांची विदेशात निर्यात

नागपुरातून १ लाख शेळ्या मेंढ्यांची विदेशात निर्यात

mendhi sheli ' साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
येत्या शनिवारचा दिवस नागपूर व विदर्भाच्या दृष्टीने ऐतिहासिक राहणार आहे. प्रथमच नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन हजार शेळ्या मेंढ्या आखाती देशांमध्ये निर्यात करण्यात येणार आहेत. या नवीन प्रकल्पाद्वारे शेळी-मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी बाजारपेठ खुली होणार आहे व पुढील तीन महिन्यांत १ लाख शेळ्या-मेंढ्या विदेशात निर्यात करण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती खा.विकास महात्मे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेदरम्यान दिली.
गुरुवारी राजीव गांधी बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेमध्ये त्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आर्थिक विवंचनेतून होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पूरकव्यवसाय करम्यासाठी संधी व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. याच विचारातून डॉ.महात्मे यांना शेळ्या-मेंढ्या विमानाने विदेशात निर्यात करण्याच्या योजनेची कल्पना सुचली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या योजनेला पाठबळ दिले. डॉ.महात्मे यांनी केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांचीदेखील अनेकदा भेट घेऊन या योजनेचा पाठपुरावा केला. या योजनेअंतर्गत ३० जून रोजी दुपारी एक वाजता नागपूर विमानतळावरुन पहिल्या टप्प्यात दोन हजार शेळ्या मेंढ्या निर्यात करण्यात येणार आहेत. निर्यात होणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
मुख्यमंत्री, गडकरी, प्रभूंची उपस्थिती
नागपूर विमानतळावर ३० जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला तीन केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय कृषीमंत्री गजेंद्र शेखावत, राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, हे प्रामुख्याने उपस्थित राहतील, असे डॉ.विकास महात्मे यांनी सांगितले. केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय, मिहान, एअर इंडिया यांच्या संयुक्त सहभागातून ही योजना आखली गेल्याचेदेखील डॉ. महात्मे यांनी सांगितले. निर्यातीचे काम खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे.
पशूधन ‘एटीएम’सारखे काम करेल
या नव्या प्रकल्पाद्वारे मेंढपाळ तसेच शेळी पालन करणाºया शेतकºयांना रोजगाराच्या तसेच आर्थिक उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून शेळी-मेंढी पालनाचा स्वीकार करतील. आर्थिक विवंचनेच्या काळात हेच पशूधन त्यांच्यासाठी ‘एटीएम’सारखे काम करेल, असा विश्वास डॉ.महात्मे यांनी व्यक्त केला.(लोसे)

Tuesday, May 08, 2018

रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू

रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यात घडली आहे. राजुरा तालुक्यातील विरूर रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान ही घटना झाली असून या मध्ये ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर १७ शेळ्यांचे लचके तुटत गंभीर जखमी झाल्या आहे. मंगळवारी  
दुपारच्या दरम्यान शेळ्यांचा कळप रेल्वे ट्रॅक ओलांडत असतांना ही दुर्घटना झाली. बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून चेन्नई च्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रेन ने हा अपघात झाला आहे. दुर्दैवी म्हणजे रेल्वे ट्रॅक च्या दोन्ही बाजूला जाळी लावण्यात असल्यामुळे या शेळ्यांच्या या कळपाला पळून जाता आले नाही आणि त्याचं कारणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या घटनेमुळे शेळी मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव 
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)