काव्यशिल्प Digital Media: पुस्तक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पुस्तक. Show all posts
Showing posts with label पुस्तक. Show all posts

Tuesday, July 31, 2018

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जंगलाची दुनिया या पुस्तकाचे वितरण

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जंगलाची दुनिया या पुस्तकाचे वितरण

चंद्रपूर/प्रतिनिधी:

मध्य चांद वन विभागातील कोठारी,धाबा,बल्लारपूर, पोभूर्ण या चार वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर असल्याने येथे नेहमी मानव - वन्यजिव संघर्ष होतात.त्यामुळे या परिसरात जंगलालगत गावातील विद्याथ्याना निसर्ग सखा संस्थेच्या वतीने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आदरणीय अरण्यऋषी मारोती चितमपल्ली यांनी लिहलेले जंगलाची दुनिया या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रम वनपरिक्षेत्र कोठारी याच्या कार्यलयात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक बी.जी हाके वनपरिक्षेत्र अधिकारी कोठारी यांनी केले तर अध्यक्ष म्हणून प.स.सदस्य सोमेश्वर पद्यगिरीवर हे होते .
निसर्ग सखा संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून ते या परिसरात वन व वन्यजीव संरक्षणाचे कार्य करीत आहे . लोकसहभागाशिवाय वन्यजीव सरंक्षण करणे अवघड असल्याने येथिल नागरिकांनी वन - वन्यजीव संरक्षणा करीता पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन बी.जी हाके यांनी यावेळी केले
अरण्यऋषीं मारोती चितमपल्ली सर हे निसर्ग लेखक म्हणून ख्यातीप्रात आहे.त्यानी लिहलेल्या पुस्तकांनी येथील युवक , विद्याथ्याना निसर्ग व वन्यजीव संरक्षणाची आवड निर्माण होईल.युवक,विद्यार्थी निसर्ग संरक्षणाकडे वळतील अशी आशा आहे असे मत निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दिपक वांढरे यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले वन विभागाने निसर्गअनुभ ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडो मुलांना एक दिवसिय जंगलात शिबीराचे आयोजन केले त्या शिबिरात भाग घेतलेल्या सर्व विध्याथ्याना या पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे असे ते सांगितले. कार्यक्रमास कोठारी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बी.जे.हाके,सोमोश्वर पद्यगिरीवर सदस्य ,प.स.बल्लारपूर,गोलू बाराहोते वन्यजीव फोटोग्राफर, चंद्रपूर, नितीन रायपूर अध्यक्ष,छायाचित्रकार बहु.संस्था, चंद्रपूर ,सुशील खोब्रागडे कोठारी,फुलचंद मेश्राम, चंद्रपूर संदीप गव्हारे,चंद्रपूर दिपक वांढरे अध्यक्ष, निसर्ग सखा संस्था इ उपस्थित होते.

Wednesday, November 15, 2017

 वनक्षेत्रपालाने फुलविली ‘पेंच अभयारण्यातील रानफुले’

वनक्षेत्रपालाने फुलविली ‘पेंच अभयारण्यातील रानफुले’

अतुल देवकरांचा वनमंत्री मुनगंटीवारांकडून सन्मान
 रामटेक/प्रतिनिधी-

पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांत पेंच पुर्व वनपरीक्षेत्राचे वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असलेले अतुल देवकर यांचा राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांची सन्मान केला.नुकतेच अतुल देवकर यांनी ‘पेंचमधील रानफुले’हे पुस्तक लिहीले व प्रकाषीत केले त्याब दल वनमंत्री यांनी पेंच येथील अमलताष सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला.